Maajhiya Priyala Preet Kalena - 5 in Marathi Love Stories by Pradnya Chavan books and stories PDF | माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 5

Featured Books
Categories
Share

माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 5

फ्लशबॅक :

 
चार वाजता ती उठते आणि फ्रेश होवून चहा घेते त्यानंतर तिच्या लक्षात येत आज तर आईला मी स्टडी मटेरियल आणून अभ्यास करायला सुरू करेन असं सांगितलं आहे ... Novel च्या नादात विसरलेच मी अस म्हणत ती तिचं आवरून घेते आणि ड्रायव्हरला स्टडी बुक्स शॉप मध्ये सोडायला सांगते...
 
वेळ संध्याकाळी  पाच वाजता 
स्थळ : दगडूशेठ गणपती , पुणे 
 
दर्शन घेऊन झाल्यावर अनुराग काही बोलायच्या आधी ऐश्वर्या त्याला बोलते ....
 
ऐश्वर्या : मला माहीत आहे तुला आत्याच्या वागण्यामुळे तुला खूप त्रास होत आलाय .... ती आपल्या दोघांच्या लग्नाची स्वप्न पहतीये पण तुला त्यात काही इंटरेस्ट नाही आहे .... आणि मला ही नाही आहे वेळ आली की मी ही हे सगळ्यांना सांगणार आहे .... 
 
अनुराग :  मला ही तुला आज हेच सांगायचं होत.... तूच सगळ क्लिअर केलंस बर झालं .... 
 
ऐश्वर्या : हो ... आता सगळ क्लिअर केलं आहे तर आता आपण आधी सारखे फ्रेंड्स होऊच शकतो ना ....  म्हणजे तुला काही problem नसेल तर .... 
 
अनुराग : मला काही प्रॉब्लेम नाही ... आणि कधी ही नव्हता ते मी १० वीत सुट्टीला आलो होतो , तेव्हा सगळे मला जावई बापू -जावई बापू करत होते... ते जाम डोक्यात गेल होत माझ्या मला एकदम कसतरी feel झालं.... म्हणून मी कोल्हापूरला येणं कायम टाळलं... आणि तुझ्यापासून थोडा डीसस्टन्स ठेवला .... पण तरीही आई तुला सून म्हणून हाक मारत आली .... हे नातं जोडाजोडी प्रकरण काही थांबायचं नावच घेत नाही....
 
ऐश्वर्या : तेच तर.... पण काही हरकत नाही आपण सांगू सर्वांना की आम्हा दोघांच्या ही मनात असं काही नाही आहे ....
 
अनुराग : बरं हा विषय राहू दे... तू आता घरी जाणार की माझ्या सोबत फिरणारं आहेस अजून ....
 
ऐश्वर्या :  नाही नाही ... तू जा फिर पुण मी जाते घरी ....
मला फक्त दर्शन घ्यायचं होतं आणि तुझ्या सोबत गोष्टी शॉर्ट आऊट करायच्या होत्या ....
 
अनुराग : बरं बरं आता जा घरी आणि पोचलीस की मेसेज करून सांग ....
 
तो तिला एका टॅक्सीत बसतो आणि घरी नीट जा आसं तिला सांगून तो सारसबागला निघून गेला जिथे अमरला त्याने ये असं सांगितलं होतं....
 
स्थळ : सारसबाग, पुणे.
  वेळ : 5.15 
 
अमर केव्हाची अनुरागची वाट पाहत होता , वाट पाहून त्याला आता वैताग येत होता ... इतक्यात अनुराग ने त्याला हाक मारली ....
 
अनुराग : अमर ... सो सॉरी थोडा उशीर झाला...
 
अमर : इट्स ओके... चल इथल्या गणपतीच दर्शन करून घे....मग आपण फिरू ....
 
अनुराग : ओके... आलो पाया पडून तू थांब इथेचं...
 
अमर : hmmm... थांबतो मी तू जा...
 
 
तो देवाच्या पाया पडतो आणि आणि बाहेर येतो ....
मग अमर आणि अनुराग तिथे असणाऱ्या एका बाकड्यावर बसतात....
 
