बदनामी ही सर्वांचीच होत असते ती कोणत्या ना कोणत्या कारणामळे तरी होत असते.
अशाच आपण एका मुलावर ती रचलेला बदनामीचा कट त्याच्यावरती एक कथा आहे बदनामी ही सादर होत आहे.
साधारण 2022 ते 2025 या तीन वर्षांमध्ये त्या मुलावर काय काय घडले कोणी कोणी बदनामी केली हे आपण या कथेमध्ये सांगणार आहोत.
2021 या वर्षामध्ये एका मुलाने औषध निर्माण या विभागामध्ये पदवी या शिक्षणासाठी ऍडमिशन घेतले होते. कॉलेज चालू झाल्यानंतर त्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड होती आणि शिक्षणाची आवड म्हटली की स्पर्धक राहतात. अशातच त्याची चांगली प्रगती चालू होती आणि कोणीतरी त्याच्याविषयी एका मुलीचे नाव पुढे करून त्याचे नाव बदनाम करण्याचे काम केले. मित्रांनो बदनामी हा असा शब्द आहे की माणसाचे कर्तुत्व, नेतृत्व आणि प्रामाणिकपणा सर्व नष्ट करण्याचे काम होते.
मुलगा म्हणजे सर्व काही झेपण्याची ताकद त्याच्यामध्ये असते आणि असाच तो होता . त्याच्यावरती खूप संकट आली पण त्यांनी नेहमी मित्रांच्या सहाय्याने त्या संकटांवर मात केली व पुढे जात राहिला. मुळात त्याची बदनामी मुलीच्या कारणामुळे झाली होती . तो मुलगा अभ्यासात पण हुशार होता आणि त्याचा प्रामाणिकपणा हा नेहमी जरा साथ देत होता. सर्व क्षेत्रात कोणती ना कोणती माणसे कोणाला तर अडवण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणजेच त्याची बदनामी करणे ,त्याची अफवा करणे आणि त्याच्याबद्दल एखाद्याच्या मनात वाईट कसे आणता येईल हे सर्व आणण्याचे काम हे त्या मुलाबद्दल होत होते. तो मुलगा नेहमी कोणत्याच गोष्टीला जास्त मनावर घेत नसत आणि कोणतीही मनाविरुद्ध चालणारी गोष्ट तो सोडून देत असत. याच कारणामुळे तो नेहमी पुढे राहायचा आणि मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी जास्त मनात ठेवत नसायचा.
दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणाचीच बदनामी केली नाही पाहिजे कारण कर्म फिरून आले तर आपली ही वाट लागते हे कोणाला सांगण्याची गरज नाही . आपण जर आज दुसऱ्याचे बदनामी केली तर उद्या आपली बदनामी अफवा आणि अनेक काही गोष्टी आपल्या बद्दल होणार असतात याचा नेहमी विचार करून दुसऱ्यांबद्दल आपण चांगले विचार ठेवले पाहिजे. मित्रांनो एखाद्या कोणत्याही कारणामुळे बदनामी झाली तरी सहन करता येते पण मुलीच्या प्रकरणांमध्ये बदनामी झाल्यानंतर तो मुलगा कदाचित सहन करू शकत नाही असेच त्या मुलासोबत घडले होते.
मित्रांनो त्या मुलाची बदनामी ही मुलीच्या कारणामुळे झाली. अफवा पसरवली वाईट वाईट बोलण्यात आली आणि खूप काही झाले. पण त्या मुलांमध्ये संयम जिद्द होती त्याने शांत बसून लोकांचे टोमणे ऐकून घेतले मित्रांचे टोमणे ऐकून घेतले आणि हे सर्व काही पाहता बदनामी चा विषय हळूहळू समाप्त झाला. सांगण्याचा उद्देश म्हणजे एखाद्याला यश मिळत असेल तर त्याला नेहमी बदनामी सहन करावी लागते. भगवत गीता मध्ये असे लिहिले आहे की आपण कर्म आपण करत राहिले पाहिजे आपल्यावर कितीही कट रचला गेला तरी नेहमी आपण सातत्य आणि प्रामाणिक राहावे. त्या मुलाची एक दीड वर्षानंतर परत बाहेरून बदनामी होऊ लागली म्हणजे जे कॉलेजमध्ये बदनाम होत होती की वाढत जाऊन बाहेरून त्याच्यावरती खूप काही वाईट वाईट त्याबद्दल येऊ लागले. पण मित्रांनो म्हणतात ना सत्य हे सत्यच असते त्यामुळे कोणी कितीही अफवा आणि कोणी कितीही बदनामी केली तरी सत्याची जीतच होते.
सांगण्यात तात्पर्य एवढेच आहे की आपण दैनंदिन जीवनामध्ये कोणाचीही बदनामी करू नये आणि केली तर स्वतःची बदनामी झाल्यानंतर ती ऐकायला किंवा भोगायला आपण नेहमी तयार पाहिजे कारण आपण जर दुसऱ्याचे वाईट केले तर आपलेही वाईट होणार आहे हे आज नाही तर खूप वर्षापासून आपण ऐकत आलो आहोत. आपल्याला दुसऱ्याचे भले करता नाही आले तरी चालेल पण आपण दुसऱ्याची बदनामी करणे हे सर्वात मोठी चूक आहे.
चांगल्या मार्गाला जाणाऱ्यांना नेहमी सतरा जण विरोधक असतात त्यामुळे आपण नेहमी विरोधकांचा विचार न करता आपले कार्य करत राहिले पाहिजे असे या कथेमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.