Quotes by Sayli in Bitesapp read free

Sayli

Sayli

@saylimane8275gmail.com2724


धर्म कोणताही असो माणूस चांगला बना कारण शेवटी हिशोब#कर्माचा होतो, धर्माचा नाही!!

भाकरी
मन सुन्न करणारी घटना आज औरंगाबादमध्ये घडली,बातमी ऐकून मन स्तब्ध झाले.पायी प्रवास करत जाणारे काही परप्रांतीय मजूर रेल्वे रूळावर झोपले होते आणि मालगाडी ने त्या १६ जणांना एका क्षणात उडवल.काय म्हणाल असेल त्यांचं मन त्या क्षणी?अगदी छिन्न विच्छिन्न करणारी ही घटना.
भाकरी साठी १७०० किलोमीटर आपल गाव सोडून आलेले हे मजूर होते,आपल्या राज्यात जाण्यासाठी सोबत शिदोरी म्हणून यांनी भाकरी ठेवली होती,आज त्यांचे मृतदेह रेल्वे रुळावर पडलेत,आणि त्यांचा बाजूला १०-१२ भाकरीचा ढिगारा!आता भाकरी तर आहे पण तिला खायला माणूस नाहीये😰याच भाकरी साठी प्रयेक जण अहोरात्र मेहनत घेत असतो परंतु तिला न खाताच मरतो.जास्त साचवून ठेवू नका, त्या त्या क्षणी त्या त्या गोष्टींचा आनंद घ्या,कोण जाणे उद्या त्या मजुरांच्या जागी आपण असू! पूर्ण जगावर राज्य करणारा सिकंदर सुद्धा दोन्ही हात रिकामे ठेवून च गेला हो!अस म्हणतात माणूस जन्म मिळायला खूप पुण्य करावं लागत,आता मिळाला आहे तर त्याचा आनंद घ्या,जमेल तेवढं गरिबांना मदत करा,जास्त साचवून ठेवला तर त्याचा नाश अटळ आहे हे नक्की!
ती स्वप्नातील भाकरी पुन्हा आर्धीच राहिली
भूक पोटातील मी माझ्या आवंढ्यात गिळली!!!
पटत असेल तर विचार नक्की करा!!
- सायली

