atavanitil pune in Marathi Classic Stories by sachin nikam books and stories PDF | आठवणीतील पुणे

Featured Books
  • मुक्ता....??️ - 6

             6.मला जगायचे आहे.....आ ssss विकास sss अरे विकास sss...

  • ऑपरेशन ब्लॅक ताज - 8

      पावसाचा जोर आता जीवघेणा झाला होता. मुंबईच्या कोस्टल रोडच्य...

  • Mr. Money - भाग 6

    जफर खान आणि शेट्टी भाईच्या अंतानंतर मुंबईच्या गुन्हेगारी जगत...

  • Ruthless Love - 7

    त्या पकडा पकडी मध्ये, तिचा लूज असलेला ड्रेस समोरून पूर्ण खाल...

  • तोतया वारसदार - भाग 59

     तोतया वारसदार पात्र रचना निशांत                      - शोधक...

Categories
Share

आठवणीतील पुणे

आठवणीतलं पुणे 🤔

मी मूळचा कोल्हापूरचा🏡. माझे वडील व्यवसाय निमित्त पुण्यातच होते. आणि त्यांच्या कारणास्तव मी पुण्यात माझं आगमन झाले🚌. आणि मानो  याना ना मानो मी पुणेकर झालो🧑‍🦳. तो काळ खुप छान गुटगुटीत होता म्हणा ना हवं तर .तेव्हाच पुणे मला लख्ख आठवते अजूनही सदाशिवपेठ, स्वारगेट, पुणेस्टेशन, भावनिपेठ, सारस बाग🌴🌲 . पर्वती टेकडी . तुळशी बाग .कात्रज, बिबवेवाडी, सहकारनगर . भापकर पेट्रोल पंप . निलायम टॉकीज, राहुल टॉकीज . गुलटेकडी,इत्यादी जुनं पुणे अजूनही माझ्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभा आहे. पुण्यात आले नंतर माझं आवडतं पेय बनल नीरा 🥛.पुण्यातील नीरा  हे माझं आवडतं पेय. 

1993 ची गोष्ट 

मी पुण्यामध्ये पर्वतीच्या पायथ्याशी जनता वसाहत मध्ये 🏡 राहत होतो. तेव्हाच जनता वसाहत गुंडांमुळे खूप फेमस होतं. पण जनता वसाहत मधली माणसं खरोखरच खूप प्रेमळ 💑आणि चांगली होती. तेव्हाच पुणच खूप म्हणजे खूपच चांगलं होतं म्हणा ना. 

त्यावेळेस पुण्याची प्रतिमा सुदृढ पुणे, हेल्दी पुणे, असंही मला वाटतंय. त्यावेळेस पुण्यातील वातावरण खेळीमेळीचे⛹️ होतं, अनेक लोक 🤼🤼पोट भरण्यासाठी सोलापूर बार्शी पंढरपूर , भोर यांना सासवड बारामती ह्या शहरातून पुण्यात जगण्याची धडपड करत होते... त्यातले आम्ही एक होतो.

विविध जाती धर्माच्या लोकांनी नटलेली ही जनता वसाहतील  मी ही अचानक आलो . आणि  पुण्याच्या लोकांच्या ❤️प्रेमामुळे मी कधी पुण्याचा झालोहे मला कळलं सुद्धा नाही ते या लोकांमुळेच . 

जनता वसाहत कॅनॉलच्या 🏞️काठावर वसलेली वसाहत🛖 . जसं काय  कॉनॉल बरोबर वहात होती .कॉनॉल वरून जाणारा तो लोखंडी छोटासा पूल🌁 . याच पुलावरून कामासाठी सायकल वरून जाणारी पुरुष मंडळी. स्त्री या .पुलावरची सकाळची लगबग कॅनलच्या काठावरती धुणं धुणाऱ्या स्त्रिया. शाळेत जाणारे मुला👬 मुली.  कॅनॉल मध्ये पोहणारी मुलं🏊‍♀️.आणि पर्वतीच्या पायथ्याशी वसलेली ही वसाहत. आणि या वसाहतीत राहणारे विविध स्वरूपाची काम करणारी मंडळी.

डेक्कन वरती माझा एक मित्र रस्त्यावरती पुस्तके📚 अंथरून विविध विषयांची पुस्तके विक्रेत्याचे काम करत होता, . त्यावेळेस मला असं वाटायचं सर्व जगाचे ज्ञान डेक्कनच्या फुटपात वरती अंथरलेला आहे.

