जात कादंबरी भाग दोन
पोलीस...... पोलिसांवर कधीकधी शंकाच घेतली जाते. कारण त्यांचं वागणं. त्यांचं वागणं कधीकधी एवढं अजब असतं की त्यांच्यावर सहजच शंका निर्माण होत असते यात शंकाच नाही. मग एखादी महिला पोलिसांवर ताशेरे ओढत त्यांचं वागणं अजबच बाई असे म्हणायला कचरत नाही. म्हटलं जातं की अकस्मात अपराधाची स्थिती उत्पन्न होत असेल तर एकशे बारा क्रमांकावर फोन करावा. मुलांच्या बाबतीत काही समस्या असल्यास एक हजार अठ्ठ्यानव या क्रमांकावर फोन करुन लावावा. पोलीस येतात व अपराध टळतो. त्यातच पोलीस कन्ट्रोल रुमचाही क्रमांक लावावा. परंतु कधीकधी असा क्रमांक लावूनही उपयोग नसतो. जेव्हा तो कामात येत नाही. कधी पुरावा म्हणून तर कधी मदत म्हणून. तेव्हाच शंका उत्पन्न होते.
पोलीस कन्ट्रोल रुमचे वा अकस्मात अपराध टाळायचे क्रमांक म्हणून एकशे बारा व एक हजार अठ्ठ्यानव हे क्रमांक प्रसिद्ध आहेत. पुर्वी शंभर क्रमांक होता. जो कधी लागतच नव्हता. आता एकशे बारा क्रमांक आहे. जो लागतो. परंतु तो क्रमांक लागल्यानंतर काय होतं. तो क्रमांक लागल्यानंतर पोलीस येतात. पण काहीच करीत नाहीत. उलट अपराध करणाऱ्या व्यक्तींनाच शह देत त्यांची बाजू कधीकधी उचलून धरतात. असं बरेचवेळा घडतं. ते मदतीला येणारे पोलीस शहानिशा करतात व सांगतात की आपण वाद मिटवावा आणि नसेल मिटत तर पोलीसस्टेशनला यावं व आपली तक्रार नोंदवावी. त्यानंतर दोन्ही बाजूकडील मंडळी मिळेल त्या साधनानं पोलीस स्टेशन गाठतात व आपली तक्रार नोंदवतात. यामध्ये महत्वपुर्ण बाब ही की संबंधीत जीही प्रकरणं उद्भवतात. त्या प्रकरणात एकशे बारावर फोन लावणारा व्यक्ती हा अन्यायशोषीत असतो. म्हणूनच तो एकशे बारावर फोन लावत असतो. त्यामुळंच पोलीस येतात व अपराध टळतो. हा एक पुरावाच असतो. अन्यायशोषीत व्यक्तींसाठी. त्यात अन्यायशोषीत व्यक्ती आणि अन्याय करणाऱ्या व्यक्तीला म्हणलं जातं की त्यानं पोलीस ठाण्यात यावं व तक्रार नोंदवावी. परंतु ज्यावेळेस अन्यायशोषीत व्यक्ती पोलीस स्टेशनला पोहोचतो. त्यावेळेस त्याची तक्रारच पोलीस स्टेशनला घेतली जात नाही. उत्तर विचारल्यावर चक्कं सांगीतलं जातं की तो उशिरा पोलीस स्टेशनला पोहोचला. तो येण्याच्या आधीच तक्रार नोंदवली गेली आहे. त्यानंतर तक्रार कोणं नोंदवली याची शहानिशा करण्यात येते. तेव्हा आढळून येतं की ती तक्रार ज्यानं अन्याय केला. त्याच व्यक्तीनं त्याचे आधी येवून तक्रार नोंदवली. त्यामुळंच ज्यानं एकशे बारा क्रमांकावर तक्रार नोंदवली. ती तक्रार घेतली जावू शकत नाही व त्या क्रमांकावर फोन लावण्याचाही उपयोग होत नाही. त्यानंतर असे का घडले याचा विचार येतो. विचार येतो व मनातल्या मनात नकाराचे चक्र सुरु होते व पोलिसांबद्दलची आत्मीयता नष्ट होवून मनात पोलिसांबद्दल असुयाही निर्माण होत असते. या प्रकरणात आणखी एक महत्वपूर्ण मुद्दा हा की संबंधीत व्यक्ती, ज्या व्यक्तीवर अन्याय झाला तो अन्यायशोषीत असून त्यानं जरी एकशे बारा क्रमांकावर फोन केला आणि पोलीस येवून त्यांनी जरी सांगीतलं की त्यानं पोलीस स्टेशनला येवून तक्रार नोंदवावी. तरीही साधनांच्या अपुरेपणामुळं तो अपराध करणाऱ्या व्यक्तीच्या मागून जर पोलीस ठाणे गाठत नसेल वा त्याची तक्रारच नोंदवली जात नसेल तर त्या एकशे बारा क्रमांकाचा वा एक हजार अठ्ठ्यानव क्रमांकाचा उपयोग काय? अशा घटना वा प्रसंग काही लोकांच्या जीवनात वारंवार घडत असतात. हे मला लहानपणापासून दिसलं. लहानपणातही गावात कुणावर कुणी अत्याचार केल्यास गावातील दोन्ही घटक तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला जात. ज्यात अन्याय करणारा घटक आपल्यावर खटला दाखल होवू नये म्हणून आधीच पोहोचलेला असायचा. त्यातच त्याचा अवतार पाहण्यासारखा असायचा. ते स्वतः कपडे फाडलेल्या अवतारात असायचे. अंगावर ओरबाडलेल्या जखमा असायच्या. त्यानंतर दोन्ही पार्टीचं मेडीकल चेकअप व्हायचं व कळायचं की त्या जखमा त्यांनी स्वतः स्वतःच्याच अंगावर केलेल्या असत. फिंगरप्रिंट प्रणालीच्या तावडीतून ते सुटायचं नाही. लपायचंही नाही व अगदी ते सहज दिसायचं. कालचे पोलीस हे अतिशय इमानदारीनं फिंगरप्रिंट प्रणाली राबवायचे. ज्यात अन्याय कोणी कोणावर केला हे निदर्शनास यायचं.
आजही अशीच फिंगर प्रिंट प्रणाली अस्तित्वात आहे. परंतु आज काळ बदलला आहे व लोकं फारच हुशारही झालेले आहेत. लोकं पोलिसांनाही मॅनेज करीत असावेत असे चित्र दिसत आहे. आज फिंगरप्रिंट प्रणाली ही आरोपीच्या मतानुसार काम करते की काय? याची शंका उत्पन्न होते. कारण एकशे बारा क्रमांकावर जरी फोन लावून अपराध टाळण्यासाठी पोलिसांना बोलवले तर पोलीस येतात हे निश्चीत. परंतु कधीकधी पोलीस येवून त्या परिस्थितीत केवळ ते तक्रारकर्त्यांनाच दाटतात. कारण असतं आरोपीचं वजन. आरोपी हा आरोपीच असतो. त्याला जात धर्म वा ओळख नसते. ही भावना गृहीत न धरता पोलीस प्रशासन संबंधीत गुन्हा नोंदवतांना आरोपीची ओळख, जात व धर्म पाहतात की जे पाहायला नको. त्यामुळंच काही लोकं म्हणतात की तशाच स्वरुपाचा आपल्यावर अत्याचार होत असतांना तोच क्रमांक लावून आपण आपल्यावर झालेल्या अत्याचाराचं निवारण करु शकत नसेल वा तो क्रमांक तक्रार करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येत नसेल किंवा त्या क्रमांकावर फोन करण्याचा उपयोग होत नसेल तर तो क्रमांक कोणत्या फायद्याचा. तो क्रमांकच बंद केलेला बरा आणि आरोपीला मोकाटच सोडून दिलेले बरे की त्याला दुसरे तशाच स्वरुपाचे इतर बरेच गुन्हे करता येतील. असं आजही वाटतं. यामुळेच आजच्या काळात बरेचसे गुन्हे वाढत चाललेले आहेत. याबाबतीत एक घटना सांगतो. एक प्रकरण अमरावतीतील मेळघाटातील रेट्याखेड्या गावात घडली. हे गाव चिखलदऱ्यापासून ऐंशी किमीच्या अंतरावर आहे. त्या गावातील एका वृद्ध महिलेवर अलिकडील काळात जादूटोणा अस्तित्वात नसतांना तिच्यावर जादूटोणा केल्याचा आक्षेप घेवून तिची धिंड काढली. तिला आगीचे चटके दिले. तिला मुत्र पाजले व तिच्या तोंडाला काळे फासले. तसंच हे कृत्य खुद्द ज्या व्यक्तीनं गावातील अन्याय दूर करावा म्हणून त्याची नियुक्ती असते. अशा पोलीस पाटलानंच केलं. त्यातच त्या पोलीस पाटलाचाच रुतबा जवळच्या पोलीस स्टेशनला असल्यानं त्या महिलेवर अन्याय होवूनही पोलिसांनी सदर तक्रार दाबून ठेवली. पुढं कारवाई झाली. परंतु तेव्हापर्यंत ती तक्रार दबूनच राहिली ना. या प्रकरणात अन्याय ज्यावर झाला. त्या व्यक्तीची मुलं जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार घेवून गेले. तेव्हाच तक्रारीचं निवारण झालं व आरोपींना अटक झाली. जर असं झालं नसतं तर आरोपी जाळ्यात अडकले तरी असते काय? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
आज बराचसा समुदाय सुशिक्षीत आहे म्हणून ठीक आहे. दाद तरी मागता येते. परंतु जर समाज सुशिक्षीत नसता तर चित्र काहीसे वेगळेच असते. आजही काही ठिकाणी असंच घडतं. विशेष सांगायचं झाल्यास आरोपी हा आरोपी असतो. त्याची जात, धर्म वा ओळखही आरोपीच असते. असे असतांना त्याला जात धर्म वा त्याची वेगळी अशी ओळख नसतेच. असे असतांनाही पोलीस ते प्रकरण जर आरोपीच्या जात, धर्म आणि विशेष अशा ओळखीनं हाताळत असतील तर जगातील कोणत्याच व्यक्तीला न्याय मिळणार नाही. अशाच धिंडी निघतील. कुणाला मुत्र पाजले जाईल तर कुणाचे गळेही कापले जातील. आज सगळीकडे असंच घडत आहे. वातावरण तंग आहे व आरोपी सर्रास सुटत आहेत. त्यांना अभय मिळत आहेत. महिलांवरही अत्याचार होत आहेत. ज्याचं काल याचं प्रमाण कमी होतं. आज जास्त आहे.
आज बऱ्याच ठिकाणी गुन्हे घडू नये म्हणून पोलीस प्रशासनानं हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला. ज्यात एकशे बारा व एक हजार अठ्ठ्यानव क्रमांकाचा समावेश होतो. लोकं फोन लावतात. परंतु प्रत्यक्षदर्शी पोलीस स्टेशन गाठण्यावर तक्रार करण्याचं स्वरुप अवलंबून असतं. त्यातच आज तक्रार करणारी व्यक्ती जरी एकशे बारावर फोन करीत असेल तरी तीच तक्रार ग्राह्यं धरली जात नसल्यानं बऱ्याच लोकांचा पोलिसांवरील विश्वास उडत चाललेला आहे. ज्यातून गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे व गुन्हे वाढत असून गुन्हेगारही वाढत आहेत. यात शंका नाही.
महत्वाचं सांगायचं झाल्यास अपराध टाळण्यासाठी वा पोलिसांची मदत मिळविण्यासाठी जर एकशे बारा क्रमांक आहे तर तोच क्रमांक तक्रार दाखल करण्यासाठीही पुरावा म्हणून वापरावा. शिवाय जो कोणी तक्रार दाखल करीत असेल तर त्याला तक्रार दाखल करतांना विचारावे की त्यानं तक्रार दाखल करण्यापुर्वी एकशे बारा क्रमांकावर फोन लावला होता काय? नसेल लावला तर त्याची तक्रार दाखलच करु नये. आधी एकशे बारावर फोन लावणाऱ्यांची तक्रार घ्यावी. जेणेकरून अन्याय कुणी कुणावर करणार नाही. गुन्हे कोणीही करणार नाही. गुन्ह्यांची संख्या कमी होईल. गुन्हेगारही कमी होतील. आरोपी मोकाट सुटणार नाही. अन् तसं होत नसेल तर एकशे बारा क्रमांक रद्द करावा.
गुन्हे वाढतात व गुन्हेगार वाढतात. कारण त्यांना माहीत असतं की एकशे बारा क्रमांकावर फोन लावल्यानं काही उपयोग नाही. ते गुन्हे करतात जाणूनबुजून व ताबडतोब पोलीस स्टेशनला जावून तक्रार नोंदवतात. शिवाय उलटे चोर आपणच शेर होत समाजात मिरवतात. काही लोकं यातून पैसेही कमवतात. गुन्हे मागे घेत असतांना. चांगले व्यक्ती मात्र या भानगडीत पडत नाहीत. ते फक्त एकशे बारावर फोन करु शकतात. तक्रारीच्या भानगडीत पडत नाहीत. मग फसगत होते व चांगला व्यक्तीच पोलिसांच्या विनाकारण जाळ्यात अडकतो यात शंका नाही. तेव्हा एकशे बारा क्रमांक हाही एक तक्रारीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा हेही तेवढंच खरं. जर असं घडत नसेल तर व्यक्तीच्या मनात शंका निर्माण होवून तो आजच्या पोलीसांचं वागणं अजबच बाई असे म्हणून घ्यायला विसरत नाहीत.
दिक्षाच्या मुलांना जातीअंतर्गत होत असलेला त्रास. ती जिल्हाधिकारी असली तरी जाती आधारावर तिनं न्यायालयात दाखल केलेली तक्रार. एकदा ती शाळेत गेली व तिनं मुलांची जाती आधारावरील तक्रार तिला का येत आहे अशी साधी विचारणा त्या शाळेतील शिक्षकांना केली. परंतु शिक्षकांनी तिचा अपमान केला. ज्यात अपमानादाखल तिनं पोलिसांना एकशेबारा क्रमांकावर फोन लावला. त्यावेळेस तिनं ती जिल्हाधिकारी असल्याचं सांगीतलं नाही. तिनं आपलं पद आपल्या जातीअंतर्गत निर्माण केलेल्या लढ्यात बाजूला ठेवलं.
दिक्षानं जातीआधारावर जात नष्ट व्हावी म्हणून जी जनहित याचिका न्यायालयात दाखल केली होती. ती याचिका ती खालच्या कोर्टात हारली होती व आता तीच याचिका तिनं डगमगून न जाता उच्च न्यायालयात दाखल केली होती.
