पाहिल्या मी त्या गालावर खळ्या अवखळ,
थांबले ओठ पुन्हा का? ओठांच्या पाकळीवर
नजरेन च केले घायाळ प्रिये तू
असे जागले हृदयात आपले पण …..
हे लयीत चालणे तुझे बघून
झाले विचलित का ?हे मन
श्रावणाच्या या सरी परी तु
बरसत राहिले प्राजक्ताचे वन
वारा उनाड हा छेडतो प्रिये का?
तुला आठवतात का हळवे क्षण
प्रितीची ही खूण मानावी का ?
का म्हणावे आपले पण _