 एक माझी मैत्रीण आणि तिचे आई-वडील अप्पा बळवंत चौकामध्ये चितळेंच्या दुकानाच्या बाजूला रुमाल विकण्याचं काम करत होती. काही मित्र तुळशी बागेमध्ये हात गाडीवर संसाराच्या वस्तू म्हणजे भांडीकुंडी🍲🫖🥘🥄🍴 विकत असे.काही माझे मित्र रीक्षा🛺 काढत होते . त्यावेळेस डुगडगी ( आठ सीटर रिक्षा)  फार फेमस होती. डुगडुगीने  तर पुणे शहर व्यापून टाकलं होतं. काही मित्र वेगवेगळ्या दुकानात आणि कंट्रक्शन लाईन होते .

अशी लोकांची विविधता पर्वतीच्या पायथ्याशी खेळत होती. बागडत होती .त्यावेळेसचा जनता वसाहतगीमधील माणसांचा सुसंवाद असा पाखरांसारखा🦆🦅🦅🕊️आकाशात भरारी मारत असताना दिसत असे. 

आम्ही पुण्यातून मांढरदेवी ला सायकल 🚴वरून जायचो. नारायणपूरला जायचो , ती मजा काही औरच होती आणि तशी आनंददायी ☺️मजा पुन्हा अनुभवणे नाही. त्या काळाचा महिमाच काही और होता. 🏤बालगंधर्व भरत नाट्य ही माझ्या हृदयाच्या जवळची स्थान. सारसबागेतील पेशवांचा गणपती . त्या सारसबागेत 🌳🌲🌴🎄आमच्या जनता वसाहत मधील काही मुलं काकड्या 🥒🥭 असं काय काय  विकायला यायची. काही माझे मित्र रिक्षा चालवत होते. सारसबागेतील तो आवाज "चला स्टेशन"अशी रिक्षावाला ओरडायची .स्टे या अक्षरावर जोर देऊन "स्टेशन " हा शब्द ठासून बोलायचीत.

स्वारगेट वरती माझ्या मित्राच्या आई-वडिलांची चहाची गाडी होती. त्यावेळेस सुरेश कलमाडी साहेब यांची खूप जोरात चर्चा असायची.

अप्पू घर 🏘️हे खास आकर्षण असायचं पुण्याचा महोत्सव, दिवाळ पहाट🌅 .,. दिवाळी अंक 📖, दिवाळीच अंकाची वाट तर लोक चातकासारखी पाहायचीत. संस्कृतीने आणि संस्काराने असं पुणे रस्त्या रस्त्याने 🛣️ वाहत होत. भरपूर  प्रमाणात नाट्य 🎭 प्रेमी इथेच सापडत होते .सुधीर जोशी शरद तळवलकर,सतीश तारे सतीश तारेच  स्ट्रगल मी पाहिला आहे, सुकन्या कुलकर्णी .संजय मोने ,गिरीश ओक, तेव्हा पुण्यातील सत्य घटनेवर आधारित " कुसुम मनोहर लेले "हे  नाटक   चर्चेत आणी जोरात चालू होत मी हे नाटक पाहिलंय . पुण्याने तशी खुप नट मंडळी दिलीत ती अजरामर आहेत. गायक गायिका,लेखक .याच्यावर एक खंडच होईल.

तर असो

जनता वसाहत मधील सुवर्ण बाल मित्र मंडळ हे आमचं मंडळ. महानगरपालिकेची शाळा🏫 मंडळाच्या समोरच होती. सर्व जाती धर्माची लोक या जनता वसाहत मध्ये अगदी आनंदाने राहत होती त. तेव्हा खुप संवाद व्हायचा लोकांमध्ये, आता तसं काही दिसत नाहीये

मी जनता वसाहत मध्ये रुळल्यानंतर .मग लहान मुलांसाठी शालेय.✍️ निबंध  स्पर्धा ,रेकॉर्ड डान्स 💃, स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा घेतल्या . बालनाट्य लिहुन बसवले . हे सगळं माझ्याकडून सुवर्ण बाल मित्र मंडळांनी करून घेतले मंडळातली मुलं माझ्या पाठीशी उभी राहिली तर माझ्यावर विश्वास ठेवला. यास या स्पर्धा मी घेतल्यानंतर मी जनता वसाहत मध्ये बऱ्यापैकी माणस मला ओळखू लागले होते. बालनाट्य मध्ये माझ्या काम केलेला एक विजय काथवटे म्हणून मुलगा आज चित्रपटात🎥 आणि नाटकात 🎭काम करत आहे. आणि रिक्षाही चालवत आहे . लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा घेतल्यामुळे जनता वसाहती 👥लोक मला ब-यापेकी ओळखू लागले होते.

