रीता ने दरवाजा उघडला समोरच तिचा बॉस उभा होता. त्याने विचारलं मिस रीता तुम्ही तयार आहात का ? चला मग तास त्याने तिचा हात पकडला. नर्मदा ताई आणि मनोहर राव तर बघतच राहिलेले.. त्याने तिला हाताला धरून खेचलं तास नर्मदा ताई म्हणाल्या भाघा तुमच्या मुलगी कशी गुण उधळते आहे. ऑफिस मध्ये ओव्हर टाईम काम आहे सांगून... हे असलं चालेल असायचं वाटत. तिच्या बोलण्याने रीता ला खूप रडू येत होते. पण तीचे हात दगडा खाली होते. कारण जर हे घर गेलं. तर कुठे जाणार सर्व. म्हणून तिला लग्न करावच लागणार होत.
त्याने कसलीही पर्वा न करता तिला खेचत आणून गाडीत बसवले. आणि गाडी स्टार्ट करून सुसाट वेगाने निघाला. काहीच वेळात एका मंदिरा जवळ गाडी थांबली. तो गाडीतून खाली उतरला पण रीता अजूनही रडतच तिच्या विचारात हरवलेली. त्याने एक नजर आपल्या घडयलावर टाकून टाइम बघितलं.. आणि रागातच तिच्या साईड च दरवाजा ओपन करून तिला खेचून बाहेर काढल. त्याच्या अस अचानक खेचण्या ने तिला हाताला दुखलं.. पण तिने ते ना जाणवू देता ती मंदिरात गेली..
मंदिरात गभाऱ्या बाहेरच छोटा अस लग्नासाठी तयारी केली होती. एक भटजी काका सर्व मांडत होते. तास मंदिरात काही लोकांची ये जा होती. पण मंदिराच वातावरण खूप शांत आणि छान होत. काहिच वेळात भटजी काका नी मंत्र चालू केले. आणि दोघांना ही पाटावर बसायला सांगितले. काही वेळाने भटजी काका नी सर्व विधी चालू केले. अशप्रकरे २तास नंतर मंगळसूत्र घातला तास गुरुजींनी त्यांना विवाह संपन्न झाल्याचं सांगीतल. मग दोघांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. गुरुजींनी रीता च्या डोक्यावर हात ठेवून सांगीतल. जरी आता कठीण वाटलं तरी धीर नको सोडुस. सर्व काही चांगलंच होईल. तिला काय बोले गुरुजी ते समजल नाही कीव ती त्या मनस्थिती च नव्हती. तिने हात जोडले. मग पुन्हा दोघं जाऊन गाडीत बसले.. रीता ला तर आता खूपच धाकधूक होत होत.
तो गाडी एकदम सुसाट पळवत होता. एक नवीन प्रवास चालू झाला .गाडीत अगदी शांतता होती. रीता बाहेर बघत होती. मानत विचार करत होती. लग्न ही किती खास गोष्ट असते. पण माझ्या बाबतीत मला ती ही सुख नाही. ती रडत होती. काही तासाच्या प्रवासा नंतर गाडी येऊन एका मोठ्या आलिशान बंगला जवळ थांबली.
तो बंगला तर एकदम मोठा च होता पण त्याच्या पुढचा पॅसेज अजूनच मोठा होतं. मधून चालायला पायवाट होती... एक साईड ला गाडी लावायला पार्किंग तर दुसऱ्या बाजूला थोडी फुलझाड आणि छोटा झोपाळा ही होता. त्याने गाडी पार्किंग मध्ये लावली आणि खाली उतरला. तशी रीता ही उतरली.
तो पुढे चालत होता. तर रीता त्याच्या पाठून चालत होती. ते घराच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिले त्याने आवाज दिला रामू काका.... ओ रामू काका जरा बाहेर या.. त्याच्या आवाजाने एक ४० ४५ च्या आसपास असेल एक माणूस बाहेर आला. तो बघून शॉक झाला. त्याने लगेच बाईसाहेब बाईसाहेब करत वरती गेला. आणि एक त्याच्या वयाची असलेली बाई खाली आली.. तिने त्याला पहिलं. आणि त्या पण शॉक झालंय बहुदा त्या आई असाव्या सरांच्या.
त्या खाली आल्या.. आणि रीता आणि त्याच्या जवळ येऊन उभ्या राहिल्या. त्यानी एक नजर रीता कडे टाकत त्याला वीच्रले. कोण आहे ही. काय चाललय? त्याच्या डोळ्यात राग सपश्ट दिसत होता. त्या ओरडून म्हणाल्या.. सांग पटकन काय आहे हे कोण आहे ही मुलगी...
