आजीचा मायेचा हात ही कथा लिहिण्या मागचा हेतू म्हणजे मागील 10 वर्षामध्ये आजीचे आमच्या कुटुंबावर असलेले प्रेम या कथेमधून सांगत आहे.
मागील दहा वर्षापूर्वी मी साधारणतः सहावी या वर्गामध्ये शिकत होतो. आमच्या आजीचा माझ्यावरती आणि माझ्या भावा वरती खूप जीव होता. सांगण्यासारखे खूप प्रसंग आहेत पण एक प्रसंग सांगतो आजीबद्दलचा सहावीला असताना मी बाहेरगावी शाळेला जात होतो. त्यावेळेस आजी नेहमीच शाळेत जाताना दहा रुपये पाच रुपये असे शुल्लक प्रमाणात पैसे देत असत. दहा वर्षांपूर्वीचे दहा रुपये म्हणजे आत्ताचे साधारणता दोनशे ते तीनशे रुपये. त्या त्यावेळेस आजी नेहमी आम्हाला संध्याकाळच्या वेळेस काही कथा गोष्टी सांगत असत. एक म्हणजे आजीला दुसऱ्यांनी कोणती केलेली गोष्ट चांगली असेल तरच आवडायची जर तिच्या मनाप्रमाणे झाली नाही गोष्ट एखांदी तर तिला राग यायचा थोडी बडबड करायची आणि तिच्या प्रमाणे ती गोष्ट करत असत. घरातली छोटी मोठी कामे करायची त्यानंतर आमचे सांभाळ पण म्हणा आणि इतरही कामे ही खूप करत असत. नंतर एक पाच ते सहा वर्षानंतर मी अकरावी बारावीच्या शिक्षणासाठी आमच्या तालुक्याच्या ठिकाणी गेलो. त्यानंतर पदवीच्या शिक्षणासाठी एक गावापासून दीडशे किलोमीटरच्या अंतरावर फार्मसी कॉलेज साठी ऍडमिशन घेतले. आजी नेहमी दुसऱ्यांना आणि नातेवाईकांना सांगत आमचे नातू हे शिक्षण घेतात असं करतात तिला खूप आदर्श वाटायचा की आम्ही कुठेतरी बाहेर जाऊन शिक्षण घेत आहे हा खूप तिला आदर्श होता. मी जेव्हा फार्मसी शिक्षणासाठी बाहेर गेलो साधारणता 2021 मध्ये ही फार्मसी या फिल्ममध्ये ऍडमिशन घेतले. त्यावेळेस जेव्हा मी घरून कॉलेज कडे पहिल्यांदा चाललो होतो त्यावेळेस आजीच्या डोळ्यांमध्ये पाणी आले आणि ते पाहून मलाही त्या भावना रोखू शकलो नाही मलाही रडू आले. त्यावेळेस आजीची आणि घरच्यांची किंमत कळली की बाहेर गेल्यानंतर फक्त आणि फक्त घरचे आणि घरचे चांगले असतात. आजी नेहमी मी घरून माघारी जाते वेळेस एक महिन्याच्या खर्चासाठी पैसे देत असत. आजी फक्त पैसे देत नसेल तर बाकीचे पण जो आपल्याला खाण्यासाठी पदार्थ असतात चिवडा म्हणा बाकी दुसरे पदार्थ ते पण देत असत. आजीचा दररोजचा कॉल म्हणजे एक माझ्यासाठी तरी चांगलाच होता. आजीचे वय वाढत वाढत चालले होते 75 च्या आसपास आजचे वय होते. आजीच्या आरोग्यामध्ये थोडा थोडा बदल होत होता आजीला पहिल्यापासून बीपी हाडांचा त्रास पाठीचा कणाही सरळ नव्हता .
आजी चे एक वाक्य मला अजूनही आठवते आजी म्हणायची लवकर नोकरीला लागा आणि आम्हाला सांभाळा. खरंतर माणसाने एक विचार केला पाहिजे ज्यांनी आपल्याला जीव लावलाय त्यांना आपणही तेवढाच जीव लाऊन सांभाळणे पाहिजे. आमच्या फॅमिली ग्राउंड पूर्णपणे शेतकरी कुटुंबातील होते आणि अजूनही आहे. आजीला नेहमी दुसऱ्यांची काळजी असंच नेहमी नातवांचा विचार करत तर मुलांचा कधीही मुलींचा असे नेहमी चिंतेत पडलेले असायची.
माझी पण पदवी संपत आली होती साधारण दोन महिने राहिले असतील त्यानंतर मी पण कुठे तरी नोकरीला किंवा व्यवसाय चालू करणार होतो. नेहमीप्रमाणे मी पण शनिवारी रविवार तरी सुट्टी साठी गेलो होतो . त्या दिवशी आजीने मला फोन करून कधी येणार आहे लवकर ये कपडे धुवायला आण लवकर ये सांगितले. संध्याकाळची वेळ होती आठ साडेआठच्या सुमारास मी घरी पोहोचलो आजीने माझ्यासाठी जेवण बनवलं होतं बाहेर गेलो होतो आजी मला हाक मारून मनाली लवकर ये जेवायला. पण त्या दिवशी मला उशीर झाला बाकीच्या घरच्या माणसांनी मला सांगितले लवकर ये आजीला चक्कर आली. त्यानंतर मी घरी पोहोचलो तर पाहिलं आजीला खूप घाम आला होता माझ्या लगेच लक्षात आले की आजीने कदाचित बीपीची गोळी खाल्ली नसावी. त्यानंतर आजीला मी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टर आले सर्व तपासण्या केल्या त्यानंतर मेंदूचा सिटीस्कॅन केला आणि त्यामध्ये खूप मोठी आजीच्या छोट्या मेंदू मधील शिर फुटली होती आणि खूप रक्तस्त्राव झाला होता.
हॉस्पिटलमध्ये आजीला पंधरा-वीस मिनिटे ठेवले आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जिल्ह्याचे ठिकाण दाखल करायचे होते. आजी माझ्यासोबत फक्त आणि फक्त फोनवर बोलली त्यानंतर बोललीच नाही. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितले की रक्तस्राव झाल्यामुळे त्याची गाठ बनवून त्याचे ऑपरेशन करावे लागणार आहे तुम्हाला ऑपरेशन करायचं असेल तर निर्णय घेऊ आम्हाला सांगा. आम्ही ऑपरेशनचा निर्णय घेतला ऑपरेशन पण केलं. त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर तिला परत छातीमध्ये कफ तयार होऊ लागला तो काढण्यासाठी परत तोंडातून नळी घालून काढत होते डॉक्टर. साधारणता पंधरा दिवस आजी एकाच जागेवरती आय सी यु बेडमध्ये होती. त्यानंतर श्वास घ्यायला त्रास होत होता.आजीला नंतर डॉक्टरांनी गळ्याजवळ छोटी सर्जरी करून श्वास घेण्यासाठी एक नळी बसवली. अजूनही आजी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे साधारण 17 18 दिवस झाले.
मी ईश्वराकडे एवढेच प्रार्थना मागतो की आजी लवकर बरी हो पहिल्यासारखे दिवस आम्हाला बघायला भेटले तर खूपच चांगले होईल कारण तिची माया म्हणजे देवापेक्षा पण जास्त आशीर्वाद देणारी माय होती आणि अशी राहू असे मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. !!