तिनं केलेली तक्रार. ना या काळात पोलीस प्रशासनही तिच्या बाजूनं बोलू शकत होतं, ना कनिष्ठ न्यायालयातील कोणी बोलत होतं. जनतेच्या उपयोगाच्या दृष्टीनं ती तक्रार होती. परंतु जनताही त्यावर बोलू शकत नव्हती. अशातच तिची ओळख झाली एका तरुणाशी. जो एक वर्तमानपत्र चालवत होता. त्याचं नाव गोपाल होतं.
गोपालची झालेली दिक्षाची मुलाखत. त्याला दिक्षाचा लढा कळला होता. त्याला त्या लढ्याची उपयुक्तताही लक्षात आली होती. तो लढा रास्त होता. तसं त्यानं तिची प्रकरणं आपल्या वर्तमानपत्रात छापण्याचं ठरवलं. वाटलं की जर अशी प्रकरणं छापली गेली तर एक दिवस जनमत जागृत होईल व जात नष्ट होणार. तसं पाहिल्यास गतकाळात जेव्हा तिनं न्यायालयात तक्रार दाखल केली होती. तेव्हा बराच गाजावाजा झाला होता. त्यावेळेस सरकारनं वृत्तपत्राच्या संपादकांना धमकी दिली होती की त्यांनी जर त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या तर त्यांच्या वर्तमानपत्राच्या मान्यता रद्द केल्या जातील. त्यानंतर बिचाऱ्यांनी त्या बातम्याच छापणं बंद केलं होतं. शिवाय गतकाळात जी जी वर्तमानपत्र तिच्या बातम्या छापत होती. त्या वर्तमानपत्राचा खपही कमी झाला होता.
तिला जातीआधारावर खटला दाखल केल्यानं वेदनाच होत राहिल्या. तिच्या मनात सतत विचारत येत राहिले. पदोपदी तिचा अपमानच होत राहिला. परंतु तिनंही हार मानली नाही. ती लढत होती एखाद्या वाघिणीसारखी. कमरेला पदर खोचून. पतीनं जातीआधारावर जातीची तक्रार का टाकली अशी विचारणा करुन घेतात ती मागे घेशिल. तरच मी ठेवणार असा धाक दिला तरी ती घाबरली नाही. कारण तिला माहीत होतं की जात ही माणसांच्या माणूसकीला गुलाम करणारी आहे. आज आपण स्वतंत्र्य आहो व स्वातंत्र्यच अबाधित ठेवण्यासाठीच प्रजासत्ताक आहे. आपल्यालाही कधी ना कधी न्याय मिळेलच.
***************************************
स्वातंत्र्य घेता का हो स्वातंत्र्य. असं जर कोणी आपल्याला दिसलं तर आपण म्हणू की संबंधीत व्यक्तीला वेड तर लागलं नाही ना. तसं पाहिल्यास आज हेच म्हणण्याची वेळ आली आहे.
स्वातंत्र्य म्हणजे मुक्त जगणं. मनात येईल तसं जगणं. एवढा सोपा अर्थ आहे. आज हेच स्वातंत्र्य हिरावत चाललेले दिसत आहे. कारण आज माणसाच्या मनात चांगले विचार उरलेलेच नाही. सर्व कुविचार भरलेले आहेत. तरीही कालानुकाल काही थोर महात्म्ये जन्म घेतात व माणसाच्या मनातील कुविचारांचं शुद्धीकरण करतात. जसा रक्तात आलेला भेसळपणा दूर केला जातो. अर्थात कोलेस्टेरॉल वाढले असेल वा रक्त जाडसर झाले असेल तर ते काही फळं खावून वा जिनस कावून दूर केले जाते. इथं रक्त फळाच्या माध्यमातून शुद्ध होतं तर तिथं मन किर्तन, प्रवचन व सुविचाराने शुद्ध होतं. मनालाच शुद्ध करण्यासाठी स्वातंत्र्य असतं व स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठीच प्रजासत्ताक असतं. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. याबाबत संत रोहिदास म्हणतात, 'मन चंगा तो कटौती मे गंगा' त्यानुसारच समर्थ रामदासांनी मनाचे महत्व लक्षात घेऊन म्हटले की मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. एवढे मनाचे महत्व आहे. मन जर चांगले असेल तर आपल्याला कोणताच आजार छळत नाही. सर्व प्रकारच्या व्याधींपासून आपण अलिप्त राहू शकतो.
आज भारतीय प्रजासत्ताक. भारतात प्रजासत्ताक स्वरुपाचं राज्य सव्वीस जानेवारी एकोणविसशे पन्नास पासून अस्तित्वात आलं. त्यापुर्वी भारतात प्रजासत्ताक नव्हतं.
प्रजासत्ताक म्हणजे लोकांचे लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालविलेले राज्य. असे राज्य हे सगळे देशच चालवत होते. हे सगळं बरोबर होतं. मग भारतात अशी कोणती गरज पडली की भारताला लिखीत राज्यघटना तयार करावी लागली व ती राज्यघटना लिहून ती सव्वीस जानेवारी एकोणविसशे पन्नासला भारतीय जनतेला बहाल करावी लागली? हा एक विचार करण्यालायकच प्रश्न. तो कोणाच्याही मनात अगदी सहजच उद्भवेल.
भारत प्रजासत्ताक होण्यापुर्वी तो आधीपासूनच अंधश्रद्धेच्या बुरख्यात जगत होता. शिवाय या भारतातील बरीचशी मंडळी ही मेंढरागत वागत होती. ती हुशार नव्हती व ती एका अतिशय हुशार माणसांच्या बोलण्यावर वा दिशा दाखविण्यावर विश्वास ठेवणारी होती. जी माणसं ढोंगी होती. बरीचशी मंडळी याच ढोंगी माणसांच्या प्रभावात लिप्त होती. ती देवादिकात व अंधश्रद्धेत रमत होती. त्यातच अंगात येणे याही गोष्टी वारंवार घडत. मांत्रीकांचे प्रस्थ माजले होते. हे मांत्रीक एखादा आजार आल्यास त्यावर अमूक भूत लागला वा एखादा व्यक्ती मरण पावल्यास अमूकानं मुठ मारली अर्थात करणी केली. अशा आशयात लोकं गुरफटले जात होते. हा मांत्रीक गुप्त धन मिळवून देतो असे सांगून परीसरातील जीवंत मुलांचा नरबळी देत असे व ते जाहीरही होवू देत नसे. मांत्रीक हा दगडाच्या देवांना पुढे करुन सामान्य माणसांना लुटत असे. एवढे लुटत असत की सामान्य माणसांचं जगणं अति अवघड होवून जाई. शिवाय केशवेपण, बालविवाह, विधवांच्या विवाहास बंदी या सर्व गोष्टी कायदे बनले तरी समाजात सुरुच होत्या. त्यातच लोकं समाजाला दोष देत होते. जे सामान्य जीवन जगायचे. अंधश्रद्धेवर विश्वास करणाऱ्या या समाजात त्यावेळच्या काळात संबंधक्रांतिकारांनी रणशिंग फुंकले. त्यांच्यात प्रयत्नाने भारत स्वतंत्र झाला. हे जरी खरं असलं तरी समाजाला नव्हे तर देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. परंतु समाज सुधारला नव्हता. अशा समाजाला सुधारण्यासाठी वा त्यांना योग्य दिशा दाखविण्यासाठी भारतात काही नियमांची गरज होती. ज्या नियमानुसार देश चालेल. देशाला चालता येईल. तेच नियम म्हणजे घटना व ती राज्यासाठी लागू झाली होती. म्हणून ती राज्यघटना. भारतीय राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणविसशे पन्नासला लागू झाली.
भारताला राज्यघटनेची गरज जेव्हा भासली. तेव्हा एक बैठक भरली. ती राज्यघटनेची आढावा बैठक होती. राज्यघटना ही लिखीत स्वरुपाची असावी की अलिखीत स्वरुपाची? त्यातच तीन देशाच्या राज्यघटना अभ्यासल्या गेल्या. इंग्लंड, अमेरिका, स्वित्झर्लंड. इंग्लंडमध्ये अलिखीत राज्यघटना होती. अमेरिकेत लिखीत पण परिदृढ राज्यघटना होती. स्वित्झर्लंडमध्ये परीवर्तनशील स्वरुपाची राज्यघटना होती. शिवाय राज्यघटना कोणती स्विकारावी यावर चर्चा झाली. अशा प्रकारचे वादविवाद त्या काळात निर्माण झाल्यानंतर मग ठरलं की आपण अलिखीत राज्यघटना ठेवावी. कारण ज्या देशानं आपल्यावर एवढे वर्ष राज्य केलं. त्या देशाची राज्यघटना ही अलिखीत स्वरुपाची होती. परंतु काही मंडळी म्हणत होती की राज्यघटना ही लिखीत स्वरुपाची असावी. इंग्लडचं जावू द्या. त्यानंतर कोण लिहिणार यावर विचारविमर्श झाला व पाच लोकांची समिती बनली. ज्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, डॉ बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी आपल्या अथक परीश्रमातून राज्यघटना लिहिली. ज्या राज्यघटनेतून त्यांनी अंधश्रद्धा कायमच्या वगळल्या. विशेष म्हणजे त्यांनी राज्यघटनेत मांत्रीकतेचा समावेश केला नाही. तसंच राज्यघटनेत त्यांनी कोणत्याही धर्माला विशेष महत्व दिले नाही. कोणत्याही व्यक्तीला विशेष महत्व दिले नाही. सामान्य लोकांचा त्यात विचार केल्या गेला. त्यातच त्या राज्यघटनेतून स्री पुरुष भेदभावच नाही तर स्री पुरुष, स्पृश्य अस्पृश्य, गरीब श्रीमंत हाही भेदभाव मिटवला.
आज राज्यघटनेतून अंधश्रद्धा दूर पळाल्या आहेत. भेदभावही तेवढेच दूर पळाले आहेत. माणसाचे माणूसपण जपले जात आहे. आजच्या या राज्यघटनेत ना मांत्रिकाला थारा आहे, ना मांत्रिकांच्या मांत्रीक विद्येला. ना आता कोणी गुप्तधनासाठी नरबळी म्हणून बालकांचा बळी देत. ना केशवेपण प्रथेचं पालन करुन स्रियांच्या पती निधनानंतर तिला विद्रूप करत. ना कोणी आपल्या कन्येचा बालविवाह करीत. आज विधवेलाही दुसरा विवाह करुन आपले जीवन जगण्याचा अधिकार आहे. एवढंच नाही तर आज कोणाचंही आपल्या पतीचं पटत नसल्यास फारकत घेता येते. आज कोणीच कोणाची नोकरी खावू शकत नाही. तसाच कोणीच कोणाचा हक्कंही हिरावून घेवू शकत नाही. एवढी स्वतंत्र्यता आहे. मात्र हे सगळं नियमांना धरुन घडतं. कारण भारत प्रजासत्ताक आहे.
आज कुणीही कायद्यासमोर नव्हे तर भारतीय प्रजासत्ताकापेक्षा मोठा नाही. कुणीही स्वातंत्र्याचा उपभोग घेतांना कोणावरही अत्याचार करु शकत नाही. तसंच कुणीही स्वातंत्र्याचा आपल्या स्वार्थासाठी उपभोग घेवू शकत नाही. अन् समजा कुणी तसं करु म्हटल्यास भारतीय, प्रजासत्ताक त्यांच्या मुसक्या आवळते. याचाच अर्थ असा की स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठीच प्रजासत्ताक आहे. स्वैराचारी वागण्यासाठी वा स्वैराचारपणे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी भारतीय प्रजासत्ताक नाही. हे मात्र खरं.
जात मिटली नव्हती. मात्र त्यानंतर चिंतातूर झालेली दिक्षा. काही लोकं वर्तमानपत्रात येत असलेल्या लेखांवर प्रतिक्रिया देत होते. म्हणत होते की थांबा, जात टिकविणे आहे.
विवाहातही जातीचं अस्तित्व होतं. जातीवर आधारीत विवाह होत होते व ते यशस्वीही होत असत. आंतरजातीय विवाह झाल्यास वडील आपल्या मुलींना स्विकारत नसे. ते आपली मुलगी मरण पावली असे मानायचे. कारण त्यांना जातीनं विशेष असं महत्व दिलं होतं.
जात विवाहात होती. कारण त्यामुळंच नवदांपत्यांच्या दांपत्य जीवनाला स्थैर्य आणि तेवढंच संरक्षण मिळत होतं. परंतु कालांतरानं जातीचा संदर्भ व स्वरुप बदललं व आंतरजातीय विवाहाला सुरुवात झाली. ते घटनेतील कलम ४९८ ब व १२५ अ यामुळं शक्य झालं. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.*
जात...... अलिकडील काळात जातीवरुन भांडणं होतात. जात काढली तर न्यायालयात खटले दाखल होतात. जातीच्या आधारावर आजही उच्च नीच असा भेदभाव चालत असतो. कधीकधी अपमान होतो. कधीकधी पदोन्नत्याही नाकारल्या जातात. एकंदरीत सांगायचं झाल्यास अन्याय होत असतो. अशी ही जाती आधारावरील भेदभावाची दरी. ती भेदभावाची दरी दूर करता यावी म्हणून जात कोणी काढल्यास खटल्याची तरतूद आहे. म्हणतात की आमची कोणी जात काढली तर आम्ही माफ करणार नाही. एखाद्याची कनिष्ठ असणारी जात काढली तर जात काढली म्हणून जे खटले दाखल होतात. मग निकाल लागेपर्यंत खटले न्यायालयात सुरुच असतात. ज्यात चपला झिजत असतात. तरीही जातीचं आमच्यावर एवढं बंधन असतं की जात जर आम्ही आमच्या नावासमोर लावली नाही तर आम्हाला ते कसंतरी विचित्र वागण्यासारखं वाटतं. जात ही विवाह करतांनाही पाहिली जाते. त्यातच जाती आधारीत विवाह हे मुला मुलींच्या पसंतीनं होतीलच याचा काही नेम नसतो. शिवाय असा विवाह झाला आणि काही काळानंतर पती पत्नीचं पटेनासं झाल्यास जातीची काही माणसं दबाव टाकून त्या दोघांनाही समजवतात. कुटूंबाचा दोष नसतांना वाळीत टाकायची धमकी देत असतात. त्यामुळं नाईलाजानं अशा स्रीपुरुषांवर जातीचं बंधन आल्यानं वा दबाव वाढल्यानं चूप बसावं लागतं. त्यामुळंच काही लोकांचं बोलणं की कशाला हव्यात जाती आणि जातीवरुन ही भांडणं. जातच नसेल तर भांडणंही होणार नाहीत.
