जात या कादंबरीबद्दल
जात या नावाची पुस्तक वाचकांच्या हातात देतांना मला आनंद होत आहे. ती माझी एकशे दोनवी पुस्तक आहे.
जात या पुस्तकाबद्दल सांगतांना मलाही संभ्रमच वाटतो. कारण माझी ही एकशे दोनवी पुस्तक जरी असली तरी वाचकांच्या गर्दीत माझी पुस्तक तेवढी गर्दी करीत नसल्याचं माझ्या निदर्शनास येत आहे. जरीही कसदार लेखन व विचार माझ्या पुस्तकात आहेत असं काही वाचकांचं म्हणणं असलं तरी. याबाबत एक फोन होता. गोविंद गोपाळ गायकवाड नावाची कादंबरी. ही कादंबरी त्यांनी ई साहित्याच्या साईटवर वाचली होती. त्यावेळेस त्या वाचकांचं म्हणणं होतं की शिवाजी सावंतच्या छावा कादंबरीत संभाजी महाराजांचं वर्णन आहे. परंतु आपण त्यानंतर कल्पकतेनं जे पुस्तकरुपात रंगवलंत. ते अगदी वाखाणण्याजोगेच आहे. कारण ज्या औरंगजेबानं संभाजीला सोडलं नाही. त्या औरंगजेबानं त्या महान राजाला अग्नी देणाऱ्या व मांसाचं विखुरलेलं शरीर शिवणाऱ्याला सोडलं असेल काय? मात्र आपण हेच दृश्य केवळ कल्पनेनं साकारलं. साहेब, लिहिण्यालाही कसब लागतं.
ते त्या वाचकाचं म्हणणं. त्याला काय उत्तर द्यायचं ते कळलं नाही. तसं पाहिल्यास आजचा काळ हा वाचन कमी व व्हिडीओ जास्त बघण्याचा काळ आहे. पुस्तकाच्या वाचकांची गर्दी अलिकडील काळात कमी होत आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी लेखक लेखन करणार नसेल तर व्हिडीओ किंवा चित्रपटाला कथानक कुठून मिळणार? म्हणूनच आम्हाला लेखन करावं लागतं. मग वाचक मिळो अगर न मिळो. समजा एखाद्या पुस्तकातून एखादा व्यक्ती संस्कारीत झाला की बस पुस्तक लिहिण्याचं सार्थक झाल्याचं समाधान मला लाभतं. इतरांचं माहीत नाही. परंतु ही पुस्तक लिहितांना माझ्यासमोर प्रश्न होते. बाजारात वाचकांच्या गर्दीत वाचक संख्या कमी असतांना माझं हे पुस्तक चालेल का? इतर पुस्तकांच्या मानानं किती बाजारमूल्य पकडेल? आजही हे माझ्या डोळ्यासमोर प्रश्न आहेत. परंतु यावर एक व्यक्ती म्हणाला, "शिवाजी सावंतनं छावा लिहिलाच नसता तर छावा नावाच्या चित्रपटाची निर्मिती झाली असती काय?" म्हणूनच ही पुस्तक लिहिली. आता वाचकांनी ठरवावं, ही पुस्तक वाचावी की नाही ते.
जात ही पुस्तक लिहिताना मला प्रेरणा ही माझ्या विद्यार्थ्यांची ठरली. जेव्हा दोन चार विद्यार्थ्यांनी मला माझीच जात विचारुन पाहिली. म्हणूनच ही पुस्तक यासाठी लिहायचं ठरवलं. ठरवलं की शाळेतूनही समता प्रस्थापित व्हावी. समता ही बोलण्यातून नाही तर कृतीतूनही प्रस्थापित व्हावी. आता आपण ठरवावं की समतेच्या दृष्टिकोनातून ही पुस्तक परिपुर्ण आहे की आणखी एकाद्या पुस्तकाची निर्मिती आणखी करावी लागेल.
आपणाला शेवटी सांगू इच्छितो की ही कादंबरी नाही तर एक विचार आहे. अलिकडील काळात मी कादंबरी कमी परंतु विचार जास्त मांडतो. ज्या विचारांना कथानकाची जोड देत असतो. विशेष म्हणजे आपणाला जर ही कादंबरी आवडली तर एक फोन अवश्य करावा ही विनंती.
आपला नम्र
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०
जात (कादंबरी) भाग एक
अंकुश शिंगाडे
शाळा हे सुसंस्कार रुजविण्याचं केंद्र आहे. परंतु शाळेतच आजच्या काळात संस्कार शिकविले जात नाहीत. समानता ही फक्त बोलण्याचीच भाषा असते. लहानशी इवली मुलं आजच्या काळात आपापसात विचारविमर्श करतात. तशीच ती शिक्षकांनाही विचारतात की सर तुम्ही कोणत्या जातीचे आहात. तेव्हा विचार येतो की या मुलांना आपण जात शिकवायची की जातविरहीत शिक्षण. खरं तर त्यांनी शाळेत कुणालाच जात विचारु नये. ना आपल्या सममित्रांना, ना आपल्या शिक्षकांना. कारण त्यातूनच त्या इवल्या वयात असमानतेची बीजं पेरली जातात.
शालेय स्तरावर अनेक प्रश्न असतात. ते सोडवता सोडवता नाकीनव येत असतं. त्यातच जातीचा प्रश्न उद्भवल्यास आणखी समस्या निर्माण होतात. असं का होतं, त्याचं कारण आहे शाळेत विद्यार्थ्यांच्या नावासमोर जात लिहिणं. जातीविरहीत शालेय प्रवेश. याला शाळेत नाव दाखल करतांना बंदी आहे. म्हणूनच लहानशी इवली इवली मुलं आपल्या शिक्षकांनाही जात विचारण्यात कतरत नाहीत.
आज अशी बरीचशी मंडळी पाहतो की त्यांना किती शिकले असं विचारले असता चक्कं सांगतात की पाचवी शिकलो. कुणी सातवी तर कुणी दहावी सांगतात आणि स्वाक्षरी करा म्हटलं तर अंगठा लावतात. यावरुन शिक्षणाची परिभाषा लक्षात येते. परंतु त्यांचेकडे पाहिलं तर ते व्यक्तीमत्व सालस स्वरुपाचं दिसून येतं. त्यांच्यात सुसंस्कार दिसतात. त्याचं कारण असतं, त्यांची शाळा. त्यांच्या शाळेनं ते शिकत असतांना त्यांच्यात संस्कार फुलवलेले असतात. त्यांना सुसंस्कारीत केलेलं असतं. जे सुसंस्कार घरात व परीसरात मिळत नाहीत.
विद्यार्थी घडवायचे असतील तर त्यांना सुसंस्कृत बनवायला हवे. त्यांना सुसंस्कृत बनवून त्यांना सुसंस्कारीत करायला हवे.
विद्यार्थ्यात काही वेगळेच सुप्त गुण असतात. ते इतर कोणाला दिसत नाहीत. ते आपले सुप्तगुणही दाखवत असतात. परंतु त्याकडे कोणाचे लक्षच जात नाही. त्यानंतर त्याला मातीचा गोळा समजून त्याच्या सुप्तगुणांना फाटा फोडून त्याला उच्छेद देवून त्याच्यावर वेगळेच काही करण्याचे तंत्र त्याचेवर थोपवलं जाते. ज्यातून त्याच्यातील सुप्त गुणांची कत्तल होते. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
म्हटलं जातं की चूक ही वैयक्तिकपणे दाखवायला हवी व त्यावर मार्गदर्शन करायला हवं आणि प्रशंसा ही सर्वांसमोर करायला हवी. तरच विद्यार्थ्यात वा कोणात आपल्याबद्दल आदर निर्माण होत असतो. मात्र लोकांचं आताचं वागणं याऊलट आहे. आताच्या लोकांच्या वागण्यानुसार लोकं चूक ही सर्वांसमोर दाखवतात आणि जी प्रशंसा सर्वांसमोर करायला हवी. ती एकट्यात करतात. मग कसे वाढतील सुप्त गुण? तसंच विद्यार्थी हा शिकत असतांना नेहमी जाणवतं की ते वारंवार कृती करतांना चुकतात. एकच कार्य काही विद्यार्थ्यांना जमत नाही तर काही विद्यार्थ्यांना चांगलं जमतं. त्यातील कारणांचा शोध कोणीही घेत नाही. हं, एखादा विद्यार्थी चुकलाच तर त्याचेवर रागविण्याशिवाय पर्याय नसतो व ती मंडळी रागावतातच. यात खऱ्या अर्थानं विचार केल्यास असं जाणवतं की ज्या विद्यार्थ्यांच्या हातून वारंवार चुका होतात. तेव्हा ते कार्य त्याला आवडत नसेलच. त्यामुळंच चुका होत असतात आणि ज्या मुलांना ते कार्य आवडतं. त्यांच्या चुका होत नसतात. त्याचं कारण असतं त्याचेतील सुप्त गुण. उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या खेळाचं देवून. ज्या विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो. तो त्या खेळाचं प्रात्यक्षिक मन लावून पाहणार व चुका करणारच नाही. परंतु ज्याला तो खेळ अजिबात आवडत नाही. त्याला कितीही सांगितलं, वारंवार चुका त्याच्या निदर्शनास आणून दिल्या. तरी त्याच्या त्या खेळातील चुका होणारच. असं का होतं? कारण प्रत्येकाची आवडनिवड त्या त्या सुप्त गुणानुसार ठरलेलीच असते. समजा एखाद्याला क्रिकेट आवडत असेल तर त्याला भाराभर ज्ञान देण्याची गरज नाही. त्याला फक्त क्रिकेटचंच ज्ञान द्यावं वा एखाद्याला अभ्यासाची आवड असेल तर ते मुल मैदानावर फिरकणारही नाही. एखाद्याला चित्र आवडत असेल तर तो चित्रच काढणार. इतर गोष्टी करणारच नाही आणि करेल तर त्यात वारंवार चुका करेल.
अलिकडील शिक्षण पद्धती सुप्त गुणांवर मुलामा घातल्यागत निर्माण झाल्यासारखी वाटतेय. त्याचं कारण आहे. त्या शिक्षणपद्धतीचा दुतर्फी निकष. म्हटलं जातं की या शिक्षण पद्धतीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यातील सुप्त गुणांची वाढ करणे हा होय. मग हे सुप्त गुण तीन वर्षातच दिसणार नाहीत. त्यासाठी वेळ जावू द्यावा लागेल. परंतु अलिकडील काळात शिक्षण हे वयाच्या तीन वर्षापासून देण्याची पद्धत आली आहे. त्या विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून शिकवले जाणार आहे. म्हणजेच त्या विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता ही अभ्यासाच्या साच्यात भरली जाणार आहे. ज्या साच्यात आधीच बीज टाकलेलं असेल. समजा डॉक्टर बनवायचं बीज असेल आणि त्या विद्यार्थ्याला जर क्रिकेटर बनायचं असेल तर ते त्याला बनू दिलं जाणार नाही. कारण साचा हा कुठंतरी डॉक्टर पदाचा असेल. याचाच अर्थ असा की ज्या पदाचा साचा. ते पद तो विद्यार्थी आपोआपच प्राप्त करणार. कारण तीन वर्ष वयात त्याचा शाळा प्रवेश होणार.
विशेष म्हणजे शाळा हे सुप्त गुण वाढविण्याचे केंद्र बनायला हवे असे सरकारचे मत. तसेच मत असावं, ते म्हणजे शाळा हे संस्काराचे केंद्रही असायला हवे. त्या शाळेतून संस्कार रुजायला पाहिजे. परंतु अलिकडील काळात काही काही शाळेतील विद्यार्थ्यात संस्कार नावाची गोष्टच दिसत नाही. त्याचं कारण काय असावं? त्याला दोन कारणं जबाबदार असतात. एक कारण असतं परीसर. तो विद्यार्थी कोणत्या परीसरातून आला? जर तो झोपडपट्टीतून आला असेल, तेथील लोकांची वारंवार होणारी भांडणं पाहात असेल तर त्या विद्यार्थ्यांचं मन हे अभ्यासात लागणारच नाही. ते बदमाशकीपणात वा भांडणातच लागेल. जरी त्या शाळेनं संस्कारीत पणाच्या चार चांगल्या गोष्टी शिकवल्या तरी त्या गोष्टी त्याच्या पचनी पडणार नाहीत. शिवाय त्याच्यात जर भांडणच करण्याचे सुप्त गुण असतील तर तो विद्यार्थी भांडण स्वखुशीनं करेल. त्यात तो वेगवेगळ्या युक्त्या योजेल. त्याला ते सांगण्याची गरज उरणार नाही. अन् दुसरं कारण असतं त्या विद्यार्थ्यांच्या घरचं वातावरण. त्या विद्यार्थ्यांच्या घरचं वातावरण काय? कोणत्या परिस्थितीत त्याला घरी वागवलं जातं? समजा त्या विद्यार्थ्याला घरी आई नसेल व सावत्र आई मारत असेल वा सावत्रपणाची वागणूक देत असेल तर त्याच्यात बदल्याचीच भावना तयार होईल. जरी तो विद्यार्थी हुशार असेल, त्याच्यात उच्च शिक्षण घ्यायची इच्छा असेल तरी त्याच्यातील बुद्धीमत्ता मारली जाईल. त्याला घरुनच शिकवले जाणार नाही. ते मुल आपलं शिक्षण अर्धवटच सोडेल.
या सर्व गोष्टी व या सर्व गोष्टीचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असतो. याचा विचार सरकारनं शैक्षणिक अभ्यासक्रमात केला की नाही केला. हा एक संभ्रमाचा विचार व आचार आहे. तसं पाहिल्यास शासन व शैक्षणिक धोरण म्हणतं की त्या विद्यार्थ्यांना वाचन हे त्याच्या वयाच्या सातव्या वर्षी यायलाच हवं. परंतु अशा वातावरणातून आलेली मुलं जर असली तर त्या मुलांकडून त्याच्या वयाच्या सातव्या वर्षी त्याला वाचन यायलाच हवं. अशी अपेक्षा करता येईल काय? शिवाय त्या विद्यार्थ्याला त्याच्या अंगातील सुप्त गुणानुसार वाचनात आवड नसेल तर ते वाचन शिकू तरी शकेल काय? महत्वपुर्ण बाब ही की खरं शिक्षण व शिक्षणातील उणीवा. या सर्व बाबी विचारात घेवून जर शाळेत औपचारिक शिक्षण देत चाकोरीबद्ध रितीनं शिकवलं तर विद्यार्थ्यात असलेल्या सुप्त गुणांचा काही अंशी विकास होईल. सर्वच बाबीतून विकास होवू शकणार नाही. तसेच सर्वच विद्यार्थी हे वाचन कौशल्य हस्तगत करु शकणार नाहीत. काही मुलं हे कदाचीत पहिल्याच वर्गात असतांना वाचन शिकतील तर काहींना तेच वाचन शिकायला दहावीचा वर्ग उजळेल तर काही विद्यार्थ्यांना जन्मजातच वाचन येणार नाही.
आज अशी बरीचशी मंडळी पाहतो की त्यांना किती शिकले असं विचारले असता चक्कं सांगतात की पाचवी शिकलो. कुणी सातवी तर कुणी दहावी सांगतात आणि स्वाक्षरी करा म्हटलं तर अंगठा लावतात. यावरुन शिक्षणाची परिभाषा लक्षात येते. महत्वाचं म्हणजे निदान वाचनात तरी शिक्षकांना धारेवर न धरता त्याला दोषी असलेलं वातावरण समजावं. याचा अर्थ सर्वच विद्यार्थी वाचन करणार नाहीत असा नाही. जसे तांदळात दोनचार खडे असतात. तसे वाचन न करणारेही विद्यार्थी दोनचार सापडतीलच. तेव्हा त्याचा बाऊ न करता शिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांवर संस्कार टाकणारा असावा. पाठ्यक्रमातून संस्काराचे मुल्य शिकवले जावे. जरी विद्यार्थ्यांच्या घरचं वातावरण चांगलं नसेल वा परीसर जरी चांगला नसेल तरी त्या विद्यार्थ्यात चांगल्या विचारांचं बीज पेरलं जावू शकते. उदाहरण द्यायचं झाल्यास शिवरायांचं देता येईल. कारण ज्या काळात शिवाजी महाराज घडले. तो काळ अतिशय धामधुमीचा होता. देशमुख, देशपांडेसारखे आपलेच वतनदार आपापसात भांडत होते. शत्रूही तसेच माणसातील कुविचारांना खतपाणी घालणारेच होते. तरीही शिवाजी महाराजात संस्काराचे बीज पेरले गेले. ते स्वराज्याच्या रुपानं फुलले. दुसरं उदाहरण डॉक्टर बाबासाहेबांचं देता येईल. बाबासाहेबांच्या वेळेसही बाबासाहेबांची शिक्षण घेण्याची परिस्थिती नव्हती. परंतु तरीही बाबासाहेब घडले. अशीच बरीच उदाहरणं आहेत की घरची, परीसराची विपरीत परिस्थिती असतांनाही आपले काही महापुरुष घडले. आपणही घडू शकतो आणि शिक्षक म्हणून या बालवयातील कोवळ्या मुलांचे भविष्य घडवू शकतो. अन् ते कार्य प्रत्येक शिक्षक करतोच. तेव्हा शासनानंही त्यांना धारेवर न धरता त्यांच्या निरपेक्ष मनानं त्यांना कार्य करु द्यावं. जेणेकरुन त्यांना विद्यार्थ्यात सुसंस्कार फुलवता येतील व प्रत्येक शाळेला संस्काराचे केंद्र बनवता येईल यात शंका नाही.
******************************************
जात फोफावत चालली होती व त्याची झळ दिक्षाला जाणवत होती. दिक्षाच्या विवाहाला गावानं स्विकारलं होतं. परंतु बिरादरी? त्या बिरादरीनं दिक्षाला स्विकारलं नव्हतं. शिवाय तिची जात जातबंधनंही पाळत होती. शिक्षणही निःशुल्क नव्हतंच जातीचं. ते पाहून दिक्षाच्या मनात विचार आला होता.
निदान शिक्षणात तरी जातीचा वापर होवू नये. जात असावी. परंतु ती माणसाची एक ओळख म्हणून. जातीवरुन जाच नसावा व जातीवरुन भेदभावही नसावाच.
जात आणि जातीप्रथा केव्हा नष्ट होणार. हा एक चिंतेचा प्रश्न होता. जातीप्रथा देशात पाळली जात होती व त्याच आधारावर भेदभाव करुन जाणीवपूर्वक जाणूनबुजून अत्याचार केला जात होता. ज्याचे बिजारोपण शाळेतच केले जात होते. शाळेतही जातीप्रथा अस्तित्वात आहे व तिथंही शिकतांना विद्यार्थ्यांचा पदोपदी अपमानच होत आहे. अन् तेवढाच त्रासही. असं सारखं जाणवत होतं. त्याचं कारणही होतं. विद्यार्थ्यांचं शाळेत नाव दाखल करतांना त्याच्या नावासमोर जात लिहिणं.
दिक्षाला वाटत होतं की तिच्या अपत्याच्या नावासमोर जात लिहावी. परंतु ती त्याची जात लिहिता तिचीच जात लिहावी. त्याचं कारण होतं, आरक्षण असणं. दिक्षाची जात चांभार असल्यानं त्या जातीचा समावेश अनुसूचित जाती गटात खुद्द बाबासाहेबांनी केला होता. तसंच आरक्षण समाप्त करण्याचा विचार करु पाहणारे नेते हे आरक्षण समाप्त करीत नव्हते. त्याचं कारण होतं निवडणूक. निवडणुकीत आपल्याला जास्तीत जास्त मतदान मिळावं म्हणून सरकारनं आरक्षण सुरु ठेवलं होतं. ज्याचा फायदा दिक्षालाच होत होता.
