फार दिवसातून आज
डायरी वाचून बघितली
नकळत घडलेली गोष्ट
त्यात वाचयला मिळाली...
वेदनांचे शब्द अन् शब्द
त्यात मांडून ठेवली होती
अनोख्या दुनियेतली झळ
त्या काळी सोसली होती...
जे सुंदर स्वप्न पाहीले होते,
त्याच डायरीत सापडले होते
अंध:कारमय जीवनातले सर्व
स्वप्न प्रकाशमय होणार होते...
त्याचा सुगावा लागत नव्हता
पण शोध त्याचा घेतला होता
कठीण जखमांसाठी औषधाचा
खजिना त्यात लिहीला होता...
गायत्री