Quotes by S... in Bitesapp read free

S...

S...

@saiprasad.aacrgmail.com2608


निसर्ग.. पक्ष्यांचे थवे, किलबिलाट, निर्मळ झरा, शांत वाहणारी नदी, हिरवीगार वृक्ष, मंद वारा आणि मनुष्याचे निर्भेळ, निरागस हास्य!
सारं काही...मोहक!

Read More

जिद्द, चिकाटी आणि मेहनत याशिवाय फक्त 'नियति' वर अवलंबून असणारे... हे कदाचित 'नियति' ला सुध्दा मान्य नसणार !
#नियति

Read More

'नियति' ला मान्य असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात आवतरतात... नसलेल्या मात्र नाही!
#नियति

दुष्काळ! हा शब्द ऐकला तरी, अंगावर काटा येतो.
दुष्काळ! हा कसाही आणि कसलाही असू शकतो. शेतकरी राजा ओला किंवा सुका पडणार्या दुष्काळाच्या विवंचनेत...लेखक किंवा कवी चांगल्या लिखाणाच्या, विचारांच्या दुष्काळाच्या विवंचनेत... गरीब, भिकारी पैशांच्या दुष्काळाच्या विवंचनेत...राजकारणी नेते मतांच्या दुष्काळाच्या विवंचनेत... जेष्ठ नागरिक आणि आप्त कुटूंबिय प्रेमाच्या दुष्काळाच्या विवंचनेत... चांगले शिक्षक,शाळा कॉलेजेस चांगल्या विद्यार्थ्यांच्या दुष्काळाच्या विवंचनेत..!
एकूण काय तर, सगळीकडे दुष्काळाच दुष्काळ व्यापून राहिलाय.
तो... नैसर्गिक, प्रेमाचा,पैशाचा,विचारांचा,अगदी लोकांचा कसा असेल!
#दुष्काळ

Read More

विनोद!
हा शब्दच मुळी विनोदी आहे! कारण, कोणी म्हणतो,' छे! माझ्या जिवनात काहीच विनोद नाहीये..!' तर कोणी, 'बघा ना.. माझे जीवन म्हणजे एक मोठा विनोदच झालाय!' हे अशा प्रकारचे आपण, 'विनोद' या शब्दाला कधी हसवणूक म्हणून घेतो तर, कधी निराशाजनक!
विनोदी माणसेच विनोद करतात.. असं काही नाहीये, विनोद हा कुठेही आणि कोणाच्याही बाबतीत घडतो. फक्त त्याकडे बघण्याची दृष्टी मात्र विनोदी पाहिजे.
#विनोदी

Read More