Kripi Filej - Khari Drashy Bhitichi - Season - 1 - Part 37 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 37

The Author
Featured Books
Categories
Share

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 37

विश्वनाथ कांताराम शिर्के वय वर्ष 45 ते मुळचे अंबरनाथचे रहीवासी असून पेशाने एक सरकारी नोकरीत कामाला होते - त्यांच्या परिवारात पत्नी मनिषा विश्वनाथ शिर्के
 वय वर्ष 41 त्या एक गृहिणी होत्या ..


        मनिषाबाईंना विश्वनाथरावांकडून एकूलती एक अपत्य होती , चित्राली विश्वनाथ शिर्के वय वर्ष 23 - तीच अद्याप लग्न झालं नव्हत , सद्या तरी ती घरीच असायची .. 
चित्रालीच शिक्षण तसं भरपूर झालं होत - शिकली सवरलेली चित्रा तीचे विचार मॉडर्न युगातले होते - आताच्या युगातल्या जुन्या रुढी परंपरा म्हंणजे तिला अगदी बोरिंग वाटायच्या - 

       आति शिक्षणाने तीचे विचार प्रगत झाले होते , जी गोष्ट आस्तित्वात नाही तिला मानायचं तरी कस ?  
      तिला दैवी शक्तिंवर काडीमात्रही विश्वास नव्हता ,भुत खेतांची पुस्तक - पिक्चर मालिका मात्र ती मोठ्या हौसेने वाचायची, पाहायची - 
हा दगडात बसलेला देव आणि त्याची पुजा करणारे ते अंध भक्त - तिला ते पाहून किळस यायची... म्हंणूनच ती कधी मंदिरात ही गेली नव्हती- साध घरातल्या देवांनाही तिने हात जोडले नव्हते.. 

मनिषाबाईंना मात्र चित्राच्या ह्या वागण्याचा जरा राग येत असे - त्या म्हंणायच्या तुझ देवांवर विश्वास नाही ना मग नको ठेवू विश्वास पण त्या देवाविषयी मनात जलकुटाची, कुत्सिक भावना मात्र ठेवू नकोस - नाहीतरी एन मदतीच्या वेळेला तो तुझी मदत करायलाही येणार नाही.. मनिषाबाईंच्या वाक्यावर चित्रा मस्करीच्या स्वरात हसायची, व म्हंणायची.. 

    " तो दगड मांणसाच्या आधाराशिआय हळणार आहे का आई ! " मनिषाबाई चित्राच्या वाक्यावर फक्त कपाळावर हात मारुन घ्यायच्या- कारण त्यांना ठावूक होत की ही पोरगी बोलायला ऐकायची नाही. 
     
  बर असो आता पुढे !             
       
एकेदिवशी रात्री जेवण वैगेरे झाल्यानंतर चित्रा आपल्या बेडरुम मध्ये फोनवर टाईमपास करत बसली होती... 

        तेव्हा तिला तिच्या प्रिया विठ्ठल मार्के वय वर्ष 22 नामक मैत्रिणीच कॉल आला , 
  कॉल उचलून चित्राने फोन कानाला लावल.. 
समोरुन तिची मैत्रिण प्रिया बोलत होती. दहा -पंधरा मिनिटे दोघिंच्या अश्याच काहीश्या गप्पा चालल्या मग विषय मूद्द्यावर आला..

  " चित्रा अंग पुढच्या आठवड्यात सोमवारी माझ्या एका मैत्रीणीच बर्थडे आहे , तर तीने पार्टी ठेवलीये - आणि पार्टी नेरळ शहरातल्या एका गावी फार्महाऊसवर आहे , एक दिवसांच स्टे आहे -आणि हो फक्त आपन मुली- असणार आहोत न तर तू येशील का ? " प्रियाच्या वाक्यावर चित्राचा अर्थातच नकार येणार नव्हता ! 

        तसंही फक्त प्रियाच्या म्हंणन्यानुसार तिथे मुलीच अशणार होत्या - परंतू प्रॉब्लेम अस होत , की तीचे आई- वडील परवानगी देणार होते का ? या पाहूयात ! 

        दुस-या दिवशी सकाळी चित्राने आपल्या वडीलांना म्हंणजे विश्वनाथरावांना फिरायला जायच सांगितलं , व गोड धोड बोलूण त्यांना मनवलही- परंतू मनिषाबाईंचा मात्र सपशेल नकार आला होता..  