रीता त्याच्या तोंडाकडे बघत होती. पण त्यांच्या ओरडण्याचा ही त्याला काही फरक पडत नव्हता. तो हसत होता.. आणि अचानक रीता ला दोन्ही खांद्याला पकडुन म्हणाला.. मीट माय स्वीट अँड लव्हली वाइफ मिसेस रीता रमण पुरोहित.... पुरोहित इंडस्ट्री ची मालकीण, आणि ह्या घरची ही.त्याच्या बोलण्याने रीता ला गोळा च आला पोटात. आणि त्या बाईसाहेब ना तर राग अनावर झाला होता. त्या जोडत ओरडून म्हणाल्या... काय बोलतोस तू? अस कोणाला पण गळ्यात हार आणि मंगळसूत्र करून आणशील आणि बायको बंवशिल का? मी नाही मानत हे लग्न.
बट मिसेस अहिल्या पुरोहित तुम्ही नाही मनात त्याला मी काही नाही करू शकत. आणि तुमच्या मनाण्या न मानाण्या वार काय आहे... तो अगदी शांतपणे म्हणाला. तास अहिल्या बाई ना राग अनावर झाला. त्या रीता ला पकडुन घराबाहेर काढायच्या विचारात होत्या. की लगेच रमण ने त्यांचा हात अडवला. आणि म्हणाला... डोन्ट यू देर... त्याच्या डोळ्यात राग दिसत होता. मिसेस अहिल्या तुम्ही असला मिस्टर पुरोहितांच्या बायको, आणि ह्या घराच्या मालकीण बाई. बट तुम्ही माझ्या कोणीही लागत नाही. सो प्लिज डोन्ट इंटर फेआर् इन माय लाईफ.. मग थोड नॉर्मल होत तो रामू काका ना म्हणाला.. काका घरात नवीन नवरी आली आहे. जा तयारी करा आरतीच ताट घेऊन या. आणि ते काय ते ओलांडायची असत ते ते पण घेऊन या.
तास रामू काका आतमध्ये गेले आणि त्यांनी सर्व घेऊन आले. मग रीता माप ओलांडून आतमध्ये आली. अहिल्या बाई तर तिथेच उभ्या होत्या. रीता अख्ख घर बघत होती. घरात प्रत्येक वस्तू तिच्या तिच्या जागेवर होती. कुठेही कसली अडचण कीव पसारा नव्हता. हॉल च एवढा मोठा होता.. आणि बाजूला च दोन रूम होत्या.
तिने सगळी कडे नजर फिरवली. आणि अचानक तिची नजर येऊन अहिल्या बाई वार थांबली. त्या एक टक तिच्या कडेच बघत होत्या. त्यांचे डोळे बघून रीता ने लगेच मान खाली घेतली. आणि स्तब्ध उभी राहिली. मग रमण तिला म्हणाला तू जा वरती आणि फ्रेश हो मी आलोच. त्याने रामू काका ना डोळ्यांनी च तिला खोली दाखवायला सांगितली. मग रामू काका तिला रमण क्या खोलीत घेऊन गेले.
ती आतमध्ये गेली पण फ्रेश व्हायला तिने बॅग आणलीच नव्हती. म्हणून फक्त तोंडावर पाणी मारलं आणि ती बाहेर आली. तिने पाहिलं. जसं हॉल मध्ये एकूण एक गोष्ट जागच्या जागी होती तशी त्याच्या रूम मध्ये पण प्रत्येक गोष्ट जागच्या जागी होती. बेड अवरलेला होता. भिंती वार काही फोटो होते. ती सगळ निरखून बघत होती. त्याचे एकट्याचे च फोटो जास्त होते. फक्त एक च फोटो होता थोडा जुना होता. तिने पाहिलं. त्या फोटोत एक त्याच्या आई च्या वयाची बाई होती. पण तिने अहिल्या बाई पहिलं त्या नव्हत्या त्या फोटो मध्ये.. म्हणून ती जरा विचारात पडली. पण नंतर तिने जास्त विचार न करता सर्व खोली पहिली. तिला खूप कंटाळा आलेला तिने घड्याळ पहिलं. ६ वाजत आलेले. तिला कपडे बदलायचे होते. पण कपडे नव्हते. भूक ही लागलेली सकाळी चहा ही घेतला नव्हता. आणि रात्री ही काही खाल्लं नव्हत म्हणून पोटात आता अन्नाचा एकही कन नव्हता. ती कोणाकडे मागू ही शकत नव्हती. कारण जरी ती लग्न करून आली असली तरी. तिला कशावरच हक्क नव्हता. ती सहा महिन्याची फक्त बायको म्हनून असलेली बाहुली होती. त्यामुळे तिला काय करावं तेच समजतं नव्हत. ती तशीच बेड वर पडली. आणि तिचा डोळा कधी लागला तेच समजल नाही.