---------
मॅडम् कोणी रमेश पवार सर बाहेर आले आहेत. तुम्ही बोलावल्याचं ते म्हणाताहेत.
हो... हो... थोडा वेळ बाहेर बसू द्या त्यांना.
शिपायाने रमेश पवार बाहेर आल्याचे सांगितल्यावर रागिनीने हातातल्या पेनचे टोपण लावले. डोक्यावर चालणार्या पंख्याकडे तिचे लक्ष गेले. पंख्याच्या फिरणार्या पात्याप्रमाणे तिच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले. ती भूतकाळात गेली....सुमारे सहा वर्षांपूर्वीची गोष्ट...
मैत्रिणींच्या गराड्यात नटून थटून रागिणी तयार होत होती. तिच्या अवतीभवती असणार्या मुलींचा हास्यविनोद सुरू होता. उद्या रागिणीला हळद लागणार होती, त्यामुळे तिच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी खास एका महिलेला बोलावले होते. ती तिच्या हातावर मेहंदी काढत होती. घराच्या समोरील ओसरीत एक महिला बायकांना बांगड्या भरत होती. त्यातील काही बायका आपल्याला आवडणार्या रंगाच्या बांगड्या तिच्या पिशवीतून शोधून काढत होत्या. सकाळपासून गॅसवर चहाचे मोठे भांडे ठेवले होते. आलेल्या पाहुण्यांना चहा दिला जात होता. घरात पाहुण्यांची रेलचेल वाढत होती. वामनराव आणि मंगलाबाई येणार्या पाहुण्यांचे मोठ्या आदराने स्वागत करीत होते. लग्नाच्या तयारीत कुठलीही कमी राहू नये म्हणून त्यांची सतत धावपळ सुरू होती.
वामनराव- मंगलाबाईंना रागिणी आणि रोहण दोन अपत्ये. रोहन बारावीत, तर रागिणी नुकतीच गॅ्रज्युएशन झालेली. रागिणी रंगाने जरी सावळी असली तरी नाके डोळ्यांमुळे आकर्षक दिसायची. सततच्या अभ्यासामुळेही तिने कधी शरीराकडे लक्ष दिले नाही. रुपाने खूप सुंदर नसली तरी अभ्यासासह इतर गोष्टींमध्ये ती हुशार होती. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणारी. रागिणी तिच्या स्वभावामुळे प्रत्येकाला आवडणारी होती.
कॉलेजला असतानाच तिच्यासाठी स्थळ शोधण्यास घरच्या लोकांनी सुरुवात केली. अनेक चांगली स्थळे रागिणीला पाहण्यास येत होती. मात्र रंगामुळे एक-दोन जणांनी नापसंत केले. त्यामुळे आई-वडील चिंतेत होते. तर रागिणी बिनधास्त होती. काही दिवसांनी अशाच एका स्थळाने रागिणीला पसंत केले. मुलगा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होता. सरकारी नोकरी करणारा मुलगा भेटल्यामुळे सर्व आनंदित होते. लग्नाची तारीख निश्चित झाली. बस्ता झाला, सर्वत्र पत्रिका वाटल्या गेल्या. लग्नाचा दिवसही जवळ आला.
घरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. रागिणीचे वडील लग्नासंबंधीच्या कामांत व्यस्त असताना त्यांच्या खिशातील मोबाईल खणखणला... घरात गोंधळ असल्यामुळे समोरचा काय बोलत आहे, त्यांना व्यवस्थित ऐकू येत नव्हते. ते थेट अंगणात गेले. फोनवरचे बोलणे ते नुसते ऐकत होते. त्यांच्या तोंडातून एक शब्द फुटत नव्हता. मोबाईलवर तिकडील संभाषण ऐकताना त्यांच्या सर्व अंगावरून घामाच्या धारा सुरू झाल्या. फोनवरचे बोलणे संपले आणि त्यांनी अंगणातच एकदम बसून घेतले. वामनरावांंची अवस्था पाहून त्यांच्या भोवती घरातील सर्व मंडळी जमली आणि विचारू लागली... कोणाचा फोन होता..?आणि काय झाले.....?