जात अस्तित्वात आली कामावरुन. त्यातच त्या काळात स्वतःच्या रक्षणाचाही एक हेतू होताच. आता जात आमच्या अगदी नावाला चिकटलेली आहे. तसं पाहिल्यास जातीचं काही असं विशेष महत्व नाही. असं काही लोकांना वाटतं. असंही नाही की जात नसेल तर आम्ही मरणार अन् जात असेल तर जगणार. जात जरी नसेल तरी आम्ही जगू शकतो. तशी जात ही पुर्वीपासूनच चालत आलेली आहे. जेव्हा झाडावरील माकडाचा मानव बनला. त्या माणसाला लवकर ओळखता यावे व आपली कामं सुकर व्हावीत म्हणून जात बनविण्यात आली. जातीचे हेच सर्वात पुर्वीचे महत्व होते. जातीचे महत्व आणि स्वरुप पुर्वीच्या काळात ओळख म्हणून जरी असले तरी आज ते स्वरुप बदललं आहे व आज जाती आधारीत जातीवरच होत असलेला अन्याय पाहिल्यास जात नष्ट झालेली बरी असे वाटत आहे.
जात ही माणसाला ओळखण्याच्या दृष्टीनं महत्वाची असली तरी जातीचं आणखी एक महत्व आहे. ते म्हणजे विवाह. विवाह हा पुर्वीपासून जातीत करण्याची परंपरा अस्तित्वात होती. त्याचं कारण होतं रक्तसंबंध व आपल्या मुलाबाळांचं पटवून घेणं. कारण ज्यावेळेस मुलं मुली तरुण होत. त्यावेळेस मुली ह्या परीपक्व नसायच्या. त्यांना स्वयंपाक करण्यापासून तर संसारातील सर्व गोष्टी शिकवाव्या लागायच्या. शिवाय शिकवावं लागायचं घरच्या धंद्यातील कसब. ज्या धंद्यातील काही गोष्टी ती आपल्या आईवडीलांकडून शिकून आलेली असायची. जसे चांभाराच्या घरच्या मुलीला चांभारकाम कसे करायचे. हे वेगळे शिकविण्याची गरज नसायची. तसंच मांगाच्या मुलींना झाडू कसे बनवावे लागते. हे शिकवावे लागायचे नाही. तेच इतर कामातही होते. काही गोष्टी या कामाशीही संबंधीत असायच्या. शिवाय आपल्याच जातीशी विवाह केल्यास जातीवरुन आक्रंदन होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज नसायची. नवीन घरात येणारी मुलगी आपल्याच जातीतील मागीतली तर ती जातीवरुन आपल्या संसारात लवकर रमून जात असे आणि विवाह करतांना केवळ जातीतीलच नाही तर नात्यातीलही मुलगी मागण्याची प्रथा होती. त्याचं कारण होतं संस्कार व ओळखपारख. मुलगी वात्रट निघू नये. हा त्यापाठीमागील उद्देश होता. अन् वात्रट निघालीच तर तिला सरळ करण्याचं बाळकडूही जातीतूनच पाजलं जायचं.
विवाह हा जातीतच व्हायचा व एखादी मुलगी वात्रट निघाली वा ती आपल्या सासू सासऱ्याचं ऐकण्याच्या पलीकडे असली तर आधी जातीत एक प्रकारची पंचायत भरायची. ज्यात जातीतील गणमान्य माणसं असायची. जी आपआपल्या अनुभवानं मार्गदर्शन करायची. ज्यातून नवविवाहीत जोडपं आपलं वर्तन सुधारायचे. एवढ्यावरच भागलं नाही तर गावपंचायत व्हायची. त्यातही खटले नेले जात व त्यातही जातीची माणसं असायची. काही नात्यातील जवळचे नातेवाईकही असायचे. ज्यातून सुधारणा होत असे आणि त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर सरळ सरळ सोडचिठ्ठी व्हायची. ज्याला आज घटस्फोट म्हणतात. ज्यातून कोणालाच कोणत्याही स्वरुपाची क्षती पोहोचविल्या जात नसे. लवकरच आणि ताबडतोब निर्णय केला जात असे. शिवाय अशावरही भागले नाही तर त्या जातीच्या माणसाला वाळीत टाकण्याची शिक्षा होत असे. ही बातमी अख्या गावच्याच बिरादरीत नाही तर गावक्रोशीत पसरत असे. त्यानं फार मोठ्या स्वरुपाचा फरक पडत असे. त्यांच्या घरच्या इतर मुलांचे त्यानंतर विवाह होत नसत. ज्यातून कोणत्याही जातीतील कोणतीच स्री वा कोणताच पुरुष हा आपल्या संसारात भांडणं जरी झाले तरी ती भांडणं मिटवायचा. परंतु संसार टिकवीत असे. महत्वपुर्ण बाब ही की काल जात होती म्हणून संसारही टिकत होता व जातीआधारावरुन जास्त प्रमाणात घटस्फोट नव्हतेच.
काल जात होती व कालच्या जातीनं घटस्फोट जास्त प्रमाणात घडू दिले नाही. संसार टिकवले. त्यातच एकदोन अशीही प्रकरणं असायची की ज्या प्रकरणात काही तरुण तरुणी पळून जावून दुसऱ्याच जातीशी विवाह करीत. ज्यात कालांतरानं पटत नसे व एकदा का मन त्या महिलेपासून विटलं की पुरुष दुसरी पत्नी करीत असे. ज्यातून पहिल्या पत्नीवर अनंत प्रकारचे अत्याचार होत असत. कधी उपाशी ठेवणे. कधी तिला आगीचे चटके देणे. कधी तिला घरातून हाकलून देणे. असे होवू नये म्हणून कालांतरानं जेव्हा संविधान बनलं. तेव्हा त्यात विशेष अशा कलमा टाकल्या. ज्यात कोणत्याही पुरुषानं विवाह केला तर त्यानं तिला सोडू नये. मग ती पत्नी म्हणून त्यानं कोणत्याही जातीतील स्रीचा स्विकार केला असेल. अन् तसं जर घडलंच तर तिला न्यायालयातर्फे तिला दाद मागता येईल. त्याच अनुषंगानं घटनेत दोन कलमं टाकली. पहिली म्हणजे ४९८ ब होती. त्यानुसार एखाद्या पुरुषानं पत्नी म्हणून एखाद्या स्रिचा स्विकार केल्यास आणि अचानक सोडल्यास त्याला विनाजमानतीनं आतमध्ये टाकणे. त्याचा अर्थ होता, त्यानं तिला सोडू नये. तशीच दुसरी कलम होती १२५ अ. समजा एखाद्या पुरुषानं एखाद्या स्रिला पत्नी म्हणून त्यागल्यास तिच्या खान्याचा खर्च म्हणून पोटगी देणे. ती पोटगी यासाठी होती की स्रियांच्या कमावण्याचा अधिकार त्यावेळच्या समेजव्यवस्थेनं नाकारला होता. जातीप्रथेनं व येथील अंधश्रद्धेनं स्रियांच्या शिक्षणावर बंदी आणली होती. शिवाय शिक्षण स्रियांसाठी जरी खुलं झालं असलं तरी येथील स्रिया शिकत नव्हत्या.
या कलमा येथील समाजव्यवस्थेला लागू होत्या. कारण जो समाज जातीवर आधारीत विवाह करायचा. त्या समाजातील एखाद्या कन्येनं असा घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्यास तिला तिचा माहेरचा परीवार पोसायला सक्षम नसायचा. त्याचं कारण होतं, मुलांना जन्मास घालणं. रोगराई जास्त असल्यानं व त्या रोगराईच्या निदानासाठी लागणारी औषधे जास्त प्रमाणात उपलब्ध नसल्यानं परीवारात अनेक मुलांना बाप जन्माला घालत असे. अशावेळेस एखादी मुलगी जर घटस्फोटानं घरी येवून बसल्यास तिच्या घरच्या बाकीच्या भावंडांचा विवाह होत नसे. अशी स्री पतीनं सोडल्यावर चक्कं आत्महत्याच करीत असे वा पतीच्याच घरी एका कोपर्यात राहून पतीचा अत्याचार सहन करीत असे. असे होवू नये म्हणून पोटगीची रक्कम व विनाजमानतीची कलम होती.
जातीवर आधारीत विवाह अस्तित्वात होता. जर एखादी मुलगी दुसर्याच जातीच्या मुलांसोबत पळून गेली तर त्या घरचा जबाबदार व्यक्ती हा आत्महत्याच करीत असे. ज्यात नाक कापलं गेलं असे मानण्याची पद्धत होती. ती आत्महत्या होती, इतर कोणत्याच मुलीनं इतर समाजातील मुलांसोबत पळून न जाणं. त्याचं कारण होतं, इतर जातीतील लोकं तिला सुखी ठेवणार नसल्याची भावना. ती जर सुखी राहणार नसेल तर आपल्याला दुःख होईल. ते माहीत होण्यापुर्वीच मरण पत्करलेलं बरं होईल. असे मानण्याची भावना. म्हणूनच आत्महत्या.
आज काळ बदलला. आज मुली शिकल्या. स्वतः कमवायल्या लागल्या. त्यामुळं काल पतीच्या भरवशावर जगणाऱ्या मुली आज कमवत्या झाल्या. व्यतिरीक्त काल ज्या मुली सासूचा अत्याचार सहन करायच्या. आज त्याच मुली ज्या कमवत्या झाल्या, त्या सासूंवरच अत्याचार करायला लागल्या. शिवाय काल ज्या मुली वडीलांच्या मतानं जातीशीच विवाह करायच्या. आज त्याच मुली मायबापाला न विचारता कोणत्याही जातीशी विवाह करतात. तशीच आज जरी मुलगी इतर कोणत्याही जातीच्या मुलाशी पळून जरी गेली तरी आजच्या काळात कोणताच बाप मुलीनं नाक कापलं म्हणून आत्महत्या करीत नाही. कारण आज ना त्याला इतर तिच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांच्या विवाहाची चिंता असते. ना त्याला समाजाची चिंता असते. कारण आज समाजही काही अंशी तशाच स्वरुपाचे पावले उचलत असतो. तशाच आजच्या काळात कोणत्याही परिवारात जास्त मुलं नसतात की विवाहाची चिंता पडेल.
विशेष सांगायचं झाल्यास काल विवाह हा जातीशीच व्हायचा. कारण विचार असायचा की आपल्या जातीतील माणसांचं वागणं पाहून त्याला समजावता येईल की बाबा रे, तू असा वागू नकोस. ही कृती जातीतील माणसांकडूनच घडायची. त्यावर तो ऐकायचा. कारण वाळीत टाकण्याची भीती असायची. ज्यातून इतर मुलांच्या विवाहाच्या चिंतेनं चिंतातूर असलेला बाप विवाहाच्या चिंतेतून मुक्त असायचा. अन् जातीचा विवाह तुटलाच, तरही त्याला समस्या नसायची. ती लवकरच जातीतील इतर माणसाच्या घरी जायची. ज्याला पाट लावणे म्हणत किंवा विवाह तुटलाच तर ती माहेरी येत नसे. ती आपल्या वडीलाची बदनामी होवू नये म्हणून कधी आत्महत्या करीत असे वा स्वतंत्र्य जगत असे. शिवाय आपल्या मुलीचा विवाह करतांना बाप सांगत असे की बेटा, मरुन जाशील, परंतु परत माहेरी येवू नकोस. ती माहेरी येणं म्हणजे बदनामीचा सूर असतो असं समजण्याची प्रथा अस्तित्वात होती. मात्र तिनं इतर जातीतील माणसांशी विवाह केल्यास चिंता असायची की तिचं कसं होणार. तिही आपल्याच पोटातील जीव आहे.
आज समाज बदलला. अंधश्रद्धा काही अंशी दूर पळाल्या. त्याचबरोबर मुली सुधारल्या. विचारानं प्रगल्भ झाल्या. हा सर्व बदल शिक्षणानं केला व शिक्षण हे वाघिणीचं दूध ठरलं. एकंदरीत सांगायचं झाल्यास परिस्थिती बदलली व त्याच मुली आज सासूवर अत्याचार करु लागल्या. पती असलेल्या पुरुषांवर अत्याचार करु लागल्या. शिवाय असे त्या स्वतः तर करुच लागल्या. व्यतिरीक्त ४९८ ब व १२५ अ या कलमांचाही गैरवापर करु लागल्या. आज जरी मुली सुधरल्या असल्या व विचारानं प्रगल्भ झाल्या असल्या तरी. कारण आज मुली सुधरल्या. मात्र कलमा अजूनही त्याच आहेत. त्या सुधरवल्या गेल्या नाहीत. शिवाय आज आणखी एक बदल झाला. जात सुधारली. जातीवर आधारीत विवाह सुधारले. आज बरीच मुलं वा परीवार आंतरजातीय विवाहही करु लागले आहेत. कारण कालच्या विवाहासारखा आज विवाह हा संस्कार राहिलेला नाही. त्यात बदल झालेला असून त्याला कराराचे स्वरुप प्राप्त झालेले आहेत. आजचे विवाह करार केल्यागत केव्हाही जुळतात आणि केव्हाही तुटतात. मात्र आज विवाहाचे खटले सुरु असतात. तारीखवर तारीख करत. ४९८ ब व १२५ अ चा वापर करीत. काही खटले याच कलमांच्या गैरवापरावरही सुरु असतात की जे संपता संपत नाहीत. महत्वाचं म्हणजे ४९८ ब व १२५ अ असल्यानं मुलींना विवाह करतांनाही घाबरण्याची गरज उरलेली नाही. जरी त्या मुलींचा विवाह झाल्यानंतर विवाह तुटला तरी. मग तो जातीच्या मुलांसोबत केलेला विवाह का असेना वा आंतरजातीय मुलांसोबत केलेला विवाह का असेना.
दिक्षाचा पती हा तिला सोडून गेला होता. मात्र इतर लोकांसारखी दिक्षानं आपल्या पतीच्या वागण्यावरुन कुरकूर केली नाही. ना त्याची तक्रार पोलीस स्टेशनला टाकली. ती लढत होती फक्त आपल्या हक्कासाठी. ज्या जातीनं तिला त्रास दिला होता. जी जात तिला छळत होती. वाटत होतं की समाजात बदलाव व्हावा. जात विरहीत समाज तयार व्हावा.