        शेवटी बायको हीच घरातली डॉन असते , घरातला कर्ता पुरुष फ्क्त नावालाच असतो- जे काही निर्णय असतील ते बायकाच घेत असतात - मनिषाबाईंचा नकार आला म्हंणजे विश्वनाथरावांच काहीही चाललं नाही..

       त्यावर शेवटी चित्राने थोडंस रुसण्या फुगण्याच नाटक केलं - त्यादिवशी पुर्णत दिवसभर ती जेवलीच नाही.

         शेवटी एकुलती एक पोर होती, मनिषाबाईंच मायेच्या भावनेन काळीज विरघळल - त्यांनी चित्राला होकार दिला व जा म्हंटल..  

        एका आठवड्यानंतर जायचा दिवस उजाडला !  

        चित्रा व तीच्या मैत्रिणी सकाळच्या ट्रेनने नेरळला पोहचल्या - स्टेशन बाहेर येताच आधीच बुक केलेली टेक्सी ह्या सर्व पाच - सहा मुलींना नेहायला आली .  

        टेक्सीमध्ये बसून सर्व मुली नेरळ शहरापासून पंधरा किलोमीटर अंतर असलेल्या भडवळ ह्या गावी आल्या , भडवळ गावातून वीस मिनिटांच्या अंतरावर - डोंगरावर एक धनगर वाडी होती -   
  त्याच वाडीच्याखाली पाटील फार्म हाऊस होत -  

       पाटील फार्म हाऊसला निसर्गाचा चांगलाच वारसा लागला होता - फार्महाऊसच्या चारही बाजुंनी हिरव्या रंगाची पाने असलेली उंचपुरी झाडे होती.. 
  आणि त्या झाडांच्या गर्भात पाटील फार्म हाऊस दडल होत.. 

        टेक्सी एकदाची फार्महाऊसवर पोहचली- 
सर्व मुली , आप-आपल सामान बाहेर काढत टेक्सीतून खाली उतरल्या- टेक्सीवाला पैसे घेऊन आला तसा निघुन गेला.
      
सर्व मुली फार्म हाऊसवर आल्या- तसे सर्व मुलींना फार्महाऊसच्या दरवाज्यात दोन सत्तरी पार केलेले एक जोडप उभ दिसल..
      
मुलींना पाहताच त्या वृद्ध जोडप्याने ह्या सर्व मुलींना आपली ओळख करुन दिली..! 

        त्या वृद्ध मांणसाच नाव होत - 
रामजी उर्फ रामा धाकू शिंगवा वय वर्ष 75 - आणी त्यांच्या बायकोच नाव होत केश्या रामजी शिंगवा वय वर्ष 70 .. 

        हे दोघेही जोडपे फार्महाऊसवर जेवन -खावन सर्व व्यव्स्थापाहण्याच काम करत असत -  

       
      रामजीकाकांनी ह्या सर्व मुला - मुलींना आपली ओळख करुन दिली- मग ह्या सर्व मुलींना त्यांच्या रहावयाच्या रुम दाखवल्या... 

सर्व मुली आप - आपल्या मैत्रिणींसमवेत रुममध्ये निघुन गेल्या- फ्रेश वैगेरे झाल्यानंतर 
जरा वेळ आराम वैगेरे करुन मग चार वाजता 
सर्व मुली फार्महाऊस बाहेर जमल्या..-  

        चित्रा, प्रिया, आणि बर्थडे असलेली प्रियाची मैत्रीण जिच नाव होत - मृणाल काशिनाथ अहूजा वय वर्ष 24 तिने रामकाकांना म्हंटलं .. 

        " काका आम्ही सर्व शहरात राहतो , आम्हाला अशी रानातली हिरवीगार झाडे वगेरे कधी पहायला मिळत नाहीत, तर प्लीज तुम्ही आम्हाला जरा फिरायला घेऊन जाल का ?आम्ही फक्त आजचीच रात्र ईथे राहणार आहोत मग उद्या सकाळी पुन्हा घरी जाणार आहोत." 
  मृणालच्या वाक्यावर रामकाकांनी हसतच होकारार्थी मान हळवली.. व ठिक आहे अस म्हंटलं . 

