**********************************
पूर्वसूत्र -
त्यानंतरचा काळ.., तिला त्याच्यासोबत धोक्याने लग्न करावं लागल पण त्यामागे कारण होत...... तिलाही अस काही करायच नव्हत पण त्या वेळचीं गरज होती... आणि हो ती पूर्ण नाकारता नाहीये... हो जेव्हा वीर बेहोशीत होता तेव्हा ती सुद्धा स्वार्थी झालेली.... तिच्याही मनात स्वार्थ होता..... पण निव्वळ प्रेमाचा..... प्रेमात स्वार्थी होणं एवढ चुकीचं...... वीर सुद्धा रावीच्या प्रेमात स्वार्थी झालेला... त्यांनेसूद्धा रावीला तिच्या लग्नातून पळवलेलं.... मग तिने वीरसोबत लग्न करण्यासाठी थोडा स्वार्थीपणा केला तर कुठे बिगडल......खरच ती चुकीची होती की त्यामागे काही कारण होत......
**********************************
आतापुढे -
स्मिताला काहीच समजत नव्हत... कुठे ती त्याच्यासोबत सुखी संसाराची स्वप्नं बघत होती आणि कुठे हे सगळं होऊन बसल... तिची एक चूक तिच्या आयुष्यात वादळ घेऊन आलेलं..... तिला काय करू अस झालेलं... खरतर आपल्या प्रेमाकडूनच झालेला आपला तिरस्कार कोणालाच आवडणार नाही... पण आज तेच झालेलं वीर तिच्यावर तिरस्कार करतो.... खुप तिरस्कार.... हो तिची चूक पण तेवढीच मोठी आहे पण त्याने त्या चुकीमागील कारणही जाणून घेणं योग्य नाही समजलं.... पण जरी त्याने स्मिताला कारण विचारलं असत तरी स्मिता त्याला सत्य सांगू शकत नाही....
तिला कधीच अस वागायचं नव्हत... हो तिला तो पाहिजे होता तिच्या आयुष्यात पण अस जबरदस्ती खरच नको होत तिला... तिला पूर्ण मान सन्मानानी आणि प्रेमाने तो पाहिजे होता....इथे मान सन्मान तर होता पण प्रेम कुठे आहे.... तिला वाटतं होत जणू तिने त्याला गमावलंय.... तो ज्याप्रकारे तिच्यासोबत बोलून गेलाय त्याने तो तिला कधी स्वीकारेल अस तर वाटतं नाहीये.....
स्मिता : "मी खरच चुकले... मी माझ्या प्रेमाच्या स्वार्थासाठी जबरदस्ती केली... हो माझ प्रेम आहे... आणि मी माझ प्रेम मिळवायला चुकीचा मार्ग निवडला... सर्वांना माझी चूक दिसेल पण त्या चुकीमागील माझ प्रेम का दिसत नाही.... मी ऐकलेलं लग्न म्हणजे जन्माची गाठ जिथे सगळ्या चुकी माफ होतात., जिथे नवीन जीवनाची सुरुवात होते... पण इथे तर यांनी मला स्वीकारायलाच नकार दिलाय.... काय करू, कस करू... मी कोणाला सांगूही शकत नाही... बहुतेक हीच माझ्या चुकीची शिक्षा आहे....बहुतेक हे मला कधीच स्वीकारणार नाही....."
स्मिता रडत होती.. खुप रडत होती... तिच्या प्रत्येक चुकीला कोसत होती.... वीरचे ते अगदी भाजके शब्द तिला आठवत होते.... ज्याप्रमाणे तो तिला बोलला... ज्याप्रमाणे त्याने तिला नकारलं.... सगळं आठवत होत.... एक चूक माणसच आयुष्य बदलून टाकत..... यापूर्वी तिने कधीच स्वार्थ केला नाही... नेहमी दुसऱ्यांना देत राहिली... नेहमी देत राहायचंय देत राहायचं... पण एकदा स्वतःच्या स्वार्थासाठी चूक केली तर ती एवढी मोठी ठरावि की त्या चुकीला योग्य करता करता पूर्ण आयुष्य निघून जाईल.....
रडत,विचार करत बेडला टेकून खाली बसलेली माहित नाही रात्रीच्या कोणत्या प्रहरी बसल्या बसल्या झोप लागली.... सकाळपासून दगदग झालेली त्यात वीरसोबत लग्न म्हणजे डबल आनंद होता.... पण काही तासातच तिची ही अवस्था व्हावी... खुप वाईट......