दिक्षाला दोन मुलं झाली होती. त्यातच तिनं विवाह केल्यामुळं ती मुलं साहजीकच आंतरजातीय विवाह केल्यामुळं तिला तिच्या पतीची जात प्राप्त झाली होती. कारण जन्मानंतर पित्याचीच जात त्या मुलांना प्राप्त होत असे व तसा नियमही होता. मात्र आरक्षणाचा विशेष फायदा होईल व आपल्याला शेवटपर्यंत लाभ मिळेल या हेतूनं दिक्षाला वाटत होतं की तिची जात मुलांसमोर लागावी. तसं तिनं घरी सांगीतलं की मला माझ्या मुलाच्या नावासमोर जात म्हणून माझीच जात टाकायची आहे व त्या जातीला विशेष असं आरक्षण आहे. तसं आरक्षण हे तुमच्या जातीला नाही.
दिक्षानं आपल्या पतीसमोर तसं म्हणताच तिच्या पतीच्या पायातील आग मस्तकात गेली. त्यानंतर काही वेळ पर्यंत त्यानं तिला समजावून पाहिलं. सांगीतलं की जन्मानंतर पित्याचीच जात मुलांच्या नावासमोर लागते. आपण जर तसं केलं तर आपल्याला लोकं वेड्यात काढतील. आपण तसं करु नये.
दिक्षानं ते ऐकलं. परंतु ती काही ऐकायला तयार नव्हती. त्याचा राग तिच्या पतीला येत होता व त्याचा राग अनावर झाला व त्यानं रागाच्या भरात त्यानं तिच्या थोबाडीत मारली. ज्यामुळं तिला तिच्या पतीचा भयंकर राग आला होता.
दिक्षा निराश होती. त्यानंतर ती चूप बसली होती. तशी रात्र झाली. रात्री दिक्षानं जेवनही केलं नाही.
सकाळ झाली होती व सकाळी काही दिक्षा लवकर उठली नाही. तिच्या मनात रात्रीचाच राग होता. काही वेळानं दिक्षा उठली व तिनं आपल्या मुलांसाठीच स्वयंपाक केला. परंतु पतीसाठी स्वयंपाक केला नव्हता.
दोन तीन दिवस झाले होते. तिचा पती आणि दिक्षा आताही बोलत नव्हते. त्यातच तिच्या पतीलाच समस्या येत होती. तिच्या न बोलण्याचा त्याला राग येत होता. अबोला सहन होत नव्हता. शेवटी त्यानंच मौन सोडून तिला म्हटलं,
"दिक्षा, मला माफ कर. मी चुकलो. तुला जसं वागायचं, तसं वाग. मुलांच्या नावासमोर जात लिहिण्याचा तुझा प्रयत्न. तो प्रयत्न रास्तच आहे. तुझं बरोबर आहे. परंतु आजच्या काळात अजुन तरी मुलांच्या नावासमोर मुलांच्या आईची जात लिहिण्याची प्रथा नाही. त्यामुळंच मी बोललो."
दिक्षाच्या पतीनं दिक्षाला म्हटलेले शब्द. ते पाहून दिक्षालाही आपली चूक कळली व तिनं ठरवलं की आता मुलांचं शाळेत नाव टाकतांना मुलांच्या नावासमोर जातच टाकायची नाही. ना रहेगा बास ना बजेगी बासरी. ना आपल्या पतीलाही राग येणार ना आपल्यालाही. तसा विचार करुन ती आपल्या मुलांचं शाळेत नाव दाखल करायला शाळेत गेली.
दिक्षानं शाळेत नाव दाखल करणं सुरु केलं होतं. त्या शाळेतील एक शिक्षिका तिच्या मुलाचा फॉम भरत होती. त्या शिक्षीकेनं त्या मुलाचं नाव गाव विचारलं. त्यानंतर ती जातीच्या रकान्यावर आली व तिनं जात विचारली.
जात...... जातीचा रकाना येताच व जात विचारताच दिक्षानं सांगीतलं की तिला मुलांच्या नावासमोर जात लिहायची नाही. परंतु ती शाळा, त्या शाळेत घरचे नियम कसे चालणार. शेवटी एक निर्णय निघाला की मुलांची जात जर मुलांच्या नावासमोर लिहिली जात नसेल तर मुलाचं नाव कसं दाखल करायचं. असं असल्यानं शेवटी तिनं आपली जात सांगीतली. आपल्या मुलांचं नाव शाळेत टाकतांना. एवढ्यात तिच्या ओळखीची एक महिला आली व तिनं तिची ओळख शिक्षकांना दाखवली व म्हणाली,
"बाई तू आपली जात बदलली ना. आतं कायले आमची जात चोरते?"
जात चोरणे. हा नवीनच प्रकार होता व दिक्षा काही जात चोरत नव्हती. तिला वाटत होतं की ती जातीनं चांभार असल्यानं तिचीच जात मुलांसमोर लागावी. तिला जाती आरक्षणाचा फायदा मिळावा. परंतु ते सगळं त्या एका महिलेसमोर फोल ठरलं होतं.
ती बातमी. दिक्षा एक सामान्य स्री नसल्यानं ती बातमी हा हा करता करता परीसरात पसरली. तशी दिक्षा कलेक्टर होती. ती शिकलेली होती. परंतु शाळेत नाव दाखल करतांना तिच्या शिक्षणाचा उपयोग झाला नाही. ती कलेक्टर जरी असली तरी ती जातीबाबत काहीही करु शकत नव्हती. तसं पाहिल्यास कितीही उच्च शिकलेला व्यक्ती जरी असेल, तो न्यायाधीश वा पंतप्रधान जरी असेल, तरी त्यालाही आपली मुलं शाळेत दाखल करतांना शाळेत आपल्या मुलांसमोर जात लिहावीच लागत होती. जाती बदल नव्हताच. शेवटी काही लोकं म्हणत होते की एवढी मोठी कलेक्टर. अन् जातीचं आरक्षण घेते.
जातीचं आरक्षण. ते आरक्षणाचा लाभ घेणारे घटक हे ती कलेक्टरच नाही, तर कित्येक शिकले सवरलेले व अति श्रीमंत असलेले लोकं घेत होते. शिवाय जात आणि आरक्षण जर नष्ट करतो म्हटलं तर लोकं ओरडत होते. ज्यातून नेत्यांच्या निवडून येण्यावर सांशकता निर्माण झाली होती. त्याचा विचार सहजच रक्षाला आला. ती विचार करु लागली की काल जातीनं जातीवरच अत्याचार केला. आजही जातच जातीवर अत्याचार करीत आहे. तसं पाहिल्यास आज पाश्चात्त्य लोकांच्या सानिध्यात समाज आल्यानं समाज थोडासा सुधारला आहे. परीवर्तन झालं आहे. त्यामुळं आज जात नष्ट व्हायला हवी असं वाटत आहे. परंतु आज जातीला अधिकच घट्टं केलं जात आहे. शिक्षणातही जात आणली आहे. विविध लाभाच्या योजना जाती माध्यमातून राबवल्या जात आहेत. शिष्यवृत्या, आरक्षण या माध्यमातून जातीला अधिकच घट्ट केलं जात आहे. शिवाय जात टिकून राहावी म्हणून मुलाला ज्यावेळेस शाळेत टाकले जाते. त्यावेळेसच त्याच्या पालकांना जात विचारली जात आहे. त्यानंतर त्याचं शाळेत नाव टाकलं जात आहे. अशा पद्धतीनं आजच्याही काळात जातीप्रथा टिकवली जात आहे व जातही टिकवली जात आहे. हे कार्य केवळ समाजमाध्यमच नाही तर सरकारकडून होत आहे. ही एक चिंतेची बाब आहे.
आज काळ बदलला आहे. त्यापाठोपाठ पोशाख, रहनसहन शिक्षण सारं बदललं आहे. लोकं शहाणे झाले आहेत. परंतु काळ बदलला असला तरी आजचा काळही असाच अनाडी काळ आहे असं वाटत आहे. त्याचं कारण आहे जात आणि जातीप्रथा. कारण अनाडी माणसंच जात व जातीप्रथा जास्त पाळतात. सुशिक्षित तेवढी पाळत नाहीत. हे लोकांना तेवढंच सत्य वाटत आहे. तसेच काल वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य व शुद्र. आज ते वर्ण नाहीत. आज जात आहे आणि जातीवरुन भेदभावही आहे.
दिक्षाला तसं वाटणं स्वाभाविक होतं. कारण अलिकडील काळातही भेदभाव होताच. जात आधारीत भेदभाव. माणसाला या काळातही माणूस समजलं जात नव्हतं.
दिक्षा विचार करीत होती, 'काल माणूस जेव्हा झाडावरुन खाली आला. तेव्हा त्याला त्याची जात कोणती हे माहीत नव्हतं. तो कामं करायचा, वडीलधारी मंडळी सांगतील तीच कामं. कालांतरानं त्यात वर्ण तयार झाले. मात्र जात, जात नसल्यानं जात म्हणजे काय? ते माणसाला माहीत नव्हतं. शिवाय माणसं कामं करीत असतांना ज्या तत्सम जाती तयार झाल्या. त्याचं कारण होतं कसब वाढवणं व कसब वाढल्यानं कामं भराभर होणं.
तिचा तो विचार. जे सत्य होतं, तेच तिला वाटू लागलं होतं. जाती कशा निर्माण झाल्या या गोष्टीचा उलगडा जातीबाबतीत तिला होऊ लागला होता. तसाच तिचा विचारही प्रगल्भ होवू लागला होता.
कामाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास सुरुवातीला काम करतांना स्वार्थ नव्हताच. कामाचं कसब वाढवणं हे धोरण होतं. ज्यातून जात निर्माण झाली. शिवाय जात ही बदलवता येत असे. एका जातीतून दुसर्या जातीत जाता येत असे माणसांना. परंतु काळ बदलला व बदलत्या काळानुसार जातीवर बंधनं आली. कोणीच आपली जात बदलवू नये अशी. त्याचंही कारण स्वार्थ नव्हताच. तर त्या जातीत येणाऱ्या नवीन व्यक्तीला ती कामं भराभर करता येत नाहीत म्हणून जात बदलविण्याची पद्धत बंद झाली.
नवीन जातीची माणसं. बदलत्या काळानुसार जे वर्ण निर्माण झाले होते. त्या प्रत्येकच वर्णात सुरुवातीच्या काळात जाती होत्याच. मात्र कालांतरानं त्या त्या वर्णातील तत्सम जाती बंद झाल्या. जातीची वर्गवारी तयार झाली व जातीचे भाग पाडण्यात आले. ज्या जातींची विभागणी वर्णात केली गेली. तेव्हाही भेदभाव नव्हताच. अशातच विदेशी लोकांचं देशात आगमण झालं व त्यांनी या देशावर राज्य करण्यासाठी एक नवी जातरहित व्यवस्था निर्माण केली. ज्या जातीव्यवस्थेचा बळी त्या काळातील ब्राम्हणच वर्ण नाही तर इतर सर्व वर्ण ठरले. ज्याची झळ संत ज्ञानेश्वर हे जरी ब्राम्हण असले तरी त्यांनाही शोसावी लागली. शिवाय त्या काळातील शुद्र वर्णातील स्रियाच नाही तर ब्राम्हणवर्णीय सर्व स्रियांना शोसावी लागली. त्या जाचातून कोणालाच सोडलं नाही. शुद्र जातींनाच नाही तर कर्तबगार स्रियांनाही सोडलं नाही. मग त्या ब्राम्हण वर्णातील का असेना.
चार वर्ण. ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य आणि शुद्र. ब्राम्हणांना देव मानलं जाई. ज्यांना देव मानावं असं एका मनुस्मृती नावाच्या ग्रंथानं लिहिलं. त्याचं कारण होतं शिक्षण. शिक्षण देण्याचे हक्कं हे ब्राम्हण वर्णाकडे अबाधीत असायचे. मग गुरु हा देवापेक्षाही मोठा म्हणजेच देवच ठरला. मात्र,त्यानं ज्याला ज्ञान दिलं, त्या व्यक्तीनं पुढं राजा बनून ज्ञानार्जन करणाऱ्या त्या ब्राम्हण वर्णाला राजाश्रय दिला. मात्र त्या वर्णाला त्यापुर्वी तेवढा दर्जा नव्हता की तो राज्याचा आधारस्तंभ असणार. हा इतिहास सांगतोच.
ब्राम्हणाचं आश्रम असायचं शिकविण्याचं. ते आश्रम राजमहालात नसायचं तर दूर अशा ठिकाणी, जिथं वाघ, सिंहांसारख्या हिंस्र प्राण्यांची भीती असायची. जिथं सदैवं साप, विंचू सारख्या प्राण्यांची भीती वाटायची. मात्र हाच ब्राम्हण व्यक्ती त्या सर्व प्राण्यांना न घाबरता तिथं राहायचा व राजाच्या मुलांना ज्ञानार्जन करायचा. तो आपल्या शिष्यांना शिकविण्याचं काम करायचा. ज्यातून काही शिष्य राजे बनत असत. ते राजे बनले की मग ते आपल्याला शिकविणाऱ्या गुरुच्या सल्ल्यानं चालत असत. जे तरुणपणात राजधानीत न राहता आश्रमात, दऱ्याखोऱ्यात शिकण्यासाठी राहायचे. ते राजे बनल्यावर आपल्याच गुरुच्या सल्ल्यानं चालत असत. कारण तेच राजाला ते आश्रमात असतांना शिकवीत असत. पुढे त्याचा शिष्य राजा बनताच राजा सल्ला घेण्यासाठी आपल्या गुरुला आश्रमात बोलावून घेत असे.
ज्ञानार्जन करणारा ब्राम्हण वर्ग. दूर दऱ्याखोऱ्यात असलेला, निसर्गाच्या सान्निध्यात असलेला त्यांचा अधिवास. पुढं ज्या राजांच्या युवराजांना त्यांनी शिकवलं. त्याच युवराजांनी पुढे राजे बनल्यावर आपल्या गुरुंना आपले आपले सल्लागार बनवले. पुढं त्यांचं राजधानीत एवढं महत्व वाढलं की राजे प्रत्येक गोष्टीत वा प्रत्येक नियम बनवितांना ब्राम्हण वर्गाचाच सल्ला घेवू लागले. ज्यांनी तद्नंतर याच गोष्टीचा फायदा घेऊन आपला स्वार्थ साधला. त्यांनी आपल्या सोईचे नियम बनवून घेतले व जे जे त्यांचे विरोधक होते. त्यांना गुलाम बनविण्याचे कार्य केले. हे जातीआधारावरुनच करता आलं हे नाकारता येत नाही.
कालचा गुरु हा ब्राम्हण वर्णातील असला तरी त्याला पाहिजे तेवढे अधिकार नव्हते. राजा जरी सर्व अधिकाराचा सर्वेसर्वा असला तरी त्याचं तेव्हापर्यंतच चालत होतं, जेव्हापर्यंत त्याची सत्ता असेल. ज्यावेळेस त्याची सत्ता जात असे वा तो म्हातारा होत असे. तेव्हा मात्र त्याचं कोणीही ऐकत नव्हतं व त्याचं कोणी ऐकत नसल्यानं नाईलाजास्तव अपमान सहन करण्याऐवजी तो अरण्यात निघून जात असे. विशेष म्हणजे त्या काळात लोकांच्या वागण्यावरुन भेदभाव होता ना कोणाच्या मतानुसार राज्य चालत असे. स्वातंत्र्य होतं व तेवढंच सार्वभौमत्वही होतं. राजा वयोवृद्ध झाल्यास तो जेव्हा अरण्यात निघून जात असे. त्यासोबतच त्याला सल्ला देणारा सल्लागार असलेला ब्राम्हण वर्णीय त्याचाच गुरु, तोही अरण्यात राजासोबत निघून जात असे. परंतु जसा काळ गेला. तसे राजाच्या अधिवासाचे नियम बदलले. त्याचबरोबर सल्लागार असलेल्या गुरु असलेल्या ब्राम्हण वर्णातील माणसांच्या अधिवासाचेही नियम बदलले. जे नियम ब्राम्हण वर्णातील व्यक्तीच्या सल्ल्यानं बनले. ज्यात भेदभाव शिरला. त्यानंतर माणसाला माणूस समजले जात नव्हते. माणसाला एका पशूगत वागणूक मिळायला लागली होती. वर्ण संपले होते व त्या वर्णाची जागा जातीनं घेतली होती. तद्नंतर जातीच्या आधारावर भेदभावाचं दृष्टचक्र सुरु झालं होतं. हे सर्व भारत स्वातंत्र्य होण्यापुर्वीपर्यंत सुरु होतं.
भारत स्वातंत्र्य झाला. त्यानंतर आरक्षण आलं व आरक्षणाचा लाभ विशिष्ट जातीलाच देण्याची पद्धत रुढ झाली. ज्या जातींनी स्वातंत्र्यापुर्वी अमानुष अमानवीय वागणूक सहन केली. परंतु त्यात एक बदल झाला. तो लाभ आपल्याला घेता यावा म्हणून बऱ्याच लोकांनी लपून छपून आपल्या जाती बदलवल्या. त्या फक्त लाभासाठी होत्या. मुळात वास्तविक रुपात जाती बदलवल्या नव्हत्या. हे बऱ्याच लोकांनी केलं. हे जरी खरं असलं तरी जाती बदलल्या होत्या हे तेवढंच खरं. जात शिक्षणासाठी व शिक्षण आणि नोकरीचा लाभ घेण्यासाठी बदलली जरी असली तरी जात बदलवता आली. मग ती लाभासाठी की असेना.
मध्यंतरीचा काळ असाच आला की जाती बदलल्या. त्या जाती शिक्षण घेण्यासाठी व लाभासाठी बदलल्या. मात्र त्यानंतर आरडाओरड झाली. ज्या जातीवर स्वातंत्र्यापुर्वी अत्याचार झाला. त्यांनी असंतोष व्यक्त केला की आमच्या जातीचं आरक्षण अशा जात बदलविणाऱ्याला नको. त्यांनी काहीच शोषलं नाही. आम्ही बरंच शोषलं आहे. त्यामुळंच जाती पडताळणी आली व पुन्हा एकदा जात शिरजोर झाली.
जात....... जी जात नाही तिला जात म्हणतात. जी जात आरक्षणाच्या निमित्यानं का होईना, बदलली गेली. बदलवताही आली. अशा कित्येकांच्या जाती बदलल्या. परंतु त्यात पुन्हा एकदा पडताळणी नावाचा राक्षस शिरल्यानं जात एखाद्या अमरवेल वा बांडगुळागत घट्ट चिकटली नव्हे तर घट्टं केली गेली.
जात ही शिक्षणात अडचणीची आहे व शिक्षणाचा लाभ घेण्यास अडसरीचा मार्ग आहे. कारण शाळशाळेत हा विद्यार्थी अमूक जातीचा, तो विद्यार्थी अमूक जातीचा अशी चर्चा विद्यार्थी आपापसात करीत असतांना आढळतात. हे अगदी बालवयापासून चित्र दिसत असतं. परंतु ती गोष्ट कोणी समजूनच घेत नाहीत. जात शाळेत असलेली पदोपदी दिसत आहे. तसेच आजही जात घट्ट करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. जरी जातीआधारावर अत्याचार आजही केला जात असला तरी. परंतु तिला नष्ट करण्याचे प्रयत्न केले जात नाहीत. तसे आदेश काढले जात नाहीत. जरी गतकाळात जातीआधारावर भेदभाव नावाच्या राक्षसानं माणसाच्या विचाराला गुरफटलं होतं. माणसाच्या मनातील विचारांच्या वाईट प्रवृत्तीवर जातीनं ताबा मिळवला होता. त्यातच जातीनं अस्पृश्यांनाही छळलं होतं त्या काळात. विशेष म्हणजे ज्या जातीनं जातीच्याच माणसांना छळलं नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारच्या यातना सहन करायला लावल्या. विविध प्रकारचे अत्याचार केले. ती जात आज नष्ट करायला हवी. तिला बांडगुळागत चिकटवून ठेवूच नये. निदान शिक्षणात तरी जात आधार म्हणून घेवू नये म्हणजे झालं. विशेष म्हणजे जात काही खेळायचा चेंडू नाही वा एखादा पदार्थ नाही की जी विद्यार्थ्यांचं शाळेत नाव टाकतांना त्याला चिकटवावी. त्याला त्याच्या जातीची ओळख करुन द्यावी. माणसानं वा पालकानं आपल्या स्वार्थासाठी आपल्या पाल्याला जातीचं बंधन घालावं. त्याला बेडी घालावी जातीची विद्यार्थी दशेपासून नव्हे तर त्याला जातीचं बांडगुळ चिकटंवावं. महत्वाचं म्हणजे सरकारनं याकडे विशेष लक्ष द्यावं. शिक्षणात तरी जातीचा वापर करु नये. जातीवर आधारीत शिक्षण नसावं. शिक्षण जातविरहीत असावं. जेणेकरुन विद्यार्थ्यांना तरी शिक्षण घेतांना जातीछळाचा त्रास होणार नाही व वर्गावर्गात तो विद्यार्थी अमूक जातीचा आहे, असे म्हणत त्याचा अपमान होणार नाही. ज्यातून त्याला मध्येच शिक्षण सोडावं लागतं.
