आज स्मिता आरशा समोर उभी होती... स्वतःच रूप ती आरशात पाहत होती.... अगदी मराठमोळी नटलेली... हिरवी साडी... त्यावर लाल डिसाईनर शाल., केसांची अगदी सुंदर हेअरस्टाईल., नाकात नथ., हातावर भरगच्च भरून काढलेली मेहंदी.... आणि त्यावर हात भरून हिरव्या बांगड्या....आणि सर्वात मुख्य म्हणजे गळ्यात मंगळसूत्र..... हो मंगळसूत्रच......ज्याच तिने स्वप्नात देखील विचार केला नव्हता ते आज सत्यात उतरलेलं......
एका कॉलेजमधील साध्या व्याख्यानाला त्याला भेटली आणि त्याच्या प्रेमात पडलेली ती... तिला हे ही माहित नव्हत की पुन्हा त्याला पाहू शकेल का नाही.... पण आज तोच तिचा नवरा झालेला.... तिच सगळ काही झालेला.... तिला अजूनही विश्वास होत नव्हता.... ज्याच्यावर तिला पहिल्या नजरेत प्रेम झाल तो आज तिचा नवरा आहे.... किती ते नशीब.... खुप कमी लोकांना आपलं प्रेम मिळत आणि त्यातलीच ती होती..... स्वतःच रूप बघून लाजत होती... आनंद होता.. खुप आनंद... पण व्यक्त कसा करणार..... आजच तर तिच लग्न झालेलं..... आजची रात्र फार महत्वाची होती तिच्यासाठी..... आपल्या प्रेमीसोबतच लग्न झाल्यावरच्या पहिल्या रात्रीची ओढ तिला लागलेली...
हो लग्नाच्या पहिल्या रात्रीची......
मैत्रिणीनीं तिची केलेली थट्टा, मस्करी आणि बरेच सल्ले घेऊन ती इथे आलेली.....वाट पाहत होती त्याची... खुप आतुरता होती त्याला पाहण्याची.. त्याच्या स्पर्शाची..... पण तो कुठे आहे... लग्नानंतर अक्ख्या दिवसात तिने त्याला पाहिलं नाही.... फोटो काढायला आणि जेवायला सुद्धा तो तिला दिसला नाही.....अचानक एवढ्या शांततेत कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागली.... आणि तिला माहित होती ही चाहूल तिच्याच नवऱ्याची होती..... ती पटकन शाल सांभाळत बेडकडे पळाली.... माहित नाही कस काय करायच.... कधी नॉर्मल मुलीसारखं लाजण., मुरडणं शिकलीच नाही... नेहमी अभ्यास आणि अभ्यास.... आज तिला खंत वाटतं होती.... थोडफार तरी मुलींच्या गोष्टी शिकून घ्यायला पाहिजे होत्या अस तिला वाटल..... आत्ता मैत्रीनींनी सांगितल्या प्रमाणे नवऱ्याचं मन जिंकायचं., त्याला भुरळ पाडायची याचे भरपूर सल्ले ती पाठ करून आलेली... पण क्षणात सगळं ब्लँक झालेलं... हे तेच डोक आहे का जे पूर्ण कॉलेजमध्ये टॉप करायच... तिचा तिलाच विचार आला... नंतर स्वतःच स्वतःवर हसून कपाळावर टफली मारली.... दरवाज्याचा आवाज आल्याने पटकन सरळ बेडवर बसली.... नजर नजर आणि मान दोन्ही खाली...... लाजून लाजून गाल लाल झालेले.... एका आवाजाने दार उघडल गेलं... तिच्या हृदययाची धडधड वाढलेली......
तो आत आला.... पण त्याने एक नजर तिला पाहिलं देखील नाही.... सरळ वॉशरूम मध्ये गेला... आणि इथे स्मिताने नजर वर केली.... आणि मोठा श्वास घेतला.... अगदी काही मिनिटात तो पुन्हा बाहेर आला आणि पुन्हा तेच त्याने अस दुर्लक्ष केल जणू ती अदृश आहे...... हळुहळु तो तिच्या बाजूला आला... तिची धडधड खूपच वाढली.... तिने डोळे गच्च मिठले....... पण....
