Silk ties will fit - 9 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | जुळून येतील रेशीमगाठी - 9

Featured Books
Categories
Share

जुळून येतील रेशीमगाठी - 9

भाग - ९
.
.
.
.

साची आणि अपूर्व हॉस्पिटल बाहेर आले.....साची खूप रडत होती.....अपूर्वच्या हीं मनात भीती होती.....पण कुणीतरी धीराने घेणं महत्वाचं होतच......





साची - अप्पू, काय करायच आता?? पैसे कुठून आणार आणि सात दिवस कस शक्य होईल...




अपूर्व - पैशाची काळजी तू नको करू पिंकी, माझे सेविंग्स आहेत.....सुट्टी साठी तुला घरी मनवावं लागेल...




साची - पण मी काय सांगू?? 




अपूर्व - अग संग की कॉलेज ची एज्युकेशनल ट्रिप चालले म्हणून...मनव त्यांना साची....मी तर त्यांच्याशी बोलायला नाही येऊ शकत....




साची - ठीके...🥺




अपूर्व - साची रडू नकोस ग...यार मी तुझ्या डोळ्यात पाणी नाही पाहून शकत...... आणि मी तुला एकटं सोडलंय का ग? मी आहे तुझ्यासोबत....हीं चूक आपल्याकडून झालेय आपणच निस्तरू ती....होईल सगळं नीट....




साची - पण अप्पू....असं पहिल्यांदाच... 🥺





अपूर्व - मी समजू नाही शकणार की तुला काय काय सहन करावं लागणार आहे.....मी फक्त तुझी साथ देऊ शकतो..... 🥺




साची -ह्म्म्म...




अपूर्व - प्रिकोशन घेऊन सुद्धा अशी चूक होणं Impossible होती.....पण खरतर आपणच व्हावत गेलो......🥺




साची - इट्स ओके...🥺
.
.
.
.
.
.
अपूर्व साचीला घरी सोडतो......साची खूप उदास होऊन घरी जातं असते...अपूर्व तिचा हात पकडतो...... आणि गाणं म्हणतो.....





अपूर्व - हेय पिंकी......




साची - ह्म्म्म?
मागे वळून पाहताना....





अपूर्व - चांदणी जब तक रात, देता हैं हर कोई साथ.....तुम मगर अंधेरो में ना छोडना........???? हम्म??
(तिला पुढे गा म्हणून सांगताना.....)





साची - ना छोडना मेरा हाथ 🥺
(त्याला मिठी मारून...)




अपूर्व - नाही सोडणार ग बाळा....🥺❤️ जा टेन्शन नको घेऊस.....




साची - ह्म्म्म बाय....




अपूर्व - बाय!!




********************




अर्जुन - आजोबा तुमची आणि आज्जीची कशी जोडी जमली...... म्हणजे आपली आज्जी आणि तुमचा स्वभाव किती वेगळा आहे....




भाऊसाहेब - अरे तुला काय सांगू.....तुझी आज्जी जरा लवकर चिडते.....Short टेम्पर्ड म्हणतात ना तेच....पण त्यापेक्षा जास्त प्रेमळ आहे...... मग अशी मुलगी जी आपल्या सुखातचं नाही तर दुःखात पहिली साथ देईल तीच योग्य......




अर्जुन - हम्म खरय...




भागीरथी - तुझ्या आजोबांच आणि माझं अरेंज मॅरिज झालं......खरतर आमचा स्वभाव वेगळा.....ते खूप शांत आणि समंजस आहेत......माझा राग, चिडचिड सगळं शांतपणे झेलतात.....मला संसाराच्या प्रत्येक पावलांवर त्यांनी सहजरीत्या साथ दिले.....मला वाटत नवरा बायको या जोडप्यांचा स्वभाव नेहमी विरुद्ध असावा......Opposite Atttracts असं म्हणतात तेच खरं.....सारख्या स्वभावांची माणसं कधीच एकत्र खुश नाही राहू शकत असं मला वाटत......




भाऊसाहेब - राहणारी राहतात.....पण सारखी स्वभाव असलेल्यापैकी एकाच तरी स्वभाव तो बदलतो हे नक्की का तर समोरील माणसाच्या प्रेमापोटी.....





भागीरथी - हो...




संगीता - उदाहरणं तू आमचं घे.....तुझे बाबा आणि मी आम्ही दोघेही तापट स्वभावाचे.....मी कमीपणा जास्त घेतलाच नाही कधी...... आमची खूप भांडण व्हायची...... मग नंतर त्यांनीच स्वतः चा स्वभाव बदलला माझ्यासाठी..... 🥹यालाच तर प्रेम म्हणतात ना...




