ज्योतिरावांचं पाऊल पहिलं
बनलं मोठी क्रांती
स्वप्नात केव्हा आलं नसेल
अशी मोडली गर्विष्ठांची भ्रांती
दिलं शिक्षण ज्योतीबांनी म्हणून
थाठ झाली मान आमची
अभिमानानं फुगली छाती
अन्याय आमच्यावर करून
काय राहिलं तुमच्या हाती
लक्षात ठेवा मूर्खांनो
जो करील अति
त्याची होईल माती
#पाऊल