Quotes by Dipak Ringe ।बोलका स्पर्श। in Bitesapp read free

Dipak Ringe ।बोलका स्पर्श।

Dipak Ringe ।बोलका स्पर्श।

@dipak421
(109.2k)

कधी काळ होता मैत्रीचा, तासनतास आपण बोलायचो,
कामाच्या त्या व्यापातही, दोन क्षण एकमेकांसाठी काढायचो.
त्या सुंदर मैत्रीचे कधी, हळुवार प्रेमात रूपांतर झाले,
सांगता सांगता कळलेच नाही, आपण कधी एकमेकांचे झाले.

तो पहिला स्पर्श, ती पहिली किस, आजही आठवतेय मला,
लाजत लाजत जवळ आलो, जीव वेडावून गेला होता तेव्हा.
पण वेळ बदलला तसे, वागणे थोडे बदलून गेले,
का प्रेमात पडल्यावर आपण, 'Taken for Granted' धरू लागलो?

"तू माझीच तर आहेस", हा विचार मनाला खाऊन गेला,
आणि प्रेमातल्या त्या ओढीला, जबाबदारीचा वेढा पडला.
तुला हवीत फक्त पाच मिनिटे, दिवसभराचा थकवा घालवायला,
पण मी अडकलो कामात असा, की वेळच उरला नाही बोलायला.
तुला वाटते प्रेम कमी झाले, पण तसे मुळीच नाही ग,
तुला आयुष्याचा जोडीदार बनवण्यासाठी, माझी ही धडपड सुरू आहे ग.

जबाबदारीच्या या जगात, शब्दांची थोडी ओढाताण होतेय,
पण तुझ्यावाचून दुसऱ्या कुणाचा, विचारही मनात येत नाहीये.
तू खूप वेगळी आहेस, अपेक्षा न ठेवता प्रेम करणारी,
माझ्यापेक्षा जास्त फक्त, माझाच विचार तू करणारी.

तुझ्यासारखी दुसरी कुणी, या जगात मला गवसणार नाही,
तू फक्त माझी आहेस आणि मी तुझा, हे कधीच बदलणार नाही.
थोडे समजून घे मला, ही फक्त एक कठीण वेळ आहे,
बोलणं कमी झालं म्हणून काय झालं? आपल्या मनाचा जुळलेला मेळ आहे.

तू नको करू काळजी, मी सदैव तुझ्याच पाठीशी उभा असेन,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, मी फक्त तुझाच आणि तुझाच असेन.

- दिपक रिंगे

Read More

"किस" म्हणजे काय तर

"लाडक्या परीचा" आपल्या वडलांच्या गालावरचा गोड "पापा", आणि

"लहानग्या कान्हाचा" आपल्या आईच्या गालावरचा गोड "पापा"

😍😍😍😍😍

#Kiss

Read More

किस करणे म्हणजे फक्त दोन मुलांमुलींमधला ओठांचा स्पर्श नव्हे तर त्या दोघांमधील प्रेमाचा ओळव्याचं प्रतीक.

#Kiss

Read More

संसारात आपण निर्णय घ्यायचा नाही. बायकांना घ्यायला लावायचा.😉 चुकला तर त्यांचा आवाज बंद.😋 बरोबर आला तर #क्रेडिट त्यांना मिळतं, पण काम आपलं झालेलं असतं. काहीही झालं तरी आपल्या डोक्याला कटकट नाही.
😂😂😂😂😂😂
Dedicated to all those who married
😝

Read More

कविश्रेष्ठ *'विष्णू वामन शिरवाडकर'* ऊर्फ *"कुसुमाग्रज"* यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज *'मराठी भाषा दिवस'* म्हणून साजरा केला जातो.

त्यांना विनम्र अभिवादन करून तमाम मराठी बांधवाना आणि मराठी प्रेमींना
*"मराठी भाषा दिनाच्या"*
हार्दिक शुभेच्छा !!!
❤🚩

शुभेच्छूक : दिपक रिंगे🚩🚩

Read More

Bolka Sparsh

पुढचा आपल्याला काहीच बोलत नाही म्हणून त्यालाच वेठीस धरणारी माणसं खूप असतात.

©Dipak

कधीही कुणाला
स्वतःची कमतरता
(Weakness)
सांगू नका,लोक वेळेला त्याचाच फायदा उचलतात.

-Dipak

आई नंतर मायेनं जवळ घेणारी दूसरी आई म्हणजे बहीण.😍

- Dipak

आयुष्यात आपल्यासाठी त्याग करणारी पहिली आई नंतर दुसरी म्हणजे बहीण.

-Dipak Ringe