 
अमर : ऐश्वर्या आणि तू दगडूशेठला गेला होतात काय बोलणं झाल तुमच्यात???
 
अनुराग : तिला ही माझ्या सोबत लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नाही... ती म्हणाली की मला माहीत आहे म्हणून तू माझ्या पासून दूर अंतर ठेवून राहतोस.... 
 
अमर : ओके ... तिच्या मनात तस काही नाही आहे.... म्हणजे आत्ता तुझ्या आणि अनामिकाच्या लग्नामध्ये कोणीही आडव येणार नाही....
 
अनुराग : हे काय बोतोयस तू ??? अस काही नाही आहे आमच्यात we are just friends .... 
 
अमर: मला वाटलं की...
 
अनुराग : काय वाटलं की आमचं काही तरी आहे .... मला तरी वाटतच होत तुम्ही सर्वजण असाच विचार करणार...
 
अमर : अरे ती काल पार्टीत तुझ्या जवळ जवळ घुटमळत होती मग तेच वाटणार ना ... आणि काल तुम्ही दोघं सोबत romantic song वर डान्स करत होतात म्हणून आमचा समज झाला की तुझ आणि तिचं काही तरी आहे सिंपल त्यात काय एवढं.... 
 
अनुराग : काही नाही आहे आमच्यात .... 
 
अमर : एक विचारू  ?? नसेल सांगायचं तर राहूदे...
 
अनुराग: आधी प्रश्न तर विचार मग मी काय सांगायचं की नाही ते ठरवतो ...
 
अमर : तू आज पर्यंत कोणाच्याच प्रेमात पडला नाहीस का ??? 
 
अनुराग : नाही मला असं कधी feel झालं नाही .... म्हणजे क्रश होत्या माझ्याही पण प्रेमात तस मी कोणाच्या पडलो नाही ... कारण मला माझा अभ्यास खूप महत्त्वाचा होता....
 
 
अमर : ठीक आहे ... I wish की लवकरच तू कोणाच्या तरी प्रेमात पडावास ..... 
 
अनुराग :  hmmm... ते सगळ जाऊ दे चल आता जाऊया इथून...
 
अमर : कुठे जायचं आता आपण...
 
अनुराग : मी आज सकाळी पेपर वाचला त्यात एक जाहिरात होती ... नवीन मराठी आणि इंग्रजी नोवेलसचा सेल आहे ..... तिथे जाऊन काही नवीन बुक्स खरेदी करूया ....
 
अमर: हो .. तिथे जाऊ आपण पण त्याआधी सारसबाग ची special भेळ खाऊया ना चल ....
 
 
अनुराग : हा हा चल ... खाऊया ...
 
ते दोघे भेळ खातात आणि एक्झिबॅशनच्या ठिकाणी जायला निघतात....
 
स्थळ:  बुक्स एक्झिबिशन , पुणे 
 
वेळ : संध्याकाळी ६ वाजता .
 
मीरा तिचं स्टडी मटेरियल घेतलेले असते ... आता ती काही नवीन बुक्स खरेदी करूया या उद्देशाने ती तिथल्याचं एका दुकानाच्या जवळ असणाऱ्या exibition मध्ये  जाते ....
 
ती  तिथं खूप सारी इंग्रजी आणि मराठी पुस्तकं होती ....
ती पाहून तिला कुठली घेऊ आणि कुठली नको असं होत , म्हणून ती एका तिथेच असणाऱ्या एका काउच वर बसते आणि पुस्तक पाहू लागते ....
 
 
तेव्हा ती स्वतःलाच म्हणत असते, मला इतकी पुस्तक वाचनाची आवड आहे पण अभ्यासाची पुस्तकं वाचण्याची का आवड नाही काय माहीत ..... तसं ही काय करायचं ती पुस्तक वाचून काय माहीत , कुठला इतका तिर लागणारं आहे देव जाणे की आई माझ्यावर दहावी आहे अभ्यास कर अभ्यास कर.... म्हणून मागे लागली आहे...
 