Read More

* कृतज्ञता*

मुंबई!सगळ्यांना पोटात घेणारी मुंबई!जिथे देशातील विविध भागातील लोक पोटाची खळगी मिटवण्यासाठी येतात आणि स्थायिक होतात!बिहार,उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश,बांगलादेश अशे अनेक परप्रांतीय मुंबईत येऊन छोटा मोठा व्यवसाय किंवा हाताला मिळेल ते काम करतात.याच मुंबई ने वर्षानुवर्ष अशे कितीतरी परप्रांतीय लोंढे पोसलेत,जिथं या लोकांना त्यांचा राज्यात कामाची संधी नव्हती तेव्हा हेच लोक मुंबईची वाट शोधत आलते.एक दोन न्हवे तर लाखोंनी लोंढे मुंबईत आले आणि या सगळ्यांना मुंबईनी तिचा उदरात जागा दिली आईसारखी प्रेम दिलं,आज मात्र मुंबई अडचणीत आहे फार मोठ संकट हे महाराष्ट्र,मुंबई आणि देशावर आले आहे अशा परिस्थितीत सर्व लोकांनी मिळून शासनाला मदत करण अपेक्षित आहे ,प्रत्येक जण चाचपडत मार्ग काढत आहे.तेव्हा हेच परप्रांतीय लोंढे शासनाचं अडचणी वाढवायचे काम करत आहेत.आतोनात प्रत्येक जण गरिबांना होईल तेवढं मदत करत आहे,परंतु परवा घडलेली घटना थक्क करणारी होती! शासनाने परप्रांतियांसाठी रेल्वेची सोय केली आहे त्यासोबत प्रवासातही शिदोरी म्हणून food box प्रत्येकाला दिले होते,आणि हे परप्रांतीय प्रामुख्याने पश्चिम बंगाल,बिहार,उत्तरप्रदेश येथील असून, यांनी सर्व अन्न रेल्वे स्थानकावर फेकून दिलं आणि महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या ही गोष्ट खूपच मन हेलावून टाकणारी होती!ज्या लोकांनी कधीच एवढ्या चांगल्या दर्जाचं अन्न खाल्ल नसेल ते अन्न फेकून दिलं,अहो याच अन्नाचा शोधत मुंबईला आलतात ना मग आता तेच अन्न फेकून देताय?याच महाराष्ट्र सरकारने कितीतरी पिढ्या पोसल्यात तुमच्या आणि हीच का तुमची कृतज्ञता????आपल्या अडचणी नम्रपणे प्रशासनाला सांगायच्या होत्या ,शक्य तितक्या अडचणी सरकारने सोडवल्या असत्या हे नक्की!!महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातील लोक यांवर त्यांच्या मातीचे संस्कार आहेत परप्रांतीय लोकांसारखे आम्ही कृतघ्न नाहीत.ज्या लोकांना त्यांचा राज्यात २ वेळच्या जेवणाची भ्रांत आहे ,जिथं त्यांना त्यांचा राज्यात काम नाही ते लोक मुंबईत येऊन आज माज दाखवत आहेत.या तून आपण एक शिकवण घ्यायला हवी ती म्हणजे आपला महाराष्ट्र हा खूप समृद्ध आहे !!परप्रांतीय लोंढे आता गेलेत, आता आहे तो आपला आपुलकीचा महाराष्ट्र!! युवकांनो परिस्थिती लक्षात घ्या बाहेरील राज्यात खूप बिकट परिस्थिती आहे.हे संकट खूप मोठं आहे मात्र यातून आपण संधी ओळखायला शिकल पाहिजे. महाराष्ट्रात अशा अनेक संधी उपलब्ध आहेत फक्त त्या शोधण्याची गरज आहे.मराठवाडा ,विदर्भ या भागात युवकांना कामाची खूप गरज आहे त्यांनी आता पुढे सरसावल पाहिजे आणि हाताला मिळेल ते काम केलं पाहिजे, कोणतंही काम हे छोट नसत ,प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात ही एका छोट्या गोष्टीतून होत असते.यासाठी सरकारनेही युवकांना कुठे कुठे कशा संधी उपलब्ध आहेत याची माहिती सातत्याने देणं गरजेचं आहे.एक डोळ्यांना न दिसणारा विषाणू सुद्धा जागाच रूप पालटतोय ,यात सर्व चूक मानवाची आहे,त्याने केलेला पर्यावरणाचा ह्रास हा एके दिवशी त्यालाच गिळंकृत करणार हे नक्की!आपणही समजाच पर्यावरणाचं काहीतरी देणं लागतोच ना, परप्रांतीयांनप्रमाने कृतघ्न होऊन कसे चालेल?चला तर मग,या lockdown चा काळात घरीच राहून एक संकल्प करूया,आपल्याच अंगणात किंवा कुंडीत एखाद रोप लावुया त्याची निगा राखूया आणि पावसाळा आला की तेच रोपट मोकळ्या जागी किंवा रस्त्याचा कडेने लावुया,मग बघा कसं उत्साहाने डोलत डोलत रोपट्याच झाड होत ते!घरात असलेल्या प्रत्येकाने अस केलं तर ही अंखड साखळी हिरवगार निसर्ग पुन्हा जिवंत करेल!आपल्या चुका सुधारण्याची संधी आहे हा lockdown काळ म्हणजे!
पृथ्वीचे सौंदर्य तिला परत करूया,
संपूर्ण महाराष्ट्र हिरवगार करूया!!
मी तयार आहे तुम्ही करणार ना??
_सायली

Read More

फ़रिश्ते ही होंगे जिनकी मोहब्बत होई मुकम्मल यहां,इंसानों को तो मेंने सिर्फ बर्बाद होते देखा है यहां!