दिक्षा जिल्हाधिकारी होती. त्यामुळंच तिच्या मनात त्या आशयाचे विचार. तसे विचार येणे साहजिकच होते व तसे विचार आलेही होते. ती स्वगतच विचार करीत होती की माझं काय चुकलं. मी माझ्या मुलाचं नाव शाळेत दाखल करतांना माझी जात टाकतो म्हटलं, तरी चाललं नाही. माझी जात न टाकता जातच नाही टाकत म्हटलं तरी चाललं नाही. ही जात तर जायलाच हवी. परंतु ती जात नाही त्यात मी तरी काय करु?
जात मुलांच्या नावासमोर न टाकण्याचा तिचा निर्धार. तो निर्धार घट्ट झाला होता. तसा तिचा मुलाच्या शाळेत मुलांची जात न टाकण्याचा निर्धार पाहून पत्रकारिता झाली. तिच्या जात न टाकण्याबाबतचे मत वर्तमानपत्रात छापून आले. ज्या पत्रात तिच्याबाजूचे असलेले मतही छापून आले. मग काय ते मत समाजमाध्यमात पसरलं. त्यातच ते प्रकरण चिघडविण्यात आलं व आंदोलनं सुरु झाली. ज्या आंदोलनात एक मोठा लोकांचा जत्था तिच्या घरावर चालून आला. त्या जत्थ्यानं तिच्या पतीला समजावलं. त्यानंतर तिच्या पतीनं तिला. परंतु तिच्या पतीनं तिला कितीही समजावलं असलं तरी तिनं त्याचं ऐकलं नाही. अशातच तिचा पतीही तिला सोडून निघून गेला होता व त्यानं घटस्फोट घेतला होता.
******************************************
जात व जातीप्रथा नष्ट व्हावी. हा तिचा विचार. जात नष्ट होवू शकते. जर जात विद्यार्थ्यांच्या नावासमोर त्याचं नाव दाखल करतांना नाही टाकली तर...... तसं पाहिल्यास जातीप्रथा व जात नष्टच व्हायला हवी. परंतु कशी करता येईल. तशी ती जाती कशा नष्ट करता येतील त्याचा गंभीरतेने विचार करु लागली होती.
दिक्षा विचार करीत होती की आज सक्षम पिढी तयार होत नाही? काल गुरुला आपण देव मानत होतो. म्हणत होतो की गुरु हाच ब्रम्ह, गुरु हाच विष्णू, गुरु हाच महेश आणि गुरु हाच सर्वेसर्वा अर्थात परब्रम्हं आहे. एवढा गुरुला मान होता. कारण गुरु जे काही विद्यार्थ्यांना शिकवायचा. त्यात ते शिकवितांना मुलांच्या समोर संकटं निर्माण करायचा. त्यात तो कधीकधी शिक्षाही करायचा. ज्यातून विद्यार्थी असे घडायचे की ते पुढं युद्ध करतांना मरणालाही घाबरत नसत. ते भेकाड्यासारखे आत्महत्या करीत नसत. तर युद्ध करुन मरण पत्करत. काही विद्यार्थी हे आपल्या संसारात यशस्वी होत. मग त्याला कितीही संकट आलं तरी. मात्र आज तसं नाही. आजचे विद्यार्थी मरणाला अजिबात घाबरत,नाहीत. ते संकटालाच घाबरतात. कारण आजचा शिक्षक हा संकटांवर मात कशी करायची ते शिकवीत नाहीत. ज्यामुळं संकटावर मात करण्याचं तंत्र विद्यार्थ्यांना माहीत नसल्यानं आत्महत्या घडतात. याला जबाबदार कोण? याला जबाबदार आजचा शिक्षक नाही तर याला जबाबदार आहे पालक. पालकांमुळंच सरकारनंही शिक्षणाचं तंत्र बदलवलं. ज्याची झळ पालकांना नाही, शिक्षकांनाही नाही, सरकारलाही नाही तर विद्यार्थ्यांना पोहोचेली आहे. यात शंका नाही.
कालमितीस माणूस बदलला नव्हता असे नाही. काळ परीवर्तनाचाच असतो. त्यानुसार बदलाव महत्वपुर्ण घटक असतो. काल माणूस माकडरुपात झाडावर राहात होता. आज तो जमीनीवर राहतो. यालाच परीवर्तन म्हणता येईल. कालचा झाडावरचा माणूस आज जसा जमीनीवर आला. तसतसा त्याच्या राहणीमानातही बदल झाला. तो बदल अनुषंगीक व कालसापेक्ष आहे.
सामाजिक परीवर्तन झालं व काळ बदलला. त्यानुसार काळ बदलला असल्यानं माणसाच्या राहणीमानातही बदल झाले. एक स्री एका नऊवारी लुगड्यावरुन साडीवर आली. त्यानंतर सलवार कमीजवर व आता जीन्स टीम शर्टवर. आज स्रियांची केससज्जाही बदलली.
आज स्री जशी बदलली. तसाच बदलला पुरूषही. त्यानं आपलं धोतर त्यागून त्याजागी फुलपँट आणला. केसाचीही फॅशन बदलवली. इतकंच नाही तर कालची डोक्यावरची टोपी जावून त्याजागी इंग्रजांची हॅट आली.
खानपान बदललं व घरेदारेही बदलली आणि रहदारीची साधनंही बदलली. त्यामुळंच साहजीकच गुरुही बदलला. कालचा गुरु हा कालचा गुरु राहिलेला नाही.
कालचा गुरु हा भेदभाव करणारा नव्हता. तो विद्यार्थ्यांना सर्वतोपरी ज्ञान शिकवीत असे. तो आपल्या मुलाला तेवढंच ज्ञान देत असे, जेवढे ज्ञान ते आपल्या शिष्यांना देत असत. परंतु आजचा गुरु आपली मुलं कॉन्व्हेंटमध्ये टाकतात. ते ज्या मुलाला शिकवतात. त्या शाळेत टाकत नाहीत. हे झालं शिकविणं. आजच्या शिक्षकांचा पोशाखही बदलला. कालचा गुरु हा धोतरवर राहात असे. आजचा गुरु शाळेत चक्कं टी शर्ट व फुलपँटवर वावरतो.
आज शिक्षकाचं जसं राहणीमान बदललं. शिकवणं बदललं, तसंच शिकविण्याचं स्थळही बदललं. कालच्या काळात मुलांवर संस्कार व्हावे म्हणून त्याला आश्रमात जावं लागत असे. तिथंच अभ्यास व्हायचा, परीपुर्ण अभ्यास. ज्यात केवळ युद्धकलाच नाही तर राजकारण, राज्यकारभार याचाही अभ्यास शिकवला जायचा. तोही परीपुर्ण. मग एकदा का परीपुर्ण अभ्यास झाला की कसोटी व्हायची. ती कसोटी मायबापासमोर व्हायची. त्यावेळेस त्यावेळच्या मुलाच्या शिक्षणात पालक ढवळाढवळ करायचे नाहीत. आपल्या मुलाला आपण टाकलेल्या आश्रमातील गुरु काय शिकवतो, कसा शिकवतो? याकडे मायबाप लक्ष द्यायचेच नाही अजिबात. ते शिक्षण परीपुर्ण झाल्यावरच दिसायचं. जेव्हा कसोटी घेतली जात असे. शिक्षणात मध्यंतरीच्या काळात मायबाप दिसत नसत. ते दिसत असत एकदम शेवटी. जेव्हा कसोटी असायची व परीक्षा घेतली जात असे.
शिकविण्याचं सानिध्य अर्थात स्थळ हेही दूर अशा ठिकाणी अर्थात अरण्यात असायचं. जरी एवढा मोठा राजमहाल असायचा. तरी तिथं शिकवायची व्यवस्था नसायची. त्याचं कारण असायचं विद्यार्थ्यांना काटक बनवणं. विद्यार्थी हे अरण्यातच राहात असल्यानं ते स्वतःचं आणि आपल्या गुरुंचं संरक्षण हिंस्र प्राण्यांपासून करायचे. त्यामुळंच विद्यार्थी साहजीकच काटक बनत असत. शिवाय विद्यार्थ्यांलाही मग मायबाप बालपणापासूनच दिसत नसल्यानं ते आपल्या गुरुंनाच मायबाप समजायचे. त्यांनाच देवही समजायचे. त्यानंतर ते त्यांच्याच आज्ञेत वागायचे. तसंच स्थळ हे निसर्गाच्या सानिध्यात असल्यानं त्या विद्यार्थ्यांना परीसर अभ्यास, भौगोलिक घटना शिकविण्याची गरज नसायची. पर्यावरण, प्रदूषण, स्वच्छता या बाबी त्याला प्रात्यक्षिक रुपात शिकायला मिळत असत. एकंदरीत सांगायचं झाल्यास मायबापाचा शिक्षणात हस्तक्षेप नसल्यानं त्यांची मुलं एवढी काटक स्वरुपाची तयार व्हायची की त्यांच्या जीवनात कोणतंही संकट आलं की ते त्या संकटाचा सामना करण्यास समर्थ असायचे.
काळ बदलला. तसं शिक्षण शिकविण्याचं स्थळही बदललं. मायबापाचा हस्तक्षेपही बदलला. शिक्षणाचं जे स्थळ अरण्यात होतं, ते स्थळही बदललं व ते स्थळ राजमहालात आलं. त्या राजमहालात, ज्या राजमहालात पर्यावरण दिसत नव्हतं. नैसर्गिक वातावरण नव्हतं. त्यामुळंच पर्यावरण म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना नैसर्गिकरीत्या शिकवता येत नव्हतं. परीसर अभ्यासाचे कुत्रिम पाठ शिकवावे लागायचे. संकट नसायचं. ना हिंस्र प्राण्यांचं संकट असायचं, ना कोणत्या स्वरुपाचं संकट की जे संकट आश्रमात शिकविणारा गुरु विद्यार्थी कितपत शिकला, हे तपासून पाहण्यासाठी निर्माण करायचा.
एकंदरीत सांगायचं झाल्यास काळ बदलला व बदलत्या काळात जिकडे तिकडे पसरलं अंधाराचंजाळं. अंधानुकरण. प्रदुषण वातावरणाचं नाही तर विचारांचं होत गेलं. ज्यातून कलुषीत विचार शिकवले जायला लागले. आश्रमपद्धती केव्हाचीच अदृश्य झाली व त्याजागी आली कुत्रीम शिकविण्याची व्यवस्था. ज्यात मायबापाचा वारंवार हस्तक्षेप होत असल्यानं गुरुंना अभय नव्हतं व त्याला ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवायचं होतं. ते तो शिकवू शकत नव्हता. साहजीकच तंत्र बदललं व बदलत्या तंत्रानुसार शिक्षण बदललं.
आज शिक्षणाची अवस्था वाईटच आहे व या वाईट अवस्थेनुसार शिक्षण हे कालच्या शिक्षणासारखं वाघिणीचं दूध राहिलेलं नाही. आज मायबापाचा वारंवार शिक्षणात हस्तक्षेप होत असल्यानं मुलांसमोर गुरु संकट निर्माण करु शकत नाही. त्यातच मुलं ही काटक स्वरुपाची तयार होत नाहीत. ती भेकड स्वरुपाची तयार होतात व थोडंसं जरी संकट आलं तरी घाबरुन जातात. महत्वपुर्ण बाब ही की शिक्षणापुढं मायबापानं आपल्या मुलांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवू नये. त्याचा बाऊ करु नये. गुरु त्यांना अभ्यासाविषयी करीत असलेल्या शिक्षा ह्या किरकोळ स्वरुपाच्या असतात. त्याचा बाऊ करु नये. ते,एक संकटच. काही पालक आता शिक्षणाच्या स्थळाची व्यवस्था बदलण्यानं त्याचा बाऊ करतात.
कोणतेही संकट. ते संकट येणारच आहे. ते जेव्हा येईल, तेव्हाच मुलंही काटक बनतील. त्यानंतर ते जीवनातील कोणत्याच संकटाला घाबरणार नाहीत. कारण मायबाप काही त्याच्या समस्त जीवनाला पुरत नाहीत. सगळा संसार मायबापानंतरही त्यांनाच सांभाळावा लागतो. जर त्या विद्यार्थ्यांच्या समोर त्यांचा सर्वांगीण विकास करीत असतांना परीक्षारुपी वा किरकोळ शिक्षेच्या स्वरुपाचं संकट निर्माणच झालं नाही तर ते जीवनातही यशस्वी होणार नाही याची पालकांनी दखल घ्यावी. त्यामुळं काळ जरी बदलला असला तरी बदलत्या काळानुसार पालकानं बदलावंच. बदलू नये असं नाही. परंतु असा बदलाव करु नये की जो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देवू शकेल. तुमच्या बदलावानं आपल्याच विद्यार्थ्यांचं आयुष्य उध्वस्त होवू शकेल.
दिक्षाला वाटत होता बदलाव. परीवर्तन. ते परीवर्तन आजतागायत झालेलं नव्हतं. ना होणार असं वाटत होतं. त्याचं कारण होतं आजतागायत बदलाव न होणं.
ती विचारच करीत होती. विचार करता करता तिचं लक्ष पतंगाकडे गेलं. आकाशात भरपूर पतंगा उडत होत्या. एक एक पतंग कटत होती. त्याचबरोबर विचार आला.
'ही पतंग. ही पतंग म्हणजे जीवन. जोपर्यंत पतंगाला प्राणवायू मिळतो. तोपर्यंत पतंग आपल्याला आकाशात दिसते आणि जेव्हा त्या पतंगाचा प्राणवायू संपतो. तोच ती पतंग आकाशातून आपलं अस्तित्व संपविते व ती जमीनीवर येते अर्थातच पतंग ही मृत्यू पावते. तिचं जीवन संपतं. तसंच माणसाचं आहे. माणसाचं जीवनही पतंगासारखंच. माणसालाही जेव्हा प्राणवायू मिळत नाही. तेव्हा माणूसही संपतो पतंगासारखाच.'
पतंग काही महत्वाचा नाही. कारण पतंगातून मृत्यू होत असतो. पतंगातून मृत्यू होतो. हे मायबापांनाही माहीत असतं. तरीही मायबाप आपल्या पाल्यांना आवडीनं पतंग घेवून देत असतात. ज्यात पतंगातून मृत्यू होतो व दोषी मायबापच असतात. परंतु ते आपल्या स्वतःवर दोष येवू देत नाहीत. विचार करतात की आपल्या लेकराचा थोडा ना पतंगातून जीव गेला. दुसर्याचा जीव गेला ना, दुसर्याचा मुलगा मरण पावला ना. बरे झाले.
पतंग उडविणे ही लोकांना एक चांगली गोष्ट वाटते. ते पतंग उडविण्याला उत्सव समजतात व पतंग उडवीत असतात. ज्यातून कोणाचे अकारण जीव जात असतात. आता पतंग उडविण्यातून धोके निर्माण झाल्यानं लोकांनी पतंग उडविणं बंद केलेले नाही तर लोकांनी पतंग हे विशिष्ट दिवशीच उडविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तीळसंक्रात, गणराज्यदिन याच विशिष्ट दिवशी ते पतंग उडवीत असतात व त्याच दिवशी अति बेभानपणे पतंग उडवून आपला आनंद साजरा करण्याची पद्धती त्या दिवशी प्रचलीत केलेली आहे. त्या दिवशी पतंग उडविणाऱ्या लोकांवर कुणीही बंदी आणत नाही व लोकांना मनसोक्तपणे पतंग उडवू देतात.
पतंग उडविणे हा अतिशय घातक खेळ असून तो तेवढाच जीवघेणाही आहे. तसं पाहिल्यास कोणतेही खेळ हे साधेसुधे नाहीत. क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, शंकरपट व पोळ्याला खेळला जाणार गोटमार हा खेळ, इत्यादी. त्यात पतंग हा देखील खेळ मोडतोच. याबाबतीत एका व्यक्तीचा संवाद. तो म्हणत होता,
"पतंग नाही उडविणार तर कोणता खेळ खेळणार."
ते त्याचं बोलणं. त्यावर दुसरा एक व्यक्ती म्हणाला,
"कंचे खेळावेत."
"कंचे खेळण्यात धोके नाहीत असं वाटंतय का?"
"होय. अगदी तसंच वाटतंय."
"अहो, कंच्यातून वाद निर्माण झाल्यावर एखाद्यानं एखादा कंचा त्याच्या गुप्त भागावर जोरानं मारल्यास त्यातही जीव जावू शकतो. जीव जावू शकतो का नाही?" ते त्याचं उत्तर. त्यावर पलीकडील व्यक्ती निरुत्तर झाला.
केवळ पतंग वा कंचेच खेळणं नाही, तर असे कितीतरी खेळ आहेत की त्या खेळात लोकांचा जीव जावू शकते. जसे क्रिकेट, विट्टीदांडू, लघोरी, धावन, जिम्नॅस्टिक्स, कबड्डी, खो खो, लंगडी. अशी बरीच नावं देता येतील की त्यामुळंच जीव जावू शकतो. थोडंसं चुकलं खेळतांना की जीव जाणारच.
बाकीच्या खेळात चुकांना वाव नाही. चुकलं खेळतांना की जीव जातो. परंतु पतंग खेळात चुकण्याचा प्रसंगच उद्भवत नाही. मात्र या खेळाचा धाग्याशी संबंध येत असल्याने व या खेळातील धाग्यापासून माणसांचे गळे, पशुपक्षांचे गळे, नाही तर संपुर्ण जीव जात असल्यानं हा खेळ खेळायला बरा वाटत नाही. त्यातच नॉयलान मंजा. जो कधी सडत नाही. सडून गळत नाही वा नष्ट होत नाही. शिवाय असा नॉयलान मंजा पक्षांच्या पायात अडकल्यास पक्षी त्यातून निसटू शकत नसल्यानं ते उपाशी पोटी तडफडत मरण पावतात. ज्यातून पक्षी कमी होतात व पक्षांवर ही सक्रांत आलेली दिसते. तसेच हाल पशुंचेही असते.
नॉयलान मंजा. हा नॉयलान मंजा सरासरी तुटत नाही, सडत नाही, गळत नाही, नष्टही होत नाही. तो ओढल्यास रबरासारखा लांब होतो. तो तिक्ष्ण असून अतिशय धारधार असतो. जो गळ्यावर आल्यास गळ्याचा पुर्ण भाग कापला जातो. ज्यात नसा असतात. रक्तवाहिन्या असतात व त्या रक्तवाहिन्या तुटून गेल्यानं त्यातून रक्तस्राव होतो. असा रक्तस्राव बराच झाल्यानं व्यक्ती गतप्राण होतो. ही तीव्रता बरेचदा जाणवते. याबाबतीत एक व्यक्ती म्हणाला,
"नॉयलान मंजाला दोष दिला जातो. मग साधा मंजा घातक नाही काय?"
त्या व्यक्तीचं म्हणणं बरोबर. साधा मंजाही गळे कापू शकतो. तोही तेवढाच घातक आहे.
त्या व्यक्तीचं म्हणणं बरोबर होतं. साध्या मंजानंही नुकसान होतच होतं व गळेही कापले जात होते.
