माझिया प्रियाला प्रीत कळेना ....❤️❤️❤️ (ओळख)
ही कथा आहे मीरा आणि अनुराग यांच्या सुंदर आणि अनोख्या प्रेमाची ....🩷🩷🩷
मीरा वेदांत कुलकर्णी आपल्या कथेची नायिका ही dr. वेदांत कुलकर्णी यांची एकुलंती एक कन्या बाबांची लाडकी लेक .
सावळा वर्ण , तपकिरी रंगाचे डोळे, गालावर पडणाऱ्या सुंदर दोन खळ्या , लांबसडक काळेभोर केस , उंची ५ फूट अशी आपली नायिका ....💝💝💝
वय वर्षे 16 बरका नुकती च 9 वी मधून 10 वीत गेलेली किशोरवयीन तरुणी , अल्लड, निरागस अशी मीरा .
जिला अभ्यासात जराही इंटरेस्ट नाही म्हणजे तस ठरवलं तर टॉप करेल अख्या वर्गात पण नाही कारण तिचा असा समज आहे की अभ्यासात top करून काय फायदा आहे परीक्षेत टॉप करणारा आणि काटावर पास होणारा दोघे ही जातातच ना पुढच्या वर्गात मग का इतकी जीवाची तगमग करायची ...
नायिकेची ओळख तर झाली आता कुटुंबाची पण ओळख व्हायला पाहिजे ना .....
कुलकर्णी कुटुंब
नायिका मीरा कुलकर्णी
बाबा वेदांत कुलकर्णी
आई रमा कुलकर्णी
भाऊ आदित्य कुलकर्णी
असे हे छोटे चौकोनी कुटुंब . मीरा चे आई आणि बाबा दोघे पण डॉक्टर आणि भाऊ आदित्य हा MBBS च्या लास्ट इअरला असतो .
आता जास्त वेळ न वाया घालवता तुम्हाला कथेच्या नायकाची ओळख करून देते .
नायक अनुराग देशपांडे हा IIT Bombay मधून m.tech केलेला 26 वर्षांचा पुण्यात एका नामांकित कंपनीत नुकताच नोकरी लागलेला.
अनुराग हा आधीच ग्रजुवेशन कंप्लीट झाल्यावर मुंबई मध्ये ऑनलाईन जॉब करत होता ... आणि आता त्याचं कंपनी च्या पुणे ब्रांचला जॉब मिळाला होता ते ही एका प्रोजेक्ट साठी खास त्याला हायर केलं होतं..,.
वर्ण गोरा , घारे डोळे, लांब नाक, उंची 6 फूट, Gym मध्ये बनवलेली भारदस्त body त्याला पाहताच कुणीही प्रेमात पडेल असा आपला smart, genius handsome young man....🤗
याच्या कुटुंबात कोण कोण आहे ते पाहू ....🤔
नायक अनुराग देशपांडे
बाबा प्रकाश देशपांडे
आई नीलम देशपांडे
भाऊ प्रीतम देशपांडे
काका अमित देशपांडे
काकी शोभना देशपांडे
त्यांची मुलगी प्रिया देशपांडे
अनुराग हा पुण्यातील प्रसिद्ध वकील प्रकाश देशपांडे यांचा मुलगा, एकत्र कुटुंबात वाढलेला, वडिलांचा अभिमान , आईचा लाडका, आपली स्वप्न जिद्दीने पूर्ण करणारा आपला हिरो....💖💖
आज देशपांडेकडे आनंदाचे वातावरण होते कारण त्यांचा मुलगा अनुराग मुंबई हून पुण्याला येणार होता ....
स्थळ : मीरा च घर "कृष्णकुंज"
मीरा अग उठ लवकर किती वाजले बघ घड्याळात
मीरा ची आई रमा तिला उठवत असते
तशी मीरा उठून बसते
मीरा : काय ग आई सकाळी सकाळी उठवलस मला आता तर शाळेला ही समर हॉलिडे सुरू झाला आहे , आता तर आठ दिवस झाले आहेत.
रमा : हो पण यंदा तुझी दहावी आहे , किती दिवस वाया घालवणार असेच. चल अंघोळ कर आणि अभ्यासाला बस , नो एक्सक्युझ मीरा.
मीरा : काय यार मम्मा इतक्या लवकर कोण अभ्यास करत ? अजून तर खूप वेळ आहे आणि तस ही मी पेपर च्या आदल्या दिवशी अभ्यास करते आणि तरी ही मला चांगले मार्क्स मिळतात परीक्षेत, यू नो ना तरीही का तू अशी वागत आहेस ???