आता वाढलेले पुणे बघून मनात धस्य 🤭होतं. पाय ठेवावासा वाटत नाही . या वाढत्या पुण्यात आणि मेट्रो🚊 पुणे मध्ये जुन्या आठवणींना उजाळा देणे हेच म्हणजे आमचं पुणे .आणि जुन्या पुण्याला कुठेतरी मन सतत शोधत राहतं. ती जुनी माणसं तो जुना संवाद ते जुनी संस्कृती.

त्यावेळेस राहुल टॉकीज खूप फेमस होती. आणि त्याकाळी आधुनिक ही होती. मित्रांच्या लग्नाला त्यांच्या बहिणींच्या लग्नाला भोर तालुका इतर खेड्यातून आम्ही खूप फिरलो. मला पुण्याला खूपच आनंद 🤸आणि फक्त आनंदच दिला.

मी जगलो ते पुण्यातच खरं जगलो . कारल्याची लेणी लोणावळा खंडाळा जगून घेतला पावसात आम्ही चिंब भिजवून मनसोक्त जगून घेतलाय. लोणावळा खंडाळ्याला व कारले च्या लेणीला खूप पावसात भिजायचो आम्ही

आणि आता ते राहिलं आठवणीतलं पुणे म्हणूनच  . पुण्याच्या धाग्याशी मी जोडला जावा म्हणून , म्हणून हा लेख प्रपंच

तुम्हाला आश्चर्य वाटेल

आता पुण्यात यायचं असेल तर आम्ही एका ठिकाणीच येतो. तुम्हाला ही आश्चर्य वाटेल त्या स्थळाचे नाव घेतल्यानंतर ते स्थळ म्हणजे "ठुब्याचा बंगला "🏯 भूत बंगला वाटलं तुम्हाला आश्चर्य. माझा मित्र आणि मी टू व्हीलर वरून आजही एक वर्षांनी दोन वर्षांनी तो ठुब्याचा बंगला बघण्यासाठी फक्त पुण्याला येतो आश्चर्यकारक सगळा बंगला जमीन दोस्त झाला आहे पण 🏯बंगल्याची समोरची भिंत त्या बंगल्याची उभी आहे.हा लेख लिहिण्याचा अनेक कारणही पैकी एक कारण  आहे.

त्यावेळी माझं वय तसं 18 ते 20 वयाच्या आसपास होत जनता वसाहतीच्या कडेने वाहणारा कॅनॉल त्यातही मनसोक्त आम्ही पोहोण्याचा 🏊‍♀️आनंद ही लुटला आहे. या सगळ्या गोष्टी अनुभवल्यानंतर पुण्यात मी स्वतःला नशीबवान समजतो

तर ठुब्याच्या  बंगल्याची गोष्ट

जनता वसाहत मध्ये राहत असताना आम्ही सात आठ मुलांनी ठरवलं ठुब्याचा बंगला म्हणजे 🏯भूत बंगल्यातील भूत शोधायला जायचं त्या वयात असं काहीतरी भूत बघण्याचं धाडस करायची खुमखुमी कुतूहल या वयात प्रत्येकाला असतेच. भुताचा आकर्षण हे सगळ्यांनाच असतं .मी आपल्या सर्वांन मध्ये असतेच आणि त्यानुसारच ते पुढे घडलं

ठुब्याच्या भुताच्या बंगल्याबद्दल माझ्या कानावर🧏 सतत काही ना काहीतरी पडत होतं

ठुब्याच्या  बंगल्याचा मालक आहे तो म्हणे तो चहा चुलीत नोटा जाळायचा आणि नोटा जाळून चहा करायचा . तो बेडवर 🛌नोटा अंथरून झोपायचा .असं बरंच काही.......

आम्ही एके दिवशी ठरवलं की आपण तळजाई डोंगरावर ⛰️जायचं भूत बंगला बघण्यासाठी आणि जनता वसाहत पासून ते चालत जवळच होतं . आम्ही  बॅटऱ्या 🪫घेतल्या होत्या पाण्याच्या 🍶बॉटल असे जे हाताला लागेल ते घेतलं होतं भूत बघण्याचा मनात आश्चर्य होतं.आणि भिंती ही..

भूत बंगला पाहण्यासाठी आम्ही दिवसा जायचं ठरवलं. रात्रीचे जाण्याचं आमच्यात धाडस😱 नव्हतं. कारण तळजाईचा भूत बंगल्याचा जो परिसर आहे तो अगदी सुनसान आणि तेव्हा झाडीने🌳🌳🌳🌳व्यापलेला होता भयानक होता तो सीन.

