Cross the line
( समुद्राच्या सौम्य लाटांचा आवाज )
( हळूहळू परदा सरकतो आणि आतले चित्र स्पष्ट होते बसण्याजोगी दोन दगड, एक ,कठडा लाईटच्या खांबावरील दिवा पेटला आहे )
तीन मित्र आपापल्या नेटवर्कमध्ये बिझी
वेळ मित्राच्या भेटण्याची,वेळ भुतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळाला गवसनी घालण्याची , वेळ नितीमत्ता समजून घेण्याची .वेळ भरून आलेल्या आकाश मोकळ करण्याची. अशीच एक समुद्राकाठची सूर्यास्ता वेळ. मित्रांच्या विचारांच्या आधान -प्रधानाच्या सौम्या लाटांनी सागराला शांत करण्याची वेळ .
मेघा हेडफोन ला डिवचत कोणाशी तरी बोलत आहे
बिपिन कठड्यावर बसून वायरलेस हेडफोन , गलतीशी मिस्टेक हे गाण ऐकत पाय मान लयबद्ध हलवत ,हातातल्या हँडसेट ची अधून मधून चाळे करत . वायरलेस हेडफोन गाणे ऐकण्यात हरवलेला . तोही दोन-तीन दगडी समुद्रात भिरकवतो .
नवीन प्रेक्षकांना पाठमोरा . अफाट पसरलेल्या समुद्रात दगड भिरकावताना, समुद्राशी मुक संवाद साधताना .
असीम चा प्रवेश होतो. आणि तिघा मित्रांना डिव्हायडेशनने न्याहाळतो. समुद्रात दगड भिरकावताना व आपला एकांत समुद्राशी शेअर करणा-या नवीन जवळ जात. तोही दोन-तीन दगडी समुद्रात भिरकावतो.
नवीन : अरे कधी आलास,मला वाटलं ऑफ झालास की काय ?
असिम : ऑफ तू होशील.( हलकस हसत) मी नाही. पण तु हे काय करतोयस ?
नवीन : काही नाही रे एकाग्रता एकवटत होतो .
असीम :- एकाग्रता,.......ती कशी काय?
नवीन :- आपण लहानपणी नाही काय , आपण समुद्रावरच्या लाटांवर काहीतरी तरंगताना एखादी वस्तू पाहिलं की , त्या वस्तू ला आपण टिपण्याचा प्रयत्न करायचो. त्याच एकाग्रतेला सर्च करण्याचा प्रयत्न करत होतो. थोडक्यात... (दगड फेकतो)
असीम :- थोडक्यात , थोडक्यात काय?
नवीन :- आरे स्वामी विवेकानंदांना सर्च करत होतो
असीम :- स्वामी विवेकानंदांना ( आश्चर्याने)
नवीन:- हो , ते म्हणतात to focus the mind on one place
असीम :- आणि मग त्याच definition काय आहे
नवीन :- attachment plus detachment is equal to concentraten
असिम : व्वा छान व्वा छान इतक्या दिवसानंतर तुझ्या एकाग्रतेचे रहस्य समजलं ( कठड्यावर बसतो).....म्हणजे रोज तु इथे येऊन नेहमी प्रमाणे स्वामी विवेकानंदांना शोधत होतास तर
नवीन : होय ! पण ते कधीच ऑफ झालेत. आजची तरूण पिढी विचित्र पद्धतीने ऑन होतेय.यार वाईट वाटत यार स्वामी विवेकानंद म्हणतात Concentration is the key to success. हे आजच्या पिढीला कधी कळणार पण खरं सांगू का,त्यांच्या विचारांनी माझं आयुष्य भरून टाकलय
असीम : तु म्हणतोस ते काही खोटं नाही.पण, आपल्या हातात काही गोष्टी नसतात ना.पण एक गोष्ट खरी सांगू का तुमच्या हिंदू धर्मीत मोटीवेशन देणारे खुप आहेत .आमच्यात अल्ला शिवाय कोणीच नाही . एकाग्रतेबद्दल आणि स्वामी विवेकानंद........ काही थोडक्यात असेल आणखीन सांग ना ऐकायला आवडेल मला
नवीन :- खरेच आवडेल तुला ,
असीम :- का नाही आवडणार
