me and my memories - 3 in Marathi Classic Stories by गिरीश books and stories PDF | मी आणि सांगण्यासारखे बरेच काही - 3

Featured Books
  • मेरी साहित्यिक यात्रा

    संस्मरण मेरी साहित्यिक यात्रा - सुधीर श्रीवास्तव से यमराज मि...

  • अंश, कार्तिक, आर्यन - 10

    मल्होत्रा का महलमल्होत्रा का महल…घर कम, ऐलान ज़्यादा था।ऊँचे...

  • VORTX - 3

    — "ब्रह्मांड की दरार: 5वीं सदी का वो खौफनाक सफर"दृश्य 1: भवि...

  • Agent Tara - 5

    फाइनल टेस्ट पास करने के बाद तारा की भूमिका सहयोग फाउंडेशन मे...

  • लिव-इन

    लिव-इन                           कमल चोपड़ा                ...

Categories
Share

मी आणि सांगण्यासारखे बरेच काही - 3

मागच्या लेखात शाळेच्या मित्राची आठवण सांगितली. तर आता पुन्हा शाळेत जाऊया.
आमची शाळा – प्रायव्हेट हायस्कूल. त्या काळात आम्हाला माहित असलेल्या इतर शाळा म्हणजे तवनाप्पा पाटणे हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल आणि ज्या शाळेला आम्ही गंमत म्हणून “महालबाड गद्ध्या मुलींची शाळा” म्हणायचो ती म. ल. गर्ल्स हायस्कूल. सधन कुटुंबातील मुले शिकायची ती सेंट झेवियर हायस्कूल.
“प्रायव्हेट हायस्कूल” हे नाव घेताच १९७०–७५ च्या काळातील मुलांना “पिंडरी शेक” आठवतो. पी.टी.चे सर शाळेत उशिरा येणाऱ्या मुलांच्या पायावर पट्ट्या मारत. त्यामुळे प्रार्थना सुरू होण्यापूर्वीच शाळेत पोहोचण्याचा मुलांचा आटापिटा असे. त्या वेळी पालक मुलाला मारले तरी क्वचितच तक्रार करत.
आमचे इतिहासाचे सर उत्तम अभिनय करायचे. त्यांनी म्हणून दाखवलेले “ला इलाह…” अजूनही कानात घुमते. त्यांना आडनावांची उत्पत्ती सांगायला फार आवडायचे. पूर्वी किल्ल्यांच्या बुरुजांवर काही लोक आंबिल उकळून ठेवत आणि ते शत्रूवर ओतत असत, त्यावरून एक आडनाव पडले, असे त्यांनी सांगितले होते.
इंग्रजीचे सर शाळा सुटल्यानंतर शब्द पाठांतरासाठी थांबवत. रोज किमान पाच शब्द पाठ करायचेच. पुढे कॉलेजमध्ये इंग्रजी माध्यम घेतले आणि इंग्रजी पुस्तके वाचण्याचे धाडस झाले, ते त्या सरांमुळेच. नंतर एका कंपनीत साहेबांनी “थिसॉरस”ची ओळख करून दिली आणि शब्दसंपत्तीचे वेगळेच दालन उघडले.
कॉलेजमध्ये शाळेपासून कॉलेजपर्यंत ‘पहिला’ येणारा विद्यार्थी भेटला. आमच्या कॉमर्स कॉलेजच्या शेजारी लॉ कॉलेज होते. वकिली शिकणारा एक मुलगा स्कुटरवर उभा राहून गाडी आत आणत असे. तो फार हुशार आहे, असे आम्ही ऐकले होते.
आमची प्राथमिक शाळा – श्री विद्यामंदिर. आम्ही लाकडी फळ्यांवर बसायचो. त्या फळ्यांना फटी पडलेल्या असत. पेन्सिली खाली पडायच्या आणि तळघरातून त्या शोधून आणणे हा एक वेगळाच उद्योग असे. तिथे ‘हेडसर’ आणि ‘थोरले सर’ अशी शिक्षकांची ओळख होती.
माझे पहिली ते तिसरीचे शिक्षण कोयनानगरला झाले. पण तिथल्या फारशा आठवणी नाहीत. स्मरणशक्ती ही एक विलक्षण शक्ती आहे. गुगल गुरु सांगतो की मेंदूमध्ये आठवणींसाठी वेगवेगळे भाग असतात. काही नवीन आठवणी तयार करतात, काही जुन्या आठवणी परत जागवतात, तर सायकल चालवण्यासारख्या कौशल्यांसाठी वेगळे भाग काम करतात.