अर्जुन - वाव..! किती गोड.....
आज्जी आजोबा लग्न संसार या बद्दल काही अनुभव सांगा तुमचा....




भाऊसाहेब - बघ अर्जुन....आपला जोडीदार एखादी गोष्ट करायला नाही म्हणाला तर नाहीच करायची.......आणि आपण त्याला नाही म्हणालो तर त्यानेही आपलं ऐकावं एवढा तुमचा बॉण्ड हवा.......नाहीतर यामुळेच चिडचिड जास्त होते....आणि समोरचा नाही घेत तरी आपण नमत घ्यायचं...





भागीरथी - बाईच मन समजन खूप अवघड असतं अर्जुन......आणि पुरुषांच मन समजन बाईला अवघड जातं.....बस्स तेच एकमेकांना समजलं तर संसार सुखाचा.....




अर्जुन - हम्म... खरय....




संगीता - अरे अप्पू आला....ये बाळा बस...पाणी देऊ...




अपूर्व - नको आई....




संगीता - काय रे काय झालं? चेहरा उतरलेला वाटतोय.....? 





अपूर्व - अग काही नाही ते....अअअ खरतर सगळ्यांना एक विचारायचं होतं की......आमची एक एज्युकेशनल ट्रिप चालले सात दिवसांसाठी तर मी जाऊ का??




अर्जुन - अरे विचारतोस काय जा जा.... बिन्दास्त....




अपूर्व  ओके...उद्याच जायचं आहे सो मी पॅकिंग करतो.....





संगीता - अरे पण असं अचानक....तू आज का सांगतोयस..... आणि.....




भाऊसाहेब - संगीता....हम्म जाऊदे त्याला.....




अर्जुन - हो आई....




अपूर्व - सॉरी आई.... आलोच मी.....




भागीरथी - अरे....काहीतरी झालंय आज अप्पूला...शांत आहे आज तो.....ट्रिप म्हंटल की किती उत्साह असतो त्याचा....




अर्जुन - ह्म्म्म.... असेल अभ्यासाचं प्रेशर....सांगेल तो मला नंतर स्वतःहून.....





संगीता - हम्म बहुतेक...





भागीरथी - बरं तू अजून काय विचारत होतास अर्जुना...




भाऊसाहेब - अरे पण आज अचानक तू लग्नाच का विचारतोयस...... इच्छा होतेय वाटत लग्न करायची अअअअअ..... लबाडा..... 😂





अर्जुन - आजोबा....




भाऊसाहेब - होती ए पिलिंग्स होती हैं पिलिंग्स अअअअअ 😂




अर्जुन - आजोबा काय पण 😂





संगीता - 😂😂😂😂
.
.
.
.
.
.
.
सतीश - काय.....सात दिवस अग वेडी झालीस का पिंकी..




सावी - बाबा तुमचा आपल्या पिंकीवर विश्वास नाही का?




सतीश - विश्वासाचा प्रश्न नाही पण...असं मुलीने सात दिवस.....काळजी  वाटते ग....





सावी - बाबा अहो पहिल्यांदाच असं जाते ना ती....जाऊदे की..... हेच वय असतं फिरायचं...... आणि तस हीं पूर्ण सेफ्टी असणारच की कॉलेजची..... नेहमी निगेटिव्ह नका विचार करू बाबा....जाऊदे तिला.....




साची - हो आहे सगळी सेफ्टी.... प्लिज बाबा..जाऊद्या मला.....




सतीश - उद्या जायचं आहे आणि तू आज सांगतेस....




साची - सॉरी बाबा...




सतीश - बरं जा... पण काळजी घे....




साची - थँक्यू बाबा.... ताई...




सावी - जा बॅग पॅक कर...आणि लवकर झोप....




साची - हो ताई...आलेच....
(वरती जाताना म्हणाली...)





साची बॅग पॅक करते, तेवढ्यात तिचा फोन वाजतो 📲





साची 📲 हॅलो, बोल अप्पू....




अपूर्व 📲 काय बोलें बाबा आणि ताई??




साची 📲 परवानगी मिळाली आहे..




अपूर्व 📲 ओह ग्रेट, बरं झालं....




साची 📲 हम्म... जेवलास का??




अपूर्व 📲 हो थोडस.... तू?




