Quotes by Ishwar Trimbak Agam in Bitesapp read free

Ishwar Trimbak Agam

Ishwar Trimbak Agam Matrubharti Verified

@bahirjii.naiik
(384)

बराच वेळ तो समोरच्या टेबलावर एकट्याच बडबडत बसलेल्या इसमाकडे पाहत होता.

"सर, हा ग्लास कुणासाठी? आणि तुम्ही नेहमी फक्त त्याच्याशीच बोलता..."

"मित्रा, हा ग्लास आहे त्या माझ्या सर्व जिवाभावाच्या मित्रांसाठी, ज्यांनी मला आजपर्यंत साथ दिली आणि ज्यांची साथ आयुष्यभर असणार आहे."

"सर, मग ग्लास अर्धाच का?"

"मित्रांशिवाय आपलं जीवन अर्धच असतं, अपूर्ण असतं."

त्यासाठी मित्रांना जपा. महिन्यातून एखाद दुसरा कॉल करत जा. मन मोकळं बोलत जा.
#अर्धा

Read More

जब कन्हैया गोकुल से मथुरा की और चल पड़े थे। यमुना के किनारे, कदम्ब वृक्ष के निचे आँसूभरे आंखोंसे राधा उनको विदा कर रही थी। बोलने के लिए होटोंसे एक भी शब्द, ना कन्हैया कह पाए, ना राधा। राधा की भावविभोर आंखोंसे कान्हा पढ़ पाया।

"कान्हा, प्रेम में वियोग क्यों आता है? क्या नाता है उनका?"

कन्हैया ने कहा, " राधा, प्रेम ही अंतिम योग है। अंतिम मिलन है।"

"कान्हा, तुम्हारे बिना आधा अधूरासा ये जीवन, अब सिर्फ तुम्हारी प्रतीक्षा में ही रहेगा। जीवन के अंत तक, मोक्ष तक। "

"राधा के बिना तो कृष्ण का जीवन भी अपूर्ण है,आधा है।"
#आधा

Read More

गुस्से में कोई भी निर्णय लेने से पहले,
खुशी में कोई भी वादा करने से पहले,
बिमारी में कोई भी गलत कदम उठाने से पहले,

सब्र करो, अपने दिल को, मन को समझाओ की,
पहले"ठीक-हो-जाओ' फिर आगे बढो।
#ठीक -हो-जाओ

Read More

जीवनात केलेली संचित सत्कर्मे आणि पुण्यकर्म हाच खरा मानवधर्म आणि हेच तुमच्या सुखाचं रहस्य आहे.
#संचित

भूतकाळातील अनुभवांचा वर्तमान काळात जर योग्य वापर केला तरच भविष्यातील वाटचाल सुखकर करता येते.
#भूत

सुसंवाद असेल तर नाती घट्ट होतात पण जर निष्काळजीपणा असेल तर मात्र नाती तुटायला वेळ लागत नाही.

#निष्काळजी

Read More

माणसानं सदैव सरळ, साधं आणि शांत असू नये.
कारण महिषासुराला मारण्यासाठी देवी कालीने सुद्धा "उग्र" रूप धारण केले होते.
त्याच प्रकारे समोरच्याला धडा शिकवण्यासाठी कधी कधी स्वतःलाही बदलावं लागतं.
#उग्र

Read More

यश मिळवण्यासाठी तुम्ही तेव्हाच "पात्र " व्हाल. जेव्हा तुमचं कष्ट तुमच्या ध्येयाच्या वरचढ होईल.
#पात्र

कोणतंही चांगलं काम कठीणंच असतं. सुरुवातीला त्याला सहकार्य करणारे कमी आणि विरोधकच जास्त असतात. तेव्हा नेहमी लक्षात ठेवा. आपलं चांगलं काम नेटानं चालू ठेवा. लोकांच्या चेष्टेकडे लक्ष देण्यात वेळ घालवू नका. माणसाची पात्रता त्याच्या वागण्या आणि बोलण्यावरूनच कळते. कारण तोंडावर बोलणारे कमी आणि मागंच बोलणारे जास्त असतात.
#पात्र

Read More

ध्येय प्राप्तीसाठी सतत संघर्ष करत राहणं, निष्क्रिय असण्यापेक्षा कधीही चांगलंच असतं...
कारण, जर लोखंड निष्क्रिय असेल तर त्याला सुद्धा गंज लागतो.
तेव्हा लक्षात ठेवा, संघर्ष कितीही कठीण का असेना पण क्रियाशीलताच तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवते.
#निष्क्रिय

Read More