लेखक: अक्षय वरक.
वर्ष: २०२५
या चारोळ्यांत एकतर्फी प्रेम, विरह, आठवणी, हळवे क्षण, आणि मनाची भावनिक तडफड यांचा अतिशय नाजूक आणि हृदयस्पर्शी अनुभव मांडलेला आहे. शब्दांतून उमटणारा भावनांचा खोल झरा, हे या संग्रहाचं खास वैशिष्ट्य आहे.
प्रत्येक चारोळी वाचकाच्या हृदयात कुठे ना कुठे जाऊन भिडते – कधी एखाद्या विसरलेल्या चेहऱ्याच्या आठवणीत, तर कधी अश्रूंनी मूक झालेल्या शब्दांत.
जर कोणी वाचक असे असतील ज्यांना एखादी चारोळी अधिक भावली, तर कृपया "कोणती चारोळी सर्वात जास्त आवडली?" हे नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अमूल्य आहेत.
© अक्षय वरक 2025
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
१. 'तुला विसरणं जमलच नाही"
काय सांगू तुला आता काही समजत नाही
मनाच्या या घाभाऱ्यात आज ही कोणीच नाही
तुझं नाव ओठांवर आलं नाही असं कधीच झालं नाही
पण तुला विसरण केव्हाच जमलं नाही.....
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
२. "ती गेली तेव्हा....."
ती होती तेव्हा जगत होतो मी
आता सारेच गेले संपून
प्रेम गेले हरपून
अन पुन्हा एकटाच राहिलो ना मी.....
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
३. "तिला आठवत असेल का मी?"
आज कुठेतरी मनात एक प्रश्न पडलाय
आठवणींचा साठा माझ्या मना मध्ये साठलाय,
तिला ही कधी आठवत असेल का रे मी,
हाच प्रश्न माझ्या काळजात दाटलाय.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
४. "घडत गेलो मी..."
आयुष्याने आयुष्याचा भार दिला
मित्राने जगण्याचा आधार दिला,
प्रेमाने मात्र कायमचा त्रास दिला,
अन या सर्वांनी मिळून, एक नवा आकार दिला.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
५. "तुला समजेल का?"
हळहळ या मनाची तुला समजेल का
चांदण्या राती तू पुन्हा भेटशील का?
भावना या माझ्या जरी दाट असल्या
ऐकून साऱ्या समजून घेशील का?
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
६. "उत्तर तरी कधी देशील?"
शब्द न बोलेस, तरी तुझं मौन ओरडतं,
नजरेआड गेलेलं सारं मनात दाटतं.
मी लिहितो तुला, रोज या भावनांतून,
तूही कधीतरी उत्तर तरी देशील का हेच वाटतं…
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
७ . " मी आहे....पण नसतो"
रोज सकाळ होते , पण उजेड मात्र नसतो,
हसतो चेहरा , पण कधी त्यात आनंदच नसतो,
श्वास घेतो रोजच , पण जीवनात नाहीस तू ,
शरीर मात्र आहे , पण मीच जिवंत नसतो.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
८ . "शब्द कमी पडतात"
बोलता जास्त येत नाही ग मला,
भावना व्यक्त करता , येत नाही ग मला,
हेच सारे कधी समजेल तुला,
प्रेमात गोड गोड बोलता येत नाही ग मला.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
९ . "मनातल गुपित"
मनातलं गुपित हे बोलतोय मी,
ओठ थरथरले तरी थांबत नाही मी.
तू समजशील का हेच माहीत नाही,
पण मनात जे आहे, ते लपवत नाही मी...
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
१० . "तूच शब्दांत आलीस....."
लेखणी तुझ्यामुळे हाती आली,
शब्दांना तूच जीव द्यायला लागली.
पूर्वी फक्त शाई होती ओळीत,
आता मात्र तूच कविता व्हायला लागली…
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
११ . "लेखणी आणि तू...."
लेखणी उचलली, तुझं नाव लिहिलं,
मनात खोल खोल काहीसं उघडलं.
शब्दांत मिसळलीस तू हळूच,
कवितेतलं प्रत्येक वाक्य मग जुळलं...
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
१२ . रक्ताची शाई
रक्ताची शाई घेऊन लिहिलं एक नाव,
हृदयाच्या कागदावर उमटलं ते भाव.
वाचता वाचता डोळे पाणावले,
कारण त्या प्रत्येक ओळीत होतं तुझं गाव…
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
१३. "पहिलं प्रेम....शेवटचा श्वास..."
ती गेल्यावर काहीच उरलं नाही,
फक्त एक फोटो आणि काळजावर ओरखडा आहे.
कधीच संपलं म्हणतो, पण झोप येत नाही,
कारण ती अजूनही डोळ्यांत झुलते, आणि श्वास थांबता थांबत नाही…
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
१४ . " ती गल्ली"
ती गल्ली अजून तशीच आहे, जुनी ओळखीची,
जिथं पहिल्यांदा तू नजर टाकली होतीस थोडीशी.
आता चालतो तिथं, पण मन मागे अडकतं,
कारण त्या वळणावर अजूनही तुझं हसू दिसतं…
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
१५. "जगलो की हरलो"
प्रेमात होतो, पण अखेर एकटाच उरलो,
स्वप्नं तर रंगवली, पण वास्तवात हरलो.
श्वास चालू होते, तरी जीव मात्र हरवला,
कळेना अजून — जगलो की हरलो…
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
१६. "ती दुसऱ्यासबत होती"
ती हसली त्याच्यासोबत, आणि माझं हास्य तुटलं,
कधी माझी असलेली ती, आज पार बदलून गेली होती.
मी रडत उभा होतो आठवणींमध्ये,
आणि ती दुसऱ्याच्या मिठीत हरवून गेली होती…
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
१७. "रात्र जळत आहे"
रात्र जळत आहे, पण तू उजेडात मावळलीस,
मी राख होत होतो, आणि तू गगनात हरवलीस.
तुझ्या आठवणींचा पेट घेतला श्वासाने,
आता रात्रींचाच कफन पांघरून जगतो मी, जळणाऱ्या आसवाने…
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
१८. "व्यसन"
तिच्या आठवणींचं व्यसन, सिगारेटपेक्षा जास्त जळतं,
श्वास चालतो तरीही, मन आतूनच तुटतं.
ती गेली कधीची, पण नशा अजून ओसरत नाही,
ही सवय आहे की शाप, हेच कळत नाही…
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
१९. "ति कोणाची राणी तर कोणाची गाणी"
ती त्याच्या स्वप्नांची राणी झाली,
आणि माझ्या कवितेची गाणी झाली,
तिचं हसू त्याच्यासाठी सजलं,
आणि माझं आयुष्य विरहातच अडलं.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
२०. 'का स्वप्नात येतेस"
झोपही आता साथ सोडते,
स्वप्नांत तुझी चाहूल येते.
मी विसरायचा प्रयत्न करतो,
आणि तू रोज पुन्हा आठवते…
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
२१. "तुझी आठवण आता डायरीत"
तुझी आठवण आता डायरीत ठेवली,
हृदयाऐवजी शब्दांत जपली.
रोज एक ओळ, रोज थोडं रडणं,
तू नसताना एवढंच उरलं जगणं…
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
समाप्त
-अक्षय वरक