Quotes by Ravi sawarkar in Bitesapp read free

Ravi sawarkar

Ravi sawarkar

@ravisawarkar5938
(3)

coming soon
"वायुत्सोनात"
मीशन गगनयान २

-Ravi sawarkar

coming soon
"वायुत्सोनात"
the si-fi story

-Ravi sawarkar

नमस्कार मित्रांनो 🙏

मी नुकताच मातृभारतीशी जोडला गेलो........ही अॅप थोडी सवयीची व्हायची आहे. म्हनुन मी आज फक्त माझी कविता पोस्ट केली.....ती प्रकाशित झाली बाईट मधे....इथे स्वतंत्र कविता पोस्ट करायचा पर्याय नाही. इथे पोस्ट केली तर ५०० ची अट.....तर असो मी उद्या घेऊन येत आहे रहस्य रोमांच ने परीपुर्ण अशी विज्ञान कथा....कथेच शिर्षक असेल "वायुत्सोनात".....कथा पाच भागात असेेल......

 १) मीशन गगनयान 

२) यंत्रमानव 

३) टेलीपोर्टेशन 

४) अभिअंश ची डायरी 

५) अंतीम युद्ध 

प्रत्तेक आठवड्यात एक भाग प्रकाशित होईल..... आठवडा ह्यासाठी म्हटल कारण मला ही कथा पुन्हा संम्पादीत करायची आहे.....कारण आहे अशुद्ध लेखन व व्याकरणाच्या चुका ....चुका आढडल्यास निसंकोच सांगा....कथा आवडल्यास अभिप्राय द्या.....नाही आवडल्यास परखडपणे सांगा ....कारण तुम्ही वाचक माईबाप जोपर्यंत तुम्ही समाधानी नाही तो पर्यंत मझ्या साहित्याला काहीच अर्थ नाही.....🙏

त्यानंतर काही प्रेम कथा सीरीज, भयकथा सीरीज, काही कविता व विज्ञान कथा येतील......आता


"वायुत्सोनात " बद्दल थोडस......

 सन २०२२ पर्यंत ईसरो मानवाला अंतरीक्ष मधे पाठवणार आहे त्यासाठी सरकारने दहा हजार कोटीचा निधी मंजूर केला.......आणि ह्या अंतरीक्ष यात्रीला  " वायुत्सोनात " म्हणून  संबोधणार आहे .....तर ह्याच माहीती द्वारे मी एक काल्पनिक कथा लीहीली ....आशा आहे तुम्हाला नक्की आवडेल...........धन्यवाद 🙏😊

Read More

मी एक अभियंता
हस्य कल्लोळचा संता-बंता
वैद्य त्या निर्जीव यंत्रांचा
सर्वेसर्वा निर्माता

मी एक अभियंता
कठोर हृदयात पाझर प्रेमाचा
दृष्ट झगडालु प्रियकर
त्या निर्जीव यंत्राचा

मी एक अभियंता
लाचारीने यंत्रवत राबनारा
प्रेमाला आसुसलेल्या संगीणीच्या
भावना चिरडून टाकनारा

मी एक अभियंता
पालक या यंत्रांचा
आतुरलेल्या पाल्य नजरेत
पालकत्व गमावलेला

मी एक अभियंता
सखा सोबती यंत्राचा
शत्रू माझ्या मित्र परीजनाचा
सोहळा समारंभाला चुकवुन
खुनी नातेसंबंधाचा नातलगांचा

मी एक अभियंता
निर्जीवतेत सजीवता आणणारा
सजीव प्रेमळ आनंदी आयुष्याला
निर्जीवतेच्या गर्तेत लोटनारा

मी एक अभियंता
यंत्राच्या संगितात रमणारा
जाणकार यांत्रिकी भावनांचा
विष्वकर्मा यांत्रिकी विश्वाचा
कर्दनकाळ मानवी संवेदनेचा

मी एक अभियंता !!!...😪

✍ रवि सावरकर

8121129889

www.savarkarstory.com

Read More