********************************************
दिक्षानं जात नष्ट करण्यासाठी उचललेलं पाऊल. वर्तमानपत्रात त्या आशयाच्या बातम्या छापून येत होत्या आजही कधीकधी. त्यातच काही व्हिडीओही बनवून यु ट्यूबवर अपलोड केले जात होते. ज्यात तिच्या मनाच्या विरुद्धचे बोल वा शंका प्रदर्शित केल्या जात असत. त्यावर तिचं म्हणणं होतं की व्हिडीओ व फोटोचा वापर चांगुलपणासाठी करावा. वात्रटपणासाठी वा कोणाची टिंगल टवाळकी करण्यासाठी नाही.
सध्या फॅशन आली आहे व्हिडीओ बनविण्याची. मग तो व्हिडीओ कोणत्याही पद्धतीनं बनलेला का असेना, लोकं व्हिडीओ टाकतच असतात. त्याचबरोबर फोटोही टाकत असतात. कधी वात्रट तर कधी फॅशन करुन. फॅशनेबल काळ असल्यानं अतिशय तोकडे कपडे घालून व्हिडीओ वा फोटो सोशल मिडीयावर टाकण्याची पद्धत अलिकडे रुढ झाली आहे. मात्र त्याला कोणी काहीही म्हणत नाहीत. लोकांना वाटते की त्याचा फायदाच होत असतो आणि लोकांचंही त्यादृष्टीनं बरोबरच आहे. कारण लोकं चांगल्या गोष्टी कधीच पाहणार नाहीत. वाईट गोष्टीकडं मात्र चटकन लक्ष जात असतं. कारण गत काही वर्षापूर्वीच पुनम पांडे वा ममता कुलकर्णी नावाच्या अभिनेत्रीनं असेच फोटो सोशल मिडीयावर पोष्ट केले होते. त्यांना चित्रपटात काम मिळालं. म्हणूनच लोकांचं असं वागणं. लोकांचं यात काय चुकतं. लोकांनाही वाटते की आपणही असेच प्रसिद्ध होवू.
दिक्षाबाबतही तेच घडत होतं. प्रसिद्धी मिळविण्यासाठी वर्तमानपत्रात तिच्या मनाच्या विरुद्ध बातम्या प्रकाशित करीत असत. त्यावर तिचं मत होतं. पद, पैसा, प्रतिष्ठा व प्रसिद्धी. ह्या जेवढ्या काही प वर आधारीत गोष्टी आहेत. या नशिबाचाच एक भाग आहे. नशिबात असेल त्यालाच या गोष्टी मिळतात. इतरांना त्या गोष्टी अजिबात मिळत नाहीत. त्यामुळंच त्याचा बाऊ होवू नये. परंतु लोकांना कोण सांगेल. लोकं सर्व कामधंदे सोडून त्यापाठीमागेच लागले आहेत. शिवाय ह्या गोष्टीनं माणसांचीच अधोगतीही होत असते. कामात रस वाटत नाही. सगळी कामं खोळंबतात. मित्रमंडळ तुटतं. नातेसंबंधही तुटतात. शिवाय माणूस हा एकाकी बनतो. आजार बळावतो व व्यक्ती अशा निराशेच्या गर्तेत पोहोचतो की तेथून तो परत येवूही शकत नाही. ज्याला डिप्रेशन म्हणतात. हे लोकांना माहीत आहे. तरीही लोकं त्यामागे लागत असतात.
आज असंच जग आहे व हे जग आम्हाला अशाच गोष्टीमागं फिरायला लावत असते. कारण स्पर्धाकाळ आहे. शेजारचा व्यक्ती असे करतो ना, मग आपणही तसेच करायला हवे. मग त्यासाठी कर्ज काढणं आणि ते कर्ज चुकवणं नाही झालं तर आत्महत्या.
आज आत्महत्याही अगदी सोप्या झाल्यात. आत्महत्येचं प्रात्यक्षिक करुन दाखवतात लोकं. परंतु बाबा रे, त्यात तुमचाच मृत्यू होतो ना. हे मात्र कोणीही जाणत नाहीत. लोकं आत्महत्याही या सर्रास करीत असतात.
व्हिडीओ व फोटोचं हे जग. लोकं या व्हिडीओ व फोटोच्या जगात चांगले फोटो वा व्हिडीओ कधीच बव्हंशी व्हायरल करणार नाही. याबाबतीत सांगतांना एका व्हिडीओबाबत सांगणे गरजेचे समजतो. एक व्हिडीओ असाच फेसबुकवर व्हायरल झाला. एक तीन वर्षाची मुलगी भांडे घासत होती. सुंदर होता तो व्हिडीओ. परंतु बोध काय, तुम्हाला पुढेही चांगले भांडे घासता यावेत यासाठी असेल का तो व्हिडीओ की स्रियांच्या नशिबात चूल आणि मूल असतं हे दर्शविणारा होता का तो व्हिडीओ. साहजिकच तेच दर्शवत असेल तो व्हिडीओ. त्यापेक्षा जर त्याच व्हिडीओच्या ठिकाणी त्याच तीन वर्षाच्या मुलीचा अभ्यास करतांना व्हिडीओ वा फोटो पोस्ट केला असता तर बराच संदेश वा बोध त्यातून देता आला असता. परंतु हे व्हिडीओ पोष्ट करणाऱ्यांना कोण सांगेल.
फोटो वा व्हिडीओ आपल्याला बरंच काही सांगून जातात. तसं पाहिल्यास आजच्या काळात लोकांकडे वेळ जरी बराच असला तरी मोबाईलच्या संगतीनं त्यांच्याकडे अजिबात वेळच नाहक असे दिसायला लागले आहे. एवढे गर्क असतात लोकं मोबाईलच्या दुनियेत. मोबाईल म्हणजे त्यांना आत्माच वाटते स्वतःचा. मोबाईल जर,त्यांच्याकडून हिसकला की आक्रनतांडव होत असतं. मग माहीत नाही. लोकं काय काय डोक्यावर घेतात ते. लहान मुलंही मोबाईलमध्ये गर्कच असतात. त्यांचंही सांगायलाच नको. त्यांच्याही हातून थोडासा मोबाईल का घेतला की बस, त्यांना चूप करणं कठीण होवून बसतं.
सोशल मिडीया ही मोठी कामाची वस्तू आहे. त्यातून राजनेते निवडूनही येत असतात. चांगलेच नाही तर गुन्हेगार राजनेतेही निवडून येत असतात. काही व्हिडीओ व फोटो हे बरंच काही सांगून जात असतात. एक फोटो असाच व्हाट्सअपवरुन व्हायरल झाला. एक आई आपल्या बाळाची आंघोळ करुन देत होती व लिहिलं होतं की जर बाळानं मोठे झाल्यावर या स्नानाचे ऋण फेडले तर त्याला कुंभमेळ्यात स्नान करण्याची काहीच गरज नाही. फोटो लहानसाच होता. परंतु त्यातून अर्थबोध किती होत होता. हे सांगायलाच नको. परंतु असे व्हिडीओ वा फोटो कुणीही लक्षात घेत नाहीत. त्याबद्दल कोणीही काही बोलत नाहीत वा प्रतिसाद देत नाहीत आणि वात्रट व्हिडीओ असले की बस. प्रतिक्रियेची सरबत्तीच होते. त्याचं कारण म्हणजे आजचा काळ. आज कलियुग आहे व या कलियुगात वाईट गोष्टींनाच जास्त प्राधान्य दिलं जात असतं. महत्वाचं म्हणजे आपल्याला जर व्हिडीओ बनवायचे कौशल्य प्राप्त झालेले आहे व ती प्रदत्त रुपात विधात्यानं दिलेली देणगी आहे. विचार करा की मोबाईलचा शोध जरी मानवानं लावला असला तरी तरी मानवाला विचार करण्याची शक्ती एका नैसर्गिक शक्तीनं दिलेली आहे. ती शक्ती निसर्गातीलच वस्तू प्राशन करुन वाढलेली आहे. म्हणूनच आपले विचार प्रगल्भ होवू शकले. जर आपण या निसर्गातील वस्तू प्राशन केल्या नसत्या तर आपली विचार करण्याची शक्ती वाढली नसती व आपण शोधही लावू शकलो नसतो. तेव्हा त्याच शक्तीच्या जोरावर आज आपण व्हिडीओ निर्मिती करु शकतो वा फोटोही काढू शकतो. तसं पाहिल्यास फोटो वा व्हिडीओ हे चांगले तसेच वाईटही काढू शकतो. तेव्हा आपल्याला मिळालेल्या त्याच अद्वैत शक्तीच्या जोरावर आपण वाईट वा वात्रट व्हिडीओ वा फोटो न काढता, चांगले फोटो वा व्हिडीओ काढावेत. जेणेकरुन त्या फोटोचा वापर जनकल्याणासाठी होईल. कधीकाळी सुचलंच तर लहान मुलांचा भांडे घासण्याचा व्हिडीओ पोष्ट न करता त्याच ठिकाणी एखादा अभ्यासाचा व्हिडीओ काढावा. जेणेकरुन त्या व्हिडीओच्या माध्यमातून लहान मुलांच्या मनात अभ्यासाची गोडी वाढेल. भांडे घासण्याची नाही हे तेवढंच खरं. म्हणूनच आपण निदान आपल्या मुलांना संस्कार लावण्यासाठी तरी तशा स्वरुपाचे व्हिडीओ वा फोटो काढू नये. ते सोशल मिडीयावर अपलोड करु नये. वात्रट व्हिडीओ वा फोटो त्याला दाखवू नये. म्हणजे झालं.
दिक्षाला नेहमी वाटायचं की जात बदलवायचीय असेल तर ती बदलविण्यासाठी मानसिकता हवी. कारण ही जात नष्ट करण्यासाठी खटला लढून काही उपयोग नाही. कदाचीत मला जात नष्ट झाल्याचा निकाल मिळेलही खटला लढून. परंतु ह्या जातीचं बांडगुळ प्रत्येक व्यक्तीच्या मनातून जेव्हापर्यंत जात नाही. तेव्हापर्यंत ही जात नष्टच होणार नाही.
जातीला अलिकडील काळात मोठे महत्व आले आहे. काही लोकं आपली जात टिकावी म्हणून प्रयत्न करु लागले आहेत. तसं पाहिल्यास जात कोणीही सोडलेली नाही. जरी आंतरजातीय विवाह होत असले तरी.
विवाहाबद्दल सांगायचं झाल्यास विवाह हे आंतरजातीय होतात. आंतरधर्मीयही होतात. परंतु तसं जरी होत असलं तरी जात बदलत नाही. धर्मही बदलत नाही. हं, पुरुषसत्ताक कुटूंबपद्धती अस्तित्वात असल्यानं जात आणि धर्म हा प्रत्येक वारसाच्या जन्मामागे पुरुषांचा लागतो. त्यामुळं जात बदलता येत नाही.
धर्माच्या बाबतीत सांगायचं झाल्यास धर्म हा तेवढा बदलतो. काही लोकांना त्याचा धर्म बरा वाटत नसेल तर तो आपला धर्म बदलवून नवीन धर्म स्विकारतो. जसा हिंदू असेल तर मुस्लिम वा ख्रिश्चन बनतो आणि मुस्लिम असेल तर तो हिंदू बनतो. हे त्यांचे हिंदू असेल तर इतर धर्माचे बनणे वा मुस्लिम असेल तर इतर धर्माचे बनणे. यावरुन जात बदलते असा त्याचा अर्थबोध होत नाही. गतकाळात बऱ्याच लोकांनी बाबासाहेबांनी बौद्ध धम्म घेतल्याबरोबर त्यांनीही बौद्ध धम्म स्विकारला. परंतु जात बदलवली नाही. जात तीच राहिली. बौद्ध धम्मात जातीला स्थान नसलं तरी. यावरुन धर्म बदलवता येतो व जात बदलवता येत नाही. हे सिद्ध होते.
लोकांनी जातीबद्दल अनेक व्याख्या केलेल्या आहेत. म्हणतात की जात ही एखाद्या बांडगुळागत आहे. कोणी म्हणतात की जात ही ढेकणासारखी आहे. कोणी म्हणतात की जात असल्यास अत्याचार होत असतो. म्हणूनच जात ही नसावीच. तिचा काही उपयोग नाही. कारण कालपासून तर आजपर्यंतच्या काळात जातीवरुन अत्याचार झालेले आहेत. कधी अमानुष मारहाण तर कधी उच्च नीच भेदभाव. आजही अशा स्वरुपाचे अत्याचार होत आहेत की जे अत्याचार जातीअंतर्गत दूर करता येत नाही. जातीअंतर्गत होत असलेले अत्याचार पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहितांना घटनेत कलमं टाकली की जर जातीअंतर्गत अत्याचार झालाच तर पोलीस स्टेशनला तक्रार करावी. न्यायालयात दाद मागावी. परंतु हे जरी खरं असलं तरी आजच्या काळात रोजच जातीअंतर्गत अत्याचार होतच असतात आणि ते अत्याचार दूर करता येत नाही. याला जबाबदार आहे प्रशासन.
प्रशासन व जातीअंतर्गत होत असलेला अत्याचार. याबद्दल थोडंसं सांगणं गरजेचं समजतो. आज भारताला डॉ. बाबासाहेबांच्या रुपानं संविधान नावाची महत्वपुर्ण देणगी मिळाली असली तरी देशात संविधानानुसार बरेच ठिकाणी लोकं वागतांना दिसत नाहीत. काही ठिकाणी चक्कं कायदा हातात घेतला जातो. आजही बऱ्याच ठिकाणी स्पृश्य अस्पृश्य भेदभाव आहेच. मग अस्पृश्य व्यक्ती एखाद्या शेतात जरी जात असेल तरी त्याला जावू देत नाहीत. शिवाय अस्पृश्यांनी मोठं घर बांधलेलंही काही काही ठिकाणी चालत नाहीत. काही ठिकाणी तर नोकरीमधील पदोन्ननतीही अस्पृश्यांना दिलेली चालत नाही. काही ठिकाणी अस्पृश्यांनी प्रगती केलेली चालत नाही. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतातच. हा अत्याचारच असतो स्पृश्यांचा अस्पृश्यावर होत असलेला. जरी संविधान असलं तरी. अन् त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनला केल्यास पोलीस प्रशासन अस्पृश्यांवरच दबाव टाकत असतात. त्यांची तक्रार घेत नाहीत आणि घेतलीच तर ती मार्गी लावली जात नाही अन् मार्गी लावलीच आणि ती न्यायालयात गेलीच तर न्यायालयातही टिकत नाही. न्यायालयातूनही अशा स्वरुपाचा स्पृश्यांचा अस्पृश्यांवर अत्याचार झाला असला तरी दाद मिळत नाही. सगळं गणित जुळवून आणलं जातं व अस्पृश्य न्यायालयातही खटले हारतात. कारण असतं अस्पृश्य व्यक्तीचं अज्ञान. न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आवश्यक असणारा जवळचा पैसा. जो वकीलांना द्यावा लागतो. तसेच महत्वाचे असतात वकील. वकीलच न्यायालयात सत्याची बाजू असत्य करीत असतात व त्यात त्यांचा हातखंडा असतो.
