रुपयौवनाचे काय गुण गाऊ
शब्दांत तुला कुठे स्थान देऊ।
चिंब भिजल्या देहाचे, तारुण्य किती पाहू
तुझ्या मोदांनदाचे, कोणते गीत गाऊ।
देहभान विसरुन बेफाम होऊनी नाचू
कितीदा तुला कितीवेळ पाहू।
मनातली तळमळ तुला कशी सांगू
प्रेमपरमेश्वराकडे आणखी काय मागू।
नग्न पावलांचे ठसे सांगून जातील
खुल्या अंगणात तुला शोधतील।
आणिक सोबतीला पावले शोधतील
कोणासवे होती आपसात चर्चतील।
सख्या विचारतील तुला वेठीस धरुन
कोण होता तो तरुण सांग म्हणतील।
निमित्त पावसाचे मनसोक्त भिजायचे
काही नाही बोलायचे,गुपित मनात ठेवायचे।
ओळखतील चतुर त्या रहस्य सारे काही
भेटला कोणी मनभावी पावसात की।
हसशील लाजून मला माहीत आहे
तु माझ्या खात्रीने प्रेमात आहे।