नवरदेव मुलाच्या काकांचा फोन होता. मुलगा कालपासून गायब झाल्याचे ते सांगत होते. त्याचा फोनही स्विचऑप येत आहे. नातेवाईक, मित्रमंडळीकडे शोधाशोध केली. तो कोठेही आढळून आला नाही. घरातील टेबलावर त्याने लिहिलेली चिठ्ठी सापडली. मुलगी काळी असल्यामुळे माझे मित्रमंडळी मला नाव ठेवत आहे. त्यामुळे मी त्या मुलीशी लग्न करणार नाही. माझे या क्षणाला कोणी ऐकणार नाही. त्यामुळे मी घर सोडून जात आहे, असे चिठ्ठीत तो लिहून गेल्याचे ते सांगत होते. दादा आमच्या नालायक पुतण्यामुळे आम्हाला खाली पाहण्याची वेळ आली. आम्हाला माफ करा...आम्ही आतापर्यंतचा खर्च तुम्हाला देऊन टाकू.... असं बरचं काही त्या मुलाचे काका बोलत होते. वामनरावांना पुढचं काही ऐकण्याची इच्छा झाली नाही.
वामनरावांनी रडकुंडीला येत फोनवरील निरोप सर्वांना सांगितला. त्याचं बोलणं ऐकल्यावर रागिणीच्या आईने हंबरडाच फोडला....अरं देवा आता काय करु... माझ्या पोरीचं आता काय होईल... असं म्हणत मोठ्याने रडू लागली. नातेवाईकांमध्ये चलबिचल झाली. जो तो गटागटाने चर्चा करू लागला. रागिणीचे वडील खाली मान घालून बसले होते.
तेवढ्यात रागिणी आली, तिला पाहताच तिच्या वडिलांना रडू कोसळले. रागिणीने त्यांना सावरले.
आई-दादा तुम्ही अजिबात रडायचं नाही. तुमची रागिणी काही मेली नाही. तिनं काही काळं बरं ही केलं नाही. उलट तुम्हाला समाधान वाटायला हवं, लग्नाआधीचं त्या बिनडोक मुलानं आपल्याला जागं केलं, नव्हे तर वाचवलं. लग्न झाल्यानंतर त्या मुलानं असा विचित्रपणा केला असता तर माझे संपूर्ण आयुष्य खराब झालं असतं.... रागिणी मोठ्या आत्मविश्वासानं समजावू…
[10:30 AM, 4/20/2020] Charushila Mali: कथेचे नाव ः जखम
लेखक ः सप्तर्षी माळी
-----------
*मॅडम् कोणी रमेश पवार सर बाहेर आले आहेत. तुम्ही बोलावल्याचं ते म्हणाताहेत.
हो... हो... थोडा वेळ बाहेर बसू द्या त्यांना*.
शिपायाने रमेश पवार बाहेर आल्याचे सांगितल्यावर रागिनीने हातातल्या पेनचे टोपण लावले. डोक्यावर चालणार्या पंख्याकडे तिचे लक्ष गेले. पंख्याच्या फिरणार्या पात्याप्रमाणे तिच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले. ती भूतकाळात गेली....सुमारे सहा वर्षांपूर्वीची गोष्ट...
मैत्रिणींच्या गराड्यात नटून थटून रागिणी तयार होत होती. तिच्या अवतीभवती असणार्या मुलींचा हास्यविनोद सुरू होता. उद्या रागिणीला हळद लागणार होती, त्यामुळे तिच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी खास एका महिलेला बोलावले होते. ती तिच्या हातावर मेहंदी काढत होती. घराच्या समोरील ओसरीत एक महिला बायकांना बांगड्या भरत होती. त्यातील काही बायका आपल्याला आवडणार्या रंगाच्या बांगड्या तिच्या पिशवीतून शोधून काढत होत्या. सकाळपासून गॅसवर चहाचे मोठे भांडे ठेवले होते. आलेल्या पाहुण्यांना चहा दिला जात होता. घरात पाहुण्यांची रेलचेल वाढत होती. वामनराव आणि मंगलाबाई येणार्या पाहुण्यांचे मोठ्या आदराने स्वागत करीत होते. लग्नाच्या तयारीत कुठलीही कमी राहू नये म्हणून त्यांची सतत धावपळ सुरू होती.
वामनराव- मंगलाबाईंना रागिणी आणि रोहण दोन अपत्ये. रोहन बारावीत, तर रागिणी नुकतीच गॅ्रज्युएशन झालेली. रागिणी रंगाने जरी सावळी असली तरी नाके डोळ्यांमुळे आकर्षक दिसायची. सततच्या अभ्यासामुळेही तिने कधी शरीराकडे लक्ष दिले नाही. रुपाने खूप सुंदर नसली तरी अभ्यासासह इतर गोष्टींमध्ये ती हुशार होती. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणारी. रागिणी तिच्या स्वभावामुळे प्रत्येकाला आवडणारी होती.