जातीअंतर्गत अत्याचार हे सतत न थांबणारं चक्र आहे. बाबासाहेब आंबेडकरांनीही जात बदलवता येत नसल्यानं व धर्म बदलवता येत असल्यानं धर्म बदलवला. ना रहेंगा बास आणि ना बजेंगी बासरी अंतर्गत. कारण धर्म बदलवण्याचं प्रावधान होतं गतकाळातील अनादी काळापासून चालत आलेलं. जात बदलविण्याचं प्रावधान नव्हतं. त्यानंतर धर्म बदलवताच जातीअंतर्गत होणारा त्यांच्यावरील अत्याचार थांबला. कारण धर्म बदलविल्यामुळे कोणताच पुर्वीचा धर्मवेडा त्यांच्या जातीवर अत्याचार करु शकला नाही. तसंच बाबासाहेबांनी संविधानातही जात बदलविण्याविषयी काहीच प्रावधान केलं नाही. त्यांनी संविधान लिहिलं व त्यात परीवर्तनाचे भरपूर नियम टाकले. परंतु जात बदलविण्याविषयी प्रावधान टाकले नाही वा एखादी कलम अशी बनवली नाही की जात बदलवता येईल. म्हणूनच आज जातीअंतर्गत अत्याचार होत आहेत व ते जरी होत असले तरी त्याला न्याय देखील कुठूनही मिळत नाही. आजही अस्पृश्य व्यक्ती देशाच्या कानाकोपऱ्यात जातांना वा प्रवास करतांना तो खुल्यामनानं जात सांगू शकत नाही. ती लपवतो व कोणी जात विचारल्यास खोटं बोलण्याची इच्छा नसतांनाही खोटं बोलून आपली दुसरीच जात सांगतो. काही ठिकाणी अधिवास करतांनाही जात लपवूनच अधिवास करतो. कारण आपल्याला माहीत असतं की आपली मुळ जात सांगितल्यास त्या ठिकाणचे लोकं आपल्याला जगू देणार नाहीत. आपली मुस्कटदाबी करतील. अन् खुल्यामनानं जात सांगतो म्हटल्यास त्याची तिथंच मुस्कटदाबी झाल्याशिवाय राहात नाही. हे वास्तविक चित्र आजही अनुभवायला येतं. तेव्हा विचार येतो की काश! बाबासाहेबांनी धर्म बदलविण्याऐवजी जात बदलविण्याचं प्रावधान घटनेत ठेवलं असतं वा निर्माण केलं असतं तर कदाचीत आपल्यावर अस्पृश्य असल्यानं अत्याचार होत असल्यास स्पृश्यांची जात लावली असती. म्हणजे अत्याचारच झाला नसता. नोकऱ्यांमध्येही पदोन्नत्या तशाच घेतल्या असत्या. देशाच्या कानाकोपऱ्यात जात बदलवूनच फिरलो असतो राजरोषपणे. परंतु आज जात बदलवता येत नसल्यानं सारेच बंधनं आहेत.
जात ही कधीतरी बदलवता येईल का? पुढे तसा काळ तरी येईल का की जात ही बांडगुळागतच चिकटलेली राहील आयुष्यात. तर त्याचं उत्तर आहे. ती बदलवताच येणार नाही. कारण जर पडताळून पाहतांना त्याचा इतिहास पाहिला तर असं जाणवतं की जात नावाचा शब्द जेव्हापासून चिकटला. तेव्हापासून त्या शब्दानं आपल्याशी रिश्तेदारी केलीय. ती आजतागायत बदलवता आली नाही व बदलवताही येणार नाही. शिवाय अलिकडील काळात जात बदलविण्याची मानसिकता डोक्यात येवू नये म्हणून तसे प्रयत्नही केले जात आहेत. प्रत्यक्षात प्रयत्न होत आहेत.
महत्वपुर्ण बाब ही की जातही बदलवता येवू शकते. जसा धर्म बदलवता येतो तसा. तसेच जात बदलवून आपल्या जातीवर होणार असलेले अत्याचारही दूर करता येवू शकतात. परंतु त्यासाठी आपली मानसिकता बदललेली हवी. ती आपली मानसिकता बदलणारी हवी. अन् विशेष सांगायचं झाल्यास देशात जेव्हा जाती बदलविण्याची प्रथा निर्माण होईल ना. तेव्हाच सामाजिक परीवर्तन होईल. त्यानंतर असे जेव्हा घडेल, तेव्हा कोणत्याच जातीचा माणूस कोणत्याच जातीवर अत्याचार करणार नाही, हेही तेवढंच खरं. परंतु याबद्दल नाण्याची एक बाजू पाहिल्यास हे होणार नाही. याची शक्यता जास्त दिसते. याला जबाबदार आहे प्रशासन आणि तेवढेच लोकंही. प्रशासनच जातीआधारीत आरक्षण देत असतं. लोकांना जातीअंतर्गत धंदे करायला टपऱ्या देत असतं. जातीचे धंदे करायला कर्ज देत असतं. शाळेतही विद्यार्थ्यांच्या नावासमोर जाती लिहायला लावतं. जातीची पडताळणी करुन मी त्याच जातीचा आहो हे सिद्ध करायला लावतं. अन् लोकंही मोठ्या दिमाखानं या सर्व गोष्टी करतात. स्वतःचा स्वार्थ पुर्ण होतो. म्हणून पिढीजात धंदे न सोडता तेच धंदे करतात. त्या धंद्यासाठी मिळणाऱ्या कर्जात सब्सिडी आहे म्हणून मी त्याच जातीचा आहे याचं प्रतिज्ञापत्र सादर करुन कर्ज उचलतात. धंद्यासाठी टपऱ्या उचलतांना जातीचं प्रमाणपत्र आवर्जून जोडतात. शिवाय आपल्या मुलांना जातीअंतर्गत आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून त्याच्या नावासमोर जात लावतात. शिवाय जातीची पडताळणी करुन सिद्धही करतात की मी अमूक जातीचा आहे. यावरुन कुठे जात बदलणार आहे. असा प्रश्न पडतो. परंतु हे जरी खरं असलं तरी दुसरी बाजू अशीही आहे की आज बरीचशी मंडळी अशीही आहेत, जी जात बदलवत जरी नसली तरी पिढीजात जातीच्या धंद्यात भरपूर फायदा होतो. म्हणून प्रशासनाकडून सब्सिडी रुपात मिळणारे कर्ज त्याच धंद्यावर उचलतात. ज्यातून जास्त पैसा मिळाल्यानं मजा मारता येते. काही दिवसापुर्वी विद्यार्थ्यांना जातीच्या आधारावर असलेल्या आरक्षणाचा लाभ व्हावा म्हणून आपल्या पाल्यांच्या नावासमोर आरक्षण ज्या जातीला असायचं, त्या जाती लिहायचे. जे जाती पडताळणीतून दिसून आलं.
विशेष बाब ही की कोणत्याही परीवर्तनासाठी आंदोलन महत्वाचं असतं. जसं भारत स्वतंत्र्य होण्यापुर्वी आंदोलन झालं. तरंच ते परीवर्तन करता येतं. जातही बदलवता येवू शकते. परंतु त्यासाठी आंदोलन घडायला हवं. परंतु त्या आंदोलनाची कोणाला गरज आहे. त्यामुळं जात असो वा नसो, प्रत्येकाचं पोट भरतं ना. मग काय करायचं आहे आपल्याला असं म्हणत आज सगळेजण निगरगट्ट आहेत व आपआपली पोळी शेकत आहेत. त्याच्यावर अत्याचार होत आहे ना. आपल्यावर नाही ना. असा विचार करीत. परंतु आग शेजारी जर लागली असेल तर त्यानं आपलंही घर जळेल. यांचा विचार आज तरी होत नाही. म्हणूनच आज जातीअंतर्गत भेदभावाचा अत्याचार सुरु आहे. तो सुरुच राहणार. मग कितीही काळ लोटला जाणार तरी आणि आम्ही सर्वजण मुकाट्यानं जातीअंतर्गत होत असलेला अत्याचार सहन करीत निगरगट्ट राहू, हे तेवढंच खरं. अन् जेव्हा जागे होवू. तेव्हा जातीच्या बांडगुळानं आपलं आंदोलनाचंही रक्त सुकविलेलं असेल. यात शंका नाही. महत्वाचं म्हणजे आपल्यावर जातीअंतर्गत अत्याचार होवू नये म्हणून जातही बदलवता येवू शकेल, परंतु त्यासाठी आपली मानसिकता बदलवलेली हवी. ती जेव्हा बदलेल. तेव्हाच जात बदलवता येईल व एकदा का जात बदलवता आली की सहजच जातीअंतर्गत होत असलेले अत्याचार नक्कीच दूर करता येतील यात शंका नाही.
*****************************************
दिक्षा आज बागेत फिरत होती. तिला आज बरच अस्वस्थ वाटत होतं. अशातच तिचं लक्ष एका गुलाबाच्या फुलाकडं गेलं. फुल आज मुरझावल्या अवस्थेत होतं. तसं त्या गुलाबाच्या फुलाला पाहताच तिचं मन अगदी भुतकाळात गेलं.
जातीआधारीत दिक्षाच्या मनात विचार होता. काही प्रश्नही होते. तसाच आणखी एक प्रश्न दिक्षाच्या मनात होता. तो प्रश्न होता व्हॅलेंटाइन दिवसाचा. तिला व्हॅलेंटाइन दिवसाचा राग येत होता. कारण त्याच दिवशी तिला तिच्या मित्रानं ती दहावीत असतांना एक गुलाबाचं फुल दिलं होतं व त्याच दिवसापासून तिचं त्याचेवर प्रेम निर्माण झालं होतं. परंतु जेव्हा जात मधात आली. तेव्हा त्याच व्हॅलेंटाइन दिवसानं तिला मदत केली नाही. त्यामुळंच तिला आज वाटायला लागलं होतं की कदाचीत व्हॅलेंटाइन दिवसाला हद्दपार करावं लागेल.
प्रेम...... अगदी दोनचार दिवसानंतर प्रेमाचा दिवस येणार होता. ज्याला व्हॅलेंटाइन दिवस म्हणत. तसं पाहिल्यास आठ तारखेपासूनच प्रेमाचा आठवडा साजरा करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. त्यातच हे दिवसं चॉकलेट डे, किक डे, किस डे, रोज डे, प्रपोज डे अशा साऱ्याच नावाने साजरे करण्याची प्रक्रिया विदेशात होती. आता ते लोण भारतात आले होते व पसरले होते. आता व्हॅलेंटाइन दिवसाचा हा सप्ताह अगदी दिवाळी दसऱ्यासारखाच भारतातही साजरा होतांना दिसत होता. अशातच दिक्षाला तिच्या मित्रानं व्हॅलेंटाइनच्या दिवशी एका टवटवीत असलेल्या गुलाबाचं फुल दिलं. तो दिवस तिला आठवणीत होता. जो तिला दिशाभूल करणारा ठरला. कारण त्यानंतर व्हॅलेंटाइन दिवस कधीच तिच्या आयुष्यात आला नाही. एवढा तिटकारा तिच्या मनात व्हॅलेंटाइन दिवसाबद्दल निर्माण झाला होता.
व्हॅलेंटाइन दिवसाचा खरा अर्थ जरी वेगळा असेल तरी त्याचा मुळात भारतात तरी अर्थ प्रेम असाच घेतला जातो. शिवाय हा दिवस आला की लोकं अगदी वेडे होवून जातात व स्वतःचं आयुष्य, वय विसरुन प्रेमाच्या मागं धावत असतात. ते अगदी म्हातारे झाले असले तरी. त्यानंतर ते आपला हशा करुन घेतात. ते असे चाळे करतात की साहजिकच काही लोकं त्यांना पाहून त्याला म्हातारचाळ लागली की काय, असेच बोलत असतात.
काही लोकं प्रेमाला नावबोटं ठेवतात. ते स्वतः तर चांगले वागत नाहीत. परंतु इतरांना सल्ला नक्कीच देत असतात. म्हणतात की अमूक असा वागतो. असा वागायला हवा. तमूक तसा वागतो. तसा वागायला नको. त्यामुळंच त्यांच्याबद्दल नक्कीच म्हणता येईल की शेंबूड माझ्या नाकाला व मी सांगतोय लोकांला.
वागणे वा प्रेम करणे. प्रेमाची आवश्यकता ही म्हातारपणापर्यंत असते. अगदी मरतानाही प्रेम हवंच असते. प्रेम जर नसेल आयुष्यात तर व्यक्ती तीळ तीळ मरत असतो. प्रेम ही कधीही न संपणारी आंतरक्रिया आहे. परंतु प्रत्येक वयातील प्रेम हे वेगवेगळं असायला हवं आणि असूही शकते. मात्र काही लोकं आजही आपलं प्रेम करतांना आपलं वय लक्षात घेत नाहीत. ते आपले वागणे जणू आपण बालवयातील माणसांच्या वागण्यासारखे ठेवतात. साहजिकच त्यांना बालवेडे अशी उपमा मिळते. उदाहरण द्यायचं झाल्यास एका शाळेचं उदाहरण देतो.
काल आम्ही जेव्हा शिकलो. त्यावेळेस अगदी दहावीला असतांनाही आमच्या वर्गातील मुलींना बहिणी मानायचे. त्यातच बहिणींचं जसं रक्षण करतो. तसंच तिचंही रक्षण करीत होतो. त्यानंतर शेजारच्या वर्गातील मुलांने त्यांना काही म्हटलं तर आम्ही त्याच्याशी भांडण करुन त्याला धडा शिकवत असू. त्याच अनुषंगानेच एका शाळेतील तो दहावीचा वर्ग. आज त्यांना दहावा वर्ग सोडून तीस बत्तीस वर्ष झाले होते. त्या कार्यक्रमात मी आवर्जून उपस्थिती लावली. तो दहावीचा वर्ग व ते विद्यार्थी गेट टू गेदर साजरा करणार होते. ज्याला तब्बल तीस वर्षाचा काळ लोटला होता. परंतु आज ते एकत्र आल्यानं त्यांचं बहिण भावाचं प्रेम उचंबळून आलं होतं. प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. तसा तो दिवस प्रेमदिवस सुरु होण्याचाच दिवस होता. तरीही कुणामध्येच कोणत्याही स्वरुपाचं आजच्या तरुणपणातील वासनामय प्रेम आजही दिसलं नाही. हे पाहून मला गतकाळात जाता आलं आणि विचार करता आला की आम्ही दहावीत कसे वागत असू. आज मात्र तसं नाही.