साची 📲 हो मी सुद्धा... आताच गोळ्या हीं घेतल्या आणि पॅकिंग केली....




अपूर्व 📲 ओके.... माझी हीं झाली पॅकिंग.....




साची 📲 ह्म्म्म 




अपूर्व 📲 साची, ह्या प्रकारामुळे तू माझ्याशी जास्त बोलण टाळलं आहेस ग...बग तुला असं वाटतय का की यात माझी चूक आहे...साची पण माझं तुझ्या शरीरावर नाही तुझ्यावर प्रेम आहे साची.....




साची 📲 मला माहिती आहे अप्पू....मी फक्त डिस्टरब आहे रे.....बाकी काही नाही.....
बरं ठेवते खाली जाते ताई बोलवत आहे....




अपूर्व 📲 ठीकेय.... बाय 




साची 📲 बाय....





संगीता - अप्पूsssss दादा बोलावतोय ये बाहेर....




अपूर्व - हा दादा बोल ना...




अर्जुन - काय रे फार बीजी झालायस...अभ्यासाचं टेन्शन आलंय का?? 




अपूर्व - हो जरासं.....
अअअ बाकी तुम्ही काय गप्पा मारत होतात....




भाऊसाहेब - अरे आम्ही तुमच्या लहानपणी च्या गोष्टी काढत होतो.....




भागीरथी - जेव्हा तू जन्मला होतास ना अप्पू, केवढासा होतास.....अजूनही तो क्षण आठवतो आम्हाला...





संगीता - हो ना..लहान लहान हात - पाय....छोटे छोटे डोळे.....छोटंसं नाक.....गोरपान.....तुला असं हातात घेतलं आणि मला वाटलं बस्स भरून पावले....तुझ्या बाबांना तर खूप आनंद झाला होता......सुट्टीत जेव्हा ते तुला पाहायला आलेले रडत होते......डोळ्यातून पाणी येतं होतं.....




भाऊसाहेब - हो ना...आपलं रक्त आपलं मुल म्हणजे एका आई वडिलांसाठी खूप मोठी गोष्ट असते.....




संगीता - मला ना मुलगी हीं हवी होती..... माझी इच्छा आहे की माझ्या अर्जुन किंवा अप्पू या दोघांपैकी एकाला तरी मुलगी व्हावीच.....




अर्जुन - समजा आम्हा दोघांना हीं झाली तर मुलगी?




संगीता - तरीही चालेल की..... तस हीं आपल्या घरात मुली कमी जन्मल्यात...... उलटा आम्हाला आंनदच आहे....मला तर लहान मुलींचे कपडे, बांगड्या, चप्पल, हेअरबँड खूप आवडतात.....




भागीरथी - हो हो संगीता खूप वेळ आहे त्याला 😂




अर्जुन - हो ना 😂




अपूर्व - हो हो... 🙂😂
.
.
.
.
.
.
.
सतीश - हो हो मग...जेव्हा पिंकी जन्मला आली...मला सगळेच म्हणाले दोन मुली झाल्या......आता काय मुलगा नाही..... घराला वंश नाही.....मी आणि तुमची आई छाती ठोकून म्हणालो.....मुली म्हणजे आमच्या कुळाची पणती आहेत......का हवाय मुलगा.....दोन्ही मुली आमच्या आहेत..... माझं रक्त आहेत....माझ्या पोटचा गोळा..... आणि देवाची देणगी...... मग का मुलगा मुलगी भेदभाव.....मुली सुद्धा जे मुलं करतात ते करू शकतात मग का..... आणि मला तर दोन वेळा कन्यादान करायच पुण्य लाभलाय....जे कुणाला नाही लाभत....काही घरात, पिढीत मुली जन्माला यावीत म्हणून नवस बोलली जातात.....





सावी - हो अगदी खरं बाबा....आजकाल मुलगा मुलगी हा भेद केलाच जातो......मुलगी असली की उशिरा घराबाहेर नाही राहणं किंवा स्वयंपाक यायलाच हवा नाहीतर मुलगी कसली?.......अंगाने बारीक हवी गोरी हवी.....बऱ्याच गोष्टी असतात...... मुलांना असं काहीच नाही....स्त्रीच आयुष्य असं बंधकारक असतं...




साची - हम्म खरं आहे ताई....पण जाऊदे आपण का एवढा विचार करायचा.....





सावी - ह्म्म्म असो.....अग पिंकी मी जेव्हा तुला पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा मला खूप भरून आलेलं.....किती गोंडस होती माझी पिंकी तेव्हा..