पतंग....... पतंग उडविल्यानं पशूपक्षांचेच नाही तर माणसांचेही गळे कापले जात असतात. ज्यात निरपराध माणसं विनाकारण मृत्युमुखी पडत असतात. ज्यातून कोणाचा पती मरण पावल्यास संसार तुटतो. कुणाचा पुत्र मरण पावल्यास शल्य जाणवतं आणि कोणाचे आईवडील मरण पावल्यास छत्र हरवतं. ज्यात पालकांचा दोष असतो. पतंग उडविल्यानं आपलं काय नुकसान होणार आहे. असा विचार करीत लोकं आपल्या पाल्यांना ते रडतात, म्हणून त्याची हौस पुरविण्यासाठी आणि त्याला आनंद मिळवून देण्यासाठी पतंग व मंजा घेवून देतात. ज्याने कधीकधी त्यांच्या पाल्याचंच नुकसान होत असते. ज्यात कधीकधी ते पाल्य पतंग उडवितांना नॉयलान मंजाचा वापर करतात. ज्यांना पोलीस पकडून नेत असतात.
अलिकडील काळात पतंग उडविण्याचा छंद वाढत चाललेला आहे. आज तिळसंक्रात आहे व तीळसंक्रात हा सण जरी तिळगुळ घ्या व गोड गोड बोला. असा गोड बोलण्याचा संदेश देत असला तरी हा दिवस कोणाच्या तरी आयुष्यात अति वेदनाशामक वेदना आणणारा दिवस आहे. जर कोणी पतंग उडविणार असेल तर....... या गोष्टीचा नक्कीच सर्वांनी विचार करावा व जरी तीळसंक्रात हा सण आपण पतंग उडविण्याचा सण म्हणून साजरा करीत असलो तरी पतंग कोणीही उडवू नये. तशी शपथ आपण घ्यावी.
उद्या लोकं तीळसंक्रात एक गोड बोलणारा सण म्हणून साजरा करणार आहेत. ज्यात कोणाचा जीव जावू शकतो व त्याला पतंग उडविणाऱ्याचा राग येवू शकतो. असे होवू नये. म्हणून कोणीही पतंग उडवू नये व तीळसंक्रात हा सण पतंग उडविण्याचा दिवस म्हणून साजरा करु नये. तर तो गोड सण म्हणून साजरा करावा. तसंच पालकांनीही या दिवसाच्या निमित्याने त्यांचा पाल्य रडला तरी आपल्या पाल्यांना पतंग घेवून देवून दोषी होवू नये. ज्यातून कोणाची मान कापण्यातून वाचेल. कोणाचा जीव जाण्यातूनही वाचेल नव्हे तर कोणाचा संसार तुटून त्याचं विनाकारण नुकसान होण्यातून वाचेल यात शंका नाही.
दिक्षाला अंधश्रद्धा आवडत नव्हत्या. ना प्रथा परंपरा आवडत होत्या. ना जातही आवडत होती. ती आपल्या मुलाचंच नाव टाकायला गेली, तेव्हा त्याचं नाव न घेतल्यानं ती खजिल झाली होती. अशातच कुंभमेळा भरला होता.
कुंभमेळा..... ज्या कुंभमेळ्याचा योग हा बारा वर्षातून एकदाच येत होता. त्या कुंभमेळ्यात कितीतरी भावीक जात होते. परंतु यावेळचा कुंभमेळा विशेष होता. लोकं म्हणत होते की त्या कुंभमेळ्यात आंघोळ केल्यास पाप धुतल्या जातं.
दिक्षा तेच ऐकत होती. परंतु तिचा कुंभमेळ्यावर विश्वास नव्हता. तिला वाटत होतं की लोकांनी कुंभमेळ्यात आंघोळ करायला जाण्याऐवजी इथेच राहून मायबापाची सेवा करावी. आंधळ्या, लंगड्या, लाचार, वृद्ध, बालक यांची सेवा करावी. म्हणजे त्यांचं इथंच पाप धुतल्या जातं. लोकं जे करायला हवं, ते करीत नाहीत व दोष दुसर्यांना देतात.
********************************************
कुंभमेळ्यातील स्नानावर एक गाणं प्रसिद्ध आहे. कभी प्यासे को पानी पिलाया नही. गंगा नहाने से क्या फायदा? गंगा नहाकर कोई फायदा नही, अगर मन के तुच्छ विचार न त्यागे तो. अशा आशयाचं ते गाणं. गाणं जुनं जरी असलं तरी आजच्या समाजातील लोकांच्या वागण्यावर चपखल बसतं.
सध्याच्या काळात कुंभमेळा सुरु होता. हा योग दर बारा वर्षांनी येत होता. लोकं कुंभ स्नान करायला आवडीनं जात होते. तेथील पाण्यात आंघोळ करीत होते. हे सगळं बरोबर असून यात एक आख्यायिका होता की त्या कुंभमेळ्यात आंघोळ केल्यानं आपलं सबंध पाप धुतलं जातं.
अंघोळ करायला हवी. एकदा तरी कुंभमेळ्यात जायला हवं. परंतु आपलं पाप धुतलं जाईल या विचारानं जावू नये तर एक आस्था म्हणून जावं. फिरायला जायचं आहे म्हणून जावं. त्याचं कारण होतं की कितीही वेळेस आपण कुंभमेळ्यात आंघोळ केली आणि मनात जर कुविचारांची कालवाकालव ठेवली तर कुंभमेळ्यात आंघोळ केल्याचा फायदाच होणार नाही. त्यासाठी मन स्वच्छ निर्मळ असायला हवं. ते कुंभमेळ्यात जाण्यापुर्वीच स्वच्छ केलेलं बरं. तसेच आंघोळ करायचीच असेल तर शरीराची स्वच्छता करण्याऐवजी आधी मनाची स्वच्छता करावी. मगच कुंभमेळ्यात आंघोळ करायला जावं. परंतु हे जरी बरोबर असलं तरी लोकं त्याचा विचार करीत नव्हते व ते कुंभमेळ्यात जात होते. कोणी फिरायला जात तर कोणी वात्रटपणे वागायला जात होते.
दिक्षाला असाच एक व्हिडिओ फेसबुकवर दिसला. त्यात दाखवलं होतं की एका व्यक्तीला लोकं चांगलं बदडून काढत आहेत. त्याचं कारण आहे, त्यानं शिवपिंडीवर पाय ठेवून फोटो काढणे. हा कुविचारच. असे करायला नको होतं व कुणाच्याही भावना दुखवायला नको होत्या. त्यासाठीच दिक्षानं म्हटलं होतं की मनातील कुविचार त्यागून कुंभमेळ्यात जावं व स्नान करावं. ज्या स्नानाला खऱ्या स्वरुपात अर्थ प्राप्त होईल. म्हणतात की बादशाहा अकबरही कुंभमेळ्यात गेला होता व त्यानंही कुंभमेळ्यात स्नान केलं होतं. तेव्हापासून तेथील स्नानाला शाही स्नान म्हटलं जातं. आज तेथे मुस्लीम समुदाय जात नसला तरी तेथील शाही स्नानाला विशेष महत्व होतं.
कुंभस्नान हे पुर्वीपासूनच सुरु होतं. परंतु हे जरी खरं असलं तरी महापुरुष हेच आपले आधारस्तंभ आहेत की ज्यांनी कुंभमेळ्यात स्नान करण्याऐवजी सद्विचार बाळगा असा संदेश दिलेला आहे. म्हणतात की वाईट विचारांचं गवत आपोआप येतं, पण चांगल्या विचारांच्या गोष्टी नेहमी पेराव्या लागतात. आज महापुरुषांना व देवांनाच शिव्या हासडण्याची पद्धत सुरु झाली आहे. जे झाले नसते तर कदाचीत सुधारणा झाल्या नसत्या. जरी देव हा पाषाणाचा असला तरी त्याचेवर आस्था ठेवून लोकांनी आपल्यात सुधारणा घडवून आणल्यात. शिवाय निदान देव नावाच्या संकल्पनेला घाबरुन तरी लोकं चांगले वागत असतात. चांगले वर्तन करीत असतात. तरीही काही कूपमंडूक देव नावाच्या संकल्पनेला घाबरत नसल्यानं समाजात भेदभाव मग तो स्पृश्य अस्पृश्य, गरीब श्रीमंत का असेना, तो संपला नाहीच. सुरुच राहिला. तो संपला नसता. अनिष्ट रुढी, प्रथा परंपरा संपल्या नसत्या. अंधश्रद्धाही तेवढ्याच जास्त प्रमाणात राहिल्या असत्या. माणूसपण कधीच लाभलं नसतं. माणूस हा माणूस बनला नसता व तो आजही त्याच झाडावरील माकडासारखा माकडच राहिला असता. जर महापुरुष झाले नसते तर.......
कुंभमेळा असंच सुधारणेचं प्रतीक. परंतु ज्यांनी कुंभमेळ्याला समजून घेतलं त्यांच्यासाठी. इतरांसाठी नाही. इतरांसाठी ते करमणुकीचं ठिकाण. मग ते शिवपिंडीवर पाय ठेवून फोटो काढणं का असेना. तसं कोणीही करु नये म्हणजे कुंभमेळ्यात आंघोळ करण्याचं सार्थक झालं.
महापुरुष....... महापुरुष हे गतकाळात होवून गेले. त्यांनी आपल्याला बरंच काही दिलं. त्यांनी कुंभमेळ्यात स्नानाला महत्व दिलं नाही तर त्यांनी चांगल्या मनातील निर्मळ विचारांना महत्व दिलं. त्यांना आपले पुर्वजही म्हणता येईल. ज्यात आपण ज्यांना देवाचा दर्जा दिला. आपण त्यांना अवतार समजतो. ते आपले महापुरुषच. असे हे महापुरुष आपल्याला बरंच काही शिकवतात. त्यांच्याकडून बरंच काही घेण्यालायक असते.
दिक्षाला एक दिवस विचार आला. ती घराच्या ओसरीत बसली होती. जिथं गार वारा सुटला होता. अचानक लोकांचा आवाज येत होता. जो आवाज तिच्या कानात शिरला होता. तो आवाज होता, शिवाजी महाराज की जय.
एकोणवीस फ्रेब्रुवारी. शिवाजी महाराजांची जयंती. ज्या राज्यामध्ये निजामशाही आणि आदिलशहाचा वचक होता. ज्या राज्यामध्ये देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार आपापसात भांडत होते. तसेच ज्या राज्यामध्ये मराठ्यांची अस्मिताच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून जात होता. त्या राज्याला आदिलशाही आणि निजामशाही मुक्त करणारा माणूस जर कोणी असेल, तर त्यात शिवाजी महाराजांचं नाव अग्रस्थानी घ्यावं लागतं. अगदी बालपणापासूनच शिवरायांचा स्वभाव हा दांडगा असल्यामुळं शिवरायाच्या वाटेला कोणी जात नसत.
शिवरायांबाबत सांगायचं झाल्यास शिवरायांना त्यांची आई जीजाबाईनं घडवलं. ज्यावेळी शिवरायांचा जन्म झाला, त्यावेळी त्यांचे वडील शहाजीराजे हे लढाईत गुंतले होते. त्यातच शहाजीराजांनी शिवरायांचा जन्म चांगल्या परिस्थीतीत व्हावा म्हणून लढाईवर जाण्याआधी जीजामातेला शिवनेरी किल्ल्यावर अगदी सुरक्षीत ठेवलं. तिथंच पुढं शिवरायांचा जन्म झाला. ती तारीख म्हणजे १९ फेब्रुवारी १६३०. या तारखेबाबतही लोकांमध्ये संभ्रम आहे. कोणी तीन मार्च तर कोणी एक मे ही शिवरायांची जन्मदिनांक सांगतात.
लहान असतांना शिवराय हे आईच्या सानिध्यात होते. शिवनेरीवर असलेल्या शिवाई देवीच्या नावावरुन शिवाजीचं शिवाजी नाव ठेवल्यानंतर त्याचं खरं शिक्षण हे आईनं केलं एवढंच नाही तर त्या शिवरायाचा पाहिजे त्या प्रमाणात लाड न करता त्याला स्वराज्यासाठी वाहून टाकलं. त्या शिवरायांना लहानपणापासूनच राम, क्रिष्ण व अभिमन्यूच्या कथा सांगून शुरवीर कसे असतात ते अगदी शिवरायांच्या रोमारोमात भरलं. त्यातच त्यांना आध्यात्मीक धडे सुद्धा दिले. संत ज्ञानेश्वरापासून तर संत तुकारामापर्यंतच्या गोष्टी त्यांना शिकवल्या. एवढंच नाही तर शिवरायांना युद्धनीती आणि राजनीती शिकविण्यासाठी वेगवेगळ्या शिक्षकांची शिवनेरीवर नियुक्ती केली. त्यातच ते राज्यकारभार करणे, घोडा भरधाव फेकणे, चोरवाटा शोधणे, तलवार चालवणे, भाला फेकणे इत्यादी गोष्टी शिवराय शिकले.
अगदी लहानग्या वयात शिवराय मातीचे किल्ले बनवणे, हत्ती बनवणे हे खेळ खेळायचे. त्यातच लहान वयात त्यांनी त्या सह्याद्रीच्या द-याखो-यातील लहान लहान आदिवासी मुलांना आपले मित्र बनवले. ज्या मित्रांनी पुढे जावून शिवरायांसाठी आपल्या प्राणांची आहूती दिली. पण शिवरायांवर थोडीशी आचही येवू दिली नाही. या मावळ्यांच्या मुलांसोबत शिवराय काय करायचे? तर चोरवाटा शोधायचे, त्या मुलांना तलवारबाजी शिकवली, एवढंच नाही तर याच शिवरायांनी रानावनात जावून मावळ्यांच्या मुलासोबत वावरतांना आपलं जेवन त्यांना दिलं व त्यांची कांदाभाकर त्यांनी खाल्ली. त्यामुळं साहजिकच शिवरायांबाबत आत्मीयता मावळ्यांच्या मुलांमध्ये निर्माण झाली. ही आत्मीयता निर्माण करण्यासाठी शिवराय त्या मावळ्यांच्या मुलांच्या घरी जात. त्यांच्या आईवडीलांशी संवाद साधत. एवढंच नाही तर त्यांच्या मायबापाशी संवाद करीत. याच संवादातून पुढे स्वराज्याचं महत्व त्या मावळ्यांच्या मायबापांनी आपल्या मुलांनाही समजावून दिलं होतं. हेच स्वराज्याचं महत्व शिवराय स्वतःही मावळ्याच्या मुलांना समजावून देत.
अगदी अल्प वयातच मावळ्यांना घेवून शिवरायांनी मावळ्याच्या मुलांसमोर रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यातच ज्या वयात मुलांचं खेळण्याबागडण्याचं वय असतं. त्या अगदी अल्प वयात म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षीच त्यांनी तोरणा किल्ला जिंकला. त्यातच जे काम आपण आपल्या उभ्या हयातीत करु शकत नाही. त्याच अल्प वयात त्यांनी सर्व गोष्टीचा विचार करुन तोरणा किल्ल्याची डागडुजी केली. त्याला नवं नाव दिलं प्रचंडगड. त्यातच या तोरण्याचं बांधकाम करतांना ज्या चार सोन्याच्या घागरी शिवरायांना सापडल्या, त्या सोन्याचा वापर शिवरायांनी पुढे दुसरे किल्ले बांधण्यासाठी केला. पुढे एक एक करीत करीत शिवरायांनी जे किल्ले जिंकण्याचा सपाटा लावला. त्याला थांबवणं कठीण होतं.
आदिलशहानं शहाजीराजांना समजावून पाहिलं. परंतू काहीच उपयोग झाला नाही. हे पाहून की काय, आदिलशहा चिडला. त्यांनी त्यावर उपाय काढण्यासाठी विजापुरात बैठक बोलावली.
बडी साहेबा. आदिलशाही महाराणी ही अध्यक्षस्थानी. पैजेच तबकात विडा. त्यांनी उचलावा. जो शिवाजीचा अंत करेल. मग घोषणा झाली. घोषणेनुसार विजापूर दरबारातील बडा तुफान ताकदीचा व धिप्पाड देहाचा सरदार अफदलखान उभा झाला. त्यानं तबकातील विडा उचलला व आश्चर्य करीत म्हटलं.
"कोण शिवाजी? कुठला शिवाजी? मी आत्ताच त्याला जीवंत वा मारलेला पकडून आणतो."
अफजलखान तुफान ताकदीचा व धिप्पाड देहाचा होता. त्याला आपल्या ताकदीवर गर्व होता. त्याला वाटत होतं की आपण शिवरायांचा बिमोड करु शकतो. तसं पाहता त्याला शिवरायांच्या बाबतीत कोणतीच माहिती नव्हती.
विडा उतलताच तो प्रतापगड पायथ्याशी आला. शिवाजी युद्धासाठी सज्ज व्हावा वा शरण यावा. म्हणून त्यानं आजूबाजूच्या गावांना व विशेषतः देवळांना त्रास देवू लागला. जबरदस्तीनं तो या तमाम महाराष्ट्रातील स्रीयांच्या इज्जती लुटू लागला. एवढेच नाही तर पशूधनांनाही ठेच पोहोचवू लागला. त्याच्या अशा प्रकारच्या उपद्रव्यानं शिवरायांना वाईट वाटत होतं. शेवटी त्यांनी विचार केला की आपण अफजलखानाला ठार करायचे.
अफजलखानाला समोरासमोर मारता येत नाही. म्हणून शिवरायांनी त्याच्याशी युक्तीनं लढा देण्याचा विचार केला. त्यांनी खान बेसावध राहावा म्हणून आपण त्यांना फारच घाबरतो अशीही सुचना पाठवली. त्यातच खान बेसावध तर झालाच. शिवाय तो निर्भीडही झाला. शेवटी तो शिवरायांच्या म्हणण्यानुसार वागायला तयार झाला.
शिवरायांनी खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला बोलावले. भेट ठरली. शिवरायांनी जय्यत तयारी केली. कारण त्यांना खानाचा डाव माहित होता. भेटीदरम्यान शिवरायांनी खानाच्या म्हणण्यानुसार आलिंगण दिलं. त्यातच शिवराय सावधच होते. शेवटी खानानं कपटी डाव साधला. शिवरायांवर कट्यारीचा वार केला. त्यातच शिवरायांनी तो वार पुरता हुकवला व अस्तनीतून बिचवा काढून खानावर वार करुन वाघनख्यांनी खानाचं पोट फाडून टाकलं. झालं, क्षणातच धिप्पाड देहाचा खान मरण पावला.
खान मरण पावताच शिवरायांचा दरारा आजूबाजूला फारच वाढला. एकेक क्लुप्त्या करीत शिवराय आदिलशाहाला पराभूत करीत होते. निजामशाही तर पावलंच बाहेर काढत नव्हती. शिवरायांसमोर शेवटी या आदिलशाहानं शरणागती पत्करली. त्यानंतर शिवरायांनी आपला मोर्चा मोगलांकडे वळवला.
त्यावेळी मोगल सम्राट औरंगजेब ह्यानेही डाव साधला. त्यानं शिवरायांच्या पराक्रमी चर्चा ऐकल्या होत्या. त्यानं शिवरायांना भेटीला आग्र्याला बोलावले. ज्यावेळी शिवराय आग्र्याला औरंगजेबाला भेटायला गेले. तेव्हा शिवराय महाराष्ट्राचे राजे असूनही त्यांचा आग्र्याला अपमान केला गेला. त्यांना दुस-या क्रमांकाच्या रांगेत उभे केले. शिवाय त्यांना नजरकैदेतही टाकले.
नजरकैदेत पडल्यानंतर शिवरायांनी आजारपणाचं सोंग केलं. त्यातच एक दिवस ते व त्यांचा मुलगा संभाजी मिठाईच्या पेटा-यात बसून ते प्रसारही झाले.
