####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
" चिंतन मनन अभ्यास "
-------------------------------
???????????
*??।। जय श्रीकृष्ण।।??*
*पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होतो असे म्हणतात. तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासाला आपण पहाटेपासून सुरूवात करू या. काकड आरती झाली म्हणजे देवाचे स्मरण संपवावे असे नाही. अखंड स्मरण आणि भाव पाहिजे. एखादा मनुष्य रस्त्याने चालला असला की, ’तुला रस्त्यात कोण कोण भेटले ?’ तर तो म्हणतो, ’माझे लक्षच नव्हते.’ त्याप्रमाणे आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावे. त्यांच्या पाठीमागे जाऊ नये, किंवा त्यांच्याबद्दल विचार करीत वेळ फुकट घालवू नये. ’मला विचार विसरला पाहीजे, विसरला पाहीजे,’ असे म्हणून का त्याचे विस्मरण होणार आहे ? नामाकडेच जास्त लक्ष द्यावे, म्हणजे विचारांचा आपोआप विसर पडतो, आणि पुढे ते येईनासे होतात. एकदा वाट चुकल्यावर ती चुकीची वाट परत उलट दिशेने चालावी लागते; आणि मग योग्य रस्ता आल्यावर त्या रस्त्याला लागायचे, हाच अभ्यास; आणि हे सर्व ध्येय गाठेपर्यंत चालू ठेवणे हीच तपश्चर्या.*
??।।राम कृष्ण हरी।।??
???शुभ प्रभात???
???????????