रमा : हो माहित आहे ना , अग पण यंदा दहावी आहे जरा तरी गांभीर्याने अभ्यास कर . मज्जा मस्ती बसं झाली आता , कळतंय का काही ? जा आवर पटकन...
मीरा : ओके आवरते बाई लवकर नाहीतर तू अजून लेक्चर देत बसशील .
अस म्हणत ती अंघोळीला निघून जाते
इकडे रमा मीरा च्या रूम मधून खाली हॉल मध्ये येतात
समोर सोफ्यावर वेदांत न्यूज पेपर वाचत असतात .
वेदांत : कश्याला तिला सकाळी सकाळी उठवलं झोपू द्यायच की तिला.
रमा : तुमच्यामुळे तिला कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य राहिलं नाहीये , कसं होणार हो, मला हीच चिंता आहे
वेदांत : तू उगाच चिंता करतेस, सगळ चांगल होणार तीच लहान आहे ती अजून.
रमा: ठीक आहे तुमची लाडकी लेक आणि तुम्हीच काय ते करा
(मीरा तीच आवरून खाली येते आणि डायनिंग टेबल वर येऊन बसते )
मीरा : वंदना काकू आज नाश्त्याला काय केले आहे लवकर वाढा मला भूक लागली आहे आणि माझा फेवरेट अद्रक वाला आणून द्या .
(मीरा वंदना काकूंना ऑर्डर देते तशा वंदना काकू लगेचच तिला चहा आणि नाश्ता आणून देतात.)
(वंदना काकू स्वयंपाकिन)
(मीरा नाष्टा करतच असते तोपर्यंत तिची जिवलग मैत्रीण
प्रिया तिचा कॉल येतो .)
रमा : अगं खाऊन तर घे नंतर फोन रिसीव्ह कर
मीरा : अगं आई प्रियाचा फोन आहे काहीतरी अर्जंट असेल म्हणूनच कॉल केला असेल
प्रिया : हॅलो मीरा गुड मॉर्निंग, उठलीस का ?
मीरा : हो ग .तू बोल ना का फोन केला होतास ?
प्रिया : अगं तुला तर माहितीच आहे ना माझा दादा आज मुंबईहून येणार आहे त्याची संध्याकाळी पार्टी आहे तू आणि काका काकूंना वेळ मिळत असेल हॉस्पिटल मधून तर या तिघे त्यासाठी कॉल केला होता
मीरा: आई बाबांचं काही माहीत नाही पण मी नक्की येत आहे .किती वाजता आहे पार्टी ???
प्रिया: संध्याकाळी सात वाजता होणार आहे नाच गाणं मजा मस्ती काही नाही आहे , तू लवकर ये पार्टीला तुझ्याशिवाय मला करमत नाही ,.
मीरा : हो ग प्रियु , मी मी नक्की येईन मलाही पहायचं आहे तुझ्या दादाला तू त्याचं एवढं कौतुक करत असतेस
I am very curious about your brother
प्रिया: बाय-बाय ये आज संध्याकाळी .
रमा: कोणती पार्टी कुठे जाणार आहेस ???
मीरा : अगं आई प्रियाच्या घरी तिचा दादा येणार आहे तुला सांगितलं होतं ना आयटी बॉम्बे रिटर्न त्याची पार्टी आहे आज संध्याकाळी त्यासाठी तिने मला इनविटेशन देण्यासाठी कॉल केला होता.
वेदांत : मग तू जाणार आहेस का?
मीरा: तुम्ही परमिशन दिल्याशिवाय कशी जाऊ मी
वेदांत: जा की तुझ्या बेस्ट फ्रेंड ने इतक्या प्रेमाने आहे आम्ही कोण नाही म्हणणारे
मीरा: thanks बाबा , थँक्यू व्हेरी मच 😊😚😌
रमा: किती वाजता आहे पार्टी ???
मीरा: संध्याकाळी सात वाजता
रमा : प्रियाच्या घरी पार्टी तसं काळजीचा कारण नाही तरी ही नऊ वाजता घरी परत ये ., नाष्टा करून झाला असेल तर जरा अभ्यासला बसं नंतर तुला पार्टीला सुद्धा जायचं आहे ना तेवढेच तासभर बस तेवढंच डोक्यात गेल तर गेलं
मीरा : हो ग , नऊपर्यत येईन तू नको काळजी करू.
(असं म्हणत ती उठून आपल्या रूम मध्ये जाते आणि मनात नसताना अभ्यासाला बसते )
स्थळ : पुणे एअरपोर्ट
सकाळी 9 वाजता अनुराग फ्लाईट ने पुण्याला आला त्याच्या एअपोर्टवर आणायला प्रीतम आणि प्रिया गेले होते.