***
रात्री तीनच्या सुमारास वीर रूममध्ये आला... त्याला त्याच्या आणि स्मितामध्ये काय चालू आहे हे कोणालाही कळू दयायच नव्हत... सध्या फार काळाने सगळे आनंदी होते... खास करून रावी आनंदी होती..... त्याचे मित्र परिवार आनंदी होते..... आणि लग्नामुळे सगळे फ्रेंड्स, रावी आणि तन्मय सुद्धा घरीच होते..... पाहुणे वैगेरे घरी असताना उदया कोणाला समजलं की तो त्याच्या खोलीत नव्हता तर उगाच सगळ्यांना वेगळं वाटायचं.....
वीर जेव्हा खोलीत आला तर त्याने स्मिताला खाली बसल्या ठिकाणी झोपलेल पाहिलं... माहित नाही तिला पाहता त्याचा राग पुन्हा उफाळून आला..... त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केल आणि जाऊन सोफ्यावर बसला..... एकटक तिच्या चेहऱ्याकडे बघत होता... माहित नाही काय विचार चालू होते त्याच्या डोक्यात.... त्याने त्याच्या हातातलं वॉच काढून बाजूला ठेवल....
"माझ्या आयुष्यातली झोप घालवून स्वतः झोपलीये....." वीर रागात बडबडला..... 👿आणि रागात उठून AC चा रिमोट घेऊन त्याच टेम्परेचर वाढवलं... आणि सिलिंग फॅन सुद्धा लावला.... आणि बेडवरची एकुलती एक ब्लॅंकेट घेऊन सोफ्यावर झोपला......"खुप हौस होती माझ्यासोबत लग्न करायची हं..."😠
अगदी वीस मिनिटांचं खोली अतिशय थंड झालेली..... वीरला तर झोप सुद्धा लागलेली.... पण इथे स्मिताला तेवढ्या थंडीमुळे जाग आलेली... ती उठून उभी झाली समोर वीर सोफ्यावर झोपलेला.... स्मिता हाताला चोळून ऊर्जा देत बेडवर एका कोपऱ्यात जाऊन बसली... तिने इकडे तिकडे पाहिलं तर पांघरून घ्यायला काहीच मिळत नव्हत तिला.... तिने उठून फॅनच स्विच बंद केल..... पण AC अजूनही जास्त टेम्परेचर वर होता... आणि त्याच रिमोट वीरजवळ होत... स्मिता तशीच कुडकूडत बेडवर आडवी झाली....
तिला समजत होत.. वीर हे सगळं मुद्दाम करतोय... पण तिला दुःख होत होत की तो तिचा एवढा तिरस्कार करतो की तिला त्रास व्हावा म्हणून हे सगळं करतोय.... तिला कधीच वाटल नव्हत ती कधी कोणाच्या एवढ्या तिरस्काराच कारण बनेल... खास करून वीरच्या, ज्याच्यावर ती प्रेम करती त्याच्या..... विचाराने अश्रू पुन्हा वाहायला लागले.....
***
सकाळी 6:30
"वीर.... वीर...." बाहेरून आई नॉक करत आवाज देत होत्या.... वीरला अचानक जाग आली.... तो उठून बसला फोन पाहिलं तर सकाळचे साडेसहा वाजलेले... तो काल खरच खुप दमलेला नाहीतर एवढा वेळ झोपणं त्याला खरच जमत नव्हत..... तो उठून उभा झाला समोर बेडवर पाहिलं तर स्मिता अगदी कुडकूडत होती.... त्याच्या डोक्यात अचानक क्लिक झाल....
"ओह्ह शिट्ट......"वीर पटकन त्याच्या आजूबाजूला AC च रिमोट शोधायला लागला.... आणि रिमोटने AC बंद केल....
"झोप कशी लागली... मी फक्त पंधरा मिनिट AC चालू ठेवणार होतो.... शिट्ट....."वीर स्वतःशी बडबडत म्हणाला...तो तिच्या बेडजवळ आला.....
"स्मिता.... स्मिता... ये उठ....." वीर हळु हळु आवाज देता एकदाच मोठ्याने म्हणाला ज्यामुळे स्मिता लगेच उठून बसली..... ती अजूनही कुडकूडत होती... माहित नाही वीरला त्याची चूक समजली... तो एवढाही निर्दयी नव्हता नां....
"स.. सॉरी.... ते मी..." स्मिता दात कडकडत बोलण्याचा प्रयत्न करत म्हणाली.....
