#####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
* श्रावण - धारा *
---------------------------------
येता श्रावण महिना
तन झुराया लागते,
पावसाच्या धारा संगे
मन भिजाया लागते..
ऋतू पावसाळा येता
खुले रंग श्रावणाचा,
नदी नाल्यात चालतो
खेळ चिंब पावसाचा..
श्रावणाच्या सरी ओल्या
माझ्या मनात दाटल्या,
थेंब थेंब बरसूनी
चारी बाजूंला दाटल्या..
बिंब दिसते सुर्याचे
श्रावणाच्या या जलात,
बाग प्रीतीची फुलते
गर्द हिरव्या रानात..
येतो श्रावण घेऊन
रिमझीम सालोसाल,
श्रावणाच्या सरी येता
हिरवळ रानोमाळ..
येई उनाड हा वारा
संगे पावसाच्या धारा,
येता श्रावण महिना
मोडे कोवळा कोसेरा..
श्रावणाच्या जलधारा
वाहे खट्याळ चंचल,
खडकात खळखळ
होई मनास नवल..
तण उगते मातीत
जाळीदार मलमल,
गंध येतो माळराना
होई मन उतावीळ..
येता श्रावण जवळी
हाळ्या मारी बुलबुल,
साद ऐकुनी पावसाची
वारा वाहे झुळझुळ..
आहे मधाळ श्रावण
मनोहर पावसाळी,
कधी हलकीच येते
माझ्या कानात आरोळी..
चहूंकडे आसमंती
इंद्रधनू रे सजला,
असा वेडा नटखट
मज श्रावण वाटला..