आज आम्ही दररोज शाळेत शिकतो. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. त्यानुसार एकाच वर्गात असलेली मुलं ही आपली साहजीकच भाऊबहिण असायला हवी. त्यांच्यात प्रेम निर्माण व्हायला हवं, ते भाऊ आणि बहिण म्हणून. मग व्हॅलेंटाइन दिवस येवो की आणखी कोणताही दिवस. आकर्षण निर्माणच होवूच नये. शारिरीक आकर्षण तर अजिबातच नाही. परंतु आजची मुलं एकाच वर्गातील असली तरी त्यांच्यात प्रेम हे एक भाऊ आणि बहिण म्हणून निर्माण होत नाही तर ते प्रेम निर्माण होतं एक प्रेमवीर म्हणून. वर्गातील मुलगी त्याला आवडायला लागते. तोही तिला आवडायला लागतो. मग इशाऱ्यावर इशारे सुरु होतात. त्यातच ते प्रेम एवढं वाढतं की त्यांना कळत नाही की मी किती मोठा आहे व मी किती लहान आहे. संसार पेलवू शकतो का? त्या वर्गातील मुलांना ते माहीत नसतं. एकदा संसारात पडल्यावर काय होणार याची कल्पना नसते. ती मुलगी त्या मुलाला एवढी आवडत असते की अगदी त्याला तिच्याशिवाय राहाणं अवघड असतं. अशा परिस्थितीत शारिरीक आकर्षणानं ते जवळ तर येतात. त्यांच्यात शारिरीक संबंध घडतात. ज्याचा परिणाम गर्भधारणेवर होतो. त्यातच गर्भधारण झाल्यानंतर काही दिवस जातात. अशी वेळ जात असते व त्यांच्यात शारिरीक आकर्षणाने जे घडतं, ते विदारक स्वरुपाचं असतं आणि त्याला खतपाणी घालतं व्हॅलेंटाइन डे नावाचा दिवस. हा दिवस त्यांच्यातील उत्तेजीत प्रेम आणखी वाढवत असतो.
व्हॅलेंटाइन डे नावाचा दिवस. ज्यातून प्रेम नावाचा शब्द तयार होतो व त्या शब्दातून पुढे शारिरीक आकर्षण व गर्भधारणा. त्यानंतर त्याचं वय,नसतांना गर्भधारणा झालीच तर ती त्याचेकडे जाते. सांगते की माझ्या गर्भात तुझंच बाळ आहे. तू माझ्याशी विवाह कर. त्यावर तो नकार देतो. ज्यातून आत्महत्या घडतात. काही वेळेस तो तयार होतो विवाह करायला.परंतु जात आडवी येते. ती जात एवढी आडवी येते की ते पळून विवाह करतात. अन् पळून जावून जरी त्यांनी विवाह केला तरी जातीचे गुंड त्यांना शोधत असतात. आपली जात बदनाम होवू नये म्हणून. त्यानंतर ते जिथे कुठे सापडले, तर त्यावेळेस त्यांना समाप्त करण्याचं काम हेच आमचे जातगुंड करीत असतात किंवा निदान वाळीत तरी टाकत असतात.
व्हॅलेंटाइन डे येणं व तो साजरा करणं या क्रियेला कोणी रोखू शकत नाही. कारण आज काळ बदलला आहे व या बदलत्या काळानुसार तरुणपणाही बदलला आहे. आजच्या मुलांना कालच्या वर्गातील प्रेमाचा संदर्भ आमच्याही काळात कसा होता आम्ही कसे एकमेकांना भाऊबहिण मानत होतो. हे काही सांगता येत नाही. शेवटी दोन चार संपर्कातील मुलं समजतात. बाकी सर्व सोडून देतात चांगल्या गोष्टी. ज्या प्रेमाच्या विकृतीपणावर फुंकर घालू शकतील. आज जात महत्वाची आहे व ही जात असे व्हॅलेंटाइन दिवसाचे प्रेम स्विकारु शकत नाही.
आज जातीनंच बदलत्या काळानुसार सातत्यानं प्रयत्न चालवायला हवा. त्यातच प्रेमाबद्दलचं शिक्षण प्रत्येक जातीत द्यायला हवं की जी मुलं शाळा तर शिकतील. परंतु प्रेम करणार नाहीत. जरी व्हॅलेंटाइन दिवस दरवर्षी येत असला तरी. कारण असं केल्यानं कुठंतरी जातीतील संस्कार नष्ट होत असतात.
काल त्या दहावीत असणारी सर्व मुलं मुली एकत्र आली व ठरवलं की आपण गेट टू गेदर घेवू. मग ठरलं, तो क्षण साजरा करायचा. गेट टू गेदर करायचं.
गेट टू गेदर झालं व ज्या दिवशी गेट टू गेदर झालं. त्याच दिवशी माहीत पडलं की मुलांमध्ये दहावीचं प्रेम उचंबळून आलं होतं. ते गोमू संगतीनंच्या गाण्यात त्यावेळेस स्नेहसंमेलनातील नाटकात केलेलं त्यांचं नृत्य त्यांना आज आठवत होतं व ते सांगत होते की अमूक अमूक व्हॅलेंटाइन दिवसाच्या दिवशी आपल्या प्रेयसींना फुल देत नव्हतो. कारण आम्ही एकमेकांचे भाऊबहिण होतो नव्हे तर एकमेकांना भाऊबहिण मानत होतो.
ते काल एकमेकांना भाऊबहिण मानत होते. म्हणूनच आज तब्बल बत्तीस वर्षानंतरही ते एकत्र आले व गेट टू गेदर साजरा करु शकले. कदाचीत त्यांनी ते दहावीत असतांना जर प्रेम केले असते प्रेमवीर असल्यागत तर कदाचीत ते आज एकत्र येवू शकले नसते व गेट टू गेदरही साजरा करु शकले नसते. हे तेवढंच खरं.
महत्वपुर्ण बाब ही की आज व्हॅलेंटाइन दिवस साजरा करावा. परंतु तो साजरा करतांना प्रेम जरी असलं तरी वासनेची भावना त्यांच्यात नसावी. शारिरीक आकर्षण तर अजीबातच नसावे. जेणेकरुन बदलत्या काळात व्हॅलेंटाइन डेवर विश्वास निर्माण होईल. नाहीतर आज जो दिवस प्रेमदिवस म्हणून भारतात आला. पसरत आहे. त्याला हद्दपार करायलाही वेळ लागणार नाही.
तो व्हॅलेंटाइन दिवस........ दिक्षाच्याही जीवनात तो दिवस आला होता. तसा तो गतकाळातील एक प्रसंग. तिला आठवत होता. ती आपल्या सवंगड्यांना सांगत होती.
'उद्या व्हॅलेंटाइन दिवस. संबंधीत सर्व जगातील प्रेमी हा दिवस साजरा करणार आहेत व ते एकमेकांना फुलही देणार आहेत. त्यातच एखाद्याचा प्रेमी जर हजर झाला नाही तर त्याचा रागही येणार आहे. तेव्हा तसा राग येवू न देता तो व्यक्ती वा तो प्रेमी का आला नाही हे समजून घ्यावे. कारण कधीकधी असंही घडू शकते की त्या व्यक्तीचा अपघात झालेला असतो. जो आपल्याला माहीत नसतो. कधीकधी आपला देश संस्कारीत असल्यामुळे त्या व्यक्तीला मायबापांनी येवू दिले नसेल किंवा कधीकधी त्या व्यक्तीला येण्याचे साधन मिळाले नसेल वा कधी संबंधीत व्यक्ती आजारी पडला असेल. आता आपण यावर म्हणाल की आता फोन आहे. फोनवर ती व्यक्ती का आली नाही ते तर ती व्यक्ती सांगू शकते ना. त्याचं कारण आहे की कधीकधी अशी बंधनं येतात, ज्याला वेळ म्हणता येईल. ते म्हणजे ती व्यक्ती फोनही करु शकत नाही. याबाबतीत जास्त न सांगीतलेलं बरं. ती बाब समजून घेण्यालायक बाब आहे.'
आज दिक्षाला तो व्हॅलेंटाइन दिवस आवडत नव्हता. तसा आजच्याच दिवशी गोपाल तिच्याकडे आला. त्याच्या हातातही एक गुलाबाचं फुल होतं. तेही टवटवीत होतं. तसं त्यानं तिला फुल दिलं. तिनंही तिच्या मनात व्हॅलेंटाइन दिवसाबद्दल अतिशय राग असतांनाही घेतलं.
असाच तो प्रसंग. तिला त्या प्रसंगाचा अतिशय राग आला होता. वाटत होतं की याला काय म्हणावं तेच कळेना. कारण एक लेखक अतिशय मेहनतीनं आपलं लेखन करतो. पुस्तक लिहितो. अन् जेव्हा तो पुस्तक काढून विक्रीला ठेवतो. तेव्हा पुढील किंतू परंतु स्वरुपाचे प्रश्न नेहमी ऐकायला मिळतात की ज्याची लेखकालाही कल्पना नसते.
पुस्तकाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास लोकं दारु पाण्यावर लाखो खर्च करतात. परंतु पुस्तकावर तो खर्च करीत नाहीत. अशीच पुस्तक. ती एका लेखकानं विक्रीला काढली. त्यावर दुसऱ्या जिल्ह्यातून फोन आला. बोलणं होतं,
"मला पुस्तक हवी आहे. तुम्ही पाठवावी."
त्यावर त्या लेखकानं म्हटलं,
"पाठवणार. मला पुस्तकाचा खर्च पाठवावा."
तो लेखक बोलला व त्यानंतर त्यानं त्यावर सवलत मुल्य सांगितलं व हेही सांगितलं की पोष्टाचा खर्च त्यात समाविष्ट होईल. त्यावर त्यांचा प्रश्न. पोष्टाचा खर्च किती येणार. लेखकानं म्हटलं, साधारणतः चाळीस रुपये येणार.
त्या लेखकाचं ते बोलणं. त्यावर त्याची छातीत धडधड वाढली असेल असं वाटायला लागलं. त्यावर तो म्हणाला,
"एवढा खर्च पोष्टाचा येत नाही राव."
याचाच अर्थ असा की लोकं पुस्तकाला नाकापेक्षा मोती जड समजतात. ज्यात काही अनमोल स्वरुपाचे विचार असतात.
आजच्या काळात पुस्तक वाचन करा म्हटलं तर ते महाविद्यालयीन तरुणांना आवडत नाही. मात्र त्यांना बागेत, शाळेच्या खानावळीत एकमेकांशी प्रेमाच्या गोष्टी करणं आवडतं. एकवेळ चांगला मित्रानं पाठविलेला व्हिडीओ आवडत नाही. अन् वात्रट स्वरुपाचा मैत्रीणीनं पाठवलेला व्हिडीओ आवडतो. त्याचं कारण आहे प्रेम.
अलिकडील काळात वाचन संस्कृती लयास जाते की काय, अशीच चिन्हं दिसत आहेत. लेखकांना वाचकवर्गच मिळत नाही अगदी निःशुल्क पुस्तक उपलब्ध करुन दिलं तरी. एकवेळ अशी येते की शुल्क लावलेली आणि तिही महागडी पुस्तकं प्रसंगी लोकं वाचतात. परंतु निःशुल्क स्वरुपात उपलब्ध करुन दिलेली पुस्तक वाचत नाही. ते मश्गुल असतात व्हिडीओ पाहण्यात. अगदी लहान लहान स्वरुपात व्हिडीओ पाहण्यात व्यस्त असतात. त्यांना पुस्तक एका ठिकाणी बसून वाचणं म्हणजे कंटाळवाणे वाटते. त्यामुळंच ते पुस्तक वाचत नाहीत. व्हिडीओ पाहतात. परंतु हे जरी खरं असलं तरी पुस्तकं हे अति तीव्र स्वरुपाचं ज्ञान देत असतात. तसे ज्ञान व्हिडीओही देतच असतात. परंतु पुस्तकातून मिळालेलं ज्ञान हे चिरकाल टिकतं. तसं ज्ञान व्हिडीओचं टिकत नाही. जरी ते प्रत्यक्षात दृश्य स्वरुपात दिलं जात असलं तरी. शिवाय पुस्तकं हे चिरकाल टिकतात व व्हिडीओ तसे चिरकाल टिकणारे नसतात. असं काही लोकांचं म्हणणं. विशेष सांगायचं झाल्यास व्हिडीओ बनविणे व पुस्तक लिहिणे या दोन्ही क्रिया सारख्याच. दोन्ही मध्ये कसब आहे. ज्याप्रमाणे पुस्तक लिहिणं कठीण आहे. त्याचप्रमाणे व्हिडीओ काढणेही अवघडच. फार प्रचंड ताकद लागते. सगळ्या स्वरुपाची जुळवाजुळव करावी लागते. अशातच कोणी जर आपल्याला वाईट म्हटलं किंवा आपली अवहेलना केली वा उपेक्षा केली तर कधीकधी त्या गोष्टीचा आपल्याला राग येतो. तो राग आपला आपल्यातच मावत नाही. मग उद्रेक होतो आपल्या मनातील विचारांचा. जे मनात चांगले विचार असतात. ते विचार कुविचारात बदलतात. मात्र राग कुणीही येवू देवू नये.
दिक्षाला आज गोपालचा राग आला होता. तिचं फुल देणं तिला खपलं नव्हतं. तरीही तो राग आपल्या चेहर्यावर न दिसू देता तिनं तो रागाचा आवंढे गिळला.
रागाबाबत काही गोष्टी सांगतो. कारण राग येणे ही आपली स्वाभाविक कृती आहे व प्रत्येकालाच राग येत असतो. तसेच रागातूनच भांडणंही उद्भवत असतात. मात्र यावर एक व्यक्ती मला म्हणाला होता की राग जर येत असेल तर आधी डोळे लावा व काही वेळ गप्प बसा. काही वेळानं डोळे उघडा. राग शांत होईल. दुसरी रागाच्या बाबतीत महत्वाची गोष्ट ही की जर पुढील व्यक्ती आपल्याला रागाच्या भरात काही बाही बोलत असेल तर त्या व्यक्तीचं संपुर्ण बोलणं आधी ऐकून घ्यायचं. मग बोलायचं. म्हणजे त्या व्यक्तीला वाटेल की संबंधीत व्यक्तीनं आपलं बोलणं ऐकून घेतलं. तो किती चांगला व्यक्ती आहे. अशानं पुढील व्यक्तीचा रागही मावळतो व सुकार्य घडतं. मात्र यात अपवाद असा आहे की काही लोकांचे राग कितीही काही केलं तरी मावळत नाही. अशांच्या गोष्टी ऐकलेल्या बऱ्या.