सतीश - हो ना....गोरीपान परी होती....





सावी - हो बाबा मला अजूनही पिंकीला पहिल्यांदा हातात घेतलेलं आठवतंय.......लहान मुलं म्हणजे माझं जिवकी प्राण....... किती गोड असतात...... त्यांचे छोटे कपडे, चप्पल, त्यांचे बोबडे बोल......गोबरे गाल......😚🫶❤️




सतीश - ह्म्म्म आता तुमची लग्न झाली की मला नातवंड दाखवा मग मी सुटलो 😂 




सावी - हा राहूदे आता तुम्ही 😂सतत तेच बोला....




साची - ह्म्म्म 😂




सावी - पिंकी जा झोप तू....तुला उद्या ट्रीपला जायचंय ना...




साची - अअअ हो.... गुड नाईट ताई..... गुड नाईट बाबा....




सतीश - गुड नाईट....




सावी - स्लिप टाईट 😂




साची - हम्म 😂
.
.
सचिच्या डोक्यात अनेक विचार यायला लागले....बाबांचा प्रत्येक शब्द तिच्या नजरे समोरून जाऊ लागला....


साची बेडवर झोपली.....त्याच क्षणी अचानक पोटावर हात ठेऊन नकळत तिच्या डोळ्यातून पाणी आलं..
तिकडे अपूर्वची हालत सुद्धा काही वेगळी नव्हती....अपूर्व हीं त्याच विचारात होता.....
.
.
.
.
.
.
.
सकाळी साची लवकरच तयार झाली आणि बॅग घेऊन निघाली....सावी हीं तिच्यासाठी लवकर उठलेली.....साची बॅग घेऊन खाली आली आणि सावी ने तिच्या हातात खाऊचा डब्बा दिला......साची उदास होती, पण सावीला कळू नये म्हणून ती लगबग करतच निघून गेली....





{हॉस्पिटल मध्ये >>> }




अपूर्व - भीती वाटतेय का साची??




साची - हो हे सगळं पहिल्यांदाच घडतंय रे...भीती वाटते खूप....




अपूर्व - नको घाबरूस... काही नाही होणार ह्म्म्म....मी आहे ना तुझ्यासोबत.....ये तू शांत झोप....




साची - ह्म्म्म...




साची च्या ऑपरेशन साठी अजून वेळ असते....साची अपूर्व च्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसते....


समोरच एक छोटंसं बाळ त्याच्या भाहुल्या सोबत खेळत होता.......साची आणि अपूर्व निरखून पाहत होते......तेवढ्यात बाजूला एक जोडपं येऊन बसत.....ती मुलगी खूप रडत असते आक्रोश करते असते.......आणि तिचा नवरा तिला शांत करत होता....


साची त्यांना बघत होती.... तिला कळलंच नाही की नक्की काय झालं आहे......तिने न राहून शेवटी त्याला जोडपंयाला विचारलं.....




साची - सॉरी, तुमच्या खासगी विषयात बोलतेय....पण काय झालं आहे? तुम्ही का एवढं रडताय....शांत व्हा...पाणी प्या जरा.....




अनोळखी स्त्री - कस शांत होऊ हं.....देवाने असं आमच्यासोबतच करायच होत..... 🥺




पुरुष - खरतर आम्हाला बाळ हवं आहे....आणि आम्हाला बाळ नाही होऊ शकत आहे.....किती वर्ष झाले आम्ही प्रयत्न करतोय....... सगळं करून झालं....आज कळलं की विज्ञान हीं या मागे काही नाही करू शकणार....




स्त्री - नवस, उपवास सगळं करते मी....तरीही आम्हाला यश नाही येतं आहे..... 🥺 आम्हाला कशाची कमी नाही....पैसा, घर, बंगला सगळं आहे...... पण काय फायदा याचा? एका जोडप्याच आयुष्य तेव्हाच सुखकर होत जेव्हा कुटुंब पूर्ण होत.... पण आमचा पूर्ण नाही होणार कधीच 🥺😭




पुरुष - ज्यांना बाळ नको असतं त्यांना देव चार पाच मुलं देतो....स्त्री भुर्णहत्या किती होतात.....मुली जन्माला आल्या म्हणून बाहेर फेकल्या जातात.......काय चूक असते त्याला बाळांची? एवढासा जीव त्याला मारून टकतात लोक....ज्यांना नकोय त्यांना मिळते आणि आम्हाला मिळत नाही आहे..... 🥺