        त्यांनी जाता जाता त्यांच्या पत्नीला पोरींना जरा फिरवून आणतो अस म्हंटलं .. 


        त्यांच्या त्या वाक्यावर केश्याकाकींच्या चेह-यावर जराशी भीतीची एक छटा झळकली- डोळे जरासे विस्फारले व केश्याकाकींनी हळूच तोंडाला पदर लावत रामकाकांच्या कानात काहीतरी खुसूर पुसूर करत पुटपुटल.. 

        त्यातले काही वाक्य ह्या सर्व मुलींच्या कानांवर पडले होते..- ते म्हंणजेच चेरेखांडी, पोरींना कशाला हात लावून देऊ नका -सांज व्हायच्या आत परत या. 

        रामकाकांबरोबर सर्व मुली फिरण्यासाठी बाहेर पडल्या - सर्व मुली शहरात वाढल्या होत्या , ह्या सर्वाँनी कधी गावाकडच नैसर्गिक सुख कधी पाहिलंच नव्हत -

        हिरव्या झाडांनी नटलेले मोठ मोठे डोंगर ,  
  पक्ष्यांचा तो मंत्र मुग्धींत करणारा आवाज - वातावरणात वाहणारी थंडगार हवा , अंगावर कसा रोमांच आणत होती - एकंदरीत सर्वदृष्य कस अगदी मनप्रसन्न करणार होत.   

     मज्जा मस्करी करत सर्व मुली फिरत होत्या- अश्यातच फिरता फिरता पावणे पाचच्या सुमारास रामकाका सर्व मुलींना एका चेरेखांडी नामक वहळावर घेऊन आले ... 

   वहळाच्या दोन्ही बाजुंना झाडी होती - झाडीच्या मधोमधून हा वहळ वाहत जात होता.. 

            " वाव काय मस्त पॉईंट आहे यार !" 
चित्रा म्हंटली. 

         प्रिया- मृणाल दोघिंनिही तिच्या त्या वाक्यावर फक्त हो ना अस म्हंणत हसतच दुजोरा दिला.. 

          " काका वहळ जास्त खोल नाही ना ? आम्ही पाण्यात जाऊ शकतो का ?" मृणाल म्हंटली.. 

        त्यावर रामकाकांच्या चेह-याचा दोन सेकंद रंग उडाला , त्यांच्या दोन्ही डोळ्यांत भयाची धार चढली , एक आवंढा गिळून ते काहीवेळाने म्हंटले..

        " पाण्यात जायचं!" रामकाकांचा आवाज जरा बसल्यासारखा - भ्यायल्यासारखा बाहेर पड़ला होता. त्यात भयक्ंपने होती.. 

        " हो जाऊद्या ना काका , तसंही आम्ही उद्या परत जाणार आहोत !" मृणाल म्हंटली. 

        सर्व मुलिंच्या चेह-यावरचा आनंद पाहून 
व ती प्रेमळ स्वरातली विनवणी ऐकूण, 
 रामकाकांना होकार देण भाग पडलं ... व ते ईतकेच म्हंटले . 

        " ठिक आहे पोरींनो, पण जास्त येळ नका लावू!" रामकाकांकडून होकार मिळताच     
  सर्व मुली ड्रेसवरच वहळातल्या पाण्यात शिरल्या.. 

         एकमेकिंच्या अंगावर पाणी उडवत        
  ,तर कधी एकमेकिंना धक्का देत- हसी मजाक करत सर्व मुली एंजॉय करत होत्या..  

    मुलींना अस खेळतांना पाहूण रामकाकाही हसत पाहत बसले.. मुलींना आनंदात पाहून त्यांनाही आनंद होत होता.... 

        पाहता सहा कधी सहा वाजून गेले हे रामकाकांनाही कळल नाही-

       हळू हळू सुर्यअस्ताला निघुन गेला -
   चेरेखांडीत झुकलेल्या झाडांमुळे आधीच सुर्यप्रकाश तिथे कमी पडायचा ज्याने आता चेरेखांडीत झाकोळून आल... 

     झाडांच्या हिरव्यागार सावल्या - काल्या भासायला सुरुवात झाली- वहळातल पाणी गडद काळसर झालं , ईतकं की ह्या मुलींच्या सावल्याही पाण्यावर दिसत नव्हत्या... 