शिवरायांनी आपल्या जीवनात खुप सा-या गोष्टी केल्या. मुसलमान झालेल्या नेतोजी पालकरांना हिंदू धर्मात आणले. तानाजीच्या मृत्यूनंतर त्याच्या उमरठे गावी जावून रायबाचं थाटामाटात विवाह केला. त्यांनी शायीस्तेखानाची बोटं तोडली. एवढंच नाही तर पुरंदरच्या लढाईत मुरारबाजी मेल्ल्यानंतर होत असलेला स्वकीय माणसाचा संहार पाहून पुरंदरचा तह केला. त्यातच तेवीस किल्ले आणि चार लक्ष होनाचा मुलूख मोगलांना दिला. पुढे राज्याची गरज लक्षात घेता कोंढाण्यासारखा बळकट किल्ला हातात घेतला. त्यामध्ये तानाजीसारखा बालपणीचा मित्र गमवावा लागला.
शिवाजीला वाचविण्यासाठी ज्या मराठे सरदारांनी प्राणांची बाजी लावली. त्यात बाजीप्रभू, तानाजी, जीवा महाला, मदारी मेहतर, शिवा काशीद यांचं बलिदानही विसरता येत नाही. त्यांनी जर बलिदान दिलं नसतं, तर शिवाजी महाराजंही दिसले नसते. त्या असंख्य शिवाजींच्या मावळ्यांमुळे हे स्वराज्य उभं राहिलं. त्याला पुढं नाव दिलं हिंदवी स्वराज्य.
हिंदवी स्वराज्य हे मावळ्यांच्या बलिदानातून साकार झालेलं स्वराज्य. प्रत्येक आई आपल्या मुलाला कोणतीही क्षति पोहोचू नये यासाठी प्रयत्न करते. स्वतः संकटं झेलते. खपते, मरते. पण जीजाबाईनं त्याचा विचारच केला नाही. तिला माहित होतं की तोरणा गडाच्या युद्धात शिवराय मरुही शकते. तरी प्रेरणा दिली की हे शिवा, तू हा तोरणा जिंकू शकतोस आणि काय आश्चर्य तोरणा जिंकला. पुढे अफजलखान भेटीलाही जातांना शिवराय आई जीजामातेला म्हणाले की वाचलोच तर परत येईल. नाही वाचलोच तर मासाहेब आपण संभाजीला गादीवर बसवायचं व राज्य सांभाळायचं. त्यावेळी त्याच्या जन्मदात्या आईला काय वाटलं असेल. तरीही तिनं आज्ञा दिली आणि सांगीतलं की तू जर माझा मुलगा असशील तर त्या अफजलखानाचं मुंडकंच कापून आणशील. पुढं आग्र्यालाही जातांना तेच घडलं.
शिवरायांनी राज्यभिषेक केला खरा. पण हे राज्य निर्माण करण्याचं स्वप्न जीजाबाईनं दाखवलं होतं. नव्हे तर ते राज्य तमाम मावळ्यांच्या बलिदानातून साकार झालं आहे. आज मात्र याच शिवरायांच्या नावावर केवळ राजकारण सुरु आहे. ऐरी, गैरी सारीच मंडळी निव्वळ शिवाजी महाराज की जय तर म्हणतात. पण तसे वागण्याचा प्रयत्न करतात का? निव्वळ दाढी वाढवून वा वेषभुषा करुन शिवाजी बनत नाही, तर शिवाजी बनायला ती शिवरायांची दृष्टी हवी. ती स्वप्न दाखवणारी जीजामाताही हवी आणि ते प्राणांची बाजी लावणारे मावळेही हवे. बापू बापू म्हणत अगदी तरणेताठ होईपर्यंत जोपासणारी आमची आई नको आणि महत्वाची एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती ही की जे शिवाजी शेकडो महिलांची अब्रू वाचवीत होते. आपण आपल्या वस्तीतील एका जरी महिलांची अब्रू वाचवली तरीही शिवराय बनल्याचं सार्थक होईल. तसेच ज्याप्रमाणे शिवराय राज्यातील प्रत्येकाला मदत करीत होते. आपण एका व्यक्तीला जरी मदत केली तरी आपल्यातला शिवाजी प्रकर्षानं दिसेल यात शंका नाही. शिवरायांनी तर एक आदर्श निर्माण करुन दिला आपल्यासमोर. आपणही त्याच आदर्शाचा आदर्श बाळगून केवळ युद्धानं नाही तर शांतीनं या काळातील आदिलशाही, निजामशाही व मोगलशाही वृत्तीच्या माणसाच्या मनातील वाईट विचारांचा बिमोड करावा. जेणेकरुन शिवाजीच्या आत्म्यालाही शांती वाटेल व ख-या अर्थानं हिंदवी स्वराज्य नाही तर बलाढ्य अशा स्वरुपाचं स्वराज्य आपल्याला दिसेल यात शंका नाही.
दिक्षाला विचार येत होता तो महापुरुषांचा. आज महापुरुषांना शिव्या हासडत होते लोकं. तिचा तो विचार. ते महापुरुष. ज्यांना आपण अवतार समजतो. त्यात राम व क्रिष्णाचा समावेश होतो. त्या राम व क्रिष्णापासून लोभाचा त्याग करणं, ही गोष्ट शिकता येते. राम प्रसंगी वनवासात गेले. परंतु त्यांनी राज्य बळकावण्याचा प्रयत्न केला नाही वा ते मोठे असल्यानं त्यांनी राजगादीवर आपला अधिकार सांगितला नाही. ही त्यागाची भावना रामानं शिकवली तर कंसवध झाल्यानंतर पुर्ण राज्य हाती आल्यावरही आपल्या आजोबाला म्हणजेच उग्रसेनाला राजगादीवर बसून राज्य बघणारे क्रिष्ण, बलराम, त्यांच्यापासूनही लोभ करु नये हेच शिकता येतं.
कर्ण दानवीर होता. त्याच्या दानशुरतेचा जोडीदार आजपर्यंत कोणीच झाला नाही. त्याला माहीत असतांनाही व आपण मरणार हे माहीत असतांनाही त्यानं आपलं कवचकुंडल दान दिलं. हीच दानशुरता त्याचेकडून शिकण्यासारखी आहे.
महापुरुषांनी सुधारणा केल्या तर काही महापुरुषांनी आपलं शरीर झिजवलं. अशीच राजा हरिश्चंद्राची कहाणी प्रसिद्ध आहे. राजा हरिश्चंद्र चित्रपट कुणालाही माहीत असेल, त्यानं एका शब्दावर आपलं पुर्ण राज्य दान केलं. ते दान केलं त्यानं आपल्या स्वप्नात दिलेल्या वचनानुसार. एवढंच नाही तर चांगोलानं आपल्या पुत्राचंच मस्तक कापून त्याचं जेवन बनवून नवश फेडला होता. नल दमयंतीचीही कथा अशीच. जवळ फक्त अर्धीच पोळी असतांना व भूक फार लागलेली असतांना त्या दोघांनीही आपली अर्धी पोळी एका श्वानाला दिली.
पुर्वी ज्याला आपण अवतार समजत होतो. त्या लोकांनी अहंकार त्यागला. लोभ त्यागला. दानशूरपणाचा धर्म हातात घेतला व परोपकार साधला. त्यामुळंच त्यांचं नाव आजही अजरामर आहे, कुंभमेळ्यात स्नान नाही केलं तरीही. मध्यंतरीच्या काळातील महापुरुष, त्यांनीही लोभ केला नाही. तेही राग, द्वेष, अहंकारापासून दूर राहिले. त्यांनीही परोपकार साधला. आज तेही महान झाले. मात्र आताचे लोकं काही बरोबर नाहीत. मी मी चा संसार आहे. एव्हाना मी पणाच्या या जगातील मीपणा वाढत चालला आहे. तोच आपली अधोगती करीत आहे. शिवाय हाच मीपणा लोकांना चांगले वागायला शिकवीत नाही. स्वार्थवाढीस लावत आहे. तरीही लोकांना माहीत आहे की कितीही मी मी व माझं माझं केलं. तरीही आपल्या पदरात काहीच पडत नाही व आपल्याजवळ काहीच येणार नाही.
आजचा आपला समाज याच मीपणाच्या चक्रव्यूहात फसत असून तोच आज महापुरुषांची टिंगल टवाळकी करतो आहे. तो प्रसंगी त्या महापुरुषांसारखा किंचीतही वागत नाही. वागण्याचा प्रयत्न करीत नाही. उलट मी किती चांगला असेच दाखविण्याचा प्रयत्न करतो आहे. हे मी पण संपणारे आहे. एकदा का व्यक्ती संपला तर........ राहू शकते दान, कर्ण व हरिश्चंद्रानं केलेला. राहू शकते त्याग, राम व क्रिष्णानं केलेला. राहू शकतात सुधारणा, महापुरुषांनी जुनाट रुढी, परंपरांना छेद दिलेल्या आणि तो सुधारणा करणाराही अमरत्व प्राप्त करु शकतो. जरी त्यानं कुंभमेळ्यात स्नान नाही केलं तरी. महत्वाचं सांगायचं झाल्यास माणसानं मी पण सोडावं. सेवा करावी. त्याग करणं शिकावं आणि शिकावा कर्णासारखा दानशुरपणा. त्याला मरण माहीत असतांनाही त्यानं आपली कवचकुंडलं दान दिली होती. मरणानंतर माणूस जमीनीवरील एकही वस्तू आपल्यासोबत नेत नाही. नेतो फक्त त्याग, दानशुरपणा आणि नाव. ज्या नावात किर्ती नावाची एक गोष्ट गुप्त स्वरुपात लपलेली असते. हेच करावं माणसानं जीवनात. कुणीही कुणाचा द्वेष करु नये. एकमेकांशी प्रेमाच्या भावनेने राहावे. प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे. कुणीही आपल्या बोलण्यानं कुणाचं मन दुखवू नये. पाप करणं सोडावं. पाप जर करणं सोडलं तर कदाचीत कुंभमेळ्यात स्नान नाही केलं तरी चालेल. आपलं नाव धरणीवर उरेल यात शंका नाही. कुंभमेळ्यात स्नान करण्याआधी मनाची स्वच्छता केलेली बरी. नाहीतर कितीही वेळेस कुंभमेळ्यात स्नान केलं तरी आपले पाप नष्ट होणार नाही. ते वाढतच जाईल. हे तेवढंच खरं.
दिक्षाच्या मनात कुंभमेळ्यात जाण्याचा विरोध नव्हता. विरोध होता माणसात निर्माण झालेल्या विचारांचा. ती म्हणत होती, कुंभमेळ्यात अवश्य जावे. पण....... त्या पणचं कारण वेगळं होतं.
********************************************
कुंभमेळा...... ज्या ठिकाणी स्नान केलं जातं. ज्या ठिकाणाला म्हणतात की तब्बल एकशे चवळेचाळीस वर्षांनी योग आला. त्या ठिकाणी आंघोळ करणे म्हणजे समस्त पापाचं खंडण. त्या गोष्टीचीच जाहिरात आणि त्याच गोष्टीच्या नादात लागून वेडी झालेली जनता. कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी जात होती व आपणही त्या क्षणाला कुंभमेळ्यात स्नान केलं होतं. त्या क्षणाचे साक्षीदार बनत होते.
कुंभमेळ्यात स्नान...... हा स्नानाचा योग एकशे चवळेचाळीस वर्षांनी आलेला. कोणी त्याला जाहिरात मानत असत. कोणी त्याला श्रद्धा तर कोणी अंधश्रद्धाही मानत. कोणी त्याला चमत्कार तर कोणी देवानं निर्माण केलेला भक्तीभाव मानत. कोणी त्याला पाप धुण्याचं साधन तर कोणी त्यात स्नान केल्यानं पुण्यप्राप्ती मानत. परंतु याही वर जावून काही लोकं तेथील आंघोळ करणाऱ्या कर्माला पाप पुण्य मानत नाहीत. लोकं कुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या गोष्टीला पाप वा पुण्य हे नाव देत नव्हते. याबाबत बरेच व्हिडिओ सोशल मिडीयावर होते. त्यातील एका व्हिडिओचं वर्णन. व्हिडीओत एक मुलगा कुंभमेळ्यात स्नान करायला जायला तयार होता. त्याची आई आजारी होती व त्यावर आई विचारत होती,
"बाळा, कुठं चाललाय?"
"कुंभमेळ्यात."
"कशासाठी?"
"पुण्य मिळवायला."
"तुला पुण्य मिळेल असं वाटतं का?"
"का नाही मिळणार? अगं, तिथं तीन नद्यांचा संगम आहे. ज्या नद्या स्वर्गातून आलेल्या आहेत. त्यात आंघोळ केल्यानं मला पुण्य मिळणार आहे."
"तरीही सांगतो बाळा की तुला पुण्य मिळेल हे शक्य आहे काय?"
आईनं म्हटलेले शब्द. प्रत्यक्षात आईच्या रुपात देवच बोललेला. त्यामुळंच बाळाला विचार आला. त्यानं विचारलं,
"आई, तू असं का बोलतेय? तुला आनंद नाही वाटत का की तुझा बाळ कुंभमेळ्यात जात आहे. आंघोळ करुन पुण्य मिळवायला."
ते बाळाचं बोलणं. त्यावर आई म्हणाली,
"आहे. नक्कीच आनंद आहे. परंतु बाळा, मी आजारी आहे व या परिस्थितीत मला एकटं सोडून कुंभमेळ्यात आंघोळीला जाणं तेवढं गरजेचं नाही. असं मला वाटतं. कदाचीत माझं बरंवाईट झालं तर......."
आईनं यु ट्यूबवरील व्हिडिओ काढला. त्यात गाणं लावलं, 'कभी प्यासे को पाणी पिलाया नही, अब गंगा नहाने से क्या फायदा?' तरीही बाळ काही ऐकला नाही. त्यानंतर ती म्हणाली,
"बाळा, विचार कर की मी आजारी असतांना तू जर कुंभमेळ्यात गेलाही आणि प्रत्यक्षात तिथं देव जरी आला तरी तो म्हणेल की तू इथं कशाला आला? आधी घरी जा व आईची सेवा कर. अन् तुला त्यावेळेस कळल्यानं तू आलाही. परंतु त्यानंतर मी जीवंत नसले तर......."
आईनं बाळाला भरपूर समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो कुंभमेळ्यात गेला व परत येईपर्यंत आई वारली.
हा एका मिडीयावरील व्हिडिओ. आजच्या काळात मुलं आपल्या मायबापाला वृद्धाश्रमात ठेवतात आणि पुण्य मिळविण्यासाठी कुंभमेळ्यात जातात. लोकं आपल्या घरी म्हाताऱ्या, अनाथ, अपंगाची सेवा करीत नाहीत. अन् कुंभमेळ्यात जातात. मान्य करतात की कुंभमेळ्यात आपलं पाप धुतलं जाणार. परंतु हे शक्य आहे काय? त्याचा अर्थ एका शब्दात सांगणे म्हणजे हे शक्य नाही.
कुंभमेळ्यात जाणे. ही अंधश्रद्धा नाही. ती एक प्रकारची श्रद्धा आहे लोकांच्या मनात निर्माण झालेली. त्या ठिकाणी चमत्कार नाही वा कोणताच दैवी गुण नाही. गुण आहे मनाला आनंद देणारा. मनाच्या आनंदासाठी कुंभमेळ्यात जाणे. परंतु त्यातून पाप धुतल्या जाते हा गैरसमज लोकांमध्ये झालेला आहे. हं, विशेष हे की कुंभमेळ्यात ज्याला जायचे ते जावू शकतात. कारण त्यांना पुढील जीवन जगत असतांना हळहळ वाटायला नको. तसंच जो कोणी गेला. त्याला हे माहीत आहे की शिस्त बाळगलेली बरी. जी बाळगली नाही तर देव निराश होईल. त्यानं ती दखल घेणे गरजेचे आहे. दखल नाही घेतली तर घात होणारच. दखल म्हणजे कुठेही झोपू नये. उदा. रस्त्यावर झोपल्यास रस्त्यावरुन चालणारी माणसं तुम्हाला पायदळी तुडवणार म्हणजे तुडवणारच. जसं मौनी अमावश्येच्या दिवशी घडलं. कारण त्या दिवशी फार मोठी गर्दी होती व लोकं रस्त्यावर झोपले होते. अशातच गर्दीचा लोंढा आला. ज्यात काही लोकं चेंगराचेंगरीत गेले.
फिरायला जाणे ही एक चांगली कृती आहे. त्यातच तेथे असलेल्या संगमातील पाण्यात आंघोळ करणे ही देखील एक चांगली कृती आहे. परंतु ही कृती करीत असतांना त्यात चमत्कार आहे वा देव प्रसन्न होईल अशी आस मनात ठेवू नये. वाटल्यास आपले मायबाप जर घरी असतील तर त्यांची सेवा करावी. कुंभमेळ्यात जायची गरज उरणार नाही. अपंग, निराधार व आश्रीतांची सेवा केली, तरही देव पावेलच. त्यात शंका नाही. त्यासाठी कुंभमेळ्यात जायची गरज नाही. तसंच आपले पाप पाण्यानं धुतले जात नाही. ते धुतले जातात चांगल्या विचारानं. चांगले विचार ऐकून आपल्यात बदल केला तर....... जसं वाल्मिकीचं झालं. अंगुलीमालचंही झालं. हेच लक्षात ठेवावे. त्यासाठीही कुंभमेळ्यात जायची गरज नाही. कुंभमेळ्यात अवश्य जायला हवं. परंतु घरी असलेल्या सर्व सदस्यांची सुखरुप असल्याची खात्री करुन. आपल्या मनातील कुविचार त्यागून नव्हे तर कुविचार नावाचं मनाच्या शेतातील तणकट काढून टाकून. त्या आपल्या मनाच्या पोकळीत सुविचारांची पेरणी करुन. जर ती पेरणी झालीच नाही तर कुंभमेळ्यात जाण्याला काहीच अर्थ उरणार नाही हे तेवढंच खरं.
*****************************************
दिक्षानं आपल्या मुलाचा प्रवेश करताच त्यासाठी होत असलेला जातीचा विरोध. ती जात त्या मुलांच्या शिक्षणाचं नुकसान करणारी ठरत होती. तिला काय करावं सुचत नव्हतं. त्यामुळंच तिच्या मनात प्रश्न पडला होता व अचानक तिच्या तोंडातून शब्द फुटले. थांबा. जात टिकविणे आहे.
जात जातीवरुन तिच्या मनात विचार आलेत. अलिकडील काळात जात ही एखाद्या घोरपडीसारखी घट्ट चिकटलेली आहे व त्याच जातीवरुन अत्याचार सुरु आहेत. तेच अत्याचार वाढत आहेत. काही ठिकाणी असले होणारे अत्याचार वाढत चाललेले दिसत आहेत तर काही ठिकाणी असले अत्याचार हे समाप्त होणार असेही जाणवत आहे. काही ठिकाणी जात घट्ट चिकटली आहे एखाद्या बांडगुळागत, तर काही ठिकाणी जात ही विरळ होतांना दिसत आहे. कारण अलिकडील काळात बऱ्याच ठिकाणी प्रेमविवाह अगदी जोरात होत चाललेले असून त्याची तिव्रताही वाढत चाललेली आहे. त्यामुळं जात नष्ट होईल काय? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे.
अलिकडील काळात जात असली तरी काही लोकं जात पाळतांना दिसत नाहीत. शहरातही प्रेमविवाह थाटात होत असून प्रेमविवाहाला आजच्या समाजातील लोकांनी मान्यता दिल्यागत चित्र दिसत आहे. हे जरी खरं असलं तरी जात नष्ट होणार नाही. ती नष्ट व्हायला वेळ लागेल. कारण ज्या तिव्रतेनं ती वाढली. त्यानंतर ती जशी टिकली. तशीच ती नष्ट होतांनाही बराच वेळ लागेल किंवा लागू शकते.