स्त्री - बाळ जन्माला घालणे म्हणजे एका स्त्री साठी पुन्हा जन्म घेणं असतं....त्या वेदना सहन करायच्या आणि मग आपलं बाळ आलं की वेदना कुठल्या कुठे निघून जातात.....आपल्या प्रेमाची निशाणी असते आपलं बाळ......देव संधी सारखी नाही देत.....एकदाच देतो... कदाचित आम्हाला देव संधी द्यायलाच विसरला....🥺





पुरुष - शेवटचा एक उपाय होता सरोग्सी तो हीं शक्य नाही झाला......🥺





साची - सर्व ठीक होईल..... कधी कधी आपल्या मनाविरुद्ध हीं गोष्टी घडतात त्याला स्वीकारून आपण पुढे जायचं असते ताई.....तिकडचं अडकून राहिलो तर काय फायदा...... होणार फक्त त्रास.....




अपूर्व - एवढं होऊन सुद्धा तुमच्यातील प्रेम अजूनही जिवन्त आहे...... यापेक्षा काय कमी आहे? भूतकाळात नका जगू आता वर्तमान बघा..... तो खराब नका करू....आम्ही तुमचं दुःख कधीच नाही समजू शकणार..... फक्त आम्ही ते दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतो....




पुरुष - खरय तुमचं....आता हाच उपाय आहे.....
शांत हो अग..मी आहे ना तुझ्यासाठी...नको आपल्याला दुसरं कुणी...हम्म...शांत हो....




स्त्री - पण......




पुरुष - ठीके.... ठीके..... शांत हो हम्म....




नर्स - साची अपूर्व कुलकर्णी......रेडी व्हा सर्जरी साठी..... आणि तिकडे समोरच्या OT मध्ये जा.....




अपूर्व - ह्म्म्म....साची....चल.....





ऑपरेशन ची वेळ जवळ आली हे बघताच सचीला धडधडू लागते.......अपूर्व हीं घाबरलेला होता.....दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात...... साचीच्या डोळ्यांत त्याला आज भीती दिसली..... ती भीती त्याचीच होती......अपूर्व साचीला OT मध्ये पाठवतो......आणि तो बाहेर विचार करतच बसतो....




अपूर्व - देवा! हे काय दाखवतोयस तू काल पासून....हा तुझाच संकेत आहे का मला...
हो मला माहिती आहे...आम्ही हे घरी सांगितलं तर खूप संकट येतील....खूप गोष्टी घडतील...पण हे हीं तितकंच खरं आहे की मला हे बाळ हवंय...ज्यांना मिळत नाही त्यांची हीं अवस्था....भले आमच्या कडून चूक झाले पण या बाळाची काय चूक? 🥺 त्याने येण्याआधीच का मराव?आणि हे बाळ माझ्या साचीच्या प्रेमाचं प्रतीक आहे... मग मी आमच्या प्रेमाला कस मारू?....पण घरी कळलं तर स्वीकार करतील का???.....काय करू, काही कळत नाही आहे....काय करू? काय करू?




अपूर्व स्वतः शी बोलत होता......विचाराणे त्याला गरगरू लागलं.......तेवढ्यात समोर त्याला त्याच्याच दोन प्रतिमा दिसल्या......




पॉजिटीव्ह अपूर्व - काय? काय करतोयस नाही आता तुझं समाधान झालं असेल ना साची चा वापर करून.....काय मिळालं हे करून......काही क्षणाच्या उपभोगासाठी आता भोगाव साचीला लागणार आहे ना??  त्यात तू तुमचं बाळ पाडतोयस...... शिईईई लाज वाटायला हवी....




अपूर्व - मग...मी काय करू? दादाला, आज्जी आजोबा आणि आईला समजलं तर ते स्वीकारणार नाहीत? म्हणून मी.... आणि अजून आमचं वय हीं नाही आहे पण.....




पॉजिटीव्ह अपूर्व - वय नाही? पालक होण्याचं वय नाही? मग शारीरिक सबंध ठेवावेत इतके हीं तुम्ही मोठे नाही आहात ना मग? जबाबदारी झटकतोयस? काय चूक त्याला निष्पाप जीवाची? मुलगा आहे की मुलगी कुणास ठाऊक......पण श्वास घेण्या आधी तू मारतोयस......अरे ज्यांना मुलं नाही त्यांना विचार काय अवस्था आहे त्यांच्या मनाची.....




