#kavyotsav2
।।शिवबा।।
ताठ मानेशी जग
हे तुला ते सांगत आहेत,
एकवटले यावे पुन्हा मराठे
स्वप्न ते पाहत आहे,
घेईल भरारी आकाशात
असे ते जाणत आहे,
रणरणत्या मातीत तुझा हा
आज ही शिवबा उभा आहे.
महाराष्ट्रातील राजा एक
माती कापली लावतो आहे
मस्तकांवरी सदा त्यांच्या
भवानीचा हाथ आहे
सह्याद्रीच्या उंच पठाराच्या
जय शिवाजी नाद आहे
रणरणत्या मातीत तुझा हा
आज ही शिवबा उभा आहे.
ना भीती कोणाची वा कशाची
सर्व माणसांची पारख आहे,
कोणी कोणास व कशासाठी
हे ते न्यायानीशी सांगत आहे,
फितुरांच्या माने वरती
तलवार त्याची ओकत आहे,
रणरणत्या मातीत तुझा हा आज ही शिवबा उभा आहे
किल्ले बांधुनी आज ही त्याचा
गड कपारीत वास आहे,
गनिमांची आज ही धडगत नाही
नियतीला कोडे घालत आहे,
आलेत बहू होतील बहू
त्यांच्या सारखे तेच आहेत
रणरणत्या मातीत तुझा हा
आज ही शिवबा उभा आहे
गेले शरीर जळुनी तरी
परमात्मा त्यांचा इथेच आहे
येईल पुन्हा याच मातीत
आस जीवाशी लावत आहे
ऐकुनी डरकाळी राजाची
घेऊन भगवा स्वतः हाथी
सिंह तो अखेर गर्जत आहे
रणरणत्या मातीत तुझा हा आज ही शिवबा उभा आहे.....
कवी -
- अभिजीत वसंत ठाकूर.....रायगड.