Motivational quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in English daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.
" राधेय... कर्ण "
जन्मता गंगेच्या प्रवाहाबरोबर वाहत आलो ,
अधिरथ अन् राधाईच्या कुशीत विसावलो !
शोणासाठी वसुसेनाचा मी वसुदादा झालो,
वृषालीचा पती असून तिचा सखाच बनलो !!
सारथी असून आवड मला शस्त्रास्त्रांची ,
आस मजला क्षत्रियांच्या धनुष्य बाणाची!
दैवाने मांडले अद्भुत असेच द्यूत माझ्याशी ,
वैर पत्करले अजाणतेपणी माझ्याच आप्तेष्टांशी !!!
काळाच्या रथाने नशिबाचे माझ्या घेतले होते वेग हाती ,
कवचकुंडलधारी या " सूर्यपुत्राला " बनविले एक सारथी !!!
मित्र दुर्योधनाने केले या कर्णा अंगदेशाचा अधिपति ,
न कळे माझेच मजला खरच मी भागी की अभागी ????
पांचालीच्या वस्त्रहरणास मी कारण बनलो ,
स्वतःच्याच नजरेत स्वतःला गमावून बसलो !!!परशुरामशिष्य बनून ब्रम्हास्त्राधिपति झालो ,
दिग्विजयाने हस्तिनापुरास समर्थ करण्यास निघालो !!!!
कवचकुंडलाच्या भयाने इंद्रालाही माझा याचक बनविले ,
शौर्य , कीर्ती अन् दातृत्व माझे या दानाने सिद्ध केले!!!
रहस्य मजला माझ्या जन्माचे श्रीकृष्णाने सांगितले ,
पांडवांना साहाय्य करण्याचे मजला मूकपणे सुचविले !!!
नियतीने पुन्हा एकदा माझ्या विरुद्धच दान टाकले ,
अन् माता कुंतीच्या चार पुत्रांना जीवनदान दिले !!!
दुर्योधनाच्या उपकारांना स्मरुन त्यास साहाय्य केले ,
अर्जुनवधाचे शेवटचे दान देण्यास मन सज्ज झाले !!!
परशुरामांच्या शापाने विद्येचे विस्मरण झालेला , रथाचे चक्र भूमीत धसलेला , कर्ण मी निशस्त्र ,
पार्था , सांग मला झाला का तुला माझ्या सामर्थ्याचा, परिचय ? अन् मग अधर्माने चालव माझ्यावर शस्त्र !!!!!
" सूर्यपुत्र "असूनही " सूतपुत्र " म्हणूनच वाढलो ,
अन् " कौंतेय " असूनही फक्त " राधेय " होऊन जगलो !!!