आमची सात आठ जणांची टीम तळजाईच्या भूत🏯 बंगल्याच्या दिशेने निघाली  .

( मला वाटतं ठुब्याचा बंगला  त्या भूत बंगल्याचे नाव होतं हे आजच्या लोकांना कदाचित माहीतही नसेल )

आम्ही भूत बंगल्याच्या दिशेने आमच्या जनता वसाहतीची टेकडी ⛰️चढून तळजाई डोंगराच्या टेकडीच्या दिशेने आम्ही जाऊ लागलो मनात अनेक प्रश्न आणि उत्तर शोधण्याची त्या वयातील धडपड, अशा स्थितीत आमची पावलं ठुब्याच्या भूत बंगल्याकडे  जात होती. तो भूत बंगला 🤔कसा असेल ?मग आपल्यासमोर ते भूत येईल का🤪? आपल्याला दिसेल का ? असे 😜बावळट प्रश्न आमच्या डोक्यात होते. डोंगरावरून चालताना कडेला पडलेल्या वाळलेल्या झाडाच्या काट्या हातात घेऊन. आम्ही सुरक्षितेच्या दृष्टीने पाऊल टाकत होतो. तूरळक पण दाट भासणाऱ्या झाडीतून🌳🎄🌴🎄🌳 आम्ही मार्ग काढत एकदाच भूत बंगल्यापाशी पोहोचलो.  तेव्हा भूत बंगल्याच्या भोवती खूप झाडी होती. आणि तो भूत बंगला आम्ही लांबूनच न्याहळत होतो. (आता रस्ता वगैरे झालाय आणि झाडी वगैरे नष्ट झाली आहे)

घाबरत आणि कुतुहल मनात घेऊन. हळूहळू आम्ही भूत बंगल्याच्या 🏯दिशेने जाऊ लागलो. थोडी भीती आणि आश्चर्य अशी काहीतरी आमची मनस्थिती तेव्हा होती. बंगल्याच्या उजव्या बाजूला गाडीसाठी पार्किंग होतं बंगल्याच्या मधोमध समोरून दिसेल असा जिना होता बंगल्याच्या खाली तळघर होतं तसा भूत बंगला दोन मजली होता. दगडी बांधकाम होत .

आम्ही भूत बंगल्याच्या दिशेने जाऊ लागलो भूत बंगला साधारणता दहा ते बारा पायाच्या अंतरावर असताना आम्ही स्तब्ध झालो 🫢आत जायचं की नाही याचा विचार करू लागलो सगळे  आम्ही त्याच विचारत असताना एकदमच पाठीमागून आम्हाला झाडीतून एक आवाज आला

"ये पोरावो काय करता इथं..... "हा आवाज ऐकून आमच्या पायाखालची वाळूच सरकली. पाठीमागे वळून पाहिलं तर एक गुर चरणारे  दाढी वाढलेले आजोबांनी🧌 ती हाक दिली होती. ती हाक जानू भुतानीच दिली होती. असा भास झाला

आम्ही घाबरतच काही नाही काही नाही असं म्हणालो

इथे थांबू नका जा मुकाट्याने घराकडे असाही तो म्हणाला

आम्ही हो हो म्हणालो

मग आम्ही ठरवलं या आजोबांची 🧌नजर चुकवून आता आपण बंगल्यात घुसायचं

थोडा वेळ तिथेच रेगळल्या नंतर आम्ही पुन्हा एकदा आजोबा कुठे आहेत. याची खात्री करून घेतली. पण आजोबा गायबच होते पण आम्हाला आजोबा🧌 कुठेच दिसले नाही हातात काठी घेतलेला आजोबा एकदम गायब 🫢कुठे झाला. मनात एक अटकळ झाली

मग आम्ही समोरून दिसणाऱ्या जिन्यावरून प्रथम जायचं ठरवलं आम्ही हळूहळू जिना चढू लागलो आणि अचानक एक कबूतर किंवा वटवाघूळ🦅🦅 फडफड करत आम्हाला घाबरून निघून गेले. भूत बंगल्याचा फील आला.

बंगल्यात शिरण्या अगोदरच आजोबांनीच तो आम्हाला फील दिला होता

भूत बंगल्याचा वातावरण तयार झालं होतं. मनात भीतीने घेरलं होतं  😱. पण कुतूहल काही आमची पाठ सोडत नव्हतं .आम्ही जिन्याचं एक एक पाऊल सावधगिरीने टाकत होतो. 

