!! ..घात.. !!
जिव्हाळ्याने जपून,
मायेनं जुंपले..
आपुलकीत माळून,
स्मित फुलवले !!
होती हक्काची भाषा,
होत्या हक्काच्या मैफिली..
अग्र नात्यांत ठेवून,
हर्षाने सजवले !!
अनोळखी एक वादळ,
सुन्न स्तब्ध आज मन..
कवटाळून काळीज,
अश्रु आक्रन्दले !!
भाबड्या जीवाचीच दैना,
कापऱ्या स्मृतींचा गहिवर..
"विश्वासघात "जीवघेणा,
जगणे अवघडले !!
- ✍️नंदिनी मेणजोगे