Silk knot in Marathi Love Stories by Mrudula books and stories PDF | रेशीमगाठ

The Author
Featured Books
Categories
Share

रेशीमगाठ

आज तिचा वाढदिवस होता. तिच्या हट्टामुळे घरातल्या घरातच वाढदिवस सेलिब्रेट करायचा ठरला. ती तिच्या आई वडिलांकडे काही स्पेशल मागणार होती. त्यामुळे ती थोडी नर्व्हस होती.
केक कट करण्याची वेळी झाली अजून ती आली नव्हती म्हणून तिचा भाऊ नचिकेत तिला बोलवायला गेला.

"अनु... इथे काय बसली आहेस... चल केक कट करायचाय ना... सगळे वाट बघतायत तुझी"
नचिकेत

"हो"
अनु

"हो काय हो... माझ्यासोबत चल... नाही तर परत इथेच बसून राहशील..."😒
नचिकेत

ती त्याच्यासोबत निघाली.

"मस्त नेहमी सारखं बाहेर गेलो असतो सेलिब्रेट करायला तर... तुझा हट्ट की या वेळी बर्थडे घरातच करायचा..."
नचिकेत

"नची... मिळेल ना मला हवं ते..."
अनु

"मी काय बोलतोय... तुझं काय मध्येच..."
नचिकेत

"सांग ना"
अनु

"नको टेन्शन घेऊस... तुला हवं ते मिळेल तुला... आपले मम्मा डॅडा कधी नाही म्हणालेत का ? आणि काय मागणार आहेस गं... की तुला एवढं टेन्शन आलंय..."
नचिकेत

"सगळ्यांसोबतच कळेल तुला..."
अनु

"मला आताच सांग... मी नाही सांगणार कोणाला "
नचिकेत तिला तिथेच थांबवत म्हणाला

"कळेल ना थोड्या वेळात"
अनु

"ओह गॉड... तू chris बद्दल सांगणार आहेस का ?"😧
नचिकेत

"Chris ? त्याचा काय संबंध ?"🤔
अनु विचार करत म्हणाली

" बॉयफ्रेंड आहे ना तुझा तो..."
नचिकेत

"कुठे डोकं चाललंय तुझं... तो माझा बॉयफ्रेंड नाहिये... मूर्ख..."😒
अनु

"मग कोण आहे ?"
नचिकेत

"फक्त मित्र आहे तो"
अनु

"बॉयफ्रेंड कोण आहे असं विचारलं मी"
नचिकेत

"कोणी नाहीये माझा बॉयफ्रेंड"
अनु

"अनु... नचिकेत येताय ना तुम्ही"
मम्मा ने आवाज दिला

"आलो आलो... चल पटकन"
नचिकेत

ती जाऊन बसली. मम्माने तिचं औक्षण केलं. केक तिच्या समोर ठेवला.

"हॅपी बर्थडे टू यू... हॅपी बर्थडे टू यू... हॅपी बर्थडे डियर अनु ... हॅपी बर्थडे टू यू..."
सगळे एका सुरात म्हणाले
तिने केक कट केला.

अनुष्का सबनीस... खूप मोठ्या इंटरनॅशनल बिझनेसमन विक्रांत सबनीसची मुलगी. तिचा मोठा भाऊ राघव तो ही काही वर्षांपूर्वी बिझनेसमध्ये उतरला होता. कमी वयात जास्त प्रगती केल्यामुळे त्याच्या नावाची खूप चर्चा होती. जगातल्या टॉप 10 यंग बिझनेसमन मध्ये त्याचं नाव होतं. तिचे डॅडा विक्रांत तिची मम्मा रेवती, मोठा भाऊ राघव आणि तिचा लहान भाऊ नचिकेत अशी पाच जणांची फॅमिली... तिघे भावंडं एकमेकांवर खूप प्रेम करायचे.