        हलु हलू पडणा-या अंधाराने चेरेखांडीच एक वेगळंच रुप समोर यायला सुरुवात झाली होती... 

  काहीवेळा अगोदर ऐकू येणा-या पक्ष्यांचा किलबिल आवाज आता नाहीसा झाला होता , 
वातावरणात जाणवणारी प्रसन्नता, आता एक दुखी, अस्वस्थ करणारी मळभ घेऊन आली होती..  

         खुप वेळ झालं हे पाहता रामकाकांनी मुलींना फार्म हाऊसवर परत जाऊया अस म्हंटलं .. 

        सर्व मुली पाण्यातून तश्याच भिजलेल्या अवस्थेतच बाहेर आल्या - सांजवेळेची थंड हवा अंगाला झोंबत होती... शरीर थंड हवेने शहारुन उठत होत - 
  

         अर्ध्यातासात सर्व मुली - रामूकाका फार्महाऊसवर परतले..-भिजलेले कपडे घालुन सर्व मुली फार्महाऊस मध्ये एका रुममध्ये जमल्या होत्या.. सर्वाँच्या गप्पागोष्टी सुरु होत्या.   

        तोच चित्रा म्हंटली. 

        " हेय , तुम्ही सर्वाँनी ऐकलं का ? जेव्हा आपण सर्व बाहेर फिरायला निघालो होतो- तेव्हा त्या काकी काकांना काहीतरी सांगत होत्या , चेरेखांडी , कशाला हात लावून देऊ नका, जास्त वेळ थांबू नका!" 
चित्रा म्हंणाली ..
    
       तोच रामकाका तिथे आले ..- त्यांनी
  चित्राच बोलण ऐकल होत. त्यावर ते म्हंटले.. 

        " पोरींनो तुम्ही ठरली शहरातली मांणस , आणि आम्ही राहिलो गावातली अनपढ-अंगुठी बहादूर मांणस, तुम्ही आमच्या बोलण्यावर काय इश्वास ठेवणार . !" रामकाकांच हे कोड्यात बोलण सर्व मुलींची उत्सुकता ताणून गेल.. 

        चित्राला तर आता कळून चुकलंच होत , की हा विषय नक्कीच भुताखेतांवर आहे - तसंही तिलाभुताखेतांच्या गोष्टी ऐकायला फार आवडायच्या..  

        तीने रामकाकांना भुताखेतांबद्दल गोष्ट 
सांगा म्हंणून आग्रह केला - तिला दुजोरा म्हंणुन बाकीच्या मुलींनीही हो हो करत आग्रह केला. 
       
     तसे रामकाका तैयार झाले व सांगू लागले..

      " हे बगा पोरींनो , ही गोष्ट ख्वोटी नाय -खरी हाई - आता आपण ज्या चेरेखांडीवरुण आलो ना , तिथे रात्री काळोख पडताच भुता हिंडत्यात - माझ्या बा ने मी बारीक व्ह्तू तव्हा सांगितलेंल की चेरेखांडीतल कोणी झाडाच लाकूड त्वडल की त्याच्या रात्री ईचू ( विंचू) चावतो , आणि अजुन एक तुम्ही ज्या वहळात अंघोळ धूतली ना ? तिथ म्हंणे वंचाट राहतो , दिवसा ज्या कोणी वहळात अंघोळ धूतली - की म्हंणतात हा वंचाट भुत रात्री त्याला बोलवायला येतो..- त्याला अर्ध झोपेतून ऊठवतो आण आपल्यासोबत वहळावर घेऊन जातो ..- आणि " एवढ बोलून रामकाका जरा थांबले - त्यांच्या चेह-यावर गुढ भयबीत करणारे भाव पसरले... 

        खोलीत एक विलक्षण शांतता पसरली होती - सर्व मुली तोंडाचा आ - वासून , विस्फारलेल्या डोळ्यांनी रामकाका पुढे काय सांगणार हे जाणुन घेण्यासाठी उत्सुक होत्या.
तोच रामकाका पुढे म्हंटले.

        " वंचाट त्या मांणसाला अर्धझोपेत सोबत घेऊन जातो , आणि वहळाच्या पाण्यात त्या मांणसाला खोलात घेऊन जात त्याला बुडवून मारुण टाकतो.!" रामकाका म्हंटले.. 

