अवघाचि हा पसारा
अवघाचि हा पसारा
मजला जरी मिळाला
तव शरण मी विधाता
परमार्थ ना कळाला ।। धृ।।
मन मोहमुक्त व्हावे
गुण दोष लुप्त व्हावे
दुविधांनी युक्त का हे
नेई मला तळाला ।। 1।।
हिणविले ना कुणाला
शिणविले ना कुणाला
जरी नित्य धर्म केला
तरी दु:ख का फळाला ।। 2।।
गुरुकृपा काय करी
स्तवने किती करावी
अर्ध्य अमान्य जर का
अर्थच ना त्या जळाला ।। 3।।
ते ज्ञान व्यक्त होई
आसक्त तू जयासी
त्यासी मी स्थिर आहे
किती देह हा पळाला ।। 4।।
- अमर