सावलीचे डोळे उघळेचे उघळे राहिले, तीचा तोंडून काहीच नीघाले नाही. आई तीला बघत राहिली आणि मग म्हणाली, " बेटा काय झाले, तू अशी का वर बघत आहेस." तेव्हा सावली, " हा हा तर......" अशी म्हणाली. मग आई म्हणाली, "अग बाळा हाच तो शशांक ज्याचा तावडीत आपली कोमल अडकलेली आहे." " परंतु हा तर..." अशी सावली म्हणू लागली परंतु पूर्ण पणे काय ती बोलू शकत नव्हती. तेव्हा आईने सावलीला आधी शांत केले आणि मग तीला विचारले, “बाळा काय झाले ते मला शांतपणे सांग." मग सावलीने आईला सांगीतले, " आई हा तर त्या निलेशचा ग्रुप मधील मुलगा आहे. मी कित्येकदा त्याचा सोबत याला बघीतले आहे. निलेशचा प्रत्येक दुष्कृत्यात हा सुद्धा सामील असायचा." मग आई एकदम आश्चर्यचकित होऊन म्हणाली, " काय सांगतेस तू, हा त्याचा साथीदार आहे काय." तेव्हा सावली म्हणाली, १००% हा तोच आहे." मग आई म्हणाली, “ मला सुद्धा आता वाटू लागले आहे, कारण कि मी जेव्हा त्याला तुझा फोटो दाखवला तेव्हा त्याचा चेहरा हा पांढरा पडला होता आणि त्याची वाणी हि अडखळत होती. शिवाय मी त्याला तुझ्याबद्दल वीचारले तर त्याने सर्रास नकार दिला आणि तुझे नाव पहिल्यांदा ऐकले आहे असे म्हणाला. त्याचबरोबर तुला कधी भेटलाच नाही असेही तो म्हणाला."
तेव्हा सावली म्हणाली, " १०१ % खोट बोलतोय तो, एकदा त्या निलेश बरोबर असतांना माझा त्याचाशी सामना झालेला आहे. शिवाय ते निलेशचे प्रकरण इतके सगळ्या कॉलेज मध्ये गाजले तेव्हा हि हा त्याचा अवतीभवती होता. आई मला आता नक्की वाटत आहे, कि हे माझ्या विरुद्ध केल्या गेलेलं फार मोठ षड्यंत्र आहे. निलेश असा अनयास मरण पावला म्हणून त्याचा मृत्यूचा प्रतिशोध घेण्याचा उद्देशाने हा माझ्या विरुद्ध कट रचला गेलेला आहे. म्हणून त्यासाठी कोमलला मोहरा बनवलेलं
गेलेलं आहे. आई आपल्याला कोमलला या जाळ्यातून बाहेर काढावे लागेल." मग आई म्हणाली, " अरे माझा देवा मी समजत होते कि ते प्रकरण संपले असेल परंतु हे तर आणखीच जास्त डोक वर काढत आहे. चल बेटा कोमलकडे आपण तीला सत्य काय ते सांगू." असे म्हणून त्या दोघीही कोमलचा रूमकडे गेल्या. तेथे गेल्यावर आईने शशांकबद्दल सावलीने जे काही सांगीतले ते सवीस्तर सांगीतले. कोमलने ते सगळ ऐकून घेतलं परंतु काहीच प्रतिक्रिया दिली नाही. म्हणून आईने तीला विचारले, " अग मी तुला सगळ सवीस्तर सांगीतले तरीही तुला काहीच फरक पडलेला मला दिसत नाही. अग आता तरी सांग तू अशा अपराधिक वृत्तीचा मुलासोबत कशी काय प्रेम आणि लग्न करू शकते."
त्यानंतर कोमल उत्तरली, " आई आपल्या परिवारात खोट बोलण्याची सवय आजवर कुणालाही नव्हती. परंतु काही दिवसांपासून हे खोट बोलण्याचे सत्र सुरु झाले आहे. काही लोकांनी हि आता प्रथाच बनवून घेतली आहे आणि तू सुद्धा त्या लोकांत सामील झालेली आहेस." तेव्हा आई म्हणाली, " अग बाळा तू हे काय आणि कशी बोलत आहेस, कोण लोक, कसली लोकं आपल्या परिवारात आपल्या तीघींचा व्यतीरिक्त चवथा कोण आहे, तर तू अशी का बर बोलत आहेस." मग कोमल म्हणाली, " आई तू एवढी समजदार आहेस तर तूच समजून घेना मी कुणाबद्दल बोलत आहे तर. मी ज्यांना आपला परिवार, माझे हितकर आजवर समजत होते, आज तेच माझा अहित करायला बघत आहेत. त्यांना माझी खुशी, माझा आनंद त्यांचा डोळ्यात खपून राहिलेला आहे." असे म्हणून कोमल सावलीकडे बघू लागली. मग मात्र सावलीला राहावल नाही गेल आणि ती बोलली, " अच्छा तर तुझी ती शत्रू मी आहे आणि मला तुझ सुख पहावल नाही जात असे म्हणायचे आहे तुला." तर मध्येच आई बोलली, "अग बाळा तू हे काय म्हणत आहेस. अग ती तुझी मोठी बहीण आहे आणि आतापर्यंत तीच आपला संभाळ करत आहे."
मग कोमल म्हणाली, " आई मला एक गोष्ट सांग तू केव्हापासून खोट बोलायला शिकली." आई म्हणाली, “ मी केव्हा खोट बोलले." पुन्हा कोमल बोलली, " अग तू आताही खोट बोलत आहेस, फक्त काही तास झालेत तुला खोट बोलून आणि तुला आता ते सुद्धा आठवत नाही." आई म्हणाली," तू काय आणि कशाबद्दल बोलत आहेस ते मला कळत नाही आहे, मला सविस्तर सांग काय झाले तर." मग कोमल बोलू लागली, " अग आज सकाळी जेव्हा शशांक आला होता तेव्हा तू त्याचा समोर किती खोट बोलली. तू त्याला हे खोट सांगीतल कि मी जन्मभर अपंग राहणार आहे. जेव्हा कि डॉक्टर म्हणाले कि मी आता बरी होऊन चालू शकते. याचा अर्थ तुलाही शशांक आणि माझे मिलन होणे मंजूर नाही आहे. तू मुद्दाम त्याला माझ्या अपंग असणायची भीती दाखवून आमचा दोघांना वेगळ करण्याचा प्रयत्न करत होतीस. ते शशांक समोर तू खोटी नाही पडली पाहिजे म्हणून मी तेथे काहीच बोलले नाही. आता ताईचा सांगण्यावरून तू पुन्हा माझ्या समोर शशांकचा बाबतीत खोट्या गोष्टी सांगून माझी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून राहिली आहेस. तुझी एक मुलगी तीकडे वाट्टेल ते करते, कुणाची हत्या करते तर ते तुला चालते आणि दुसरी मुलगी एका मुलाशी निरागस प्रेम करते ते तुला चालत नाही. आज पासून हि माझी सगळ्यात मोठी शत्रू झाली आहेस." कोमलचे कथन ऐकून सावली चूप होऊन बघत राहिली होती.
शेष पुढील भागात........