Koun? 27 in Marathi Fiction Stories by Gajendra Kudmate books and stories PDF | कोण? - 27

Featured Books
Categories
Share

कोण? - 27

मग सावली बोलली, "कुणाची हत्या, कुणाबद्दल तू बोलत आहेस. मग कोमल उत्तरली, "ताई तू इतकी भोळी बनू नकोस तुला माहित आहे कुणाचा हत्याबद्दल मी बोलतेय तर, 'सावली पुन्हा बोलली, अग काय तू कोड्यात बोलल्यासारखी बोलतेय तू स्पष्ट सांग कुणाबद्दल बोलते आहेस तर." तेव्हा कोमल बोलली,"नीलेशची हत्या तूच केलेली आहेस. तू इस्पितळातून पळून त्याला भेटायला जाण्याचा बहाण्याने गेलीस आणि तेथे जाऊन तूच त्याची हत्या केली. त्यानंतर भी तुला अनयास फोन केला म्हणून मला हे कळले कि तू इस्पितळात नाहीतर तीकडे नीलेशकडे गेलेली आहेस आणि तेथे जाऊन तू त्याची हत्या केली आहेस, तुझे हे पाप कर्म मी तुझी बहिण आणि तुझी हितकर म्हणून आजवर लपवून ठेवले, नाही तर मी कधीच पोलिसांना जाऊन हे सगळ सांगितल असत". हे सगळ ऐकून सावलीचा पायाखालची जमीनच सरकून गेली. त्याच बरोबर तीची आई सुद्धा तीचाकडे संशयाचा नजरेने बघू लागली. ती त्यानंतर म्हणाली, " सावली काय हे सत्य आहे, कोमल काय सांगत आहे हे खर आहे काय." तेव्हा सावलीला सत्य बोलावे लागले. ती म्हणाली, " होय आई है सत्य आहे की मी नीलेशला
भेटण्याचा हेतूने तेथे गेले होते. परंतु तुझी शप्पथ घेऊन सांगते कि मी निलेशची हत्या केलेली नाही आहे."

   मग आई जोरात ओरडली आणि म्हणाली, "खबरदार जर माझी खोटी शप्पथ घेतली तर. एवढे मोठे कर्मकांड करून ठेवले आणि मला काहीच सांगीतले नाही. आजवर माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवलीस, मला इकडल्या तीकडल्या गोष्टी सांगून माझी दिशा भूल करत गेलीस, या तुझ्या कर्मकांडाचे फळ बिचारी कोमल भोगत आहे. तुझा कारण ती बिचारी मरता मरता वाचली आहे. आता सांग तू खोटी नाही बोलत आहेस हे तू
कशावरून सिद्ध करतेस." आता मात्र सावलीकडे बोलण्यासाठी काहीच उरले नव्हते, म्हणून ती हताश होऊन तेथून निघून गेली. ती तिचा रुममध्ये जाऊन रडू लागली होती. रडता रडता ती हाच विचार करत होती कि मी खरच निलेशची हत्या केली काय. म्हणून ती सारखी त्या क्षणाला आठवू लागली होती. काहीही करून तिला काहीच आठवत नव्हते शेवटी तीचे डोकं आता फार दुखू लागले होते. कारण कि सावलीचे मानसिक उपचार हे सुरु होते. मागील काही काळापासून तीचे दिवस चांगले व्यथित होत होते म्हणून ती आनंदित राहू लागलेली होती. त्यामुळे
तीला औषध घेण्याची आवश्यकता भासलेली नव्हती. परंतु आता या क्षणी तीचा डोक्यावर तेच जुन्या दिवसांचा
प्रमाणे टेन्शन आलेले होते. म्हणून ते टेन्शन तीचा डोक्यावर हावी होऊ लागले होते.

    म्हणून सावलीने कपाटातून गोळ्या काढल्या आणि खाऊन घेतल्या. त्या गोळ्यांचा नशेने ती कशी काय झोपी गेली ते तीलाच कळले नाही. त्या टेन्शनचा भारात तीने गोळ्यांचा डोस जास्तीच घेतला होता. त्यामुळे ती सतत २४ तास झोपूनच राहिली होती. इकडे तीची आई आणि तीची सख्खी बहिण तीची वैरी झालेली होती. त्या शशांकने कोमलचे असे ब्रेन वाश केले होते कि तीला आता त्याचा शिवाय दुसरे कुणीच दिसत नव्हते. इकडे सावली आता त्या गोळ्यांचा नशेतून बाहेर येऊन झोपेतून जागे झाली होती. तीला आता काल काय घडले काहीच आठवत नव्हते. ती उठली आणि नेहमीसारखी आईकडे गेली, तर तीची आई तीचाशी बोलायला तयार नव्हती. मग कोमलकडे गेली तर तीनेही तीचाकडे ढुंकून बघीतले नाही. सावलीला कळत नव्हते काय झाले आहे आणि त्या दोघीही का बर असे वागत आहेत. मग सावलीने तीचा फोन हातात घेतला तर तीने बघीतले कि तीचा फोनवर
अनोळख्या नंबरने दोन कॉल होते आणि पियुषचे दहा कॉल होते. मग तीने पियुषला फोन केला आणि त्याचाशी ती बोलू लागली होती. पियुषने तीला म्हटले, "सावली तू कुठे होतीस यार, मी तुझा घराजवळ येऊन तुला फोन केले परंतु तू काहीच उत्तर दिले नाही माझ्या फोनचे.” सावली म्हणाली, "नाही रे असे होऊ शकत नाही मी तर....." असे बोलता बोलता सावलीचे लक्ष घराचा बाहेर लावलेल्या व्हिडिओ रेकोर्डिंगकडे गेले. तीला त्यात शशांक तीचा घरात आलेला आहे असे दिसले."

    मग सावलीला काहीतरी आठवू लागले कि ती बाहेर गेली होती आणि मग शशांक काय आणि कसे घडले ते सावलीला आता स्मरण झाले होते. इकडे पियुष फोनवर हेलो सावली बोलत होता, तेव्हा सावली त्याचासोबत बोलू लागली, ती म्हणाली, “हेलो पियुष बोल," मग पियुष बोलला, “काय यार सावली तू कुठे आणि काय करत आहेस. इकडे मी हेलो हेलो करतो आहे आणि तू आहे कि उत्तरही देत नाही आहेस. काय समस्या आहे काही सांगशील काय तुझी तब्येत तर बरी आहे ना.' मग सावलीने स्वतःला सावरले आणि ती पियुषला बोलली, "मला माफ कर पियुष मी दुसऱ्या कामात व्यस्त होते म्हणून तुझ्याशी बोलू शकले नाही. मी एक काम करते मी स्वतः तुझ्या घरी येते आणि मग निवांत बोलते." असे म्हणून सावलीने फोन कट केला आणि ती कालचा वाद झाल्याबद्दल विचार करू लागली होती. तीला हे सुद्धा लक्षात आले होते कि शशांकने कोमलला तीचा विरुद्ध करून टाकले आहे. तेवढ्यात सावलीची नजर टेबलावरील एका कागदावर पडली. त्यानंतर तो कागद घेऊन ती लगबगीने घराचा बाहेर पडली.

    शेष पुढील भागात.......