भाग - ११
दुसऱ्या दिवशी पेडणेकर कुटूंब आणि कुलकर्णी कुटूंब एकत्र जमले, सगळे आंनदी होते...अर्जुनाच्या आत्याची वाट पाहत होते...
तेवढ्यात बाहेरून कारचा आवाज आला...तस सगळे अंगणात गेले...कार मधून त्यांची आत्या उतरली.(तुळजा)
कॉटनची सफेद साडी नेसलेली...केसांचा जुडा बांधलेला....चेहरा निखळ, तेजस्वी जणू देवीचे रूप...
अर्जुन - आत्या कशी आहेस...
(मिठी मारताना म्हणाला )
तुळजा - मी एकदम मस्त अर्जुना तू कसा आहेस?
अर्जुन - मी पण मस्त आत्या..
अपूर्व - नमस्कार करतो आत्या,
(पाया पडताना म्हणाला)
तुळजा - अप्पू, पूर्ण खाली वाक आणि परत नमस्कार कर....
अपूर्व - बर 😒 पुन्हा नमस्कार करतो आत्या...
तुळजा - ह्म्म्म सदासूखी रहा :
आई बाबा नमस्कार करते..
भाऊसाहेब - असुदे बाळा, सुखी रहा :
भागीरथी- सुखी रहा बाळा...
संगीता - ताई आत या, ओळख ही करून देते मंडळीशी...
तुळजा - हो हो चल..
सावी - नमस्कार करते आत्या,
तुळजा - सुखी रहा :
साची - नमस्कार करते!
तुळजा - आयुष्मान भाव :
संगीता - ताई हे सतीश पेडणेकर आहेत,
तुळजा - नमस्कार!!
सतीश - नमस्कार!!
संगीता - ही ह्यांची मोठी मुलगी सावी आणि ही लहान मुलगी साची...
भागीरथी- तुळजा साची आणि अपूर्वची पत्रिका बग आणि मुहूर्त काढ.... सोबत सावी अर्जुन ची पण पत्रिका पहा यांचं ही लग्न करायचंय, स्थळ बघायची आहेत आम्हला...जरा सांग बघून..
तुळजा - ठीके, वहिनी पत्रिका दाखव मला चौघांच्या सुद्धा...
संगीता - हो हे घ्या,
अपूर्व - आता बग आत्या असं काहीतरी सांगेल, ज्याने आपल्या सर्वांना धक्का बसेल 😒
(अर्जुनाच्या कानात बोलताना..)
अर्जुन - शुई शांत बस ऐकलं तर ओरडा खाशील..
तुळजा - साची आणि अपूर्वची पत्रिका जुळतेय, लग्नाची तारीख पुढच्या महिन्याची १५ तारीख निघाले... आणि साखरपुडा करायच असेल आधी तर ५ तारीख....म्हणजे ५ मार्च ला साखरपुडा आणि १५ मार्च लग्न...
भाऊसाहेब- वाह वाह! जवळचा मुहूर्त काढलास बर झालं..
संगीता - ताई पण अर्जुनच सावीच काय?
तुळजा - त्यांचं ही लग्न लावा त्याच दिवशी..
सतीश - पण कुणाशी? स्थळ आम्ही अजून पाहिली नाहीत? तुम्ही काही सुचवलीत तर बर होईल...
तुळजा - पाहायची काय गरज? सावी आणि अर्जुनच लग्न लावा....पत्रिका जुळतेय त्यांची...
सावी / अर्जुन - काय????? 😧😧😧😧
संगीता - ताई? काय बोलताय?
भाऊसाहेब- तुळजा काय बोलतेस?
संगीता - ह्यांनी कधीच असा विचार नाही केला स्वतः बद्दल...
सतीश - हो असं कस होईल?
साची - पत्रिका कशी जुळेल...हा योगायोग आहे कि???
भागीरथी- नीट पाहिलीस का पत्रिका
तुळजा - बाबा आई, कुंडली पाहणारे कधीच सर्व सत्य नाही सांगत पण....सांगायचं झालं तर यांच्या पत्रिकेत सरळ स्पष्ट लिहिलंय हे दोघ एकमेकांसाठी बनलेत.....देवाने यांची गाठ बांधले.....तुम्ही दुसऱ्या कुणाशी ही यांचा विवाह लावून देण्याचा प्रयत्न केलात तर तो होणार नाही, काही कारणास्तव तुटेल...