अनुराग सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करून लगेजसह येत असतो
प्रीतम आणि प्रिया दोघे ही त्याला येताना पाहतात आणि त्याला मिठी मारतात .
प्रिया : hii दादा ! कसा आहेस ?
अनुराग : मी मस्त !
प्रीतम: आता काय बाबा तू मस्त असणार की , इतकं भारी सॅलरी असणारं पॅकेज मिळालं आहे तुला
अनुराग : तस काही नाहीये रे मला तर युएस जॉब करायचा होता पण बाबांनी माझा ऐकलं नाही माझा ड्रीम जॉब माझ्या हातातून गेला , किती मेहनत केली होती मी.
प्रिया : म्हणजे तुला आमच्या पासून दूर जायचं होतं का आधीच तू बारावी नंतर आय आय टी बॉम्बेला निघून गेलास. इतकी वर्ष कुटुंबापासून दूर आमच्यापासून दूर होतास आता तुला आमच्यापासून अजूनच दूर जायचं होतं का?
अनुराग: अग तस नाही ग बाळा, माझ स्वप्न होत ते त्यासाठी मी इतका अट्टाहास केला होता पण माझ्या मनासारख काही झालं नाही.
तो तिला एक्सप्लेन करत असतो तितक्यात प्रीतम त्याला म्हणतो आपण हे सर्व गाडीत जाऊन बोलूया घरी सर्व जण तुझी वाट पाहत आहे....
तसे ते तिघे गाडीच्या जवळ येतात गाडीत बसतात प्रीतम गाडी घराच्या दिशेने घेतो.
अनुरागच घर : मृगजळ निवास
प्रीतम गाडी मृगजळ निवासासमोर उभी करतो घरचे सर्वजण त्याचीच वाट पाहत असतात त्याच्या स्वागतासाठी आणि त्याच्या यशाच्या कौतुकासाठी....
आज संपूर्ण घर सजवण्यात आले होते
अनुराग गाडीतून खाली उतरला आणि घरात गेला
तर समोर काकी , आई , सर्व कुटुंबीय त्याचीच वाट पाहत होते , आईने तो आत येताना त्याला ओवाळले
आणि मग आत घेतले .
अनुराग काका काकी आई बाबा या सर्वांच्या पाया पडतो
सर्वजण त्याला आशीर्वाद देतात
अनुराग : हे काय आहे सर्व घर सजवले आहे जणू काही मी युद्धच जिंकून खूप वर्षांनी घरी परतलो आहे.
आई : अरे तू M.tech कम्प्लीट केलं त्यानंतर पुण्यातील एजे ग्रुप ऑफ कंपनीज या इतक्या मोठ्या पुण्यातील कंपनीत जॉब मिळाला तुला , मोठ्या पगाराचं पॅकेज तुला मिळालं. ही गोष्ट खूप मोठी आहे त्याचा आनंद साजरा करायला नको का ?
बाबा : तू कायमच माझी मान अभिमानाने उंच केली आहेस , तू माझा शब्द कधी पण खाली पडू दिला नाहीस म्हणून तू माझा लाडका आहेस.
आई : आता फक्त आमची एकच इच्छा आहे तुझं लवकरात लवकर लग्न करून आमची सून घरात येऊ दे तेवढी इच्छा पूर्ण कर नंतर तुझ्याकडे काहीच मागणार नाही.
(हे ऐकून अनुराग थोडा अस्वस्थ होतो हे लक्षात येताच
अमर विषय बदलण्यासाठी मध्येच अनुरागच्या आईला टोकतो.)
अमर (अनुराग चा मित्र) : आता कौतुक सोहळा पुरे मेरा यार कितने दिनो के बाद घर आया है उसके लिए अच्छा खाने पीने का इंतजाम तो करिये . त्याला बसू द्या आणि मग तुम्हाला काही कौतुक करायचे आहेत ती करा
काका : त्याला खायला हवंय की तुला खायला हवं इतक्या दिवसांनी आला तो त्याचं कौतुक तरी मन भरून करू द्या
काकी : जा अनुराग फ्रेश होऊन खाली ये आज तुझ्या आवडीचा ब्रेकफास्ट आहे.
अनुराग : हो काकू आत्ताच फ्रेश होऊन आलो .