तांत्रिक बाजू बाजूला ठेवली तरी प्रश्न उरतो – आपण काय लक्षात ठेवतो आणि काय विसरतो?
असे म्हणतात, स्मरणशक्तीचा वापर कसा करतो यावर ती अवलंबून असते. पण काही वेळा खूप प्रयत्न करूनही काही आठवत नाही. काही जण म्हणतात, चांगल्या गोष्टी लक्षात राहतात; तर काहींचा अनुभव उलट – वाईटच जास्त आठवते. एक वाक्य या संदर्भात बोलले जाते ते चांगले केलेले लोक विसरतात एखादे वाईट केलेले मात्र लक्षात ठेवतात
मग या स्मरणाच्या “लायब्ररी”त नेमके काय साठते आणि काय नाही, हे कळणे कठीण आहे. विस्मरण चांगले की वाईट? काही गोष्टी विस्मरणाच्या टोपलीत जाणे मनःशांतीसाठी आवश्यक असते. पण वृद्धापकाळात स्मरणशक्तीचा आजार जवळच्यांसाठी त्रासदायक ठरतो.
मी स्वप्नांवरील एका लेखात लिहिले आहे – स्वप्नांचा ठराविक पॅटर्न नसतो. तसेच काय स्मरणात राहील किंवा नाही, यालाही ठराविक नियम दिसत नाही.
कोयनानगरचे काहीच आठवत नाही असे नाही. आम्ही ते गाव भूकंपामुळे सोडले. आमच्या सरकारी घराची भिंत पडली होती. दोन-तीन दिवस गाड्यांतून बिस्किटे वाटली जात होती. नंतर कोल्हापूरच्या गाडीत बसलो – एवढे मात्र स्पष्ट आठवते.
शाळेत असताना क्लासेस लावले नव्हते. गणिताशी माझे कधी पटले नाही. कधी परीक्षक सर एखादे गणित समजावून सांगत आणि त्यामुळे पासिंग मार्क मिळत. त्या काळात प्रसिद्ध असलेल्या पेठे क्लासेसला मात्र गेलो नाही. इंग्रजीचा एक “हत्ती” नावाच्या सरांचा क्लास होता. कॉमर्सला अकाउंटन्सी आणि स्टॅटिस्टिक्सचे क्लासेस असत. आता आमच्याच एका मित्राने अकाउंटन्सीवर पुस्तके लिहिली आहेत.
मला नेहमी एक प्रश्न पडतो – निर्णयशक्ती म्हणजे नेमके काय? एखाद्या प्रसंगी मनात पहिला विचार येतो; तोच बरोबर असतो असे वाटते. पण लगेच दुसरा विचारही डोकावतो. जणू दोन मनांचे द्वंद्व सुरू होते. त्या द्वंद्वात शेवटी कोणता विचार जिंकतो?
 आपण कृती करतो, बोलतो – पण नंतर ते चुकीचे ठरते. जो योग्य निर्णय घेतो तो हुशार मानला जातो; जो चुकतो तो मागे पडतो.
माणूस जन्मतःच हुशार, मध्यम किंवा सामान्य असतो का? काही जण जन्मत:च शारीरिक किंवा मानसिक मर्यादा घेऊन येतात. त्यामागे नेमके काय तत्त्व असते? मागील जन्म, कर्म या संकल्पनांवर विश्वास ठेवावा का?
एक कथा ऐकली आहे – एका व्यसनी माणसाला एका महाराजांचा फोटो मिळाला आणि तो हळूहळू सुधारला. काही लेखक अत्यंत वाईट अवस्थेतून मोठे झाले. पण काही लोक प्रयत्न करूनही सुधारत नाहीत.
दोन भाऊ – एक व्यसनी, एक धार्मिक. पण धार्मिक भाऊ लवकरच जग सोडून गेला आणि व्यसनी मात्र जगत राहिला. हे का घडते?
“मी केले” असे म्हणणारे अनेकदा एखाद्या अदृश्य शक्तीचा आधार विसरतात. एखादा प्रामाणिक माणूस नोकरी करून निवृत्त होतो आणि अचानक आजारी पडतो. तर एखादा भ्रष्ट माणूस निवृत्तीनंतर सुखाने, प्रवास करत वर्षानुवर्षे जगतो.
हे का होते?
कर्म, दैव, नशीब, भक्ती – यांवर विश्वास ठेवणारेही आहेत आणि आयुष्यभर नास्तिक राहणारेही. प्रश्न मात्र तसाच उरतो.