आणि जर झाला तर दुःखच भोगावं लागेल दोघांना ही,ते लग्न ही टिकणार नाही......एक तर यांचं लग्न होईल किंवा होणारच नाही...
सावी - असं होत तर अर्जुन सर मला खूप आधीच का नाही भेटले?
तुळजा - बाळा प्रत्येक गोष्टीची वेळ असते....आणि ह्या आधी तुझं एक लग्न झालंय ना? ते टिकलं का?
सावी - नाही...
तुळजा - तुला किती दुःख भोगावी लागलेत हे दिसतय मला... तुला त्या लग्नात ना शारीरिक सुख मिळालं, ना मानसिक.....म्हणूंन सांगतेय पुन्हा तीच चूक करू नका...नाहीतर यावेळी दोन जीवन बरबाद होतील.....देवाचं निर्णय तुम्ही धुडकावून लावू शकत नाहीत...
अर्जुन - आत्या पण हे सगळं खूप वेगळंच आहे, धक्कादायक आहे...मी आणि सावीच का?
तुळजा - तुम्ही हा प्रश्न माल विचारण्यापेक्षा स्वतः ला का नाही विचारात? तुम्हीच का? हा कधी विचार केलात का? 🙂 उत्तर नक्की मिळतील, उशिरा का असेना मिळतील...🙂
संगीता - ताई पण,
तुळजा - शुई, मी सर्वांना जे आहे ते सांगितलं... आणि हो कुणीही हा विचार आणू नका कि सावीच आधी एक लग्न झालेलं, नग आता हे दुसरं आहे पण अर्जुनच पाहिलं आहे....असं काहीही? ती तिची चूक नव्हती विधिलिखित होत....आणि आजचा युग बदलला आहे....लक्ष्मी आहे सावी आणि साची...यांचे पायगुण उत्तम आहेत...
मी सांगितलं आहे आणि माझा निर्णय कधीही चुकीचा नसतो...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बराच वेळ शांतता पसरली...घरातील सगळे मंडळी शांत बसून विचार करत होते....सावी आणि अर्जुन तर शॉक झालेले...
अर्जुन - हे काय आहे? असं विधिलिखित का? यावर मी आनंदी होऊ कि दुःखी कळत नाही आहे.....म्हणजे सावी सारखी मुलगी माझ्या नशिबी असणं भाग्यच म्हणा....पण त्यांना हे आवडल नसणार? त्या मला नकारच देतील...आजवर आत्याने जे काही सांगितलंय सगळं खरं झालं आहे...पण सावीच काय? जाऊन बोलायला हवंय त्यांच्याशी एकदा..
(मनातच..)
सावी - देवा ह्या कोणत्या सत्व परीक्षेत अडकवलंस मला...🥺ज्या विषय पासून मी पळत आले आजवर पुन्हा तिकडेच येऊन थांबावं लागलं मला...काय करू? माझ्या लग्नावर अवलंबून आहे साचीच लग्न...आणि बाबांना होणारा त्रास त्याच काय?? माझ्या लग्ना मुळे खूप प्रश्न सुटणार असतील तर हरकत काय आहे?
मान्य आहे मला अर्जुन सर नाही आवडत, माणूस म्हणून कसा आहे ह्यांचा अनुभव मला आलाय त्यांनी जे कृत्य केले त्यावरून....पण मलाच नाही कळत आहे आता.......(मनात)
अर्जुन - अअ मला सावीशी बोलायचंय...बोलू शकतो का आम्ही एकट्यात?
(सर्वांची परवानगी विचारत म्हणाला..)
सतीश - हो हो बाळा नक्कीच तुम्ही जाऊन बोलायला हवंय....तरच कोडं सुटेल...
भागीरथी- हो जाऊन बोलून या दोघ आम्ही सुद्धा बोलतो...
भाऊसाहेब- हो, जा सावी...
सावी - हो!
अर्जुन आणि सावी बाहेर बाल्कनी मध्ये जातात.....दोघांनाही कळत नव्हतं कि काय बोलू?