आम्ही दुसऱ्या मजल्यावर पोचल्यानंतर काही रूम होत्या त्यात कुठे भूत दिसतं . हे पाहत होतो . का तेव्हा तो भूत बंगला सुस्थितीत होता. आजूबाजूला वस्ती नव्हती झाडांनी व्यापलेला तो परिसर होता

बंगल्याला आम्ही निरखून पाहत होतो. पुन्हा एकदा अचानकच कसलातरी आवाज झाला आणि आमची भंबेरी उडाली. मग आम्ही जिना उतरून झपाट्याने घाबरून 😱🏃🏃🏃खाली आलो .बंगल्यातून बाहेर पडलो . मग ठरवलं हा भुतं बंगला बाहेरून पूर्ण बंगला आम्ही न्याहळुन बघायचा ठरवला .

मग आम्ही पुन्हा धाडस करायचे ठरवले . तळघरात जायचे ठरवले. पुन्हा एकदा ते आजोबा कुठे दिसतात का ते आजूबाजूला आम्ही पाहिल . अचानक गायब झालेले आजोबा🧌 भूत तर नसतील ना असं मनात येऊन गेलं.

आणि तळघराच्या दिशेने आमची पावले  पडू लागली तळ घराचा जिना चालू झाला. टॉर्चचा  प्रकाश त्या तळघराचा अंधारलेला जिन्याला स्पर्श झाला. आणि  आम्ही हळूहळू घाबरत घाबरत तळघरची एकेक पाऊल खाली उतरून लागलो. तळघराच्या शेवटच्या खालच्या पायरीवर घाबरत घाबरत आम्ही पोहोचलो. आणि अचानक चार-पाच पक्षी 🦅🦅🦅🦅फडफडत आमच्या डोक्यावरून निघून गेले.

घाबरत आम्ही त्या पाखरांच्या पाठी मागून आम्ही बंगल्याच्या बाहेर आलो. मनात भूत😱 बंगल्याचं भयानक वातावरण तयार झालं होतं. आमच्या सर्व मुलांच्या मनात पुन्हा आलं आपण तळघर व्यवस्थित बघितलंच नाही पुन्हा आपण तर घरात जायचं व पुन्हा मी टॉर्चचा प्रकाश 🪫जिन्यावरून टाकत आत गेलो आत काहीच नव्हतं . तळघळा घरात सात आठ जमीनीवर दगडी पडली होती. आम्ही तो तळघर अंधार होता काही दगडी होती. आम्ही तो व्यवस्थित तळघर डोळ्यांनी पाहून घेतला मला काहीच दिसलं नाही.पण भूत बंगला पहिल्याच  समाधान आमच्या चेहऱ्यावर होतं ते समाधान घेऊन आम्ही जिना वर चढून आलो.स्वतः मधल कुतूहल जिवंत ठेवत. आणि मग आम्ही परतीच्या मार्गाला निघालो.

अचानक गायब झालेले आजोबाना 🧌आमचे डोळे शोधत होते. पुन्हा पुन्हा मनात प्रश्न येत होते ते आजोबा भूत तर नसतील ना ? ज्यांनी आम्हाला बंगल्यात🏯 घुसण्याच्या आधी हाक दिली होती

त्यांनाही आम्ही जाता जाता शोधण्याचा प्रयत्न केला.पण ते सापडलेच नाहीत .कुठे गायब झालेत कळलेच नाही .

तर अशीही ठुब्याच्या भुतबंगल्याची रहस्य कथा

खरंतर माझ्या आतील लेखकाचा जन्म हि पुण्यातच झाला. नाटक, कादंबरी,राजकीय लेख,बलरंजक कथा ,शॉर्टफिल्म,कविता ,चारोळी,एकाकीका, बळनाट्य असा माझा लेखकाचा प्रवास झाला.

तर असो 

पण आत्ताच पुणे मेट्रो🚅🚄  स्मार्ट सिटी पुणे  झाले आहे .बदलत्या आधुनिक पुण्याला पाहिलेकी  भीती ही वाटते, बदलत पुणे आधुनिक पुणे बरं ही वाटतं .माणुसकी हरवल्याची भीतीही वाटते. .पण बदल हा अटळ असतो. हा नियम लक्ष्यत घेता .पण पुणे हे विधेच माहेरघर म्हंटल जायचं ही ओळख  अजून तरी जिवंत आहे .पुणे तिथे काय उणे हे ही वाक्य अधून मधून कानावर पडत .  पुणे कात टाकत आहे.एव्हडं मात्र नक्की

लेखक - सचिन निकम कोल्हापूर 🙏

( आधुनिक मेट्रो सिटीच्या पुणेकरांनी मला व्यक्त व्हायला संधी दिली .त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे 🙏🙏🙏🙏🙏 )