आज समाज सुधारला. कारण तो शिकला आणि शिकू लागला आहे. तो शिकलेला सुधारलेला समाज जातीप्रथा नष्ट करीत असून पाहिजे त्या प्रमाणात जात पाहात नाही. शहरात तर जातीप्रथा तेवढ्या प्रमाणात दिसून येत नाही. जातीभेद मिटलेला दिसत आहे. हे कामावरुन दिसतं. विवाहावरुनही तेच दिसतं. तसंच एकमेकांच्या व्यवहारावरुनही तेच दिसून येत असतं. कारण जातीच्या आधारावर विचार केल्यास शहरातील माणसे जात जात न करता एकमेकांच्या घरी जातात. मग तो विवाह समारंभ असो की एखादा कोणता समारंभ. शिवाय आजचे शहरातील लोकं हेही समजायला लागले आहेत की रक्त हे कोणत्याही जातीच्या व्यक्तीचे काढले तर ते लालच निघेल वा रक्तदान होतांना ते रक्त कधीच भेदभाव बाळगत नाही. मी अमूक माणसांचा असे कधीच म्हणत नाही. कधी ते रक्त दान होतांना धर्मावरुन भांडत नाही. मी हिंदू मी मुसलमान म्हणा, कधीच ते रक्त मी अमूक जातीचा बहुजन तर मी तमूक जातीचा सनातन असा फरक करीत नाही. यावरुन एकंदरीत सांगायचं झाल्यास जात नष्ट होणार असल्याची चिन्हं दिसतात.
जात....... जातीवरुन वरील स्वरुपाच्या गोष्टी ह्या जरी खऱ्या असल्या तरी मी अमूक जातीचा. मला अमूक म्हणा किंवा माना. असे का मानावे आम्ही. अन् त्या जातीवरुन कधीकधी ती नष्ट व्हायलाच पाहिजे व जातीवरुन भेदभावही नष्ट व्हायलाच पाहिजे. असेही का मानावे आम्ही? असे शहरातील नाही तर तमाम देशातील लोकांचे वागणे दिसून येते.
लोकांच्या एकंदरीत वागण्यावरुन शहरात जातीप्रथा दिसत नाही. शिवाय शहरातील लोकं कामासाठीही एक दुसऱ्याच्या घरी, अनोळखी माणसाच्याही घरी कामाला जात असतात. ज्या घरी ते कामावर जातात. त्या घरची मंडळी ती त्याची जात पाहात नाहीत. काम करवून घेतात, ओळख पारख नसतांनाही अन् जात माहीत नसतानाही अन् जातही माहीत झाली तरी जातीचा भेदभाव मानत नाहीत. याचाच अर्थ असा की शहरात जातीवरुन वादंग नाही. एकंदरीत सांगायचं झाल्यास समाजातून जात मिटल्याची चिन्हं दिसत आहेत.
ग्रामीण भागातही आज आंतरजातीय विवाह होवू लागले आहेत. तेही एकमेकांच्या घरी कामाला जावू लागले आहेत. तेही एकमेकांच्या विवाह सोहळ्यात सहभागी होवू लागले आहेत. याचाच अर्थ असा की ग्रामीण भागातूनही शहरासारखी जात मिटत चाललेली आहे. तशीच जात मिटत चालली आहे सरकारी कार्यालयातूनही सरकारी नोकऱ्या मिळाल्यावर अनेक जातीची माणसं एकत्र जेवनाचे डबे खातांना दिसतित. परंतु हे जरी खरं असलं तरी शहरात जात आहे, ती शाळेतील एकंदरीत वातावरणातून दिसते. ज्या शाळेत मुलं दाखल करतांना प्रत्यक्षात जात लिहिली जावू नये. असे असतांना जात ही विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश घडतांना लिहिली जाते. शहरात जात समाजातून जरी मिटत चालली असली तरी शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जात आजही शहरात सुरु असलेली दिसत आहे. हेही नाकारता येत नाही. ही झाली शहरातील स्थिती. ग्रामीण भाग तर याहीपेक्षा वेगळा आहे. तिथे तर जात एखाद्या जळूसारखी आहे. जी जात जळूसारखी माणसांचं रक्तही पिते. कधीकधी यावरुनच अत्याचार होतो व उच्च जातीची माणसं कनिष्ठ जातीवर अनन्वीत जातीआधारावर अत्याचार करतात.
ग्रामीण भाग असो वा शहरी. जात एवढी माणसाला घट्ट चिकटली आहे की जातीवरुन भेदभाव आजही दिसतो. जात आजही अस्तित्वात आहे. कधीकधी शहरातही एखाद्या व्यक्तीची मुलगी एखाद्या दुसर्याच जातीतील मुलांसोबत पळून जरी गेली तर बाऊ होतो. कधी त्याचा तेवढा जास्त दिवस बाऊ होत नाही. ग्रामीण भागात मात्र त्याचा बाऊ होतो. एवढंच नाही तर अशा घटना खेड्यात घडल्यास वाळीत टाकण्यासारख्या घटना घडतातच. व्यतिरीक्त कधीकधी ज्यांची मुलगी पळून गेली. त्यांच्या घरी आत्महत्याही घडत असतात. सर्वात जास्त प्रमाणात परजातीसोबत मुलगी पळून जाण्याचा धक्का मुलीच्या बापालाच पोहचतो व तोच आत्महत्या करीत असतो. एखादा अपवाद असतो की जातीवरुन वादंग होत नाही व परजातीशी एखाद्या मुलीचा विवाह झाल्यास मायबाप त्या विवाहाला स्विकार करीत असतात. इतर जातीचे जातीवरुन वाळीत टाकणे दूरच.
जात..... एकीकडे जात आहे असे चित्र दिसतं तर दुसरीकडे जात अस्तित्वात नाही असंच चित्र दिसतं. जात ही रक्तावरुन दिसत नसली व सर्वांचे रक्त लालच असले तरी जात ही आजच्या काळात सरकारी कार्यालयातही दिसून येते. जातीवरुन आम्ही भेदभाव करीत नाहीत म्हणणारे चक्कं जातीवरुन सरकारी कार्यालयात भेदभाव करतांना दिसतात. ते इतर कनिष्ठ जातीशी फटकून वागतात. त्यांना साध्या पदोन्नत्याही देत नाहीत वा त्या द्यायला मागेपूढे पाहतात. तेच चित्र शहरातील काही लोकांच्या वागण्यावरुन दिसून येते तर तेच चित्र कधीकधी ग्रामीण भागातील लोकांच्या वागण्यावरुन दिसून येते. एकंदरीत सांगायचं झाल्यास रक्तावरुन व रक्तदानावरुन जात जरी नष्ट झालेली दिसत असली तरी आजही जात आहे. त्यातच जातीप्रथाही टिकूनच आहे. शिवाय जातीवरुन आजही भेदभाव आहे हे नाकारता येत नाही. तेव्हा जात नाही वा जातीप्रथा व जातीआधारीत भेदभाव मिटत आहे, मिटणार आहे. जात नष्ट होणार आहे असे कोणीही म्हणू नये. मानू नये. त्यामुळंच कोणी जर म्हणत असेल की थांबा, जात टिकविणे आहे, तर ते तेवढंच खरं आहे यात शंका नाही.
जात...... जातीवरुन सर्व प्रकारचं आक्रंदन. जातीवरुन विवाह जुळणे व ते तुटणे. जातीवरुन निर्माण झालेल्या सर्वच गोष्टी. अशातच तिला गतकाळ आठवला व आठवलं तिला तिचं प्रेम. जे प्रेम गतकाळात ती दहावीला असतांना तिच्या मनात निर्माण झालं होतं. परंतु ते प्रेम जातीवरुनच तुटलं होतं. जरी ते तिचं प्रेम खरं होतं तरी. त्यानंतर तिला वाटत होतं. दहावीत निर्माण झालेलं प्रेम खरं प्रेम नसतंच.
माणसं लहान असतात वा दहावीत असतात. तेव्हा अचानक मुलामुलीत प्रेम निर्माण होतं. परंतु ते प्रेम शाश्वत टिकत नाही. ते तुटतं. ते दहावीचं प्रेम तर सोडाच. साध्या कोणत्याही वयातील आजच्या काळात प्रेमाला थारा नाही. प्रेम हे अंधश्रद्धा, प्रथा, परंपरेच्या जाळ्यात अडकून पडले आहे व जातीनं त्या प्रेमावर बंधनं कसली आहेत. त्या प्रेमावर जात नावाच्या कवचाचं अतिशय कठीण असं आवरण बसवलं आहे की जे आवरण तुटता तुटत नाही. तो मुलामा नाही की तो निघून जाईल. अलिकडील काळात जे निर्माण झालेलं प्रेम दिसतं. ती वासना असते. ते प्रेम नसतं तर तो एका रासायनिक स्त्रावाचा परिणाम असतो. ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो. आपण त्यालाच प्रेम समजतो. परंतु त्या रासायनिक स्रावाचा परिणाम जर सोडला वा तो परिणाम निघून गेला की प्रेम संपते. ज्याला आपण खरे प्रेम समजतो.
प्रेम...... हे अतिशय महत्वाचं असतं. आईवडीलावर निर्माण झालेलं. भावाबहिणीत निर्माण झालेलं. परंतु अलिकडील काळात असं प्रेम कितीही मोठ्या स्वरुपाचं असलं तरी त्याला अर्थ उरत नाही. अर्थ येतो तो त्यानंतरच्या निर्माण झालेल्या प्रेमाला. जे प्रेम आजच्या काळात तरुण तरुणीत निर्माण होत असतं की ते तुटलं तर अतिशय वाईट वाटत असतं. कधीकधी ते तुटतंही. जेव्हा लक्षात येतं की आपल्या मित्रानंच आपला विश्वासघात केलाय किंवा आपल्या मैत्रीणीनंच आपला विश्वासघात केलाय. याबाबत एक प्रसंग, जो दिक्षाच्या जीवनात घडला नव्हता. प्रसंग एका दहावीतील विद्यार्थ्यांचा होता. ती एक मुलगी. ती दहावीत होती. तेव्हा तिच्यावर एक मुलगा निरतिशय प्रेम करायचा. तिही प्रेम करीत होती. कालांतरानं दहावी सुटलं व बरीच वर्ष झालीत. तो मुलगा अतिशय मोठ्या हुद्यावर लागला. तिही आज जिल्हाधिकारी बनली होती. तशीच आज ती एका मात्र सुसंस्कृत कुटूंबात पडली होती.
मुलगा मोठ्या हुद्यावर. त्याचंही लग्न झालेलं. परंतु जसजसा काळ गेला, तसतसं त्याला त्याचं जुनं प्रेम आठवायला लागलं. अशातच त्याला दोनचार मैत्रिणी भेटल्या, काही मित्रही भेटले. ती भेटली नाही. ती भेटली नसल्यानं त्यातच त्यानं तिची भेट घ्यायचं ठरवलं. परंतु हे इतर काही मित्रांना आवडत नव्हतं व त्यातील एका मित्रानं त्याला सल्ला दिला.
"तू तिच्या घरी जावू नकोस. नाही तर सगळं बरोबर असतांना एक चूक होईल. तिच्या पतीच्या मनात संशय निर्माण होईल व त्यांचा संसार तुटेल."
ते त्याचं बोलणं. त्यावर उत्तर देत तो मित्र म्हणाला,
"मी सगळं बरोबर करतोय."
"आता काय बरोबर करायचं राहून गेलं तुझं?"
"अरे ती माझं स्वागतच करणार."
"अगदी बरोबर. परंतु तिच्या घरच्यांचा स्वभाव कसा आहे हे मला नाही, पण तिचा स्वभाव मला माहीती आहे. ती मनमिळाऊ होती आणि असेलही कदाचीत. ते तुझं स्वागतच करणारच. परंतु तू परत फिरल्यानंतर तिच्या घरी काय प्रतिक्रिया उमटतील. ते तुला तरी माहीत आहेत का? कितीतरी प्रश्नांची सरबत्ती होईल तिच्या घरात की ज्या प्रश्नांची उत्तरे ती देवू शकणार नाही."
ते बोल ऐकून न घेता मित्र पुन्हा म्हणाला,
"मी सगळं बरोबर करतो." त्यावर सल्ला देत तोच एक मित्र म्हणाला,
"आता दहावीत आहे का बरोबर करण्यासाठी. सोडून दे भेटायचा नाद बाळा. तू तिच्या घरी जावू नको आणि तिच्या संसारात ढवळाढवळ करु नकोस. सुखी राहू दे सगळं वातावरण."
ते एका मित्राचं बोलणं. त्यावर सगळेच त्याला सल्ला देवू लागले. त्यावर तो म्हणाला,
"अरे सर्वांनी काहीही अर्थ काढू नका. बालमैत्रीण म्हणजे वर्ग मैत्रीण आहे. जसे तुम्ही सर्व."
त्यानंतर त्यातील एकजण म्हणाला,
"मित्रा, आता बालप्रेम चालत नाही. आता पतीप्रेम चालते. तिच्या सासूरवाडीला नाही समजत बालमैत्रीण. तू जाणारही कदाचीत. कदाचीत ती काही म्हणणारही नाही. परंतु तू गेल्यावर साऱ्याच प्रश्नांची सरबत्ती. प्रश्न न संपणारे."
स्रीचं जीवन असंच. तिला तिचं प्रेम, तिच्या भावना, तिचं स्वातंत्र्य, तिचे जुने मित्रमंडळ, हे सर्व त्यागून व आपलं मन मारुन आपला विवाह करावा लागतो अगदी बालवयातही. तिला प्रत्यक्षात आजही तिच्या आवडीचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य नाही. पुढं संसारात रमल्यावर तिला फक्त एकच मुल आवश्यक वाटत असतांना पती व सासरच्या आग्रहाखातर तिला चार पाच मुलं जन्मास घालावी लागतात. ज्यात तिला अतिशय वेदनादायक त्रास होतो. कधी एखाद्यावेळेस पती मरण पावलाच तर तिला वैधव्याचं जीर्ण जगणं जगावं लागतं. अन् अचानक अशावेळेस जुन्या प्रेमाची आठवण जरी आली तरी तिला ती विधवा असतांनाही ते जुनं प्रेम ती मिळवू शकत नाही.
दिक्षाच्या मनात ते विचार खेळत होते. तिनं एक दिर्घ श्वास घेतला. तशी ती मनाशीच प्रश्न करु लागली.
"ते प्रेम, ज्या प्रेमात जात असते. जातीआधारावर निर्माण झालेले संबंध हे सर्वकाळ टिकतात. अन् प्रेमात जात जर नसली तर एक वडील म्हणतो की बेटा तू आता माझ्यासाठी मरण पावलीय. पुन्हा मला तोंड दाखवू नकोस. हेच का स्रीचं जीवन? हेच का दुर्भाग्य तिच्या जीवनातलं की ती परिपक्व होण्यापुर्वीच तिचा विवाह होतो. तोही एका वयस्क माणसाशी. जो लवकर मरण पावेल व वैधव्याचं जगणं वाट्याला येईल. त्यातच तिला तिचा जुना दहाव्या वर्गातील प्रियकर आठवत असला तरी तिला काही उपयोग नसतो. कारण संसार हा भावनावर आधारीत नसतो. आधारीत असतो जुन्या अंधश्रद्धा, रुढी, प्रथा परंपरेवर. ज्या जुनाट प्रथा परंपरा आपल्याला आपल्या मनाच्या भावनांच्या वागण्याच्या परवानगी देत नाहीत. आपल्याला याच जुन्या प्रथा परंपरांमुळे नीट व्यक्तही होता येत नाही. मग आपलं दहाव्या वर्गातील कितीही चांगलं प्रेम असलं, ते प्रेम कितीही खरं प्रेम असलं तरी. ते प्रेम खरं नसतं. याबाबतीत कोणी म्हणतात की बालवय संपताच जेव्हा तरुणपण येतं. तेव्हा विशिष्ट असे रासायनिक स्त्राव शरीरातून सुटतात. त्याला हार्मोन्स म्हणतात. हे हार्मोन्सचे प्रमाण जसजसं वाढते. तसंतसं आकर्षण वाटते. ते आकर्षण वाढतेही. त्यातच असे काही काही रासायनिक घटक असतात की त्या घटकानं एकमेकांशिवाय जगणं अशक्य असते. कधीकधी एकमेकांशिवाय राहणंही अशक्य असते. हेच दहावीत घडतं आणि त्याच वयात एकत्रीकरण घडलं नाही तर कधीकधी त्यातून आत्महत्याही घडत असतात. त्यामुळं वेळीच सावधान झालेलं बरं. कारण जर याच हार्मोन्सची मात्रा संपली की प्रेम संपतं आणि भांडणंही बरीच होत असतात. त्याची परियंती आत्महत्येत. याचा दहावीच्याच नाही तर इतर सर्वच लोकांनी विचार करावा व आपलं वागणं बदलवावं. कारण दहावीत निर्माण झालेलं प्रेम हे खरं प्रेम नसतं तर तो रसायनांचा आणि वेड्या भावनांचा परिपाक असतो यात शंका नाही.
मी माझ्या दहावीतील प्रेमाला जात समजू की हार्मोन्स. तोही माझा प्रियकर मला सोडून गेला. कदाचीत माझी जात तर त्यात आड आली नसेल! हो, जातच आड आली. तो चक्कं म्हणाला होता की दिक्षा, तू खालच्या जातीची. मी उच्च. तुझी जात माझ्या घरच्यांना चालत नाही."
दिक्षा दहावीत होती. तिचं प्रेम होतं एका दिनेश नावाच्या उच्च जातीच्या मुलावर. ते प्रेम वृद्धिंगत होत गेलं होतं. तिनंही एक दिवस त्याला एक चैन बक्षीस दिली होती. परंतु जेव्हा दहावी संपत आली होती. तेव्हा त्याला दिक्षानं प्रेमाबद्दल विचारलं असता तो म्हणाला होता की तू खालच्या जातीतील आहेस. मी कदाचीत तुझा स्विकार करेल. परंतु माझा परीवार. तो परीवार आपलं प्रेम स्विकारुच शकणार नाही. तेव्हा हे प्रेम आपण इथंच थांबवलेलं बरं.
प्रेमात दिक्षाला जातीआधारावरुन मिळालेला दगा. तो तिला सोडून गेला होता आणि त्यावेळेपासून तिला जगणं अतिशय अवघड वाटत होतं. परंतु त्यातून ती सावरली व पुढं तिनं कोणावरही प्रेम केलं नाही. तिनं अभ्यासालाच आपला मित्र बनवलं व आज ती जिल्हाधिकारी बनली होती. परंतु तिनं त्यावेळेपासून ठरवलं होतं की ज्या जाती भेदभावानं तिचं प्रेम तोडलं. तिही एक ना एक दिवस जात मिटवेल.
****************************************
शिक्षणानं दिक्षा पुढे गेली होती व आज ती जिल्हाधिकारी म्हणून कार्य करीत होती. तिनं आपल्या मुलांच्या शिक्षणाची तमा बाळगली नाही. मात्र जात न लिहिण्याचा तिनं केलेला निर्धार. आज तिनं जात ही मुलांच्या शिक्षणावर अडसर ठरु नये म्हणून न्यायालयात खटला दाखल केला होता.
शिक्षण...... शिक्षणानं व्यक्ती अति पुढे जात असतो. त्याचा दर्जा वाढतो. समाजात तेवढीच इज्जतही वाढते व मान प्रतिष्ठा सर्वकाही. दिक्षाचंही तेच झालं होतं. मात्र तिनं जात नष्ट करण्यासाठी व जात मुलांच्या नावासमोर न लिहिण्याचा घेतलेला निर्णय. त्यावर आधारलेला खटला न्यायालयात दाखल केल्यानं तिच्यावर कट्टर जातीवाद्यांकडून ताशेरे ओढले जावू लागले होते. त्यातच एवढं सर्व केल्यानंतर तात्पुरता तिच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळाला. तात्पुरती त्यांच्या नावासमोर जात लिहिली नाही. मात्र आज तिच्या मुलांशी काही शिक्षक व्यवहार करतांना अभद्र व्यवहार करु लागले होते.
शिक्षण शिकविण्यासाठी गरज पडते शिक्षकांची. शिक्षकच हे विद्यार्थ्यांना शिकवीत असतात. त्यांचं जीवन घडवीत असतात. ज्या शिक्षणाच्या भरवशावर व्यक्तीचे विचार प्रगल्भ होत असतात.