"झालं का सगळ्यांचं ? काय हवंय तुला... सांग आता... लवकर... मला राहवत नाहीये आता"
नचिकेत

"डॅडा, मला आता पर्यंत मी जे मागितलं ते मिळालं आहे... त्या बद्दल खूप खूप थँक्स..."
अनु तिच्या आई वडिलांकडे बघत म्हणाली

"अनु... असं काय बोलतेस... आमचं कर्तव्य आहे तुम्हाला हवं ते देणं"
मम्मा

"बोल तू काय हवंय"
डॅडा

"मी आता मागणार आहे त्याने कदाचित तुम्हाला माझा राग येईल"
अनु

"असं काय मागणार आहेस ?"
राघव

"परमिशन"
अनु

"कसली"
डॅडा

"डॅडा मला जॉब करायचा आहे"
अनु धीर एकवटून म्हणाली

"जॉब ? आपला एवढा मोठा बिझनेस असताना तुला जॉब का करायचा आहे"
नचिकेत

"मला शिकायचं आहे"
अनु

"जबाबदारी घ्यायचं सोडून काय बडबडतेय तू ?"
राघव

"काय शिकायचं आहे तुला ?"
डॅडा

"एम्प्लॉइजचे प्रॉब्लेम... हे त्यांच्यात राहिल्या शिवाय कसं कळणार ना आपल्याला... आणि बॉस कसा असावा हे ही शिकायचं आहे मला"
अनु

तिच्या बोलण्यावर नचिकेतला हसू आलं

"आपला डॅडा एक चांगला बॉस आहे... त्याच्याकडे बघून शिक ना तू काय शिकायचं आहे ते"
राघव

"आपल्या ऑफिस मध्ये काही दिवस शिक तुला जे शिकायचं आहे ते"
डॅड

"डॅडा मला शिकायचं आहे... आपल्या ऑफिस मध्ये सगळे ओळखतात मला... तिथे राहून मला शिकता येणार नाही... माझ्याकडून काही चुका झाल्या तरी आपल्या ऑफिस मध्ये त्यावर पांघरून घालण्यात येईल"
अनु

"बरं तू सांग मग तुला कोणत्या कंपनी मध्ये जॉब करायचा आहे ? मी बोलतो त्यांच्याशी"
डॅड विचार करत म्हणाले

"बिझनेस पार्टी मध्ये जाऊन बरेच जण मला ओळखतात... मला इथे कोण जॉब देईल आणि दिला तरी ते मला एम्प्लॉय सारखं ट्रीट करणार नाहीत..."
अनु

"तुला जे म्हणायचं आहे ते स्पष्ट बोल"
राघव

"मला इंडिया मध्ये जाऊन जॉब करायचा आहे"
अनु घाबरत बोलली.

"काय बोलतेय अनु तू..."
मम्मा

"तुझं डोकं फिरलं आहे का ?"😠
नचिकेत

"शांत हो नचिकेत... आज तिचा वाढदिवस आहे आपण यावर नंतर बोलू... चला डिनर करूया..."
मम्मा
सगळे शांततेत जेवले.

अनुच्या डोळ्यात पाणी होतं. ती तिच्या रूम मध्ये निघून गेली. डॅडही त्यांच्या रूम मध्ये गेले. त्यांच्या मागून मम्मा गेली.

"काय गरज होती हिला तिचा बर्थडे स्पॉइल करायची"😠
नचिकेत

"त्या पेक्षा तू हा विचार कर की डॅडा ने तिला परमिशन दिली तर ?"
राघव शून्यात नजर नेत म्हणाला

"आय डोन्ट थिंक तिला परमिशन मिळेल"
नचिकेत

"मिळेल... तिने अजून एक - दोनदा विचारलं तर नक्कीच मिळेल"
राघव

"पण ती तिथे एकटीच काय करणार... कशी राहणार... कसं मॅनेज करणार सगळं ?"
नचिकेत

"मी बोलतो उद्या डॅडासोबत"
राघव

अनु अस्वस्थ झाली होती. 

"मी आज परवानगी घेतली नाही तर मला कधीच परवानगी मिळणार नाही... सगळे हो म्हणतील या आशेनेच मी हा दिवस निवडला होता ना... मी परत जाऊन विचारते डॅडाला... आज नाही तर कधीच नाही"
अनु स्वतःशीच बोलत होती.

अनु मम्मा डॅडा कडे गेली. डॅड तिच्या बद्दलच विचार करत बसले होते.