(अनुराग रूम मध्ये जातो आणि त्याच्या पाठोपाठ त्याचा मित्र अमर सुद्धा त्याच्या बरोबर जातो)
अमर: काय यार अनु सगळ इतकं चांगलं घडत असताना तू असा का तोंड पडून आहेस ? जरा ही खुशी नाही आहे चेहऱ्यावर ....
अनुराग : काही नाही रे ते असच आपल
अमर : असच आपल काय हेच ना की इतकी छान संधी होती , ज्या संधीसाठी तू इतकी मेहनत केली होती त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट काकांनी तुला साफ विरोध करून हट्ट करून हा पुण्याचा जॉब ॲक्सप्त करायला सांगितला आणि युएस ला जाण्याची संधी त्या मिहिरला मिळाली .
अनुराग : हो रे , सर्वजण खूप खुश आहेत मी इथे कायमच त्यांच्या बरोबर सेटल होणार म्हणून मी पण तसा आनंदी आहे म्हणा कारण घरी आपल्या माणसासोबत राहण्याचे सुख मिळतं. पण तरीही रे मनात कुठेतरी अस वाटतय मला की मी काहीतरी मौल्यवान गोष्ट गमावली आहे मला तिथे खूप काही शिकायला मिळल असत पण बाबांना हे कोण समजावनार. आणि राहिली गोष्ट त्या मिहिर ची तर मला त्याचं काही वाटत नाही कारण मी ती ऑफर रेजेक्ट केली आणि त्याने की ॲक्सेप्त म्हणून तो तिथे आहे आणि मी इथे आहे ....
अमर : तुलाच खूप हौस होती आदर्श पुत्र व्हायची सांगायचं होत त्याचं वेळी काकांना की नाही मला जायचंय तिकडे पण नाही त्यांच्या पुढे तुझ काही चालत नाही , आता अस तोंड पाडून बसू नकोस हा निर्णय तू घेतला आहेस आता तो बदलू शकत नाही. आनंदाने सर्वामध्ये रहा ..... आणि शेवटी तू कितीही म्हटलास तरी जे होत ते चांगल्यासाठीच असं म्हण आणि पुढे जा आता ....
अनुराग : हो रे , ते ही आहेच ....
बाकी dr. साहेब तुमचं कसं काय सुरू आहे ???
अमर: माझ मस्तच सुरू आहे रे , हॉस्पिटल टू घर घर टू हॉस्पिटल हेच की अजून काय लेका...
अमर आणि अनुराग बोलतच असतात की प्रिया येते ....
वेळ : सकाळी १०:३० वाजता
प्रिया : अरे दादा खाली चला सर्व वाट पाहतायत, ये ना पटकन आमच्या बरोबर पण गप्पा मार ये आवरून...
अनुराग : हो आलोच.
तो फ्रेश होवून खाली येतो सर्वजण डायनिंग टेबलवर त्याचीच वाट पाहत असतात ....
आई : ये बस पटकन खाऊन घे, तुझ्या आवडीचा लोणी डोसा बनवला आहे .
अनुराग : हो आई .
अनुराग डोष्यावर चांगलाच ताव मारत असतो
(सर्व जण गप्पा मारत असतात गप्पा मारत असताना कधी एक - दोन तास निघून जातात हे कळतं नाही , आई अनुराग ला म्हणते... )
आई : अनु संध्याकाळी पार्टी आहे तुला तर माहीतच आहे ना सर्व नातेवाईक , शेजारी, यांचे आणि माझे जवळ चे मित्र - मैत्रिणी , तुझे मित्र हे सर्व जण येणार आहेत त्यामुळे आता जरा आराम कर नंतर सर्व पार्टी च्या तयारीत व्यस्त होतील ...
अनुराग : मला प्रवासाचा थकवा नाहीये पण हो मला कंपनीच्या CEO ने ज्या प्रोजेक्ट साठी मला पुण्यात हायर केलं आहे त्याच्या काही डिटेल्स मेल केल्या आहेत त्या बघायच्या आहेत त्यामुळे मी ते करत बसतो ...
अमर : जा ,जा .कर तुझ काम मीही आता माझ्या घरी जातो, संध्याकाळी भेटू पार्टीला bye bye.....
(अनुराग ही त्याला bye करून वरती त्याच्या रूम मध्ये जातो त्याचं काम करत बसतो , काही वेळाने त्याची आई त्याला जेवायला खाली बोलवते)
वेळ दुपारचे २:१५ वाजता
आई : अनु खाली ये २ वाजून गेले जेवणार नाहीये का तू आज की डोसाने पोटात जागा झाली नाहीये आजुन, जेवायला ये राजा....