शिक्षक ज्ञान देत असतात. बदल्यात मोबदला घेत असतात. परंतु त्यातही काही शिक्षक हे शिकवीत असतात, तर काही शिक्षक हे शिकवीतच नाहीत.
शिक्षणातही आज भेदभाव निर्माण होत आहे. काही शिक्षकांना भरपूर वेतन मिळतं. तर काही शिक्षकांना शिकविण्याचं वेतनच मिळत नाही. ज्या शिक्षकांना भरपूर वेतन मिळत असतं. ते शिक्षक ज्या शाळेत शिकवतात. त्या शाळेत विद्यार्थी पटसंख्या कमी असते आणि काही शिक्षक जे कॉन्व्हेंटला शिकवतात. त्या शिक्षकांना पुरेसं वेतनच नसतं. शिवाय पवित्र पोर्टल अंतर्गत सुरुवातीला परीविक्षा कालावधीत असणाऱ्या शिक्षकांना मिळणारं वेतन कमी असतं.
काल शिक्षणाची व्यवस्था एका आश्रमात असायची. तो आश्रम की ज्या आश्रमात एक कच्चे घर असायचे नव्हे तर काट्याकुट्यानं बनवलेलं वा कुडानं बनवलेलं झोपडं असायचं. ज्यात चारही बाजूनं हवा यायची. सतत जंगली श्वापदाची भीती असायची. ती श्वापदं जंगलातून यायचे व त्या विद्यार्थ्यांवर हमलाही करायचे. त्यातच साप, विंचूसारखे प्राणी वेगळेच. अशा भययुक्त वातावरणात विद्यार्थ्यांची शाळा असायची. त्यातच काही विद्यार्थी पहारा देण्याचेही काम करायचे. शिकणे शिकविणे ही क्रिया एकजुटीनं व मिळून मिसळून घडायची. भेदभाव नसायचा आपापसात, ना ही वर्गातील कोणत्याच विद्यार्थ्यांची एकमेकांविरुद्ध कुरकूर असायची.
तो काळ व त्यांना शिकविणारा तो गुरु. तो गुरु फक्त विद्यार्थ्यांना आपलं संरक्षण कसं करायचं, तेवढंच शिकवायचा. मात्र तो त्यांचं रक्षण करीत नसे. तर त्या विद्यार्थ्यांसमोर संकटच उत्पन्न करायचा. ज्यातून विद्यार्थी घडायचे. शिवाय विद्यार्थीच आपल्या गुरुचं त्या जंगली प्राण्यांपासून रक्षण करायचे. त्यांना अशा प्राण्यांची भीती वाटलीच वा एखादा प्राणी आश्रमाजवळ आढळलाच तर तेच शिष्य त्या प्राण्यांना हुसकावून लावायचे.
हळूहळू काळ बदलला. त्या बदलत्या काळानुसार अनेक बदलाव शिक्षणात झाले. आश्रमाची जागा जावून इमारत आली. विद्यार्थ्यांना पुर्ण शरीर झाकेल असा पोशाख आला. तसं पाहिल्यास पुर्वीच्या काळात विद्यार्थी हे शरीर थोडेसे नागडे ठेवूनच संन्यासी वृत्तीनं शिक्षण घ्यायचे. ते सर्वप्रथम आपलं शरीर बनवायचे. आज तसं नाही. तशीच आज बैठक व्यवस्थाही बदलली. आज विद्यार्थ्यांना बसायला बाक आला, जो काल नव्हता. आज शिक्षणाची व्यवस्था सध्या एका पक्क्या इमारतीत झाली आहे. ज्या इमारतीला रंग मारावा लागतो. कशासाठी? तर इमारत चांगली असेल तर विद्यार्थी येईल या भावनेनं. शाळा चालावी या भावनेनं. शिक्षणात जणू स्पर्धा निर्माण झाली आहे. कारण आज दिखाव्याचं जग आहे. आज शिक्षणाला पाहिजे त्या प्रमाणात वाव नाही. जेवढा भपकेबाजपणा, तेवढं शिक्षण. असं आजचं शिक्षणाचं गणित आहे. कारण शाळेचा दर्जाच अशा भपकेबाजपणावर अवलंबून आहे.
आज काळ बदलला आहे. तसा समाजही बदलला आहे व बदलत्या समाजानुसार शिक्षणाची व्याख्याही बदलली आहे. त्यानुसार असं वाटतं की आज खरं शिक्षण शाळेतून मिळतच नाही. जे काल परीसरातून मिळत होतं.
काही शिक्षक ज्या शाळेत शिकवतात. त्या शाळेत विद्यार्थी पटसंख्या कमी असते आणि काही शिक्षक जे कॉन्व्हेंटला शिकवतात. त्या शिक्षकांना पुरेसं वेतनच नसतं. तसंच अलिकडेच आलेलं पवित्र पोर्टल. या काळातही शिकवीत असतांना मिळणारं वेतन हे अत्यल्पच असतं. असं वाटत असतं की तेही शिक्षक आणि हेही शिक्षकच. मग असला भेदभाव का?
खरं शिक्षण हे शिक्षणाचा भेदभावच करीत असतं. पुर्वीही असाच भेदभाव होत होता व तो आजही आहे. पुर्वी अस्तित्वात असलेला एकलव्य. तो एक विद्यार्थी होता व त्याला शिक्षण शिकायची आवड असल्यानं तो शिक्षण शिकण्यासाठी आपल्या गुरुकडे गेला. परंतु गुरुनं त्याला शिकवलं नाही. कारण होतं शिक्षणात असलेला भेदभाव. शिक्षणाची संधी ही शुद्र वर्गासाठी नव्हतीच. ती क्षत्रीय वर्गासाठी व ब्राह्मण वर्गासाठी होती. शिक्षणात शिक्षकामधील भेदभाव दिसतो. तोही वेतनावरुन. एका घटकाला तो तेवढेच शिक्षण शिकवीत असूनही त्याला तुटपुंजे पैसे मिळतात. शिकवायचं वेतन एकच असायला हवे शिक्षकांना. मग तो माध्यमिक, महाविद्यालयीन वा प्राथमिक विभागातील का असेना, शिकवायला कसब वेगवेगळं लागत नाही. मेहनतही वेगवेगळी लागत नाही. परंतु भेदभाव बराच दिसतो. वेतनाच्या बाबतीत तर निश्चीतच दिसतो, जो काल दिसत होता. कालही काही गुरुंना वेतन नव्हतंच. हा भेदभावच होता वेतनातील शिक्षकांच्या बाबतीत होत असलेला. आता शिकविण्यातील विद्यार्थ्यांच्या बाबतीतील भेदभाव. काल एकलव्य सारख्या एका विद्यार्थ्याच्या मनात शिक्षणाची इच्छा होती. त्याला राजवाड्यातील मुलांना जे शिक्षण मिळतं, ते शिकायचं होतं. परंतु ते शिकायला मिळालं नाही. शिवाय व्यतिरीक्त त्याचा अंगठाही घेण्याची कृती घडली. आजही तेच घडत आहे. आजही शिक्षणात भेदभावच केला जात आहेत. आजच्या शिक्षणातील भेदभाव कोणता? असा विचार केल्यास आज शिक्षणात गरीब विद्यार्थ्यांना कॉन्व्हेटचं शिक्षण मिळत नाही. शिवाय उच्च शिक्षण घेतो म्हटल्यास तेही घेता येत नाही. एखाद्या गरीब विद्यार्थ्यानं डॉक्टर, इंजीनियर बनतो म्हटलं तर ते बनता येत नाही. कारण त्याला पैसा लागतो. तो पैसा गरीबांजवळ राहात नाही. हा शिक्षणातील भेदभावच नाही का? हा भेदभावच आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत होत असलेला. विशेष म्हणजे विद्यार्थी विद्यार्थी यातही भेदभाव होवू नये. आज एखाद्या गरीब विद्यार्थ्यांना जर डॉक्टर, इंजीनियर बनायचं असेल वा एखाद्याला एकलव्यासारखी शिकायची आवड असेल तर ती आवड पैसे नसल्यानं मोडावी लागते. शिक्षणातून मोठं होण्याची इच्छा असेल, तरीही त्याला पुर्ण करता न येणे. हा एक भेदभावच कालपासून तर आजपर्यंत सुरु आहे व तो सुरुच राहणार की काय? असं वाटत आहे. शिवाय काल असलेला जातीतील भेदभाव आजही उघडपणे दिसत आहे. आज शाळेत जाणाऱ्या लहान मुलाला, ज्यावेळेस जात म्हणजे काय? हे समजत नाही. त्याचकाळात जात चिकटवून देवून पुढे जात माहीत झाल्यावर विद्यार्थ्यांच्या समजसुचकतेत जो बदल होतो. जो बदल एका श्वानाच्या तोंडात बाण मारून व त्याचा भुंकण्याचा आवाज बंद करुन एकलव्यानं आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं होतं. हे अर्जुन व द्रोणाचार्यला माहीत होताच अर्जुनात व द्रोणाचार्यात जो बदल झाला, त्यासारखाच असतो.
महत्वपुर्ण बाब ही की आज आपण काळ बदलला म्हणतो. समाज सुधारला म्हणतो. काळानं पाश्चिमात्य विचारसरणीचा अवलंब केला म्हणतो. परंतु खरं, सांगायचं झाल्यास खरी सुधारणा झालेली दिसते का? लोकं आजही शिकत असले. शिकले सवरले असले तरी कालच्या अंधश्रद्धेचा बुरखा वापरलेल्या लोकांच्या मनातून जुन्या अंधश्रद्धा जात नाहीत. भेदभावही जात नाही. मग तो जातीतील भेदभाव असो वा शिक्षणातील भेदभाव असो. माणसानं जी जात नाही तिला जात ठरवलं असून आज विद्यार्थ्यांच्या मनावरही जातच बिंबवली जात आहे. जरी समाज सुधरला आहे असं आपण मानत असलो तरी. तसंच शिक्षण हे गरीबांसाठी नाहीच. तुम्ही हमालच बना. असं आजचं शिक्षण हे गरीबांना खुणावतही आहे.
विशेष म्हणजे आज जिथं आपण समाज सुधरला असे म्हणतो. तिथं जातीप्रथा व शिक्षणातील होत असलेला भेदभाव तरी दूर व्हायलाच हवा. निदान शिक्षणात तरी भेदभाव होवू नये. शिक्षण सर्वांनाच निःशुल्क व्हावं. त्यातच उच्च शिक्षणही. मग तो व्यक्ती गरीब असो की श्रीमंत. एखाद्या गरीब मुलांची जर इच्छा असेल, डॉक्टर, इंजीनियर बनायची तर त्याला ते बनता यावं. तशाच लोकांनी अंधश्रद्धा सोडाव्यात व तेवढ्याच जातीप्रथा आणि जातही. कारण काळ बदलला आहे आणि बदलत्या काळात सर्वच अनैतिक गोष्टी बदलायला हव्यात हे तेवढंच खरं. नाहीतर देश कितीतरी मागं जाईल. देश घडणार नाही व शिक्षणासाठी आणखी एक मोठी क्रांती घडवावी लागेल यात शंका नाही.
दिक्षानं न्यायालयात टाकलेला खटला. त्याचा परिणाम म्हणून तिच्या मुलांची शाळेत होत असलेली हेळसांड. तिची मुलं जेव्हा शिक्षकांच्या वर्तनाच्या गोष्टी घरी सांगायचे. तेव्हा तिला विचार यायचा. वाटायचं की आपण विनाकारणच जातीच्या आधारावर न्यायालयात खटला दाखल केला. ज्यातून माझ्याच मुलांना त्यास शोषावा लागत आहे.
दिक्षाला आलेला विचार. जात आधारीत शिक्षण व शिक्षण आधारीत जात. जात तरी शिक्षणात नसावी. परंतु कोण ऐकतोय. जी जात शिक्षणात नसावी असं वाटतं. तीच जात आज शिक्षणात आहे व ज्या जातीच्या आधारावर शिक्षण शाळेतून मिळू नये. त्याच जाती आधारीत शिक्षण शाळेतून दिलं जातं. याचं कारण सरकार व शासन धोरण. आम्ही जिल्हाधिकारी असलो आणि जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर जरी असलो तरी आमच्या मताला जिल्ह्यात काही वाव नाही. वाव आहे नेत्यांच्या मताला. जे नेते कमी शिकलेले असतात व ज्या नेत्यांच्या मनात जात ही कुटकूट भरलेली असते.
अलिकडे शिक्षण हे जातीवरुन दिलं जात नाही. आजच्या काळात शिक्षण हे कोणताही व्यक्ती कोणत्याही जातीचं घेवू शकतो. जातीवर आधारीत आज शिक्षण उरलेलं नाही. मात्र जात जशी पुर्वी बदलवता येत होती. तशी आज बदलवता येत नाही.
जात पुर्वी बदलवता येत होती काय? तर त्याचं उत्तर होय असंच येतं. पुर्वी जात ही बदलवता येत असे. जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जातीतील धंदा आवडला नाही तर तो धंदा बदलवत असे. त्यानंतर त्या धंद्यावरुन त्याची जात त्याला मिळत नसे.
मध्यंतरीचा काळ आला व जातीवर बंधनं आली. त्यानुसार कोणीही आपली जात बदलवू नये असं ठरलं. त्याचं कारण होतं कामाचं कसब आणि कोणतेही काम जलद गतीनं व्हावे असे वाटण्याची प्रक्रिया. नंतर जातीवर आधारीत उद्योगधंदे वाढले व ते करण्यासाठी कारागीर हे जातीतूनच तयार करण्याची प्रक्रिया अस्तित्वात आली. त्यानंतर काही दिवस शांततेत गेले व काही दिवसानं त्यातही भेदभाव शिरला.
जातीवर आधारीत धंदे व ते का आले? त्याचं कारण होतं कामाचं कसब व त्या कामाची गती वाढवणं. त्यानुसार कारागीरही तयार झाले व लोकं आवडीनं कोणतही काम, मग ते काम कोणत्याही जातीतील का असेना, करण्याची पद्धती अस्तित्वात आली. ज्यावेळेस भेदभाव नव्हता. परंतु याच दरम्यानच्या काळात एक नवी व्यवस्था समाजात अस्तित्वात आली. ज्या व्यवस्थेनं जातीव्यवस्थेला अधिकच घट्ट केलं. ती व्यवस्था होती गुलामीपणा.
गुलामीपणा व जातीगत भेदभाव कसा आला? त्याचं कारण आहे युद्ध. युद्ध झाल्यानंतर एका राजाचा पराभव होत असे. काही राजे शरण जात असत. राजा हारत असे वा शरण जात असे. त्याचबरोबर राजाची प्रजाही हारत असे वा ती शरण जात असे. तो राजा शरण गेला वा पराभवी ठरला तर त्या दोन राज्यात तह होत. त्यानंतर त्या तहात काही अटी राहात. अटी जशा प्रदेशाच्या राहात. तशाच अटी असत कामाच्या. कामासाठी कष्टप्रद माणसं हवी असायची. जी माणसं अस्वच्छतेची कामं करु,शकतील. ज्या कामाचा राज्यातील लोकांना त्रास येतो. शिवाय ते लोकं गुलाम असायचे व ते गुलाम असल्यानं विद्यमान राजा जी कामं सांगणार. ती त्यांना करावी लागायची. अशातच जातीअंतर्गत न आवडणारी कामं ही गुलामांना करावी लागली व त्या गुलामांची जात ही त्याला घट्ट चिकटविली गेली. पुढे त्या गुलामांच्या वाणीला व त्याच्या वागण्याला पर्यात नव्हता व त्यांना इतर जातीत जाताही येत नव्हते. कामं ही आधीपासूनच होती. मात्र ती कामं व त्या कामाची जात घट्ट चिकटविण्याचं काम विजयी राज्यसंस्कृतीनं केलं
पुर्वी जाती नव्हत्याच. फक्त कामं होती. परंतु जेव्हा गुलामाची संस्कृती तयार झाली. तेव्हाच जात तयार झाली व जाती आधारीत भेदभावही तयार झाला. त्या गुलामांना न बोलता कोणतीही कामं करावी लागायची. ती कामं न केल्यास गुलामांवर अत्याचार होत असत. ज्यातून गुलामांना नग्न करणे, त्यांच्या शरीरावर जळत्या अग्नीचा चटका देणे, त्यांचे हातपाय पाठीमागं बांधून त्यांचा कडेलोट करणे, त्यांना सुळावर चढविणे, ज्यातून त्यांची हत्या होईल. असं होवू नये याची भीती गुलामांमध्ये निर्माण झाल्यानं त्यांनी न बोलता सर्व प्रकारची कामं करणे वा त्या कामाचा सहर्ष स्विकार करणे सुरु केले व जाती अधिकच घट्ट झाल्या.
गुलामांना काही चांगलीच कामं दिली जात नव्हती. त्यांना अतिशय हीन दर्जाची कामं दिली जायची. जी कामं अस्वच्छतेची असायची. त्यातच त्यांच्याबद्दल बरेच नियम बनवले गेले. त्यांच्या राहण्याच्या जागा ठरविण्यात आल्या. त्यातही नियम होते. त्यांनी मोठं घर बांधू नये. त्यांनी वस्तीत घर बांधू नये.
गुलाम हे कोणत्याही जातीचे का असेना. त्यांच्याबाबतीत कोणीच व काहीच भेदभाव करीत नव्हते. परंतु तद्नंतरच्या काळात गुलामांसोबत अभद्र व्यवहार होवू लागला. भेदभाव व हिनतेनं कळस गाठला. आता गुलामांना जेवनही नीट मिळत नसे. सतत उपाशी राहावे लागत असे. ज्यातून त्यांनी हिंस्र पशुगत कच्चे मांस खाणे सुरु केले. एकंदरीत सांगायचं झाल्यास त्यांच्या जरी जाती ह्या उच्च स्वरुपाच्या असल्या तरी ते एका विजयी राज्याचे मांडलिक असल्यानं त्यांच्या जाती बदलल्या. त्यातून गरीब श्रीमंतच नाही तर स्पृश्य अस्पृश्यता निर्माण झाली. त्यानंतर जातीअंतर्गत भेदभाव निर्माण होवून जातीआधारीत भेदभावांला खतपाणी मिळाले.
शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास काल शिक्षणावर आधारीत जात होती. त्यामुळंच जातीप्रथा नव्हती. आज मात्र जातीवर आधारीत शिक्षण आहे. म्हणूनच आज जात अस्तित्वात आहे. तसं पाहिल्यास आज जात नष्ट झाली नाही व ती अस्तित्वात जरी असली तरी आजच्या काळात लोकांना जातीगत धंदे करावे लागत नाहीत. त्यांना दुसर्याही जातीचे धंदे करण्याची मुभा मिळाली असून ही एक महत्वपूर्ण गोष्ट एका महान व्यक्तीनं केलेलं आहे. ते महान व्यक्ती आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून प्रत्येक माणसाला कोणतीही कामे करण्यासाठी मोकळीक मिळवून दिली. जातीवर आधारीत भेदभाव नष्ट केला. त्याचबरोबर जातीची बंधनं नष्ट केली. त्याचबरोबर नष्ट केला जातीअंतर्गत पुर्वी होत असलेला भेदभाव. तो भेदभाव की ज्यातून स्पृश्य अस्पृश्यता होती. ज्यातून अस्पृश्यांना त्रास होता. ज्यातून अस्पृश्यांना स्पृश्य वस्तीत व्यवस्थीतपणे जाता येत नव्हते. त्यांना मोठमोठी घरंही बांधता येत नव्हती. त्यांचा स्पृश्यांना विटाळ होत असे. अन् समजा एखाद्यावेळेस अस्पृश्यांचा हात स्पृश्यांना लागलाच वा साधा स्पर्श जरी झाला तरी विटाळ झाला हे गृहीत धरुन अस्पृश्यांना छळलं जात असे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं व अस्पृश्यांना स्पृश्यांच्या बरोबरीनं बसण्यासाठी जागा मिळवून दिली. त्याच संधीचा लाभ होवून आता अस्पृश्यांनाही मोठमोठी घरं बांधता येतात. त्यांना स्पृश्यांच्या घरी विवाह समारंभात सन्मानानं जाता येते. त्यांना स्पृश्यांच्या बरोबरीनं एकत्र जेवन करता येते. आता काल जे पशुगत त्यांचं जीवन होतं. ते जीवन अनुभवावं लागत नाही. त्यात बरीच सुधारणा झालेली असून आज अस्पृश्यांनाही मानवासारखं वागवलं जात आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी आजही काही ठिकाणी अस्पृश्यांवर अत्याचार केला जातो. कधी अनन्वीत अत्याचार केला जातो. कधी त्यांना हिनतेनं वागवलं जातं तर कधी त्यांना पशुसारखं वागवलं जातं. काही ठिकाणी याच अस्पृश्यांना नोकरीच्या अधिकारांपासून डावललं जातं. जरी आज संविधानाचं राज्य असले तरी आणि संविधानाच्या या राज्यात प्रत्येकाला स्वतंत्र्यपणे जीवन जगण्याचा अधिकार असला तरी.