महत्वपुर्ण बाब ही की आपली कृतीच कोणाला राग येईल अशी असू नये. जेणेकरुन त्यांना राग येईल. तो रागावलाही असेल कधीतरी. तरी त्या व्यक्तीला आपल्याला त्याचा राग आला आहे हे दाखविण्याची गरज नाही. तसं जर दाखवलं तर राग दिसून येईल व त्याचा परिणाम हा उद्रेकातच होईल ही शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा राग येवू न देता आपण सहकार्याची भावना ठेवावी हे तेवढंच खरं.
ज्याप्रमाणे पुस्तक लिहिणाऱ्या लोकांना ती वाचन न करणाऱ्यांचा राग येतो. तसाच राग हा प्रेमीचा प्रेमिकेला वा प्रेमिकेला प्रेमिला येत असतो. ती न आल्यास वा त्या दोन्हींपैकी जो हजर,राहिला नाही तर असे करीत असतांना अतिशय राग येणारच. कारण त्यासाठी भरपूर तयारी केलेली असते. महत्वाचं म्हणजे उद्या व्हॅलेंटाइन दिवस. संबंधीत सर्व जगातील प्रेमी हा दिवस साजरा करणार आहेत व ते एकमेकांना फुलही देणार आहेत. त्यातच एखादा व्यक्ती जर हजर झाला नाही तर त्याचा रागही येणार आहे. तेव्हा तसा राग येवू न देता तो व्यक्ती वा तो प्रेमी का आला नाही हे समजून घ्यावे. कारण कधीकधी असंही घडू शकते की त्या व्यक्तीचा अपघात झालेला असतो. जो आपल्याला माहीत नसतो. कधीकधी आपला देश संस्कारीत असल्यामुळे त्या व्यक्तीला मायबापांनी येवू दिले नसेल किंवा कधीकधी त्या व्यक्तीला येण्याचे साधन मिळाले नसेल वा कधी संबंधीत व्यक्ती आजारी पडला असेल. आता आपण यावर म्हणाल की आता फोन आहे. फोनवर ती व्यक्ती का आली नाही ते तर ती व्यक्ती सांगू शकते ना. त्याचं कारण आहे की कधीकधी अशी बंधनं येतात, ज्याला वेळ म्हणता येईल. ते म्हणजे ती व्यक्ती फोनही करु शकत नाही. याबाबतीत जास्त न सांगीतलेलं बरं. ती बाब समजून घेण्यालायक बाब आहे व त्याबाबतीत राग येवू देवू नये म्हणजे झालं. कारण प्रेमदिवस आहे. त्यामुळंच प्रेम हे देखील तिळगुळासारखे वाटा म्हणजेच त्याचा तिळगुळासारखा गोडवा वाटेल व प्रेमदिवसाचंही सार्थक होईल यात शंका नाही.
*******************************************
दिक्षा हुशार होती. ती जिल्हाधिकारी होती. परंतु खटल्यात तिचा पैसा अतोनात खर्च झाला होता. तसं तिनं जे जे प्रसंग पाहिले होते की त्यावरुन तिला वाटत होतं की श्रीमंतीच्या काळात हुशारीला किंमत नसते.
श्रीमंतीच्या काळात हुशारीला किंमत नसते. कारण मुळातच गरीबांच्या घरी जे हुशार जन्मास येतात. त्यांना आपल्या परिस्थितीशीच झगडावे लागते. त्यांच्या गरजा गरीबीमुळं पुर्ण करता येत नाही. मग ती शिक्षण शिकण्याची गरज का असेना, अशातच त्यांचं शिक्षणही सुटलं व ते एखाद्या कामावर वेठबिगार म्हणून काम करीत असतात. त्यांच्या हुशारीचा त्यांना काहीच उपयोग होत नसतो. आज देश सुशिक्षीत आहे असं आपण म्हणतो आणि ते खरंच आहे. कारण देशात हुशार जर नसते तर देश आज विकसीत राष्ट्राच्या रांगेत उभा नसता. त्यामुळं देशात चाणाक्ष बुद्धीमत्तेची मंडळी नाहीत असे म्हणताच येत नाही.*
आज जगात जसं खानपान व फॅशनला महत्व आहे. तसंच महत्व हुशारी व श्रीमंतीलाही आहे. परंतु सर्वांच्याच घरी विधाता दोन्ही गोष्टी देत नसतो. तसंच सर्वांनाच विधाता सुखी ठेवत नसतो. प्रत्येकाच्या घरी काही काही दुःख असतंच यात दुमत नाही.
हुशारी व श्रीमंतीबद्दल सांगायचं झाल्यास प्रत्येकाच्या घरी हुशारी नसते. काही ठिकाणी हुशार असतात तर काही ठिकाणी पैसा असतो. तिथे पैसा वा मालमत्ता एवढी असते की ती मोजता येत नाही. परंतु तो पैसा कसा वापरावा याचं तारतम्य त्या घरात नसतं. तर काही ठिकाणी एवढी हुशारी असते. परंतु त्या हुशारीचा काहीच उपयोग नसतो. म्हणतात ना की चने जिथं असतात, तिथं दात नसतात व दात जिथं असतात तिथं चने नसतातच.
आजचा आपला काळ असाच आहे. आजच्या काळात चने व दात असण्याला अर्थ नाही. कारण काही ठिकाणी लोकांनी भ्रष्टाचार करुन पैसा वाढवला आहे. म्हणूनच विधात्यानं त्या ठिकाणी हुशारी ठेवलेली नाही. बऱ्याचशा अशा कुटूंबात एक दोन जण वेडेच असलेले दिसतात. कारण विचारलं असता काहीजण ते व्यंग जन्मापासून असल्याचं सांगतात, तर काहीजण अकस्मात काळानंतर घडलेला प्रकार असल्याचं सांगतात. असं का होतं? त्याचं कारण आहे, पैसा कमविण्यासाठी केलेला भ्रष्टाचार.
हुशारी ही सर्वच ठिकाणी नसते. याबाबतीतील एक उदाहरण आहे. एका शाळेत एक मुलगी फारच हुशार होती. कुटूंब सर्वसाधारणही नव्हतं. गरीबच होतं आणि अशातच त्या घरचा जबाबदार व्यक्ती मरण पावला. मग आबाळ झाली. मुलीला शिकवायचे कसे? प्रश्न पडला. ज्यात त्या महिलेनं पैशाअभावी तिची मुलगी हुशार असूनही तिला शिकवले नाही. या ठिकाणी तिच्या हुशारीचा कोणता उपयोग झाला? ही विचार करायला लावणारी बाबच आहे. याबाबतीतील दुसरं उदाहरण असंच आहे. एक गरीबच कुटूंब व त्याही कुटूंबातील ती एक हुशार मुलगी. मुलीला सर्वच यायचं. परंतु वडील दारु प्यायचे. ज्यातून तिच्या आईच्या मनावर परिणाम झाला व तिनं तिला शिकवलंच नाही. दारुड्या माणसाच्या घरची हुशारीची परिस्थितीच सांगू नये. त्या माणसाच्या घरीही हुशार मुलं असतात. परंतु दारुच्या व्यसनानं पुर्णच मुलांच्या हुशारीची राखरांगोळी होत असते. एक असाच दारुडा की त्या घरची त्याची पत्नी त्याला सोडून गेली व तिनं परिस्थितीअभावी तिला शिकवलेच नाही.
दारुचं व्यसन असलेल्या घरी जरी हुशारीला किंमत नसते. तशीच किंमत नसते घटस्फोट घेणाऱ्या महिलेच्या घरच्या मुलांच्या हुशारीला. तिच्या घरची मुले हुशार असतात. परंतु तिच्या एकंदरीत वागण्यानं त्याही मुलांच्या अंगच्या हुशारीची राखरांगोळी होत असते. त्याही मुली ऐन वेळेवर मुलांची हुशारी न पाहता आपल्या पतीला सोडून जात असतात.
हुशारीला कधीकधी उधळीही लागत असते. त्याला कारणीभूत असतो मृत्यू. अतिश्रीमंत कुटूंबात एखादा मुलगा हुशार असल्यास त्याच्या हुशारीला तेव्हा किंमत उरत नाही. जेव्हा त्याच्या कुटूंबातील त्याच्या आईचा किंवा वडीलांचा मृत्यू होत असतो. अशावेळेस जर एखादा घटक मृत्यू पावल्यास तो दुसरा विवाह करतो. मग दुसरा आलेला घरातील घटक हा अशा हुशार मुलांना शिकवेलच असं नाही. तो सरळ सरळ त्या मुलांना घरी बसवून त्यांना घरच्या कामाला लावत असतो. मग तो घटक श्रीमंत का असेना. तो घटक श्रीमंत जरी असला तरी त्या घरी हुशारीला काही किंमत नसते व हुशारीचा काही उपयोग नसतोच. श्रीमंतीचंही असंच आहे. श्रीमंत कुटूंबात एखादा जरी हुशार व्यक्ती असेल तर त्याच्या कलागुणांना व हुशारीला वाव नसतोच. सगळं काही पैशानंच विकत घेवू शकतो. असा विचार त्या कुटूंबात असतो. अन् तसं घडतंही. कारण सगळं पैशानंच घडून येत असतं. नोकरी, बंगले, गाड्या घोड्या जरी वापरण्याची रीत माहीत नसली तरी पैशाच्या भरवशावर वापरणं सुरु होत असतं अनेक ठिकाणी. अन् एखाद्या घरी जरी अतिहुशार असतील तरी पैसे नसल्यानं ते परिस्थितीशीच लढत असतात. त्यातच त्यांची बुद्धीमत्ता खर्च होत असते. जी बुद्धीमत्ता एखादा प्रयोग करतांना त्या प्रयोगात खर्च व्हायला हवी. परंतु तसे होत नसल्यानं ते मागे पडतात. त्याचबरोबर त्यांची बुद्धीमत्ताही मागे पडते आणि त्यांचा तो देशही. गरीबीत हुशारीला किंमत नसते. कारण त्यांना सतत परिस्थितीशी लढावं लागतं. ज्यात हुशारी खर्च होत असते. ज्या हुशारीची शक्ती मेंदूतून प्राप्त होत असते. ही नेहमी होणारी मेंदूतील झीज त्याच्या हुशारीला नेस्तनाबूत करीत असते. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
व्हॅलेंटाइन दिवस हा अलिकडील काळात वात्रटासारखे वागण्याचा दिवस होता. त्या दिवसाला आज प्रेमी प्रेमिका भेटत असत. गुलाबाचं एक फुल देत असत व भोळ्या भाबड्या प्रेयसींना फसवीत असत. त्यामुळंच तिला आज वाटायला लागलं होतं की असं व्हॅलेंटाइन दिवसाच्या निमित्यानं अभद्र गोष्टी वा कृती घडू नये. संस्कार रुजावेत. जे संस्कार शिक्षणातून रुजवले जावू शकतात. शिक्षणातूनही संस्कार रुजावेत.
शिक्षणातून संस्कार रुजायला हवं. कॉपी करणं पापच. परंतु अलिकडील काळात शाळेतील विद्यार्थी हे कॉपी करीत असतात आणि त्यांनी कॉपी करु नये म्हणून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. परंतु कितीही अशा प्रकारचे अभियान राबवले गेले तरी कॉपी ही कॉपीमुक्त होणार नाही. कारण जे संस्कार आलेले असतात. ते संस्कार हे अभ्यासक्रमातूनच आलेले असतात नव्हे तर ते राबविणाऱ्या घटकातूनही आलेले असतात. त्यातच त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचा परीसरही भर टाकत असतो. महत्वाचं म्हणजे असं होवू नये म्हणून अभ्यासक्रमच तयार करतांना तो संस्कारक्षम तयार करावा. तो राबविणारा घटकही संस्कारक्षम असावा आणि त्याचा परीसरही संस्कारक्षम बनावा. जेणेकरुन संस्कार त्या विद्यार्थ्यात रुजेल. ते कॉपी करणार नाहीत. व्यतिरीक्त देशही संस्कारक्षम बनेल हे तेवढंच खरं.
अलिकडे शिक्षणाला फार महत्व आलेलं आहे. त्यानुसार शिक्षणाला वाघिणीचे दूध समजले जात असून शिक्षण सर्वांना मिळायला हवं. यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी ते शिकवीत असतांना वा देत असतांना शिक्षण काही शैक्षणिक धोरणं आखले जात आहेत व बदलत्या अभ्यासक्रमानुसार शिक्षकांना कामाला लादले जात असून विद्यार्थी स्वतः शिकावा व त्याचे सुप्त गुण बाहेर निघावे, त्याचा विकास व्हावा म्हणून तेच सुप्त गुण त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन व्हावे वा ते सुप्त गुण वृद्धींगत होत जावून ते देशाच्या कामी यावे यासाठी पुरेपूर प्रयत्न केल्या जात आहे.
शिक्षण सर्वांना मिळायलाच हवं. ते सर्वांना दर्जेदारच मिळायला हवं. यासाठीच शिक्षण धोरण हे बदलत्या काळानुसार वेळोवेळी आखलं जात असतं. हे सगळं बरोबर आहे. त्यासाठी शिक्षणाची रुपरेषा ठरवली जाते व त्यासाठी प्रशिक्षणं राबवली जातात. त्यासाठी खर्चही केला जातो. परंतु असं असतांनाही व भावी काळात घडणारी पिढी शिकवीत असतांना साहजीकच असं लक्षात येतं की जी पिढी शिकते. त्या पिढीत संस्कारच रुजलेले नाहीत. चारदोन जर सोडले तर त्यातील कुणीतरी गुंड निघतात. कुणीतरी मायबापाची सेवा करीत नाही. कुणीतरी चोऱ्या करतात. असं का होतं? याचाच अर्थ असा की मुलांना लहानपणापासून जे शाळेच्या माध्यमातून संस्कार आपण देतो. ते संस्कार मुळात आपले त्या विद्यार्थ्यांना गुन्हेगारीकडे नेणारे असतात. कारण सध्याच्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकात संस्कार रुजविणाऱ्या गोष्टी असल्या तरी ते शिकविणारे व अभ्यासक्रम राबविणारे घटक हे स्वतः संस्कारीत नाहीत आणि अभ्यासक्रमही संस्कार देणारा नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास इतिहासाचं देता येईल. इतिहासात अमूक व्यक्तीनं अमूक व्यक्तीला मारलं. अमूक युगातील व्यक्ती अमूक युगात शिकार करुन जगायचा. यात अशाच प्रकारच्या गोष्टी जर अभ्यासक्रमात राबवल्या जात असतील तर मुलांमध्ये संस्कार रुजणार कुठून? शिवाय आजच्या काळातील शाळेतील परिक्षा. शिक्षक स्वतःच मुलांना चांगला पेपर सोडवता यावा म्हणून मदत करतात. ज्यातून कॉपीची सवय लागणारच. पुढे त्याचा बिनधास्तपणा एवढा वाढतो की ती मुलं चोऱ्याही करु लागतात.
