####Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
ॐ चिंतन माला ॐ १
???राम कृष्ण हरी???
*मानवी जीवनात प्रत्येकाला सर्वांत प्रिय गोष्ट म्हणजे आपला प्राण आहे. आपण प्राणाचे रक्षण करीत असतो, देहाचे नाही. प्राण नसेल तर देह कुठला? त्यासाठी परमार्थात जवळपास सर्वच संत पहिली गोष्ट सांगतात ती म्हणजे आपला प्राण, ध्यान किंवा नामस्मरणाने शुद्ध करा. नासिकाग्रावर दृष्टी ठेवून ध्यान करताना जी प्रकाशाची झलक अधूनमधून दिसते, ते आपल्या प्राणाचे दर्शन असते. प्राण जसजसा शुद्ध होत जातो तसतशी दर्शने होत जातात. दर्शन मग ते देवाचे असो किंवा कोणाचेही असो, प्रत्यक्षात विशिष्ट आकाराचा तो आपलाच प्राण असतो. प्राण विदेही असल्याने तो कोणताही आकार घेऊ शकतो. सर्व चमत्कार प्राणशक्तीचेच असतात. स्व-स्वरूप प्राणाच्या पलीकडचे. आपण शुद्ध केलेल्या प्राणानेच स्वतःच्या बोधाचे ध्यान केल्यावर स्व-स्वरूप प्राप्त होते. प्राण जेव्हा स्वतःमध्येच मुरतो तेव्हा समाधी लागते, आणि असे अनुसंधान साधले तर देवळातील मूर्तीचे दर्शन घेण्याची जरुरी नाही*.
अगा वैकुंठीच्या राया।
अगा विठ्ठल सखया ॥१॥
अगा नारायणा।
अगा वासुदेवनंदना ॥२॥
अगा पुंडलिक वरदा।
अगा विष्णू तू गोविंदा ॥३॥
अगा रखुमाईच्या कांता।
कान्होपात्रा राखी आता ॥४॥
?????????