नवीन :-मग ऐक .एक छोटी तुला बोधकथा सांगतो,स्वामी विवेकानंदांची. खूप इंटरेस्टिंग आहे . एकदा अमेरिकेत स्वामी विवेकानंद गेले असता एक दिवस. तेथील नदीच्या नदीकाठाने फिरत होते. त्यांना एक तरूणाचे टोळके बंदुकीची नेमबाजीचा सराव करताना दिसले . ठराविक अंतरावर पाण्यावर तरंगणारे काही वस्तूंचा लक्ष भेधण्याचा ते प्रयत्न करत होते .पण त्यांना इतका वेळ प्रयत्न करून त्यातल्या कोणाचाही नेम लागत नव्हता . स्वामी विवेकानंद त्या टोळक्याच्या जवळ जाऊन हळूच म्हणाले,.मी प्रयत्न करून बघू का ?त्या टोळक्याने विचार केला हा विचित्र पोशाखातील घातलेला माणूस काय विशेष करणार आहे. त्यांनी विचार केला काय करतो ते पाहूया तरी . त्यांनी स्वामींची खिल्ली उडवण्यासाठी हेतूने त्यांच्या हाती बंदूक दित, त्या टोळक्यानी परवानगी दिली .विवेकानंदांनी सलग ओळीने तीन वेळा पाण्यावर तरंगणाऱ्या तीन वस्तूंचा सलग बरोबर लक्षवेध केला . त्या टोळक्याला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला .त्या टोळक्याना त्यांचा अपमान झाल्यासारखा वाटला . म्हणून स्वामी विवेकानंदाची त्या दुस-यानदा संधी देत टोळक्यानी पुन्हा स्वामी विवेकानंदांची परीक्षा घ्यायची ठरवली .त्यांनी विवेकानंदांना एकूण सलग दहा प्रयत्न करायला लावले . विवेकानंदांनी दहा ही वेळेस सलग अचूक लक्ष भेद केला. ते पाहून ते टोळके हिरमुसले . आणि डोळे विस्फारून त्यांना पाहू लागले. स्वामींची खिल्ली उडवणाऱ्या टोळक्याला आता प्रचंड आदर वाटू लागला. तर त्यांनी लाजून नम्रपणे विचारले तुम्ही कोठे नेबाजी शिकलात. विवेकानंद म्हणाले .यापूर्वी मी कधीच बंदूक हातात घेतली नाही . हे ऐकून आणखीन त्याना धक्का बसला.त्या टोळक्यातील एक स्वतःला सावरत म्हणाला हे कसं शक्य आहे . यावर विवेकानंद म्हणाले हे शक्य आहे .मी माझी दृष्टी त्या लक्ष्यावर एकाग्रह केली, त्यामुळे मला लक्ष शिवाय इतर काहीच दिसले नाही. म्हणून लक्षवेध झाला रोज चित्त एकाग्र केल्याने लक्ष साधता येते . attachment plus detachment is equal to concentraten हे एकाग्रतेचे डेफिनेशन कळलं
असीम:-खरच काय स्लालीट स्वामी विवेकानंद
नवीन : हे बघ बसला नेम एस.......एस
बिपिन : ब्रेकिंग न्यूज , आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार, समुद्राकाठी बसलेल्या नवीन या इसमाने काही दगड समुद्रात भिरकावले.त्यातील काही दगड माशांना लागले.काय दोष होता त्या माशांचा,का भिरकावले असतील नवीन या इसमाने दगड , दगड भिरकावण्यामागे काय हेतू असे नवीन चा .त्याला आता कोणती शिक्षा व्हायला हवी .पाहू आपण ब्रेक नंतर
नवीन : - अहो पत्रकार,तुमची पत्रकारिता वायरलेस माईक पुरतीच उरलीय.अंधातरी
मेघा :-नाहितर काय ,तुम्हा पत्रकारांना ना नीट इतिहास माहिती असतो . ना लोकांच्या वर्तमानाचे भान असतं. ना लोकांच्या भविष्यकाळावर होणा-या परिणामाची चिंता असते. नाहि तर काय नुसती बकबकबकबक दुसरं काही नाही
असिम :- नाहीतर तुमच्या बायकांचं वेगळं काय असतं (सर्व हसतात)
