Saha Mahine - 3 in Marathi Love Stories by Neha Kadam books and stories PDF | सहा महिने - 3

Featured Books
Categories
Share

सहा महिने - 3

रमण दरवाजा खोलून आतमध्ये आला. त्या दरवाज्याच्या आवाजाने तिला जाग आली. रमण ला आलेलं बघून ती उठून बसली. तो आतमध्ये आला. आणि कपाटातून कपडे घेऊन फ्रेश व्हायला गेला. रीता कडे तर त्याने ढुंकून ही पहिलं नाही. जणू तीच काहीच अस्तित्व नाही अस वाटत होत तिला. तो आतमध्ये गेला. तास ती विचार करत होती आता आला का मग तिच्या कपड्याचा विषय काढू अस. तिला समजत नव्हत कस बोलावं.
           काही वेळाने तो बाहेर आला. आणि आरश्या समोर जाऊन केसला फनी करत होता. तिने हळूच त्याला बोलण्यासाठी आवाज दिला.. स... सर ते मी... तास तो मागे वळला... ती घाबरली पण बोलणं भाग होत. सर ते माझे कपडे म्हणजे बॅग तिकडेच राहिली... तिच्या बोलण्याने तो तडक आणि ठसर आवाजात म्हणाला... मग त्याला मी काय करू? तुला सगळी कल्पना दिली होती मी आधीच... त्याच्या अशा बोलण्याने तिला कसंतरीच झाल. मग ती पुढे काहीच बोलू शकली नाही. तो तिकडून निघून बाहेर गेला.
           तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती विचार करत होती. एखादा माणूस एवढा कसा दगड असू शकतो. त्याला कोणाच्या वागण्याचा, रडण्याचा काहीच कसा फरक नाही पडत. ती ने आलेलं अश्रू पुसत फ्रेश व्हायला गेली. पोटात तर अजूनही मुरडा पडत होता. ती फ्रेश होऊन खाली आली. रामू काका हॉल मध्ये डायनिंग टेबल साफ करत होते. ती आली आणि त्यांना म्हणाली... 
काका पाणी घेऊ का किचन मधून. तास रामू काका तिला म्हणाले. अहो छोट्या बाईसाहेब आता हे घर तुमचं च आहे. तुम्ही मला कशाला विचारता. तुम्ही बसा मी देतो आणून. नाही नको मला सांगा मी आणते. रीता म्हणाली म्हणून रामू काका नी तिला सांगितला.जा घ्या ओट्या वर आहे. बघा आणि थंड हवा असेल तर फ्रीज मधून घ्या. 
             त्यांच्या बोलण्याने तिला थोड हसूच आलं. पण ती आतमध्ये गेली. किचन बघून तिला थोड भिर भिरलाच तास घर मोठ होत ते बघून तिला हरवल्या सारखच वाटत होत. पण किचन ही एवढ मोठं असू शकत हे तिला आज च समजल. ती ओट्या जवळ. गेली  जेवणाची भांडी सोडली तर सर्व गोष्टी काचेच्या होत्या. कपाट ही काचेच होते. ती ने ग्लास घेण्या साठी कपाट खोलले.. आणि तिने ग्लास घेतला. ती पाणी घेतले आणि ग्लास ठेवायला जाणार तेच ग्लास निसटला तास तो फुटला... आता तर तिला घामाच आलेला.. अहिल्या बाई आणि रामू काका धावतच किचन मध्ये आले. अहिल्या बाई तर आधीच रागावलेल्या. त्या मुळे त्या संधीच शोधत होत्या. त्यानी ते बघून तिच्या वार ओरडून म्हणाल्या... काय केलंस हे.. हे ग्लास चा सेट असतो पूर्ण.. तुझ्या मुळे एक फुटला आता आखा सेट फुकट जाणार.. माहितेय का तुला त्याची किंमत... 
             रीता चे डोळे पाणावले होते. एका ग्लास तुटण्या वरून तिला एवढा ऐकायला पडत होत. ती मनात विचार करत होती. ही माणसं फक्त पैशांनी च श्रीमंत आहेत. बाकी मनाने गरिबाच आहेत. आज चा तिचा ह्या घरातला पहिलाच दिवस होता. आणि तिला अजून सहा महिने काढायचे होते. ते कसे जाणार तिलाच समजत नव्हत. ती खाली मान घालून उभी होती. आणि अहिल्या बाई तिला नको नको ते ऐकवत होत्या. ती काहीच बोलत नव्हती. ते बघून त्या अजूनच रागात तिच्या अंगावर धावून जात म्हणाल्या. बोल आता कोण भरून देणार हे नुकसान.... तुझ्या सारख्या मुलीची माझ्या घराची मोलकरीण बनायची पण लायकी नाही. पण रमण ने तुला बायको म्हणून आणल आहे. म्हणून पण थोडेच दिवस बघत बस... त्या अस बोलून तिकडून निघून गेल्या....