निगेटिव्ह अपूर्व - हा मग काय झालं? सेक्स आणि नंतर अशी चूक एकदा न एकदा घडतेच आयुष्यात.....त्यात काय एवढं? रिलेशनशिप मध्ये होतात या गोष्टी....... हेच तर वय आहे ना सगळं करायचंय....लग्ना नंतर काय बाळ होईलच.....




पॉजिटीव्ह अपूर्व - हे बग अप्पू याच नको ऐकूस..... माझं ऐक..... हे बाळ तुमचं प्रेम आहे...... एका निष्पाप जीवाला मारण्यापेक्षा मोठं पाप नाही...... तुझं प्रेम खोटं आहे का मग? खोटं!!





निगेटिव्ह अपूर्व - याच नको ऐकूस....लहान वयात जबाबदारी कशाला हव्यात.....बाळ नंतर होईलच की तुमचं वय काय निघून चाललं आहे का? 





पॉजिटीव्ह अपूर्व - आज तुम्ही निसर्ग नियम मोडताय जर निसर्गाने नंतर तुमचा घात केला तर? आणि तुम्हाला बाळच नाही झालं तर????





निगेटिव्ह अपूर्व - अरे मूर्ख आहेस का तू? काहीही बोलू नकोस...... अप्पू तू याच नको ऐकूस.....बाळ होत नंतर..... खूप ट्रीटमेंट आहेत आयुष्यात....... आणि सेक्स तू साचीच्या मर्जीनेच केलेला ना? कधी कधी तर तिचा मूड व्हायचा ना? मग यात तुझाच दोष नाही.....कॉमन आहे....




पॉजिटीव्ह अपूर्व - अप्पू...इमॅजिन कर एक गोंडस बाळ तुझ्याजवळ येतंय......तुझं आणि साचीच बाळ जे तुला बाबा बाबा करतय.....तुझं रक्त, तुझं प्रतीक.....



अपूर्व काही क्षण थांबतो.......त्याला दिसतं की समोर लहानस गोंडस बाळ घेऊन साची उभी आहे...... एक परफेक्ट फॅमिली अप्पूच स्वप्न....बाळाला बघून अपूर्वच्या डोळ्यांत पाणी येतं.....




पॉजिटीव्ह अपूर्व - अप्पू...... अप्पूssss....माझं ऐक...थांबव जाऊन हे सगळं.... नाहीतर साची ला हीं गमावून बशील..... आणि तुझं बाळ हीं.....कुणास ठाऊक येणार बाळ मुलगा असेल तर.....आणि तुझे वडीलच तुझ्या पोटी येणार असतील तर???





अपूर्व -  अअअअ बाबाssssss...... माझं बाळ..... साची...... नाही नाही........ डॉक्टर....... डॉक्टरssss 




अपूर्व जोरात ओरडून उभा राहिला.......आणि सरळ आत OT मध्ये गेला.....साची समोर झोपलेली......अपूर्वने जाऊन सरळ तिला मिठी मारली.....आणि जोरात रडू लागला.....




साची - अप्पू.... अरे काय झालं? काय झालं 




अपूर्व - ड ड अअअ डॉक्टर आम्हाला नाही करायचंय हे ऑपरेशन....... प्लिज...... सॉरी...... पण नाही करायचंय..... साची साची म म मला हे बाळ हवंय... 🥺मला आपलं बाळ हवंय साची...... आपण लग्न करूयात..... घरच्यांना समजावूयात..... मी आहे ना सोबत.....मी मी सगळं करेन......🥺तुला माझ्यावर विश्वास आहे ना...... 🥺





साची - हो अप्पू
आणि मला हीं हे बाळ हवंय.....मी हीं खूप विचार करते होते रे.......🥺आपण जाऊयात सगळ्या गोष्टींना सामोरे 🥺😭





अपूर्व - हो हो....🥺😭




दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात....❤️
.
.
.
.
.
.
क्रमश : 


आता काय होईल पुढे अपूर्व आणि साचीच??? यांच्या नात्यामुळे नवं जुळलेलं सावी अर्जुनच नातं बिघडेल का???
आशा आहे कथा तुम्हाला आवडत असेल.....काही चुकल्यास क्षमा असावी.....कमेंट्स नक्की करा....तुमचा जेवढा स्पोर्ट असेल मलाही लिखाण करायला उभारी येईल...... आणि भाग उशिरा अपलोड केल्यामुळे सॉरी..... भेटूया लवकरच!!!




©Pratiksha Wagoskar