पण हे काय तो सरळ तिच्या बाजूची उशी घेऊन जाऊ लागला.... आणि याची भनक स्मिताला लागली... ती अचानक त्याला अस करतांना बघून पॅनिक झाली... हे काय..?
"वीर तुम्ही....." स्मिता बेडवरून खाली आली.... आणि त्याला साद घातली.....
Don't.... Don't call me veer...... वीर अतिशय रागात मागे वळून म्हणाला..... स्मिता जागीच गार पडली...हे अस का बोलतोय तो... तिला समजत नव्हत...
"सॉरी..." पण तुम्ही कुठे जाताय..... स्मिता स्वतःला रडण्यापासून कंट्रोल करत म्हणाली....
"मग तुझी काय अपेक्षा आहे... मी तुझ्यासारख्या मुलीसोबत एका बेडवर झोपू... No... तू जरी धोक्याने माझ्यासोबत लग्न केल असेल तरी मी कधीच तुला स्वीकारणार नाही... कधीच आपल्यात नवराबायकोच नात निर्माण होणार नाही.... तू स्वतः पश्चाताप करशील.... बाहेरच्या जगासाठी आपण नवराबायको असेल पण या खोलीत केवळ अनोळखी..... आणि माझ्यापासून जेवढं लांब राहशील तेवढं तुझ्यासाठी योग्य आहे....." वीर अतिशय रागात तिच्यावर डाफरला...... स्मिताच्या पायाखालची जमीनच सरकली.... हे काय बोलतोय तो....
"मिस्टर राजवीर... हे कश्याबद्दल बोलताय तुम्ही......" स्मिता शांत होत म्हणाली.....
"ओह्ह... तर तुला मी कशाबद्दल बोलतोय हे सुद्धा माहित नाही....." वीर उशी शेजारच्या काउचवर आपटत म्हणाला....
"मिस्टर राजवीर पहिली गोष्ट जे काही असेल शांततेत बोलू शकतो आपण..... आणि दुसरी गोष्ट माझा असा अपमान मी कधीच खपवून घेणार नाही..... जे असेल स्पष्ट मला सांगा...." स्मिता अतिशय शांततेत म्हणाली....
"Wow..... म्हणजे धोका करून तुझ्यात एवढा अटीट्युड आहे... कमाल आहे..... माझ्यासोबत धोक्याने लग्न केल आणि वरून मलाच बोलतीये.... हे सगळं करण्याअगोदर स्वतःच्या पदाचा तरी विचार करायचास.... डॉक्टर आहेस नां......" वीर तिला उलट म्हणाला....
"काय? मिस्टर राजवीर मी अस काहीच केल नाहीये.... मी धोक्याने का लग्न करेल... आत्ता काही तासापूर्वी आपलं लग्न झालंय...." स्मिता त्याला विचारत म्हणाली....
"मी आजबद्दल बोलत नाहीये.... दोन दिवसापूर्वी मॅरिज पेपरवर माझ्या बेहोशीत असण्याच्या फायदा घेऊन तू साइन करून घेतली... खर आहे की खोटं......" वीर अतिशय रागात म्हणाला.....
"I said wrong or right...." वीर भडकून म्हणाला त्याचे डोळे अतिशय लाल झालेले..... स्मिता पण एका क्षणाला घाबरली......
R...r.... Right...... 😰स्मिता रडत घाबरून म्हणाली.... वीर खुनशी हसला.....
"तुला माहितीये यासाठी मी तुझ्यावर केस फाईल करू शकतो.... त्यानंतर तुला शिक्षा होईल ती वेगळी पण तुझ डॉक्टरच पद सुद्धा जाईल....."वीर हसत म्हणाला...
"मिस्टर राजवीर मला एक्सप्लेन करुदया...." स्मिता हळूच म्हणाली...
"No.. No... ती वेळ गेलीये आत्ता.... माझ्या घरच्यांना स्वतःच्या बाजूनी करून घेतलं... इवन रावीला सुद्धा तुझ्या जाळेत ओढून स्वतःकडे केलंस... मला माहितीये रावी भोळी आहे तुझ्या बोलण्यात येऊन माझ्याकडून या लग्नाचं वचन घेतलंय........ हे लग्न जबरदस्तीच आहे... सगळ्यांनी मिळून मला फोर्स केलंय........" वीर रागात म्हणाला आणि राग कण्ट्रोल न झाल्याने समोर येऊन तिचा गाल पकडला...