तिच्या हे लक्षात आल नाही की कोणीतरी तिच्या शेजारी बसले आहे पण जेव्हा तिच्या हे लक्षात आल तेव्हा तिने शेजारी पाहिलं ....
 
ओळखा पाहू तो कोण ??? Ofcourse तो आपला हिरो अनुराग....😁😁😁
 
अनुराग : hello miss ....😊
 
मीरा : hii.... तुम्ही इथे !!! 
 
अनुराग : पुस्तकं वाचायला फक्तं तुम्हाला आवडलं नाही.... मला ही आवडत.... 
 
मीरा : हा .. माझ्या ते लक्षातच आलं नाही... 
 
अनुराग : इट्स ओके.... मिस तुम्ही मगाशी असं म्हणत होता , तुम्हाला पुस्तकं वाचायला खूप आवडत पण अभ्यासाची पुस्तकं वाचायला नाही आवडतं....
 
मीरा: हो... मला नाही आवडत अभ्यास करायला... आणि माझी आई माझ्या सतत मागे लागते अभ्यास कर अभ्यास कर म्हणून...
 
अनुराग : मिस....
 
मीरा : माझं नाव मीरा आहे सो, you can called me mira ...
 
अनुराग : okay mira ... तू  आणी प्रिया एकाचं स्कूल मध्ये आहात  का ???
 
मीरा : हो ....
 
 
अनुराग : मीरा तुला एक सांगू का ???  म्हणजे तुझ बोलण ऐकलं म्हणून बोलतोय तुला ....
 
मीरा : बोला ना ... 
 
अनुराग :  आपल्या लाईफ मध्ये जगण्यासाठी काही तरी प्रर्पज हवा ... काही तरी मिळवण्याची जिद्द हवी... अभ्यास फक्त टॉप करून मिरवण्यासाठी नाही तर आपला aim साध्य करण्यासाठी ची एक स्टेप असते ....
जर आपला या जीवनात जगण्यासाठी काही aim नसेल तर जनावरात आणि माणसात काय फरक नाही का ???
खूप झाल लेक्चर देऊन सॉरी त्यासाठी पण एका स्वतःच काही तरी aim ठेव आणि अभ्यास कर... अभ्यास तुला आवडायला लागेल.... तू माझ्या बहिणीसारखी आहेस म्हणुन तुला सांगावस वाटल....
 
मीरा एकदम शांत पणे त्याचं म्हणन ऐकत होती पण शेवटी तो तिला बहीण म्हणाला हे काही तिला आवडलं नाही ......
 
मीरा : तुम्ही जे काही म्हणताय ते मला पटलंय आता मी मनापासून अभ्यास करण्याचा प्रयत्न करेन... Thank You ☺️ मला छान समजावल्याबद्दल ....
 
 
असं म्हणून ती उठून काही पुस्तकं खरेदी करून त्याचं बिल पे करते.... त्याला जाताना bye करून जायला वळते.... तोच तुला कोणीतरी हाक मारत....
 
"प्रिया.... तू इथे!!!
 
मीरा : hii ... dr. अमर तुम्ही इथे काय करताय ???
 
अमर : मीरा मी अनुराग सोबत बुक्स घ्यायला आलो होतो ... माझा मित्र आहे तो ... 
 
मीरा : अच्छा.... मी पण नवीन बुक्स खरेदी करायला आले होते .... 
 
अनुराग : तू हिला कसं काय ओळखतोस???
 
अमर : अरे मी ज्या पुण्यातल्या कुलकर्णी मल्टीस्पेशािटी हॉस्पिटल मध्ये काम करतो ... ते हिच्या बाबांचं आहे ... वेदांत कुलकर्णी पुण्यातले प्रसिद्ध gynecologist  त्यांची ही मुलगी मीरा ....
 
अनुराग : ही त्यांची मुलगी आहे !!!
 
मीरा : वाटतं नसल तरी आहे.... चला मला खूप लेट झालाय bye byee dr. Amar मी आता येते ....
 
असं म्हणत ती निघून जाते ....
 
 
पुढे नक्की काय होणार त्यासाठी वाचत रहा माझिया प्रियाला प्रीत कळेना...❤️❤️❤️