"श्रीसूक्त"
"श्रीसूक्त"
"ऋचा ८"
क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां अलक्ष्मीं नाशयाम्यहम् | अभूतिमसमृद्धिं च सर्वांनिर्णुद मे गृहात् ||८||
अर्थ:- क्षुत म्हणजे क्षुधा,भूक आणि पिपासा म्हणजे तृषा (तहान) भूक आणि तहान यांनी मालाम,मालिन दिसणारी कृश,अशक्त एक प्रकारची अवकळा प्राप्त झालेली, ज्येष्टाम म्हणजे
अगोदर निर्माण झाल्यामुळे वडील असलेली.(क्षिरोदधितून लक्ष्मी उत्पन्न होण्यापूर्वी अगोदर निर्माण झाली म्हणून
हिला ज्येष्ठा म्हंटलेले आहे) अलक्ष्मीम- म्हणजे दारिद्रता, अहम - मी,नाशयामी म्हणजे नाहीशी करतो,दारिद्र्याच्या मी
स्वतः नाश करतो,हे लक्ष्मी तू फक्त मे-माझ्या,गृहात-घरातून,अभूतीम म्हणजे सर्व प्रकारची अवकळा,औदासीन्य आणि निरुत्साह,असमृध्दीम म्हणजे वर
सांगितल्या प्रमाणे,औदासिन्य आणि निरुत्साह,यांच्यामुळे प्राप्त होणारी असमृद्धी,निर्णुद--नाहीसा कर,माझ्या
घरातून तू याचे उच्चाटन कर हा आशय.
संपत्ती प्रयत्न साध्य तर .दारिद्र्य हे प्रयत्ना वाचून प्राप्त होणारे, संपत्ती ही प्रयत्नानंतर येणारी दारिद्र्य हे प्रयत्ना पूर्वी,या अभिप्रायाने दारिद्रतेला लक्ष्मीची
वडील बहीण असे संबोधले आहे.