"तुला वाटतय तेवढ साधा मी नाहीये..... मी चांगला केवळ माझ्या माणसांसाठी आहे.... बाकी तुझ्यासारख्यासाठी मी राक्षस आहे.... 😈खुप हौस आहे नां तुला माझी बायको होण्याची... तर ठीक आहे.... Now game is start.... प्रत्येक एक दिवस नर्क असणार आहे तुझ्यासाठी.... मी तुला कधीच स्वीकारणार नाही पण नकारणार पण नाही....आत्ता आपण ह्या बंधनात बांधल गेलोय.... आणि ही तुझी निवड होती..... आत्ता सुटका नाही..... जर बाहेर कोणाला आपल्यातली एकही गोष्ट कळाली तर तुझ्यासाठी अतिशय वाईट होईल......."वीर तिचा गाल दाबून अतिशय रागात बोलत होता त्याला काहीच फरक पडत नव्हता..... स्मिता कधीच कोणासमोर झुकत नव्हती... तिच्या बाबांनी नेहमी तिला ताट मानेने जगायला शिकवलेलं.... ती कधीच कोणाला घाबरली नाही... पण आज ती कदाचित पहिल्यांदा घाबरलेली... तिच्याच प्रेमाला., तिच्याच नवऱ्याला.... तिच्या डोळ्यात अश्रू जमा झालेले... बोलायला शब्द फुटत नव्हते....
"आणि जर तुला वाटतं असेल तुझ्या या रूपाने किंवा या खोट्या अश्रूने माझ्यावर फरक पडेल तर चूक..... तुझे अश्रू बघून मला केवळ समाधान मिळेल..... आजपासून तुझी शिक्षा सुरु....आणि जो अटीट्युड मला आत्ता दाखवलास तो पुन्हा दिसला नाही पाहिजे नाहीतर माझ्या एवढ वाईट कोणी नाही..... सांगून ठेवतोय......." वीर झटक्यात तिला पाठीमागे बेडवर ढकलत म्हणाला.... स्मिता मागे पडल्यामुळे तिच्या कमरेला बेडचा कोपरा जोरात लागला.... पण वीर दुर्लक्ष करत रागाने बाहेर निघून गेला..... स्मिता उठून रडायला लागली... तिने बघितलेली सगळी स्वप्नं एका क्षणात पाण्यात मिळालेली..... सगळं उलट झालेलं..... तिला वाटल लग्न झालंय तर तो तिला स्वीकारेल..... बराच वेळ रडत राहिली.... तिला तो दिवस आठवला ज्या दिवशी वीर तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये भेटलेला..... कशी अवस्था होती त्याची.....
त्यानंतरचा काळ.., तिला त्याच्यासोबत धोक्याने लग्न करावं लागल पण त्यामागे कारण होत...... तिलाही अस काही करायच नव्हत पण त्या वेळचीं गरज होती... आणि हो ती पूर्ण नाकारता नाहीये... हो जेव्हा वीर बेहोशीत होता तेव्हा ती सुद्धा स्वार्थी झालेली.... तिच्याही मनात स्वार्थ होता..... पण निव्वळ प्रेमाचा..... प्रेमात स्वार्थी होणं एवढ चुकीचं...... वीर सुद्धा रावीच्या प्रेमात स्वार्थी झालेला... त्यांनेसूद्धा रावीला तिच्या लग्नातून पळवलेलं.... मग तिने वीरसोबत लग्न करण्यासाठी थोडा स्वार्थीपणा केला तर कुठे बिगडल......खरच ती चुकीची होती की त्यामागे काही कारण होत......
**********************************
🔹काय होईल वीर स्वीकारेल का कधी या लग्नाला..?
🔸वीर स्मिताला माफ करू शकेल का....?
🔹तिरस्काराच प्रेमात रूपांतर होईल का..?
🔸स्मिता जिंकू शकेल का त्याच मन...?
हे सर्व जाणून घेण्यासाठी या कथेशी जोडून रहा..... आणि कॉमेंट्स., शेअर., फॉलो करायला विसरू नका....🤗
©️संजना कांबळे" sanju"