कॉलेजला असतानाच तिच्यासाठी स्थळ शोधण्यास घरच्या लोकांनी सुरुवात केली. अनेक चांगली स्थळे रागिणीला पाहण्यास येत होती. मात्र रंगामुळे एक-दोन जणांनी नापसंत केले. त्यामुळे आई-वडील चिंतेत होते. तर रागिणी बिनधास्त होती. काही दिवसांनी अशाच एका स्थळाने रागिणीला पसंत केले. मुलगा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होता. सरकारी नोकरी करणारा मुलगा भेटल्यामुळे सर्व आनंदित होते. लग्नाची तारीख निश्चित झाली. बस्ता झाला, सर्वत्र पत्रिका वाटल्या गेल्या. लग्नाचा दिवसही जवळ आला.
घरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. रागिणीचे वडील लग्नासंबंधीच्या कामांत व्यस्त असताना त्यांच्या खिशातील मोबाईल खणखणला... घरात गोंधळ असल्यामुळे समोरचा काय बोलत आहे, त्यांना व्यवस्थित ऐकू येत नव्हते. ते थेट अंगणात गेले. फोनवरचे बोलणे ते नुसते ऐकत होते. त्यांच्या तोंडातून एक शब्द फुटत नव्हता. मोबाईलवर तिकडील संभाषण ऐकताना त्यांच्या सर्व अंगावरून घामाच्या धारा सुरू झाल्या. फोनवरचे बोलणे संपले आणि त्यांनी अंगणातच एकदम बसून घेतले. वामनरावांंची अवस्था पाहून त्यांच्या भोवती घरातील सर्व मंडळी जमली आणि विचारू लागली... कोणाचा फोन होता..?आणि काय झाले.....?
नवरदेव मुलाच्या काकांचा फोन होता. मुलगा कालपासून गायब झाल्याचे ते सांगत होते. त्याचा फोनही स्विचऑप येत आहे. नातेवाईक, मित्रमंडळीकडे शोधाशोध केली. तो कोठेही आढळून आला नाही. घरातील टेबलावर त्याने लिहिलेली चिठ्ठी सापडली. मुलगी काळी असल्यामुळे माझे मित्रमंडळी मला नाव ठेवत आहे. त्यामुळे मी त्या मुलीशी लग्न करणार नाही. माझे या क्षणाला कोणी ऐकणार नाही. त्यामुळे मी घर सोडून जात आहे, असे चिठ्ठीत तो लिहून गेल्याचे ते सांगत होते. दादा आमच्या नालायक पुतण्यामुळे आम्हाला खाली पाहण्याची वेळ आली. आम्हाला माफ करा...आम्ही आतापर्यंतचा खर्च तुम्हाला देऊन टाकू.... असं बरचं काही त्या मुलाचे काका बोलत होते. वामनरावांना पुढचं काही ऐकण्याची इच्छा झाली नाही.
वामनरावांनी रडकुंडीला येत फोनवरील निरोप सर्वांना सांगितला. त्याचं बोलणं ऐकल्यावर रागिणीच्या आईने हंबरडाच फोडला....अरं देवा आता काय करु...माझ्या पोरीचं आता काय होईल... असं म्हणत मोठ्याने रडू लागली. नातेवाईकांमध्ये चलबिचल झाली. जो तो गटागटाने चर्चा करू लागला. रागिणीचे वडील खाली मान घालून बसले होते.
तेवढ्यात रागिणी आली, तिला पाहताच तिच्या वडिलांना रडू कोसळले. रागिणीने त्यांना सावरले.
आई-दादा तुम्ही अजिबात रडायचं नाही. तुमची रागिणी काही मेली नाही. तिनं काही काळं बरं ही केलं नाही. उलट तुम्हाला समाधान वाटायला हवं, लग्नाआधीचं त्या बिनडोक मुलानं आपल्याला जागं केलं, नव्हे तर वाचवलं. लग्न झाल्यानंतर त्या मुलानं असा विचित्रपणा केला असता तर माझे संपूर्ण आयुष्य खराब झालं असतं.... रागिणी मोठ्या आत्मविश्वासानं समजावून सांगत होती. आई-वडिलांसह नातेवाईकांना तिचे म्हणणे पटले. काहींनी दुसरे स्थळ झटपट शोधून त्याच तारखेला व त्याच मुहुर्तावर लग्न करण्याचे सुचविले, रागिणीने मात्र या गोष्टीला सपशेल नकार दिला.