"मला बोलायचं आहे थोडं"
अनु घाबरत म्हणाली

"जे काही बोलायचं आहे ते उद्या बोल"
मम्मा

"आताच बोलायचं आहे मला... मम्मा प्लीज"
अनु

"बोलुदे तिला"
डॅड

आता अनुला कळत नव्हतं की कुठून सुरुवात करावी.

"बोल"
डॅड

"डॅडा मला खरंच जायचं आहे"
अनु डोळ्यात पाणी आणून म्हणाली

डॅड काहीच म्हणाले नाही

"डॅडा तू मला माझ्या प्रत्येक बर्थडेला विचारतो मला काय हवं आहे. मी कधीच काही मागितलं नाही तुझ्याकडे. आज मी स्वतःहुन काही तरी मागतेय तर..."🥺
अनु

डॅड काहीच म्हणत नव्हते. तिच्या डोळ्यात पाणी आलं.

"ठीक आहे... तुमची इच्छा नाहिये तर मी नाही जात"
ती रडक्या स्वरात म्हणाली आणि रूम बाहेर जायला निघाली.

"थांब अनु..."
डॅड

अनु जागीच थांबली

"किती दिवसांसाठी जायचं आहे तुला ?"
डॅड

"किमान सहा महिने"
अनु हळू आवाजात म्हणाली

"तू जाऊ शकतेस."
डॅड

"काय बोलतोयस तू विक्रांत"
मम्मा

"मला माहितेय मी काय बोलतोय"
डॅड 

"काय ? खरंच ?"
अनुला विश्वास बसत नव्हता की ती काय ऐकतेय

"डॅडा तू खरंच तयार आहेस मला पाठवायला ?"
अनु

"हो पण एका अटीवर"
डॅडा

"अट ? कोणती अट ?"
अनु

"तू प्रधानांकडे जॉब करशील... स्वतःहुन कुठेही इंटरव्यूला जायचं नाही... मान्य असेल तर सांग नाही तर..."
डॅडा

"मान्य आहे... मी त्यांच्याकडे जाईल पण तिथे कोणाला कळलं नाही पाहिजे मी तुझी मुलगी आहे."
अनु

"मी बोलतो त्यांच्याशी."
डॅडा

"थॅन्क्स डॅडा... थँक्यू सो मच"
अनु

दुसऱ्या दिवशी राघव अनु बद्दल बोलण्यासाठी डॅड कडे गेला.

"डॅडा... अनु काल जे बोलली ते..."
राघव

"हं... विचार करूनच निर्णय घेतला आहे मी..."
डॅड

"गूड डिसिजन डॅडा... नकोच पाठवू तिला"
राघव

"मी होकार दिला आहे तिला."
डॅड

"डॅडा तू... तू कसा तयार झाला तिला पाठवायला ? मला माहित होतं ती तुला इमोशनल करून होकार मिळवणार म्हणून मी तुझ्याशी बोलायला आलो. तर तू आधीच... तू चुकतोय डॅडा"😟
राघव

"मी काही चुकत नाहिये. मी पूर्ण विचार करून निर्णय घेतला आहे. ती सहा महिन्यांसाठी जायचं म्हणतेय पण बघ तू... ती दोन - तीन महिन्यात परत येईल."
डॅड

"ते दोन - तीन महिने तरी कसं राहणार आहे ती. तिला जमेल का ? इथे सगळं तिच्या हातात मिळतं तिला. तिथे सगळ्या गोष्टी स्वतः कशी करणार आहे ती ? आणि सिक्योरोटी ? त्याचं काय ?"
राघव तिच्या काळजीने म्हणाला

"त्याची काळजी नको करुस. बॉडगार्ड लावणार आहे मी तिच्या मागे. तिला कळू ही न देता"
डॅड 

"तू आता तिला परवानगी दिली आहेस तर सगळी व्यवस्था करतो मी..."
राघव निराशेने म्हणाला

...




नवीन कथा आहे. कशी वाटतेय प्लीज समीक्षा देऊन सांगा
स्टिकर्स द्यायला विसरू नका.
Happy Reading :)