       खोलीत दहा सेकंद अगदी गुढ शांतता पसरली होती- सर्व मुली आप-आपल्या मैत्रिणींकडे टक लावून पाहत होत्या.. 

        तोच एकदमच चित्रा, प्रिया- मृणाल त्यांच्या बाकीच्या मैत्रिणीही हसू लागल्या.... 


        रामकाकांच बोलण त्या सर्वाँना फक्त एक मजेशीर कल्पना वाटली होती, जिला काहीच अर्थ नव्हता.. 

            रामकाकांना मुलींच्या हसण्याच मुळीचंच वाईट वाटल नाही , त्यांना माहितीच होत - आपल बोलण ह्या सर्वाँना मुळीचंच पटणार नाही.. 

        तस्ंही आपण ठरलो गावची लोक आणि ही सर्व शहरातली शिकली सवरलेली मांणस..

        नऊ साडे नऊ वाजेपर्यंत जेवण आटोपली गेली-  

        भांडी वगेरे घासून केश्याकाकी- व रामकाका दोघेही त्यांच्या वाडीवरच्या घरी निघुन गेले .. 

        परंतू जातांना त्यांनी सर्व मुलींना सांगितलं होत की रात्री फार्महाऊस सोडून कोठेही बाहेर जाऊ नका , रात्री आजुबाजूला भुतांचा फेरा फिरतो ..रामकाका एवढ सांगून निघुन गेले होते..

    रात्रीचे दहा वाजले होते. 

            
          सर्व मुली फार्म हाऊसमधल्या एका खोलीत बसल्या होत्या- 

        समोर एक गोल लाकडी टेबल ठेवलेला होता- त्यावर तीन वॉडका दारुच्या बाटल्या ठेवल्या होत्या - चखणा म्हंणुन खारट शेंगदाणे- चिप्स, अस काही बाही थाळीमध्ये ठेवल होत..
आजकाल दारु पिण म्हंणजे कॉमन झालं आहे.
आज दारु फक्त फेशन म्हणुन प्यायली जाते.. त्यातच ह्या मुलींनाही दारुची सवय होतीच..

              प्रत्येक मुलीने एक एक दारुचा ग्लास उचल्ला.. - चियर्स म्हंणत काचेचे ग्लास तोंडाला लावले ..  

        सर्व मुली दारुच्या नशेत धुंद झाल्या होत्या - पाहता पाहता रात्रीचे बारा वाजून गेले होते , फार्महाऊस बाहेर सफेद रंगाच धुक साचलं होत - 

        फार्महाऊसच्या आजुबाजूला असलेली झाडे जणु मृत मेलेल्या प्रेतांचा फौजफाटा भासत होता - 

          "हेय गाईज चला गाण्यांच्या भेंड्या खेळू !" मृणाल दारुच्या नशेत म्हंटली. 
   बोलतावेळेस तीचे शब्द बोबडे निघत होते   
        
सर्व मुली दारुच्या नशेत धुंद झाल्या होत्या , नशा डोक्यात शिरली होती..- मुलींच्या गाण्यांच्या भेंड्या सुरु झाल्या..         

     पंधरा वीस मिनिटे होऊन गेली असतील- तोच चित्राच्या कानांवर तीच्या नावाने कोणितरी हाक मारावी असा आवाज पडला - 


        " चित्राहाsssss!" आवाज खोलीच्या बंद दरवाज्याआडून आला होता.   

        चित्राच्या कानांवर तो आवाज पडताच तीने वळुन बंद दरवाज्याकडे पाहिलं - दरवाज्या बाहेर भिंतीवर एक पिवळा दिवा जळत
 होता , त्याचा पिवळसर प्रकाश दरवाज्याच्या खालच्या फटीतून खाली पडलेला दिसत होता - आणि त्याच प्रकाशात एक काळीशार सावली उभी असून डावीडून उजवीकडे फे -या मारतांना दिसत होती.. 

        " कोण हाये..!" चित्रा मोठ्याने ओरडून म्हंटली. 

        तिचा आवाज ऐकून सर्व मुलींच्या नजरा तिच्याकडे वळाल्या..

           " काय ग ? काय झालं ?" प्रियाने विचारलं ..  

           प्रियाच्या वाक्यावर चित्राने मला कोणितरी माझ्या नावाने हाक मारली अस सांगितलं .. 

