माझी शेवटची इच्छा...
जमल तर आत्मदर्शन करणे
नाही तर शांती समाधानाने मरणे,
ह्या पेक्षा दूसरा काही पाहिजे काय,
मला वाटत नाही तीसरी काही असेल काय...(१)
आयुष्य भर मरमर केली,
चार इंची पोटासाठी
मला नाही माहीत,
कोण येणार माझ्या सोबत...(२)
खूप काही कष्ट केला,
बायको मुलांना खुश ठेवायला
त्यांची चीज झालेली दिसत नाही,
अजूनही काय हवी आहे त्यांना
कळतं नाही माझ्या मनाला...(३)
पुरे झाले असे जगणे,
देवा,
तूच सांग मला आता,
जगू कशी मी अशा जगात,
किंवा मरून जावू तुझ्या नामस्मरणात...(४)