"Shut up... And open the door...." वीर रागात बोलून बेडवर पुन्हा पालता पडला..... राग तर होता पण तिला बघून आत्ता त्याला त्याच्या वागण्याचा गिल्ट वाटतं होत...... स्मिता त्याला पुन्हा झोपलेल बघून हळूच साडी सावरत दार उघडायला गेली...... बाहेर आई उभ्या होत्या....
"झोप नीट झाली नां स्मितु......" आई तिला बघत म्हणाल्या...
"हो आई... तुम्ही सकाळी..... म्हणजे काही काम होत का?..." स्मिता खाली मान घालून म्हणाली.....
"अग सगळे पाहुणे उठतीलच.... तुमची हळद उतरवायचा कार्यक्रम आहे नां सगळे जमतीलच आत्ता तू हळदीतली साडी घालून तयार हो...." आई तिला सांगत म्हणाल्या....स्मिताने मान हलवली.....
"वीर झोपलाय का अजुन....." आई आतमध्ये बघत म्हणल्या....स्मिताने होकारार्थी मान हलवली... आई वीरला बेडवर झोपलेल बघून आनंदी झाले... त्यांना वाटलेलं वीर स्मिताला स्वीकारेल का नाही... पण दोघात सगळ नीट आहे बघून त्यांना आनंद झाला.....
"बर त्याला पण उठव आणि खाली या लवकर हा...." आई हसून बोलून खाली निघून गेल्या.....
***
"मोठी आई., काकू.... इकडे या लवकर...." रावी आणि आशु आईंना बोलावत म्हणाले.... आई पटकन त्यांच्याकडे गेले आणि त्याना थम्ब दाखवला 👍
"कस...?" रावी आणि आशु एक्साईटेड होत म्हणाल्या...
"अग मी स्वतः बघितलंय.... वीर बेडवर झोपलेला...." आई त्यांना हळू आवाजात सांगत म्हणाले...
"येस्स्स्सस...." रावी आणि आशु एकमेकांना टाळी देत म्हणाल्या....
"अग उठेल कोणीतरी...." आई हसत म्हणाले..
"तुला माहितीये मोठी आई काल स्मिताला सगळे टिप्स देता देता आम्हाला नाकी नऊ आले.... प्रत्येक गोष्टीला अस का म्हणून विचारायची स्मिता... पण चला आमचा प्लॅन सक्सेस झाला..." रावी आईंना म्हणाली
"खरच बाई... आपण ज्याप्रकारे त्याला लग्नाला तयार केल त्याने तर अस वाटतं नव्हत की तो स्मिताला लवकर जवळ करेल..... पण देवाच्या कृपेनें सगळं नीट झाल..."आई हात जोडत म्हणाले....
"मला पण असच वाटलेलं मोठी आई... एकप्रकारे आपण त्याच्यावर लग्नासाठी जबरदस्तीच केली... मी त्याला वचन देऊन लग्न करायला लावल.... पण हे त्याच्यासाठी योग्यच आहे... स्मिता खुप चांगली आहे... आणि महत्वाच म्हणजे त्याच्यावर अतिशय प्रेम करती.... आत्ता बघ तो पण कसा संसारात रमतो....." रावी हसत म्हणाली....
"अग आशु काही जेवली का नाही... बाळा अश्या दिवसात अस फार काळ उपाशी राहणं चुकीचं आहे नां.... चल तुला नाश्ता देते...." आई आशूला बघत म्हणाले...
"मग काय काकू... इथे मित्राच घर बसवता बसवता माझ जीवचे हाल... पण चला वीरच एक लग्न झाल आत्ता राहिलाय आपला सिदया...." आशु हसत म्हणाली...
"काय रावी आत्ता तू पण आनंदाची बातमी दे बाई..." आई रावीला छेडत म्हणाल्या... रावी लाजायला लागली....
"काय मोठी आई तू पण...."😳 रावी लाजत म्हणाली....
"बर किती लाजतेस आत्ता..... जा तुझा नवरा वाट बघत असेल... मी जरा आशूला नाश्ता देऊन येते...." आई हसत म्हणाल्या...
"हा हा.. जा जीजु बिचारे किती वाट बघत असतील... काल पण उशीरापर्यंत माझ्यासोबत होती आत्ता इथे... बिचारे जीजु वाट बघत असतील...." आशु तिला त्रास देत म्हणाली...
"चूप आगाव... एकदा तू हाताला ये मग सांगते तुला....."रावी तिला धमकी देत वर निघून गेली.....😠
**********************************
पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा.... स्मिर :कथा प्रेमाच्या प्रवासाची......
कथेला शेअर., कॉमेंट्स आणि फॉलो करायला विसरू नका....
©️संजना कांबळे "sanju"