ती म्हटली की मी आता स्वतःच्या पायावर उभी राहून काही तरी बनेल, तेव्हाच लग्नाला तयार होईल. तिच्या इच्छेपुढे कोणाचे काहीही चालले नाही. अनेकांनी नवरदेव मुलगा आणि त्याच्या घरच्या लोकांनी ऐनवेळी नकार दिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचे सांगितले. मात्र रागिणीने तसं कोणतंही कृत्य करण्यास विरोध दर्शविला.
कोणीतरी मंडपवाल्याला निरोप दिल्याने तो मंडप, लाईटींग काढत होता. रागिणी तिच्या रूममधील खिडकीतून पाहत होती. रोषणाईचा उजेड पडण्याआधी ती काढण्यात आली होती. रागिणी शांतपणे बसली होती. तिचे लक्ष तिच्या हाताकडे गेले. मेहंदी चांगली रंगलेली होती. बांगड्यांचा हिरवा चुडा चमकत होता. रागिणी हळूहळू बांगड्या काढू लागली, व्यवस्थित निघत नसल्यामुळे एक-एक बांगडी तोडून काढावी लागत होती. तोडताना काचा तिच्या हाताला लागत होत्या. त्यामुळे हातातून रक्त येऊ लागले. वेदना होऊ लागल्या. रक्त येण्याच्या ठिकाणी तिने रुमाल ठेवला. इतका वेळ कोरडे पडलेल्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू येऊ लागले. रक्त थांबल्यानंतर हातावर लहानशी जखम दिसत होती. रागिणीला मात्र हातावरील जखमेच्या पेक्षा ऐनवेळी लग्न मोडल्याने हृदयावर जी मोठी जखम झाली होती, त्याच्या वेदना तीव्र स्वरूपाच्या होत होत्या.
रागिणी अजूनही पंख्याकडे बघत होती. मागचा काही वर्षांपूर्वीचा भूतकाळ एका चित्रपटाप्रमाणे काही वेळात डोळ्यांसमोरून आज गेला होता. त्याला कारण विशेष झालं होतं. तिला ऐन लग्नाच्या वेळी नकार देणारा तो मुलगा आज तिच्या केबिनच्या बाहेर बसला होता. तिला पाहण्याच्या वेळी आलेला व नंतर साखरपुड्याच्या वेळी तिने पाहिलेल्या मुलाला ती विसरू शकली नव्हती. लग्न मोडल्यानंतर रागिणी सावरली होती. विचलित न होता तिने मन दुसरीकडे गुंतविले होते. सातत्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत राहिली. मध्यंतरी एका मुलाशी तिचे लग्नही झाले होते. लग्नानंतर अशाच एका स्पर्धा परीक्षेत ती उत्तीर्ण होऊन शिक्षणाधिकारी झाली. मात्र तिच्या हृदयाला झालेली जखम अद्याप वेदना देत होती. शरीरावर झालेल्या जखमा लवकर भरून काढता येतात मात्र हृदयावर झालेली छोटी जखमही दीर्घ काळ वेदना देत राहते. त्याप्रमाणे रागिणी अवस्था झाली होती.त्या वेदना देणार्याला अद्दल घडविण्याची संधी तिला आली होती.
तिला नाकारणारा मुलगा तालुक्यातील एका शाळेवर मुख्याध्यापक म्हणून होता. शालेय इमारतीच्या बांधकामात त्याने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार आली होत्या. त्याबाबतची चौकशी करून अहवाल देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या सीओ साहेबांनी रागिणीकडे सोपवली होती. रागिणीने सर्व माहिती घेऊन अहवाल तयार केला होता. हा अहवाल ती आज सीओ साहेबांना देणार होती. त्याआधी त्या शिक्षकाची प्रत्यक्ष साक्ष घेणार होती. त्यासाठी तो शिक्षक आज आला होता.
शिपायाला सांगून रागिणीने त्या शिक्षकाला केबिनमध्ये बोलावले. त्याने आत प्रवेश करताच,
या रमेश शशिकांत पवार सर, बसा खुर्चीवर
असेे म्हणत रागिणीने त्याच्या तळपायापासून डोक्यापर्यंत नजर मारली.
तुमचे मूळ गाव नामपूरच ना....