(अनुराग जेवायला येतो तर डायनिंग टेबलवर त्याच्याच आवडीचा बेत केलेला असतो , तो जेवणात मग्न असतो त्याचं वेळी प्रीतम त्याला विचारतो )
प्रीतम : दादा पार्टीला काय घालणार आहेस ????
अनुराग :काही ठरवलं नाहीये रे अजून .
प्रीतम : दादा तू ना मस्त ब्लेजर घाल , मी पण घालतो छान वाटेल .
अनुराग : ठीक आहे , घालतो
प्रिया : मी तर खूप एक्साईटेड आहे पार्टीसाठी कधी एकदा संध्याकाळ होते अस झालंय....
काकी : अशी एक्साईट तू जर अभ्यास करायला असती तर आम्हाला खूप आनंद झाला असता , आठवडाभर पार्टीसाठी मी कोणता ड्रेस घालू , त्यावर कोणती हेअर स्टाइल सूट करेल, कोणत चप्पल घालू , कोणत्या गाण्यावर मी डान्स करू हेच सुरू आहे . आता पार्टी झाली की उद्यापासून अभ्यास सुरू करायचा आहे , यंदा दहावी आहे ... नटन - मुरडन बसं आता ....
प्रिया: हो आई मी करेन अभ्यास.
अनुराग : काकी आता तुम्ही काळजी करू नका तिच्या अभ्यासाची, मी आहे आता त्यासाठी तीने नाही ना टॉप केलं तर बघच तू .
प्रिया : दादा तुला खूप कॉन्फिडन्स आहे माझ्या वर पण मी इतकी हुशार नाही आहे मला जास्तीत जास्त 75 -
80% पडतील जास्त अपेक्षा ठेऊ नकोस ...
अनुराग : अग बाळा मी आहे ना , तू आरामात 85+ जाशील याची खात्री आहे मला ....
प्रिया : हमम... बर बघू .
( सर्वांची जेवणं झाली, त्यानंतर बाबा आणि प्रीतम पार्टी च्या तयारी साठी आलेले डेकोरेटर यांची गार्डन मध्ये डेकोरेशन कसे करत आहेत व त्यानुसार सूचना देण्यासाठी जातात , तर काका आणि प्रीतम हे कॅटर्सना जेवणाचा मेनू आणि जेवणाची व्यवस्था पाहण्यासाठी जातात . आई आणि काकू घरातील नोकरांना घर नीटनेटके ठेवण्याचे आदेश देत असतात कारण घरी खूप सारी मंडळी येणार मग घर सर्वांना आवडायला हवं ना का ??? )
(अनुराग त्याच्या रूम मध्ये जाऊन थोडा वेळ झोपतो अस म्हणून जातो )
संध्याकाळी सहा वाजता - स्थळ : मीराच घर
मीरा पार्टीला जाण्यासाठी रेडी होण्यासाठी ड्रेस पाहू लागते कोणता ड्रेस घालू हेच नेमक कळत नसत , याच विचाराच्या गर्तेत अडकलेली ती ....
मीरा : काय घालू काही कळत नाहीये , हा फ्लोरल फ्रॉक च घालते तो मला खूप छान दिसतो .
(अस म्हणत ती पार्टीसाठी रेडी होते, केस मोकळे सोडते , चेहऱ्यावर हलकासा मेकअप करून , तिचा फेवरेट परफ्यूम अंगावर मारून मॅडम तर होतात )
तिकडे मृगजळ अनुराग घर
वेळ : संध्याकाळी सात वाजता
अनुराग पार्टीसाठी रेडी होत असतो प्रीतम च्या सांगण्यानुसार त्याने ब्लेझर घातले होते त्यामध्ये तो एकदम देखना दिसत होता , सेट केलेले केस , त्याचे ते नशीले घारे डोळे, आणि चेहऱ्यावरची किलर स्माईल जी कोणालाही घायाळ करेल ....
तो आज खरोकरच खूप attractive दिसत होता, नक्कीच आज त्याच्यावर कोणीतरी फिदा होणार होत....❤️❤️❤️
कशी होईल मीरा अन् अनुराग ची भेट उत्सुक आहात ना .... तर मग यासाठी भेटूया पुढच्या भागात...💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗
आणि जरा कमेट्स आणि लाईक करून सांगा की राव कथा आवडते की नाही ते तुम्ही जसा रिस्पॉन्स द्याल त्यावर ही कथा मी कंटिन्यू करेन ... ❤️❤️❤️❤️
तुमची एक सकारात्मक कमेंट मला प्रोत्साहित करेल ...😊
.
.
.
.
Bye bye stay tuned ❤️❤️❤️