        परंतू बाकीच्या मुलींनी त्या सर्वांना कोणताही आवाज ऐकू आला नव्हता... 

        चित्रा तुला भास झालं असेल अस सांगून
मुली पुन्हा दारु पिण्यात व्यस्त झाल्या.. 

        काहीवेळाने पुन्हा एकदा चित्राच्या कानांवर तोच तो घोगरा -खर्जातला आवाज पडला.

            " चित्राहाssss !" दारुच्या नशेने लाल झालेल्या तांबरटसर डोळ्यांनी चित्राने पुन्हा दरवाज्याकडे पाहिल्ं.. 

        ह्यावेळेस चित्राने ओ दिली नाही, ती हळुच जागेवरुन उठली- 

         " चित्रे कुठं चाललीस ?" प्रियाने विचारलं . 
परंतू चित्राने कोणतही प्रतिउत्तर दिल नाही - चित्रा चालत दरवाज्याजवळ आली-     

      कडीवर हात ठेवून तीने दरवाजा उघड़ला , 
 तिला वाटलं होत - दरवाज्याबाहेर कोणितरी असेल? पण कसलं काय ?दरवाज्या बाहेर कोणिही नव्हत -   

        दरवाज्यापासून डाव्या बाजुला हॉल होता , आणि हॉलमधून फार्म हाऊसचा मुख्य दरवाजा दिसत होता - जो की बंद होता.. 

        तोच तो दरवाजा करकर आवाज करत आपो-आप उघड़ला - त्या उघड्या दरवाज्याची दोन्ही झाप आतल्या बाजुने उघड़ली , व उघड्या दरवाज्यातून हळूच पांढरट धुक आत शिरल..  

          " चित्राsssss बाहेर ह्ये...!" 
   चित्राच्या कानांवर तो मधाळ आवाज पडला , त्या आवाजात एक प्रेमळ विनवणी होती, त्यासहितच तो आवाज चित्राच्या ओळखीचा होता.. 
   दोन वर्षांअगोदर पंचकात मेलेल्या तिच्या आजीचा तो आवाज होता.      

        " आज्जी !" चित्रा ईतकेच म्हंटली. तोच त्या उघड्या दरवाज्या बाहेरुन प्रतिउत्तर आल..  

        " होय चित्रे , मीच, ये बाह्ये र ये बाह्येर ये..! हिहिहिहिहिही!" वाक्य संपताच बाहेर जे कोणी होत - ते चेष्टेने हसल.! 

        नशेत धुंद झालेल्या चित्राला हे लक्षात नव्हत..- की तीची आज्जी दोन वर्षा अगोदर वारली आहे! त्यासहितच चित्रा ज्या दरवाज्यात उभी होती , त्या दरवाज्यापासून मुख्य दरवाजा फारच लांब होता - तिथपर्यंत तीचा आवाज जाण अशक्य होत.. 
मग बाहेर जे कोणी उभ होत त्याला चित्राचा आवाज ऐकू तरी कसा गेला होता ? त्यासहितच आतून लावलेला दरवाजा आपो-आप कसा उघड़ला होता ?   

        चित्रा नशेत धुंद असल्याने तिच्या मनात हे सर्व विचार आले नाहीत, उलट ती त्या उघड्या 
 दरवाज्याच्या दिशेने चालत आली.. 

        दरवाज्यात येताच तिच्या अंगावर थंडगार हवेचा झोत धावून आला - सर्व शरीर त्या थंड हवेने शहारल -  

        हळुच तिची नजर उघड्या दरवाज्यातून बाहेर अंगणात पडली-   

        अंगणातल्या जमिनीवरुन गडद पांढरट - जाडसर धुक वाहत होत - आणि त्याच धुक्यात
  चित्राची मृत , मय्यत पावलेली आज्जी उभी होती.. 

सर्व अंग काठीसारख सुकल होत - अंगात एक चौकलेटी मैक्सी होती , चेह-यावरची त्वचा मोर्ग मध्ये बेवारस पडून राहिलेल्या प्रेतासारखी पांढरी पडली होती , डोळ्यांत शुन्यभाव असून - डोळ्यांखाली वर्तुळाकार उमटले होते.... 
     डोक्यावरचे पिंजारलेले पांढरे केस - अस्तव्यस्थपणे चेह -यावर पसरले होते.. हाता -पायांची चामडी रक्त शोषल्यासारखी दुधाळ दिसत होती, हातांची नख चेटकीनी सारखी वाढलेली होती.. 

