आई
आई तू आहेस कुठे?
सांग मला,
कशी शोधू मी तुला
तुझ्या प्रेमळ हात
कधी फिरतील माझ्या डोक्यावर,
वाट बघत आहे मी
त्या प्रेमळ स्पर्शाचा....(१)
क्षणोक्षणी आठवण येते,
तुझ्या मायेचा
विसरू शकत नाही,
तो क्षण आनंदाचा...(२)
लहानपणी,
मला नाही लावली
एक पण काम,
एवढी लाड,
करायला नको होत,
कारण मी बनलो,
आळसी खूप.....(३)