प्रिय बापू,
तुमचा मृत्यू घडवून आणला,पण तुमच्या मृत्यू ने इतिहास घडविला. तुमच्या विचाराने पिढ्या घडवल्या. तुमच्या वैचारिक वारसा अजून जिवंत आहे. तुमची साधी राहणी, उच्च विचारसरणी अजून रुचत नाही, म्हणून रुजत नाही.पैशांच्या मूल्ल्या पुढे, नैतिक मूल्ये निष्क्रिय झाली आहेत.
काही मृत्यू तर्किक्तेतून घडवून आणले जातात.मृत्यूने शरीर मरतं,विचार नाही.विचार अमर असतात.विचार हा एक प्रसाद आहे.प्रसादान,अनुयायीनिर्माणहोतात.अनुयायी पुन्हाविचार पेरतात.विचार हवा तो प्रसार करतात.
शरीरातून आनुवंशिकता वाहते ती विचाराचं वहन करते.विचाराचं कलम केलं की तेही अनेक पिढ्यांपासून चालत राहतं.
जगावर तुमची छाप पडली आहे.जगभर तुमचे पुतळे आहेत.गांधींना कोण ओळखत नाही?आमच्या कडे कुणी आवडलं की फोटोत बंदिस्त करतात व भिंतीला टांगतात. असं केलं की प्रेम ही दिसत व जवाबदारी ही झटकता येते.
बापू तुमच्या साक्षीने फारच भयांण चाललं आहे. तुमची शिडी वापरून लोकांनी आपले मनसुबें पूर्ण केले आहेत.
तुमच्या फोटोला हार व समाधीवर ओंझळभर फुले वाहीली की हवे ते करायला लोक मोकळे होतात.
तुम्ही नोटावरील चित्रांत आहांत, पण निवडणुकीतील नोटाच्या बाबतीत तुम्हीसुद्धा असाह्य आहात. नोटा मध्ये या पैकी कोणीच नको म्हणलं तरी नको ते निवडून येतंच आहेत. नोटा म्हणजे एक वैधानिक इशारा झाला आहे. वैधानिक इशारा दिलं की सरकारचं कर्तव्य संपत, जबाबदारी संपते.वैधानिक इशारा हे गोमुत्रा सारखं शिंपडलं की हवें ते करायला लोक मोकळें. धूम्रपान असो, दारू पिणे असो, चुंबन असो आलिंगन असो ,अश्लीलता, बलात्काराची दृश्य दाखवणं असो, कोपऱ्यात फक्त वैधानिक इशारा लिहायचा.
ऑफिसमध्ये तुमच्या फोटो समोर भ्रष्टाचार होतो, पैशाची देवाण-घेवाण होते.
लोकं इतकी धिट झाली आहेत की स्पर्धक ही आलिंगन, देण्याच्याबहाण्यानेपरीक्षकांचे चुंबन घ्यायला मागेपुढे पहात नाहीत,इतकी नीतिमत्ता ढासळली आहे.
नव्या नोटा वर ही तुम्हींच विराजमान झालात पण तुम्ही नोटा बंदी,महागाई, भ्रष्टाचार रोखू शकला नाहीत.
गांधी है तो मुमकिन है,म्हणंत,
गांधींच्या फोटोला हार व समाधींवर फुले उधळतां यायला हवीत.खोट्या शपथा घेता, यायला हव्यात.
भाषणात गांधीचे गोडवे गाता यायला हवेत.इतकं केलं की सात पिढ्यांची कमाई करण्याचं नवीन तंत्र माणसाने शोधून काढलंय.
भांडणारे गळ्यात पडत आहेत आणि गळ्यात पडलेले भांडत आहेत.
पूर्वी तत्वां,साठी काही पण होतं,आता तत्वांसाठी काहीहीं आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण, संस्कृती, मानवी व्यवहार भावभावना, सगळेंच गढूळ झालें आहे. चांगल्या विचारांची तुरटी दुुर्मिळ झालीआहे.
राजकरणात गांधी ही पहिली पायरी चढलीच पाहिजे. अनेका साठी,गांधी यशाची पहिली पायरी आहे.
यशोशिखराकडे जाताना पहिली पायरी विस्मरणात जाते. तरीही देशाला व जगाला गांधीच तारू शकतील हाविश्वास तिसरे युद्धहोण्याच्या पूर्वसंध्येला बळावत आहे.
शाळेतल्या प्रतिज्ञेच्याचिंधड्या उडत आहेत.CAA, NRC वादामुळे सारे भारतीय माझे बांधव आहेत का? हा प्रश्न पडू लागला आहे. शाळेतील मुले निरागसपणे प्रार्थना व प्रतिज्ञा म्हणतात. तरुण फ्री काश्मीर ची मागणीकरतात,पोलीसावर दगडफेक करतात,हिंसे मध्ये भाग घेतात. तुमचा अहिंसेचा डोस आवश्यक झाला आहे
मतासाठी तुमच्या नावाचा वापर करून जोगवा मागणे आजही सुरूआहे.
नई तालीम शिक्षण पद्धती ही तुम्ही दिलेली अमूल्य भेट होती,पण ती गुंडाळून ठेवली गेली,कारण कुणालाच नको आहे मूल्य आणि श्रम प्रतिष्ठा.
नई तालीम हेच आजच्या शिक्षण पद्धती वर जालीम औषध आहे.पण मस्तका पेक्षा पुस्तकाला महत्व आलय. पुस्तकात आहे तेवढच वाचायचं, लक्षात ठेवायचं. मस्तकात जे आहे त्याचा विकास करणे अभिप्रेत आहे. शिक्षण म्हणजे स्वतः;मधील उत्कृष्ट शोधणे,व त्याला बाहेर काढण. . तुमचं नाव वापरून अनेकांना राजकारणात यायचंय. स्वतःचा जम बसवण्यासाठी दुसर्यांना फसवायचे आहे.
वैष्णव जन तो तेणे कहिये, जो पीड परायी जाने रे हे तुमच्याबरोबरच इतिहासजमा झाले आहे.
तरीसुद्धा चिरंतन मुल्याप्रमाणे तुम्ही चिरंतन राहणारच.
तुमचाच....
डॉ अनिल कुलकर्णी. b-24 रोहन प्रार्थना गांधी भवन कोथरूड. पुणे 411 0 38.