        हळुच तो हाडकूळा- खेळण्यातल्या खूळखुळ्यासारखा हात वर आला , व ती हाताची पाच बोट हळली.. 

        " ये !" त्या शुष्क काळ्या ओठांची हालचाल झाली, व तो भसाड्या स्वरातला आवाज बाहेर पड़ला.. 

       चित्रा फार्महाऊसच्या दरवाज्याच्या पुढे असलेल्या पाय-या उतरुन बाहेर आली, गार्डनमध्ये तिच्या आज्जीजवळ आली, 
 चित्राला तिच्या आज्जीच्या अंगातून एक , कुबट, कुजका - घाणेरडा वास जाणवत होता .

        " आज्जी तू ईथे ?" चित्राने विचारलं - परंतू तिच्या वाक्याला उत्तर न देता तिची आज्जी गर्रकन वळाली.. 

      अगदी संथ गतीने एखाद मेलेल कलेवर चालाव, तस पाच पावळ चालत आज्जीच रुप घेऊन आलेल ते ध्यान चित्रापासून पुढे गेल.. 

        त्या ध्यानाने हळुच तीरकस कटाक्षाने 
 मागे वळून पाहिलं - व मानेनेच चित्राला आपल्या मागे यायची खून केली..    

        चित्रा चालत त्या ध्यानाच्या मागे मागे जाऊ लागली-  

        ते ध्यान फार्म हाऊसच्या गेटपाशी पोहचल, गेटपाशी पोहचताच दरवाजा आपोआप उघड़ला -  

        उघड्या गेटमधून ते ध्यान बाहेर पडल-
    चित्राही त्या ध्यानाच्या मागे गेटमधून बाहेर पडणार होती , की तेवढ्यात चित्राच्या कानांवर एक हाक ऐकू आली.. 

          " चित्रा पोरी थांब!" आवाजात जरब होती - आज्ञा होती - त्यासहितच त्या आवाजात एक मायेची उब होती.. 

        चित्राने मागे वळून पाहिलं - तीच्या मागे एक पांढ-या कपड्यातली म्हाता-या मांणसाची आकृती उभी होती... 

        त्या आकृतीच्या सर्वशरीरातून शुभ्र -स्वच्छ, असा पांढ-या रंगाचा प्रकाश बाहेर येत होता..

        

        त्या आकृतीला पाहताच चित्राच्या तोंडून ते नाव निघालं .. 

        " आजोबा !"  

        " होय मीच - कुठ चाललीस तू ? जा वापस घरात जा बघू ? आणि बाह्येर निघू नको जा ?" हे चित्राचे आजोबा होते - पाच वर्षांअगोदर आजारपणात त्यांची डेथ झाली होती.. 

         " अहो पन आजोबा , आज्जी !" 
  चित्राने अस म्हंणतच हळूच वळुन समोर पाहिलं ..! 

     चित्रापासून दहा पावळांवर तीची आज्जी उभी होती - चेह-यावर तेच ते अनोळखी शुन्य भाव होते.. 

        " नाय पोरी ती तुझी आज्जी नाय , तो धोका आहे पोरी, जा परत जा !" चित्राने तिच्या आजोबांच्या वाक्यावर न समजून त्यांच्याकडे पाहिलं ... व म्हंणाली.

        " धोका कसला धोका , ही तर माझी आज्जी आहे !" चित्राने अस म्हंणतच - तिच्या आज्जीकडे पाहिलं व हसली.. 

        तिला प्रतिउत्तर म्हंणुन ते ध्यान सुद्धा 
   दोन्ही ओठ u आकारात हळूच विचकत हसल.. 

           मागचा पुढचा विचार न करता नशेत 
धुंद झालेली चित्रा, चालत तिच्या आज्जी जवळ आली- तीने गेटची सीमा ओलांडताच चित्राच्या आज्जीच रुप घेऊन आलेल ते ध्याना त्याच्या ओठांवर विजयी हसू फुलल... 

        

        सावज जाळ्यात फसलं हे पाहता - 
त्या ध्यानाने गेम खेळला..
    