हो हो.. मॅडम नामपूरचं माझं गाव
रागिणी फाईल काढूत ती चाळू लागली.
मॅडम् तुमचे गाव कोणते,
त्याच्या प्रश्नावर रागिणीने कुठलेही उत्तर दिले नाही.
रागिणी फाईलमधील कागद चाळता चाळता त्याच्याकडे कटाक्ष नजेरेने पाहत म्हणाली, वर्ग खोल्यांच्या बांधकामात तुम्ही फार मोठा भ्रष्टाचार केलेला दिसतो.
मॅडम् खोटं आहे, गावातील लोकांनी राजकारण करीत माझ्यावर खोटे आरोप केले आहेत.
अहो पवार सर. शाळेच्या फक्त दोन खोल्या बांधल्या...त्या खोल्यांना फरशी न लावता सिमेंटचा कोबा केला. पण दोन खोल्यांना फरशी लावल्याचे त्या फरशीचे 80 हजारांचे बिल तुम्ही सादर केले आहे. पाण्याची कुठलीही टाकी बांधली नसताना तुम्ही त्याचेही बिल सादर केले आहे. न झालेल्या दीड लाखांच्या कामाची बिले तुम्ही सादर सादर करून, ती रक्कम तुम्ही खिशात घातली.
रागिणीच्या बोलण्यावर तो खिशातील रुमाल काढत बोलू लागला...म म.. मॅडम ऐका ना...
आता हेही म्हणा की हे खोटं आहे.... पण त्याचे पुरावे माझ्याकडे आहे. चार दिवसांपूर्वी तुमच्या गैरहजेरीत मी शाळेला भेट दिली. त्या वेळी मला सदर प्रकार लक्षात आला आणि त्याचे फोटो घेऊन ग्रामस्थांसमक्ष पंचनामा केला, याची तुम्हाला कल्पना नाही. आता हा अहवाल मी सीओ साहेबांना सादर करणार आहे. तत्पूर्वी तुमचे म्हणणे मांडा, रागिणी कडक शब्दांत बोललीय.
हे बघा मॅडम... माझ्याकडून चूक झाली. भविष्यात अशी चूक पुन्हा करणार नाही. माझी नोकरी गेली तर.. बायको, दोन मुले आहेत, त्यांचे काय होईल, त्यांच्यावर दया करा....
तुमच्या बायको-मुलांवर मी का दया करायची,
मॅडम् अशा निष्ठूर बनू नका...माणुसकी नात्याने दोन मुलांच्या बापावर दया करा....
दया... माणुसकी...हे शब्द तुम्हाला माहिती आहेत का हो... कोणाच्या बापावर किंवा कोणाच्या मुलीवर तुम्ही कधी दया, माणुसकी दाखवली होती का...
हे बघा रमेश शशिकांत पवार सर समोर माझ्याकडे बघा. तुम्ही मला ओळखलं नाही, पण मी तुम्हाला चांगली ओळखते....सुमारे सहा वर्षांपूर्वी तुम्ही मला ऐनवेळी लग्नाच्या वेळी नकार दिला, तीच मुलगी आहे मी रागिणी पाटील.
मोठी वीज चमकल्यावर जमीन हादरते त्या प्रमाणे रमेश हादरला... क्षणार्धात तो घामाने ओलाचिंब झाला.
रागिणीने पाण्याचा भरलेला ग्लास त्याच्याकडे दिला. पवारसर पाणी घ्या...
घाबरेल्या अवस्थेत त्याने ग्लास रिकामा केला.
तर पवार सर तुम्ही काही मुर्ख मित्रांच्या सांगण्यावरून मी काळी असल्याने तुम्ही मला हळदीच्या आदल्या दिवशी लग्नाला नकार दिला. त्या वेळी त्या मुलीची, तिच्या आई-बापाची काय अवस्था झाली असेल, त्याची कल्पना तुम्ही केली नाही का... त्यावेळी तुमच्याकडील हे दया... माणुसकी शब्द कुठे होते.
स्वारी मला माफ करा मॅडम... मी मित्रांच्या सांगण्यावरून असं करायला नको होतं.
अहो स्वारी का म्हणतात, मीच तर तर तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना थँकू म्हणते.... मला एका भ्रष्टाचारी, माणुसकीहीन माणसाशी लग्न करण्यावाचून रोखले... एवढे बोलत रागिणी फाईल घेऊन केबिनच्या बाहेर जावू लागली....
रमेश निःशब्द होऊन तेथेच बसून होता.
(समाप्त)