विशेष सांगायचं झाल्यास अस्पृश्यही एक जीवच आहे स्पृश्यांसारखा. त्यालाही स्पृश्यांच्या बरोबरीचं स्थान मिळावं. लोकांनी त्याला समजून घ्यावे. त्यालाही हक्कं द्यावे. त्थांच्या अधिकाराच्या जागा हिरावून घेवू नये. तरच अस्पृश्य अस्पृश्य राहणार नाही. तोही खऱ्या स्वरुपात स्वतंत्र झाला असे म्हणता येईल.
दिक्षाच्या मनात निर्माण झालेला जातीचा प्रश्न. जात नष्ट करणे आहे. हा तिचा विचार. त्यासाठीच उभारलेला तिचा तो खटला. आज ती आपलं घर सांभाळत होती. जातीचाच हा खटला तिच्या पतीला सहन न झाल्यानं व समाजानंही तिच्या पतीला जातीआधारावरुन विरोध केल्यानं तिला सोडून गेला होता. मात्र तिचा पती तिला सोडून गेला असला तरी तिनं जात नष्ट करायचा विचार त्यागला नव्हता. तो विचार आज आणखी प्रगल्भ झाला होता. ज्याची कळ तिलाच नाही तर तिच्या मुलांनाही शोषावी लागत होती.
जाती आधारावर तिच्या मनात विचार आला. जात अस्तित्वात आली कामावरुन. कामाची आखणी केली गेली व त्या कामानुसार कामाचं वर्गीकरण झालं. त्यातच विशिष्ट कामाची माणसं लवकर ओळखायला यावीत. म्हणून जात निर्माण झाली. ज्यात सुरुवातीला जातीजातीतील भेदभाव नव्हता. ज्यात विटाळही नव्हता. परंतु कालांतरानं त्यात विटाळ व भेदभाव शिरला. ज्यातून सामान्य माणसांचे जीवन जगणे असह्य झाले होते. हे सर्व स्वार्थापायी झालं होतं. विशिष्ट वर्गानं आपली अक्कलहुशारी वापरुन आपल्या बिरादरीला सुख भोगता यावं म्हणून निर्माण झालेल्या जातीचा वापर कलुषीतता निर्माण करण्यासाठी केला. आजही करीत आहे. म्हणूनच जात नष्ट करणे आहे.
जात स्वार्थासाठी निर्माण केलेली गोष्ट. काल जातीचं महत्व होतं. लोकांना जात व जातीची माणसं ओळखू यावी म्हणून. ज्या जातीनं पुढं जावून व्यक्तीत विटाळ व भेदभाव निर्माण केला. ज्यातून विशिष्ट जातीवर अत्याचार झाले. जे असह्य अशाच स्वरुपाचे होते. जातीवर आधारीत विटाळ कालपर्यंत चालला. आजही आहे. म्हणूनच जात नष्ट करणे आहे.
जात...... जी जात नाही, ती जात. जातीवरुन विटाळ अस्तित्वात आला. विटाळ हा स्वच्छतेवरुन अस्तित्वात आला. काही लोकं म्हणतात की पुर्वी जातीवरुन विटाळ नव्हता तर तो विटाळ म्हणजे काही काळाकरिता लोकांना दिलेली शिक्षा होती. जातीवरुन विटाळ जर असता तर कुंभार, सुतार वा इतर तत्सम कामे करणाऱ्यां लोकांच्या बाबतीतही विटाळ असता. परंतु तो नाही. याचाच अर्थ जातीवरुन विटाळ नव्हताच. विटाळ होता कामावरुन. लोकांना वाटत होतं की ती कामं अर्थात घाणेरडी कामं कोणीही करु नये. ती सोडावीत. म्हणून विटाळ नावाची शिक्षा. ती शिक्षा होती लोकांनी सुधरावं यासाठी. त्यांनी व्यवस्थीत राहावं. घाणेरडं राहू नये यासाठी दिलेली. त्यांचं म्हणणं होतं की लोकांनी घाणेरडं काम करु नये. स्वच्छ अंघोळ करावी व नीटनेटकं राहावं. कारण असं अस्वच्छ राहण्यातून लोकांना आजार शिवतो. साथीचे रोग पसरतात. कारण पुर्वी गावात साथीच्या साथी यायच्या. ज्या साथीत कित्येक लोकं मरण पावत असत. ती आजाराची साथ अस्वच्छतेपासून पसरत असल्यानं ती अस्वच्छतेची कामं करणाऱ्यांचा तत्सम लोकं विटाळ मानत असत. म्हणूनच जे लोकं चांगले राहात असत. स्वच्छता पाळत असत. त्यांच्याबाबतीत विटाळ नव्हताच. यासाठीच मनुस्मृती लिहिल्या गेली.
विटाळ...... अस्वच्छतेवरुन व कामाच्या स्वरुपावरुन आलेला. लोकांचं आजचं म्हणणं की त्या वेळच्या लोकांचं म्हणणं की लोकांची अस्वच्छतेची कामं करु नये. म्हणूनच विटाळ. परंतु हे जरी खरं असलं तरी ती अस्वच्छतेची कामं करणं एखाद्या तरी घटकाला आवश्यक होतं. जर ती कामं त्या विशिष्ट घटकानं केली नसती तर कदाचीत अस्वच्छताच अस्वच्छता पसरली असती. शिवाय तेवढेच आजारही आणि आजाराच्या साथीही. उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या गाईचं देवू. एखादी गाय जर एखाद्या व्यक्तीच्या घरी मरण पावली असती आणि तिला ओढत नेवून फेकणारी जात जगात नसती तर कदाचीत त्या गाईला तिथंच सडत राहावं लागलं असतं. तिच्या पार्थिव शरीराची दुर्गंधी परीसरात सुटली असती. शिवाय त्यातून आजार पसरलाच असता. त्यामुळंच ती अस्वच्छतेची जात तेवढीच महत्वाची होती. जेवढी स्वच्छतेची कामं करणारी जात महत्वाची होती. त्यामुळंच विटाळ मानायलाच नको होता. व्यतिरीक्त मनुस्मृती लिहून जगाला मनुस्मृतीतील जाचक नियमांच्या आधारे जगायला लावले. जे जगणे अस्वच्छतेची कामं करणाऱ्यांसाठी व संपुर्ण स्रीवर्गासाठी जाचक स्वरुपाचे होते. मनुस्मृतीत स्वच्छता बाळगणाऱ्या विशिष्ट वर्गासाठी वेगळे व अस्वच्छ राहणाऱ्या विशिष्ट वर्गासाठी वेगळे नियम होते. शिक्षेच्या बाबतीतही भेदभाव केलेला होता. शिवाय अधिकार आणि स्वातंत्र्यही गोठवले होते.
काही लोकांनी विटाळाला अतिशय महत्वपुर्ण घटक मानून त्याचा साथीच्या आजाराशी सःबंध जोडला. त्याला अधिक प्राधान्य दिलं. परंतु हे जरी बरोबर असलं तरी विटाळ हा अतिशय महत्वाचा घटक नव्हताच आणि तो मानणे गरजेचे नव्हतेच. शिवाय आजाराशी विटाळाचा संबंध लावून लोकांनी एका विशिष्ट जातींना अस्पृश्य मानलं. तसंच रजस्व नावाच्या नैसर्गिक प्रवृत्तीलाही विटाळ मानून स्रियांच्याही स्वतंत्र्यपणे जगण्यावर मर्यादा आणल्या. त्यांचे समाजातील अधिकार नाकारले. त्यातच अस्पृश्यांचा सुर्योदयानंतरच्या काही तासाचा गावातील प्रवेश नाकारला.
एकीकडे त्यांचा स्पर्श म्हणजेच आजाराचा शिरकाव मानलं. तर दुसरीकडे त्यांनी तयार केलेल्या वस्तू त्यांना चालल्या. याचाच अभ्यास बाबासाहेबांनी केला होता. त्यानंतर बाबासाहेबांनीच सांगीतलं की पिढीतील धंदे सोडा. ते धंदेच विटाळ टिकवतात. आपल्याला माणसाप्रमाणे जगू देत नाहीत. आपल्याला त्या धंद्यामुळेच अतुच्छतेचं जगणं सहन करावं लागतं. त्यांनी पिढीजात धंदे सोडायला लावले. जातीगत विटाळ मिटविण्यासाठी. परंतु जात मिटवली नाही. जी जात मिटवायला हवी होती. ज्या कामातून जात निर्माण झाली होती व जातीअंतर्गत विटाळही निर्माण झाला होता. जो विटाळ मनुस्मृती आणि भाला संग्राममधील काही जाचक नियमांनी निर्माण केला होता. जाती, विटाळ व भेदभावाच्या पैलूतूनच त्यांनी मनुस्मृती जाळली. कारण त्यात लिहिलेल्या काही अनैतिक गोष्टी. ज्या मनाला रुचत आणि पटत नव्हत्या. शिवाय त्या प्रकरणाचा खटला न्यायालयात गेला. ज्यात विटाळ, भेदभाव होता. प्रथम तो खटला खालच्या न्यायालयात चालला. त्यानंतर तिथं बाबासाहेबांना विजय प्राप्त झाला व तो विजय इतर लोकांना पटला नसल्यानं तो खटला उच्च न्यायालयातही चालला. ज्यात विटाळ वाईटच असा निकाल आला होता. तरीही आज काही लोकं विटाळाच्या नियमांचा उदोउदो करुन त्या संबंधित विटाळाचा संबंध साथीच्या आजाराशी लावतात. त्या अस्पृश्य शोषत असलेल्या व स्रियांचे हक्कं नाकारणाऱ्या गोष्टी काही लोकं चांगल्या होत्या असे मानतात. म्हणतात की आजपर्यंत जो देश मनुस्मृतीच्या आधारावर चालला. चांगला चालला. ज्यानं राष्ट्र टिकवलं. त्यांचं म्हणणं असं की मनुस्मृती चांगली.
मनुस्मृती, विटाळ, भेदभाव स्रियांचे अधिकार नाकारणे. या गोष्टी चांगल्या होत्या की वाईट. हे म्हणणं नाही. प्रत्येकांचं मत याबाबतीत वेगवेगळं असू शकते. कारण सर्वच व्यक्तींना सर्वच गोष्टी चांगल्या वाटतीलच असं नाही. एखाद्याला एखादी गोष्ट जास्त आवडते तर तीच गोष्ट दुसऱ्याला अजिबात आवडत नाही. तेच झालं मनुस्मृती म, विटाळ, भेदभाव व इतर गोष्टींबद्दलबद्दल. आज जेही लोकं त्या सर्व गोष्टीला चांगले म्हणत असतील. त्यांना त्या गोष्टी आवडत असेलच यात शंका नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांना त्यातील जाचक नियमांची झळ पोहोचलेली नसेल. त्यामुळं त्यांनाच त्यातील नियमांबद्दल काही घेणं देणं नव्हतंच. परंतु ज्यांना त्यातील नियमांची झळ पोहोचली. त्यांना मनुस्मृती, विटाळ, भेदभाव, स्रियांचे अधिकार नाकारणे या गोष्टी तरी कशा आवडतील? समजा एखाद्याला कारल्याची भाजी आवडत नसेल तर तो व्यक्ती कारल्याच्या भाजीला कडूच म्हणेल व ज्या व्यक्तीला कारल्याची भाजी आवडत असेल, तो व्यक्ती आवडीनं कारल्याची भाजी कडू होवूनही खाईलच खाईल. तेच झालं बाबासाहेबांबद्दल. त्यांनी या सर्व गोष्टींचा अभ्यास केला. त्यांना त्यातील नियम अजिबात पटले नाहीत. म्हणूनच त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि चवदार तळ्याचा सत्याग्रहही. ही बाब नाकारता येत नाही. तसाच तो खटला न्यायालयात गेला व न्यायालयानंही त्यातील नियम सामान्य लोकांच्या जीवन जगण्यासाठी वाईट आहेत याची पडताळणी करुन वा गृहीत धरुन जी मनुस्मृती जाळण्याची कृती वा इतर कृती चवदार तळ्याच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर केल्या होत्या. त्या कृतींना योग्य ठरवत बाबासाहेबांच्या कृतींचं समर्थन केलं. त्यानंतर निकाल दिला की आजपासून अशा सर्वच कृत्यांवर कायमस्वरुपी बंदी लावण्यात येत आहे. त्यातूनच विटाळ, स्रियांचे अधिकार नाकारणे आणि भेदभावावर बंदी घालण्यात आली.
विटाळ व भेदभावाची पाश्वभुमी. समाजाला बाबासाहेब जागृत करीत होते. सांगत होते की पिढीजात धंदे सोडा. ते अस्वच्छतेचे धंदे आहेत व त्यापासूनच भेदभाव, विटाळाचे किडे वळवळतात. वाढतात. विटाळ ही कीडच. शेवटी काही लोकांना वाटले, विटाळ नष्ट व्हावा. त्यांनी पिढीजात धंदे सोडले. ज्यातून सामाजिक परीवर्तन झालं व विटाळ मिटला व त्याचा परिणाम हा झाला की तद्नंतर समाजातील काही लोकांनी पिढीजात धंदे सोडले नाहीत. त्यांनाही समाजात सन्मानाचं स्थान मिळायला लागलं.
आज विटाळ नाही. विटाळ कायमचा मिटला आहे असंही म्हणता येत नाही. तरीही समाजात काल ज्या घटकाला हीन समजलं जात होतं. त्या घटकाला आज समाजात मानाचं तसंच सन्मानाचं स्थान आहे. काल धंद्यावरुन नीच समजल्या अस्पृश्यांनाही आज उच्च जातीचे लोकं आपल्या बरोबरीनं जगण्याची परवानगी देतात. त्यांना हीन लेखत नाहीत. विटाळाच्या कालचक्रात काल मोठं घर बांधण्याची इच्छा ठेवणाऱ्यांना काल मोठं घर बांधता येत नव्हतं. आज तेही मोठं घर बांधू शकतात. एकमेकांच्या विवाह समारंभात भेदभाव न बाळगता सहभागी होत असतात. काल उच्च शिक्षण शिकता येत नव्हतं. आज उच्च शिक्षण शिकता येतं. काल एका अस्पृश्यानं तपश्चर्या केली म्हणून त्याच्या कानात शिसं ओतलं. आज तशी गोष्ट घडत नाही व तसा अन्याय झाल्यास आज न्यायालयात दाद मागण्याची तरतूद उपलब्ध आहे. कोणीच कोणाला हीन लेखू शकत नाही. अत्याचार करु शकत नाही. कारण आज कायद्याचं राज्य आहे व कायद्याचं उल्लंघन आज तरी करता येणे शक्य नाही. हेही शक्य झालं बाबासाहेबांमुळं. तरीही काही ठिकाणी विटाळ वळवळतोच. भेदभावही वळवळतोच. काही ठिकाणी स्रियांचे अधिकारही नाकारले जातातच. हे सगळं घडत असतं जातीमुळे. काही ठिकाणी आजही विशिष्ट जातीला हीन समजलं जातं. विटाळ मानला जातो. जात सहजासहजी सांगता येत नाही. ती जाणीवपूर्वक जाणूनबुजून लपवून आपली दुसरीच उच्चभ्रू जात सांगीतली जाते. याला काय म्हणता येईल. भेदभाव आणि विटाळच ना.
आज बाबासाहेब आंबेडकर देवच आहेत की ज्यांनी समाज सुधरवला. समाजातील विटाळ थोडाफार बदलवला. लोकांना खुल्ल्या मनानं जगात प्रवास करता येत असतं. आपली जात लपवून का असेना, वावरता येत असतं. अन् तरीही यदाकदाचित जातीवर अन्याय झाल्यास न्यायालयात दादही मागता येत असतं. याचाच अर्थ असा की बाबासाहेबांनीच कायद्याचं राज्य आणलं. लोकांना सन्मानानं जगण्याचाही मार्ग उपलब्ध करुन दिला. विटाळ थोडासा का होईना, परंतु कायमचा संपला. हे जरी बरोबर असलं तरी आजही काही ठिकाणी भेदभाव आहेच. विटाळाच्या कालचक्रात आजही माणसं मारलीच जात आहेत. असं का होतं? तर त्याचं एकमेव कारण आहे जात. कारण जातीनंच भेदभाव निर्माण केला अन् जातीनंच विटाळदेखील. ती जात जेव्हा बंद होईल, तेव्हाच विटाळालाही पायबंद बसेल. त्यातल्यात्यात जातीप्रथा देखील नष्ट होईल यात शंका नाही. जर जात नष्ट होत नसेल तर, विटाळ, भेदभाव वा स्रियांचे अधिकार नाकारणे ह्या गोष्टी कधीच संपणार नाहीत. काल जरी मनुस्मृती जाळली असेल, तरी आज ती जाळून काहीच उपयोग नाही. काल चवदार तळ्याचं आंदोलन केलं गेलं व खटला लढल्या गेला असला तरी आज त्याचा काही उपयोग नाही. अन् कालच्या निकालानं विटाळ व भेदभाव थोडासा का होईना, संपला असला तरी आज त्याचा काहीच फायदा नाही. हे म्हणणे संयुक्तिक ठरते.
डॉ. बाबासाहेब हे हिंदू होते. आरक्षण हे त्यांनी हिंदू धर्मात राहूनच लोकांना मिळवून दिलं. जेव्हा संविधान जगजाहीर झालं. ते कशासाठी तर हा सर्व उपेक्षित राहिलेला समाज सुधरावा. त्या समाजानंही आरक्षणाचा वापर करुन आपला सर्वप्रकारचा विकास करावा. परंतु तेवढी सोय करुनही जेव्हा त्यांनी पाहिलं की हा अस्पृश्य समाज जागच्या जाग्यावर आहे. त्यांच्यात एवढासाही बदल झालेला नाही. तेव्हा तसाच विचार करुन धर्म बदलवला तर कदाचीत आपला समाज सुधरु शकतो असं बाबासाहेबांना वाटलं व त्यांनी धर्म बदलवला. ते बौद्ध झाले. परंतु ते जरी बौद्ध झाले असले आणि आपल्या समाजालाही बौद्ध बनवलं असलं तरी समाज सुधरला नाही. त्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला नाही. म्हणूनच आरक्षण वाढवावं लागलं.
आज आरक्षण आहे. परंतु समाज सुधरला नाही. समाजातील काही लोकांनीच फक्त आरक्षणाचा लाभ घेतला. काहींनी लाभ घेतलाच नाही. म्हणूनच आरक्षण आजही सुरु आहे व त्यातूनच आज इतरही जातीचे वाद सुरु झाले आहेत. त्यामुळंच विशेष सांगायचं म्हणजे हे सर्व जात आहे, म्हणूनच सुरु आहे. जात जर नसती तर आरक्षण, भेदभाव, विटाळ नसताच, ना कोणावर कोणाचा अत्याचार झाला असता, ना कोणीच कोणाला उच व कोणीच कोणाला नीच समजले नसते. सर्व लोकं समान असते, समानतेनं जगले असते. म्हणूनच जात नष्ट करणे आहे व सर्व लोकांना समाजात समानतेने वागणे शिकवणे आहे यात शंका नाही.
********************************************