मौन सोडताना अर्जुन बोलला...
अर्जुन - सावी, मी तुम्हाला इकडे जबरदस्ती करायला किंवा मन परिवर्तन करायला नाही आणलय....फक्त तुमच्याशी बोलायला आलोय, मान्य आहे कि हे धक्कादायक आहे...पण सध्या माझ्यासाठी अपूर्व आणि साची महत्वाचे आहेत....राहिला प्रश्न Practical बोलण्याचा तर, मी वाईट मुलगा नाही...मी चांगली साथ देईन...तुम्हाला कसलाही बंधन नसणार, तुम्हाला हवंय तस तुम्ही वागू शकता.... कसलीही जोर जबरदस्ती मी नाही करणार....अपूर्व आणि सचीच सर्व नीट होउदे बस...
आणि मला नाही माहिती कि आपणच का? पण हे तुम्हाला नक्कीच सांगेन कि माझी तुळजा आत्या आजवर जे बोलले ते खरं झालंय, माझ्या वडिलांच्या वेळेस ही आत्या म्हणाली होती कि ते.....🥺🙌
आणि म त तेव्हा पासून मी विश्वास ठेवायला लागलो..
आता अजून काही बोलू नाही शकणार मी...तुमचा निर्णय शेवट असेल...
(रडताना बाहेर निघून गेला...)
सावी बराचवेळ एकटी शांतपणे विचार करत उभी होती....
अर्जुन एका बाजूला जाऊन रडत होता, वडिलांची आठवण आल्यामुळे....
{बाहेर हॉलमध्ये सगळे एकत्र जमले होते....}
भागीरथी - खरं तर सर्वांना साठी जरा धक्कादायक आहे पण, मला तरी तुमच्या दोन्ही मुली आवडतात, आणि मला हरकत नाही..
भाऊसाहेब- हो मलाही हरकत नाही, सतीश अरे गोड मुली आहेत तुझ्या दोघीही....अरे आशा मुली आम्हाला ही नसत्या सापडल्या...
संगीता - बाबा आणि आईना हरकत नाही, तर मला का असेल...मी ही तयार आहे यांच्या लग्नासाठी...
सतीश - पण सावीच हे दुसरं लग्न आहे आणि?
संगीता - सतीश भाऊ आम्ही हा विचार पण मनात नाही आणला हा...आम्हाला सर्व सत्य माहित असताना ही आम्ही का असं मुद्दाम करू? आम्हाला मुलगी चांगली हवी, आमच्या मुलांचा संसार चांगला झालेला हवाय, आणि या सगळ्यात सविची काय चूक?
भाऊसाहेब- नाहीतर काय नशिबात होत ते झालं...आता तरी तुझ्या लेकीने खुश रहावं असं तुला वाटतं तस आम्ही ही तिला खुश ठेऊ....
अपूर्व - लहान तोंडी मोठा घास घेतोय...माफ करा
Practicaly आपण जर बोललो तर सावी ताई वयस्कर नाहीत, तरुण आहेत, दिसायला उत्तम, शिकलेली, स्वभावाने उत्तम, स्वतः च्या पायावर उभी...मग आम्ही नकार तरी का देणार सतीश काका?
भागीरथी- अरे सतीश आम्ही अशी घाणेरड्या विचाराची माणसं नाहीत मुळी...आता मुलांचा निर्णयचं अंतिम असेल.... कळलं का...
सतीश - हो ठीके जस हे निर्णय घेतील तस आपण....
सावी - मी तयार आहे लग्नासाठी
(बाल्कनी मधून आत येताना म्हणाली...)
सावीचा निर्णय ऐकून सगळे आनंदी झाले...
सतीश सुद्धा सुखावले....आपल्या दोन्ही मुली योग्य घराचे जात असल्याने ते आता निश्चिन्त होते....
सर्वानी एकमेकांना पेढा भरवला आणि लग्न ठरवलं..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमश :
सावी आणि अर्जुनचा हा निर्णय ठरेल का त्यांच्या ल्व्ह स्टोरीचा पहिला धडा?
कथा चांगली वाटतं असेल तर कमेंट्स मध्ये कळवा,
.
.
.
.
.
©® Pratiksha Wagoskar