####Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
************************************
*२८ नोव्हेंबर - महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन*
************************************
जन्म - ११ एप्रिल १८२७
मृत्यू - २८ नोव्हेंबर १८९०
थोर भारतीय समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांची आज जयंती. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली झाला. तर २८ नोव्हेंबर १८९० साली त्यांचे देहावसन झाले.
त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा.
* महात्मा ज्योतिबा फुलेंनी १८४८ मध्ये पहिली, १८५१ मध्ये दुसरी आणि तिसरी मुलींची शाळा काढली.
* महात्मा फुले शिक्षणाचे महत्व असलेले व स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा स्थापन करणारे पहिले भारतीय होत. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून, तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली.
* अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ज्योतिबा आपल्या भूमिकेवर ठाम असत.
* १८७३ मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली.
* समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
* सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.
* सतीची प्रथा, विधवा पुनर्विवाह, भ्रुणहत्या या समाज विघातक गोष्टींना त्यांनी विरोध केला. केवळ शाब्दिक विरोध न करता त्यांनी पुढाकार घेउन ‘बालहत्या प्रतिबंधगृह' ही संस्था सुरु केली.
* वयाच्या ६० व्या वर्षी जनतेने त्यांचा सत्कार करून त्यांना ‘महात्मा' ही पदवी बहाल केली. डॉ. आंबेडकर हे ज्योतिबांना आपले गुरु मानत. गांधीजींनी ‘खरा महात्मा’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना ‘सामाजिक क्रांतिकारक’ म्हणत.
महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्व पटवून देणाऱ्या काही कवितेच्या ओळी :
विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली ,
नीतीविना गती गेली
गतीविना वित्त गेले ,
वित्ताविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले !
************************************