"श्रीसूक्त"
"श्रीसूक्त"
"ऋचा११"
कर्दमेनप्रजाभूता मयिसम्भवकर्दम | श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ||११||>
अर्थ:-कर्दमेन;-कर्दम नावाच्या सुपुत्राने
(लक्ष्मी) प्रजा:प्रजापती,पुत्रवती,भुता:-झाली,प्रजा या शब्दाचा अर्थ अपत्य असा आहे.कर्दम हा लक्ष्मीचा पुत्र आहे.
व हा पुत्र तिचा अत्यंत प्रिय आहे.म्हणून
हे कर्दम!हे श्री पुत्रा, कर्दमा!तू मायि:-
माझ्या घरी,संभव:-राहा.केवळ तूच राहा
असे नव्हे तर, पद्ममालिनीम :-कमल
पुष्पांची माला धारण करणाऱ्या जगज्जननी आदिमाता अशा तुझ्या,
मातरम:-आईलाही,मे माझ्या,कुले:-वंशात,वासय:-निवास करण्यास सांग.
तुझ्या आईचे वास्तव्य माझ्या वंशात सदैव राहो असे कर.तूच माझ्या इथे राहिलास की,तुझी आई आपोआपच माझे घरी येईल."माझे घराण्यात कायमचे वास्तव्य करण्यास तू जर सांगितलंस तर तुझ्यावरील प्रितीने ती
जगन्माता माझ्या कुलात सैदैव राहिहा आशय.
केवळ लक्ष्मी नव्हे तर लक्ष्मी पुत्रही आपल्या कुलांत निरंतर राहावा ही इच्छा
मोठी मार्मिक आहे.
केवळ ऐश्वर्य असले आणि त्या ऐश्वर्याचा
उपभोग घेणारा परिवार नसेल तर तर त्या ऐश्वर्याचा काय उपयोग?
कित्येक माणसांच्या घरी गडगंज संपत्ती
असते पण त्याचा उपभोग घेणारा परिवार मुळीच नसतो.आशा माणसांना
संपत्ती असूनही संपत्तीचा आनंद कसा
वाटणार.?म्हणून संपत्ती बरोबर तिचे योग्य असे विणतर व्हावयास हवे.ज्या
घरात ऐश्वर्य आहे पण उचित वितरण नाही त्या घरात ऐश्वर्य असूनही ऐश्वर्याची
कळा दिसत नाही.
या साठीच भारतीय ऋषी मुनींनी धनार्जना बरोबरच धनवितरणाचाही संदेश दिला आहे.
" आधायुरिन्द्रियारमो मोघं पार्थ स जिवति" केवळ स्वात:च उपभोग घेणाऱ्या व्यक्तींची अशी निंदा केली
आहे. संपत्तीविषयक धारणा ही त्यागावरच अधिष्ठित आहे.