           गदागदा खांदे हळवत चित्राची आज्जी फ़िदिफ़िदि करत - वानराप्रमाणे हसू लागली- 
पाहता -पाहता आज्जीच्या डोळ्यांचा रंग बदल्ला - हिरवा झाला - संपुर्ण अंगाची कातडी मुका मार बसून रक्त काळ व्हाव तस कातडी काली निलि पडली, डोक्यावरचे केस रक्ताळल्या प्रमाणे लाळेलाल झाले..

   डोळ्यांसमोर घडलेल हे विचीत्र भयंकर प्रकार पाहून , चित्राची दातखील बसली -         
झटक्यात मेंदूवर चढलेला नशेचा अंमळ उतरला , विस्फारलेल्या डोळ्यांनीच तीने त्या ध्यानाकडे पाहिलं .. 

        भीतीने ती ओरडू पाहत होती , परंतू आवाज घश्यात बसला होता - हळू हळू चित्राची पावळे मागे मागे जाऊ लागली.. 

        तोच त्या ध्यानाने आपला काळशार कातडीचा हात फर्रकन पुढे आणला , व चित्राचा हात पकडला..- 
 

        गरम तापलेल्या तव्यावर पाण्याचे थेंब पडावे आणि फस्स आवाज करत वाफ निघावी तसा त्या ध्यानाच हात जस चित्राच्या हातावर पडल-
फस्स आवाज होत - चित्राच हात भाजल.. 

        भीतीने दाबून धरलेली किंकाळी वेदनारुपात बाहेर पडली.. 

        " आssssssss...!" रात्रीच्या स्मशान शांततेत चित्राचा तो आवाज फार्म हाऊसच्या उघड्या दरवाज्यातून हवेसारखा साई साई करत आत घुसला - 

       प्रिया , मृणाल , त्यांच्या बाकीच्या मैत्रिणी सर्वाँनी जसा हा आवाज ऐकला , एक एकाची नशा खाडकन उतरली.. 

        सर्वजनी धावतच फार्महाऊस बाहेर आल्या , तसे त्यांना दिसलं - 

        फार्म हाऊसच्या गेटबाहेर चित्रा धुक्यात जागेवर गोल गोल फिरत आहे..- तिच्या डोक्यावरचे काळे केस तिने पुर्णत चेह-यावर पसरवले होते - ज्याने तिचा पूर्णत चेहरा झाकला गेला होता.. 

         " ह्या चित्राला काय झालं ? अशी वेड्यासारखी का फे -या मारत आहे ! " मृणाल म्हंटली. 

        त्यावर ग्रुपमधील एक मुलगी म्हंटली-
   " ए अंग तिला चढलीये वाटतं!"  
 त्या मुलीच्या वाक्यावर बाकी दोन मुली खदाखदा हसल्या.. 

        प्रियाला मात्र त्यांचा राग आला , तसे तिने फणकारत म्हंटलं .

        " ए गप्प बसा ग तुम्ही , आणि आधी तिला आत आणू चला !" प्रियाच्या वाक्यावर सर्व मुली गेटबाहेर आल्या.. 

       चित्राला ह्या सर्व मुलींची जणु चाहुळच लागली नव्हती - ती अद्याप तशीच वर्तुळाकारात गोल गोल फिरत होती.. 

        तिच्या तोंडातून एक रानटी श्वापद गुरगुरावा तसा गुरगूरण्याचा अस्पष्ट असा आवाज येत होता..

        " चित्रा , ए चित्रा अंग काय होतंय ? ठिक आहेस ना तू?" प्रिया म्हंटली .. 

        परंतू तिच्या वाक्यावर चित्राने कसलेही प्रतिउत्तर दिलं नाही , ती गोल गोल फिरतच होती....   

         तोच प्रियाने तिचा उजवा हात धरला - हात धरताच प्रियाच्या तळव्याला चित्राच्या हाताची चामडी भाजलेली दिसली... 

        " एय चित्रा , तुझ्या हाताला काय झालं ग?" प्रियाने विचारलं ..- परंतू एका जागेवर थांबलेली चित्रा गप्प उभी होती- 

      हो म्हंणायला तो गुरगूरण्याचा आवाज येतच होता - 

      एक - दोन मुलीतर तो आवाज ऐकून पार घाबरुन गेल्या होत्या. 

        " ए हात स्वोड!" डोक्यावर पसरलेल्या केसांमधून ,