❤❤❤
आवडतं मला तुझ्यात रमायला
पण मन घाबरतं
सर्वकाही सोडायला...
😔
आवडतं मला तुझं म्हणून जगायला
पण मन घाबरतं
तुला सर्वस्व सोपवायला...
🤗
आवडतं मला तुझं स्वप्न पहायला
पण मन घाबरतं
स्वप्न विसरायला...
💑
आवडतं मला तुझ्याजवळ यायला
पण मन घाबरतं
तुझ्यापासून दुरावायला...
😔
आवडतं मला तुझ्यावर प्रेम करायला
पण मन घाबरतं
प्रेमाला मैत्रीचं नावं द्यायला...
💕💕
- कल्याणी जाधव.