बिपिन:- आपल्या छोट्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे कामच असतं
नवीन: -वाटेल तसी मोडतोड करून कुठल्याही परिणामाचा विचार न करता
बिपिन:-काळानुसार बदलावं लागतं. नाही बदलणार तर माती होते . आयुष्य धक्क्याला लागते आता प्रत्येक प्रोफेशनल असंच झालंय दिखता है वही बिकता है भाई
असीम:-हे मात्र खर आहे
नवीन :- या जगात माणसं हरवलीत एवढे मात्र नक्की
मेघा :- अरे तो बघ फ्लेमिंगो स्टॅच्यू ( पक्षाला)
सर्वजण :- स्टॅच्यू
बिपिन: - स्टॅच्यू .....नमस्कार मी बिपिन मला स्वप्नात राहायला खूप आवडत. मला जगाचा कंटाळा आला स्वतःच मी विमान करतो. अनेक स्वप्नांना घेऊन आकाशात मी भराऱ्या-या मारतो. त्याला पैसे पडत नाहीत नाही .free of cost एक मात्र नक्की मला लयबद्ध जगायला आवडतं . जसं सा रे ग म प ध नी सा या सप्तसुरांसारखं . सप्तसुरांमध्ये रमायला मला खुप आवडतं..आपल्या चोहीबाजूनी मुझीक वाजत असल्याचा भास सतत होत राहतो पण कधी कधी आपल्या विमानाला जमिनीवर लँड व्हाव लागत.माझ वास्तववादी पेट्रोल संपलं कि, पण खरं सांगू का जमिनीवर उतरावसंच वाटत नाही जगण्याची जीवघेणी स्पर्धा नको नको नकोसी करते . म्हणून मला स्वप्नात रमायला आवडतं
मेघा :- स्टॅच्यू .नमस्कार मी अधांतरी. पण वास्तवाला जुळवून घेण्याची धडपड सतत करत असते. माझी अवस्था पंख असून उडता येत नाही .स्वातंत्र्य असून लढता येत नाही. आपली माणसं असून त्यांच्याबरोबर चांगलं जगता येत नाही. डोक्याने बुन्डी छोटी केस असून गजरा माळता येत नाही. असंच काहीतरी विचारांची उलथापालत होत असते.फुल असून फुलांचा सुगंध येत नाही म्हणून मी आधांतरी आहे असं सतत वाटत राहतं. का कोणास ठाऊक पण जगताना लोक कशाची वाट पाहतील बरं . रॅपर मधल्या पुडा सारखं पुडा मोठा फुगलेला पण वेफर्स पुढच्या फक्त तळालाच. अख्खा पुडा हवे न भरलेला. असं सगळं आयुष्य
असीम:- स्टॅच्यू . मी असीम. माझ्या धर्मातील धर्मांधांना कंटाळलेला. आकाश मोकळा असून स्वतःच्या मर्जीने झेप घेऊ न शकणारा . वाट समोर दिसते आहे पण स्वतःच्या मर्जीने पुढे एक पाय टाकू न शकणारा .देहाभोवती असत्य विचारांचं कोडाळ आहे .असं वाटतं.म्हणून स्वताला बोट बनवतो . आणि पाण्यावर तरंगतो.पाणी खुप मला आवडतं ,म्हणून मी पाण्यावरून चालतो. सगळे मला बोट म्हणतात मी सतत पाण्याची खोली मोजत असतो. ती जगताना मला महत्त्वाची वाटते तरंगताना अंदाज घेऊन मार्ग काढता येतो.
नवीन :- स्टॅच्यू नमस्कार मी नवीन मी नेहमी म्हणत असतो सत्य ही सत्य असत. मला आजूबाजूला जे काही घडतं ते सोयीनुसार नजरेआड करायला मला जमत नाही. क्या गोष्टी साथ त्रास ही होतो हाच माझा मोठा प्रश्न आहे त्याला मी सतत छोटा करण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या अंतरातील लढाई सतत चालू असते. स्वामी विवेकानंद म्हणतात. The world is great gymnasium where we come to make ourselves strong. इतरही विचारवंत आहेत पण देशी विचारच स्ट्रॉंग असतात म्हणून मी स्वामी विवेकानंद फॉलो करतो
( फ्लेमिंगो आवाज करत जातो )words