             रामू काका नी काचा भरल्या.... आणि रीता ला म्हणाल्या बाईसाहेब जा तुम्ही बसा बाहेर जाऊन.. त्यांचं बोलणं मनाला नका लावून घेऊ. त्यांना त्या म्हणतील तसच लोकांनी वागायचं अस वाटत. त्या  अशाच आहेत पण  रमण साहेब आले ना का मग ते करतील त्यांना बरोबर.. त्यांच्या समोर त्या काही नाही बोलू शकत. कारण रमण साहेब त्यांना बोलायला जागा च नाही ठेवत.जा तुम्ही बाहेर भूक लागली असेल ना तुम्हाला? रामू काका च्या बोलण्याने तिला थोड हसू आलं. पण भूक ऐकताच ती म्हणाली हो काका खूप भूक लागली आहे. रामू काका तिला म्हणाले. तुम्ही जा बसा बाहेर मी आणतो.
              ती बाहेर जाऊन बसली. रामू काका खायला घेऊन आले. तिने जेवण केलं. तेव्हा तिला जरा बरं वाटल.. तीच जेवण झालं तशी मग ती रूम मध्ये गेली.. तिने टाईम पहिलं ८ वाजून गेलेले. ती बेड वार बसली आणि विचार करत होती. की उद्या सकाळी लवकरच जाऊन कपड्याची बॅग आणायला लागेल. नाहीतर काही खर नाही. तसच ती विचार करत होती. मला आई बाबा ना खरी गोष्ट सांगताच आली नाही. ते दोघं किती टेन्शन मधे असतील.. आणि नामित च काय झालं असेल? तिने फोन चेक केला. नमित चे फोन आलेले. तिला फोन उचलायचा धीर च होत नव्हता. आता पर्यंत त्याला सर्व समजलं च असेल. पण मग मनात विचार केला की त्याचा त्रास घरच्यांना नको व्हायला. म्हणून तिने फोन डियाला केला. 
              एका रिंग च्या आधी फोन उचलला. आणि एकदम मोठ्या आवाजात नमित म्हणाला. काय चालवलं हे सगळं. तुला काय खेळ वाटतो का सगळा. एवढीच जर का हाउस होती तर मग मला का हो बोललीस लग्नासाठी. तुला फक्त पैसा च हवा होता हा बरोबर म्हणूनच माझ्या सोबत तयार झाली लग्नाला.आणि आता दुसरा जास्त पैसे वाला भेटला म्हणून तिकडे गेलीस ना मी चांगला ओळखतो तुझ्या सारख्या मुलींना. मला तर वाटला नव्हतं तू अशी असशील अस.नमिता च्या ओरडण्याने आणि अस बोलण्याने तिला पुन्हा रडू आले. ती फक्त ऐकत होती. नमिता ने रागाने फोन ठेवून दिला. ती बेड वर बसून रडत होती. 
                  रमण आतमध्ये आला. त्याने पाहिलं रीता बसून रडत होती. त्याला बघून ती ने डोळे पुसले आणि शांत झाली. पण त्याने तिला तिच्या रडण्या मागच कारण ही विचारलं नाही. तो येऊन लगेच झोपून गेला. आणि लाइट्स ही ऑफ केल्या.ती मात्र आलेला हुंदका आवरत उठून छोट्या सोफ्यावर गेली. आणि झोपायचा प्रयत्न करत होती. पण तिला झोपच लागत नव्हती. ती विचार करत होती की काय चाललं आहे. आणि माझ्याच सोबत का? विचार करता करता च तिचा डोळा लागला तशी ती झोपून गेली.
                 सकाळी जाग आली तेव्हा तिने पहिलं. ९ वाजता आलेले. ती पटकन उठून फ्रेश झाली. आणि तिला तीच सामान घ्यायला जायचं होतं. म्हणून ती कालच्याच कपड्यावर खाली. आली तिने रामू काका ना सांगून ती जायला निघाली इतक्यात समोरून एक व्यक्ती. बॅग घेऊन आला मिसेस पुरोहित आपणच का? ती फक्त मान हलवली.. तास मग त्याने बॅग पुढे करत तो म्हणाला मॅडम सरांनी ही बॅग तुम्हाला द्यायला सांगितलेली. तिने पहिलं तिचीच बॅग होती. ती थोडी शॉक झाली. पण बॅग घेऊन ती त्याला थँक यू म्हणली आणि बॅग घेऊन रूम मध्ये आली. 
                 मग कपडे घेऊन ती फ्रेश व्हायला गेली. ती विचार करत होती. मी काल सांगीतल तेव्हा का मग ते अस म्हणाले. आणि अचानक बॅग घेऊन यायला सांगितल. काय समजतच नाही कधी मनात काय असतं त्यांच्या ते... ती फ्रेश बाहेर आली. आणि सगळं आवरलं. मग ती ऑफिस मध्ये जायचा विचार करत होती. पण ११ वाजून गेलेले. त्यामुळे जाई पर्यंतच तिला अजून लेट झाला असता. म्हणून ती ने आज न जायचेच ठरवले. मग खाली आली. 
                 हॉल मध्ये अहिल्या बाई डियानिंग टेबल वर बसून नाष्टा करत होत्या. रीता थोडी घाबरत घाबरतच खाली आली. त्यानी तिच्या कडे एक कटाक्ष टाकला.