#आनंद
शोधू कुठे कुठे
मी आनंद ?
मदत कराल का
कोणी मला?
दुःखाचे विरुद्धार्थि
शब्द आहे सुख
कोणी सांगेना मला
आनंदाचे विरुद्ध शब्द
सुख म्हणजे काय असतो
कळते सर्वांना, पण
आनंदाचा अनुभव
सांगणारा भेटला नाही
मला आज पर्यंत
मला वाटते,
भगवंताच्या नामातच
मिळेल हा आनंद
जितके मनापासून
घेता नाम तितकेच
लवकर समजेल आनंद
विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल