देउळ बंद..
माणसें झाली उन्मत्त, समजू लागली स्वतःला देव.
देव झाली माणसें असाह्य नजर कैदेत बंद.
शासकीय आदेशानुसार मंदिर बंद राहील.
असेआदेश काढू लागली माणसें.
मंदिर बंद केले तरीही देव मनात असतो.
देव देहाचे मंदिर.
शेंदूर ठरवतं दगडाचं देवपण.
माथा टेकवावे असे पाय जेव्हा नसतात.
बोट धरण्यासाठी हात जेव्हा नसतात.
तेव्हा श्रद्धे बरोबर अंधश्रद्धेचेही पाऊल पडतें वाकडे.
श्रद्धेच्या फुलांचा हार देवाला घालायचा की अंधश्रद्धेचा गजरा मनगटावर बांधायचा हे ठरवता आलं पाहिजे.
लक्ष्मण रेषेची जागा जेव्हा वैधानिक इशारा घेते,
देऊळ बंद असलं तरीही श्रद्धा अंधश्रद्धेचा वावर वैधानिक इशारा देऊन चालूच असतो..
डॉ. अनिल कुलकर्णी