आजची काही पाठ्यपुस्तके व अभ्यासक्रम हा जरी संस्कारावर काहीसा आधारीत असला तरी अलिकडील काळात मुलांवर संस्कार कसे करावेत. हा प्रश्न शिक्षकांसमोर आ वासून उभा आहे. कारण तो विद्यार्थी जसा करेल वा जसा वागेल. तसं त्याला वागू द्यायचं आहे. त्याला रागवायचे नाही. मारायचे तर अजीबात नाही. त्यामुळं पुर्वी जो धाक असायचा की ज्या धाकातून मुलं मायबापाची सेवा करायचे. ते आता दिसत नाही. आज जे घटक अभ्यासक्रम राबवतात. त्याच घटकांचं खाजगी आयुष्य पाहिलं तर त्यांचे मायबाप वृद्धाश्रमात दिसतात. कित्येक ठिकाणी पती पत्नीचे वाद असतात. कित्येक ठिकाणी अशा स्वरुपाचा उपक्रम राबविणारा घटक वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतो आणि कित्येक ठिकाणी त्या व्यक्तीचे हात हे भ्रष्टाचारात लिप्त असतात.
अभ्यासक्रम तयार करणे वा ती प्रक्रिया घडून येणे ही काही साधी पद्धत नाही. ती एखाद्या गर्भात तयार होणाऱ्या बाळासारखी प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे एखादे बाळ गर्भात तयार होत असतांना त्या बाळावर आई कशी वागते. ती काय खाते पिते, त्या आईच्या सभोवताल कसे वातावरण आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम होत असतो. तोच परिणाम अभ्यासक्रम तयार करतांनाही होतो. ज्याप्रमाणे एखाद्या परीक्षकाचे पेपर तपासत असतांना त्याच्या मनात कोणते विचार येतात. त्याचप्रमाणे गुण पेपरवरही उतरतात. त्यामुळंच जेव्हा अभ्यासक्रम तयार होतो. तेव्हा तो तयार होत असतांना वा जो कोणी तो अभ्यासक्रम तयार करण्याची प्रक्रिया करीत असतो. तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात कोणती भावना असते. त्यानुसार अभ्यासक्रम तयार होवू शकतो. मग तो अभ्यासक्रम त्या व्यक्तीने रागात तयार केला तर तो राग अभ्यासक्रमात उतरणारच आणि तो जर आनंदात असेल तर तो आनंदही अभ्यासक्रमात उतरणारच. जेव्हा तो आनंदात असेल, तेव्हा तो ज्या कथेत आनंद व्यक्त केल्या गेला. ती कथा घेणार आणि जर तो व्यक्ती रागात असेल, तर राग व्यक्त केल्या गेलेल्या कथा घेणार.
महत्वपुर्ण बाब ही की अलिकडील काळातील अभ्यासक्रम हा देखील अशाच स्वरुपाचा तयार व्हावा की ज्यातून संस्कार फुलतील. अन् ते राबविणारे घटकही संस्कारक्षम वा संस्कार फुलविणारेच असावेत. ते घटक प्रसन्न व सुविचार बाळगणारे असावेत. जसा अभ्यासक्रमात संस्कार असेल, तसाच तो शिकविणारा घटक हा देखील संस्कारक्षम. उदाहरणार्थ अभ्यासक्रमात खोटे बोलू नका हा संस्कार सांगितला असेल तर त्या राबविणाऱ्या घटकानेही खोटे बोलू नये नव्हे तर त्याने खोटे न बोलता वागावे. तरंच अभ्यासक्रमातून संस्कार फुलतील. ज्या संस्कारातून घडणारी भावी पीढी ही संस्कारक्षम घडेल व देशातील गुन्हेगारीही कमी होईल नव्हे तर देशातही संस्कारक्षमता वाढीस लागेल. जी देशाच्याच विकासाच्या कामात येईल यात शंका नाही.
दिक्षानं जात नष्ट करण्यासाठी दाखल केलेला न्यायालयीन खटला. तो खटला आज उच्च न्यायालयात होता व तिथंही ती हारली होती. तिचा खटला न्यायालयात न्यायाधीश महोदयानं नाकारला होता व निकाल देतांना म्हटलं होतं की जात कधीच नष्ट होवू शकत नाही आणि ती नष्ट करण्यासाठी दाखल केलेली कृती ही अतिशय मुर्खपणाची कृती आहे.
न्यायालयानं नाकारलेला खटला. त्यावर खजील झालेली दिक्षा. तिच्या मनात न्यायालयीन प्रकरणावर प्रश्नचिन्हं उभं राहिलं होतं. तिला वाटत होतं की अजुनही पक्षकाराला न्याय मिळत नाही.
दिक्षा विचार करीत होती. न्यायालयात खटले दाखल होतात. ज्यात पुरावे सापडत नाहीत व आरोपी सुटतात. काही प्रकरणात पुरावे असतात. परंतु ते तपासले जात नाहीत. पक्षकार हा तारीखवर तारीख करीत न्यायाच्या प्रतिक्षेत आपल्या चपला झिजवीत असतो. प्रसंगी तो मरण पावतो. परंतु न्याय मिळत नाही. ही झाली सामान्य लोकांची व जातीची प्रकरणं. अनुसूचित जातीच्याही प्रकरणात असंच घडून येतं. याबाबतीत एक किस्सा आहे. एक प्रकरण न्यायालयात उभं होतं. ते अनुसूचित जातीवर झालेल्या अत्याचाराशी संबंधित होतं. घटना ही एक दिड महिन्यापुर्वी झाली होती. घावही सुकले होते. पीडीत व्यक्तीनं तक्रार टाकली होती. ज्याला तब्बल दिड महिना झाला होता. परंतु पीडीत व्यक्ती गरीब असल्यानं वा त्याच्या ओळख्या पाळख्या नसल्यानं तक्रारीची दखल घेतली गेली नाही. सगळं काही मॅनेज केलं गेलं. त्यानंतर पीडीत व्यक्तीनं गत एक दिड महिन्याच्या तक्रारीवरून दखल का घेतली नाही, म्हणून वरच्या स्तरावर तक्रार केली. त्यानंतर त्या दुसर्या तक्रारीची दखल घेतली गेली व प्रकरण नोंद झालं. त्यानंतर खटला न्यायालयात गेला. न्यायालयात विचारलं गेलं की ज्या तारखेला खटला दाखल करण्यात आला. त्या तारखेला घटना झाली होती का? सहजच नकारार्थी उत्तर निघालं की सदर तारखेला घटना झालीच नव्हती. त्यानंतर प्रकरणाचे पुरावे तपासले गेले. प्रकरणाच्या संबधाने तारखेवरचे पुरावे तपासण्यात आले व ठरवलं गेलं की सदर तारखेला प्रकरण घडलंच नाही व त्या संबंधानं शहानिशा केली असता पुरावेही सापडले नाहीत आणि पुरावे तरी कसे सापडणार? कारण घटना होण्याला दिड महिना झाला होता.
घटना अशाच घडतात. संबंधीत तारखेला घडतात व नोंद होतात वेगळ्याच तारखांना. पुरावे घटनेच्या वेळेस मिळतात. ते घटना नोंद होण्याच्या तारखेपर्यंत मिटतात. मग कसा आरोपी जाळ्यात अडेल. त्याला निसटायला बराच वेळ मिळतो व तो सहजच निसटून जातो. अशाप्रकारे घटना घडत असल्याने व त्या घटना वेगळ्याच तारखांना नोंद होत असल्यानं न्याय हा अधुरा राहतो. त्यातच सगळेच आरोपी सुटतात. अनुसूचित जातीवरही असे बरेच अत्याचार होतात. परंतु खटले उभे राहात नाहीत. एखादा खटला उभा राहतो व तो न्यायालयात टिकत नाही. टिकला तरी यशस्वी होत नाही. त्याचं कारण तेच.
अनुसूचित जात ही मुळात कालची महान जात. जी राजसत्तेवर असतांना इतर जातींना सन्मानानं वागवत होती. परंतु काळ बदलला व कित्येक काळानंतर या अनुसूचित जातीची सत्ता गेली. त्यानंतर पराभवानंतर व अधःपतनानंतर अनुसूचित जातीवर कालपर्यंत अत्याचार होत गेलेत. जेव्हापर्यंत भारत स्वतंत्र्य झाला नाही वा संविधान बनले नाही.
जात..... जातीअंतर्गत भांडण. भांडणारा घटक हा उच्च जातीतील. माझी जात काढली म्हणून भांडण. नवीनच वादाचा मुद्दा. घटनेतील कलम ३(१) व ३(२) नुसार अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर कोणी इतर उच्च जातीच्या व्यक्तीने अत्याचार केल्यास त्याचेवर ती कलम लावून दाद मिळवून दिली जात असे. ज्यात एखाद्याची जात काढल्यावर तो गुन्हा मानून त्यानं जर जात काढलीच तर तो दंडणीय अपराध मानून त्यावर दाद मागण्याचं प्रावधान संविधानात लिहिलं गेलं. ज्यात दोन तरी साक्षीदार उच्चवर्णीय असायला हवेत. असा मतितार्थ होता.
संविधानातील त्या कलमेनुसार जर तो खटला फसलाच किंवा यशस्वी झाला नाही तर न्याय मिळविण्याच्या हेतूनं तो खटला दाखल करण्यात आला असे मानून सदभावना म्हणून त्या खटल्यात तो खटला यशस्वी जरी होत नसेल तर कारवाईचे संकेत नव्हते. त्याच अनुषंगाने दाखल केलेल्या त्या खटल्यात कलम बावीस नुसार शिक्षा नव्हती. तसं पाहिल्यास शिक्षाही व्हायलाच नको. त्याचं कारण आहे की जो अनसुचीत जातीचा व्यक्ती असतो, ज्याचेवर अत्याचार होतो. तो व्यक्ती सरासरी अत्याचार सहन करीत असतो. परंतु तो त्याचेवर अत्याचार जरी झाला तरी त्यासाठी खटला टाकू शकत नाही. एखादाच व्यक्ती असा असतो की तोच हिंमत करतो. हे आजतागायत चालत आलेलं सत्य आहे.
अनुसूचित जातीनं टाकलेले बरेचसे खटले फसतात. त्याचं कारण आहे त्यांचं दारिद्र्य. त्यांना खटले लढायला वकील बरोबर न मिळणं. कित्येक अनुसूचित जातीचे खटले सरकारी वकील चालवत असतात. जे खटले व्यवस्थीत लढवत नाहीत. ज्यातून पराभवाचा सामना करावा लागतो अनुसूचित जातीच्या लोकांना. म्हणूनच ही कलम क्रमांक बावीसची तरतूद होती. आता त्यालाही छेद दिलेला आहे. सहानुभूती शब्दच राहिलेला नाही. आता एकदा का अनुसूचित जातीचा व्यक्ती खटला हारलाच तर त्याचेवर ज्याप्रमाणे एखाद्या असहाय्य सापावर असंख्य कावळे अचानक एकाचवेळेस हमले करतात. तसाच हमला उच्चवर्णीय व्यक्ती करतो चारही बाजूंनी. त्यातच त्या उच्चवर्णीय व्यक्तीला संपुर्ण उच्चवर्णीय यंत्रणा धडा शिकविण्यासाठी मदत करीत असते. ज्यातून अनुसूचित जातीचे लचके तोडले जातात. यात महत्वपुर्ण बाब ही की जोपर्यंत तक्रारी घडलेल्या तारखेवर दाखल होणार नाहीत व त्याच दिवशी घडलेल्या प्रकरणाची शहानिशा करुन जेव्हापर्यंत पुरावे नष्ट होण्यापुर्वी पुरावे गोळा केले जाणार नाहीत. तेव्हापर्यंत आरोपी सापडणार नाहीत. आरोपींना शिक्षा होणार नाही. मग इतर जातीतील खटले असोत वा अनुसूचित जातीतील खटले असोत.
आज असे बरेच खटले आहेत की जे दाखल होण्यापुर्वीच संपतात. पक्षकाराला गुन्हा नोंदविण्यापुर्वीच आरोपी त्याला धमक्या देतो की ज्या धमक्यांना घाबरून पक्षकार आपल्यावर अन्याय अत्याचार झाला तरी तक्रार दाखलच करीत नाही. घाबरतो. कारण आजच्या पक्षकाराला माहीत झालं आहे की आपण संबंधीत प्रकरणाची तक्रार केली तरी आपल्याला न्याय मिळणार नाही व आपला प्रसंगी पराभव होईलच. अशी बरीच प्रकरणं घडत आहेत. ज्यात आरोपी मोकाट सुटत आहे व पक्षकारच शिक्षा भोगत न्यायालयाचे चक्कर कापत आहे. तारीखवर तारीख करत. मात्र त्यांना अजुनही न्याय मिळत नाही हे तेवढंच खरं.
हे असं का घडतं? दिक्षाच्या मनात आलेला विचार. खुद्द न्यायाधीश या प्रकरणावर रास्त बाजूनं विचार करीत नाहीत. कारण कालच्यापेक्षा आजच्या अभ्यासक्रमात विशेष म्हणजे चांगल्या गोष्टीच शिकवल्या जात नाहीत.
आज शिक्षणात औपचारिक व अनौपचारिक अशा दोन्ही स्वरुपाचे शिक्षण आलेले आहे. शिवाय आज शिक्षणाची व्याख्याच बदलली आहे. अलिकडच्या शिक्षणात विद्यार्थ्यांना शिकवावेच लागत नाही तर तो स्वतः शिकतो यावर भर दिला जात आहे. त्यानुसार आज शिक्षणाचा साचेबद्ध प्रकार बंद झाला असून मुक्त शिक्षणाचा आकृतीबंध शासनाने स्विकारलेला आहे. असं सरकार म्हणतं. त्यानुसारच विद्यार्थ्यांना वर्गात शिकवले जात आहे. त्यासाठी कृतीवर जास्त भर दिला जात असून त्यासाठी शिक्षकांची कृती जेवढी महत्वाची आहे. विद्यार्थ्यांची कृतीही तेवढी महत्वाची आहे व त्याच कृतीला वाढविण्यावर जास्त भर दिला जात आहे. अन् हे करीत असतांना विद्यार्थ्यांच्या औपचारिक शिक्षण घेण्याचे वयही बदललेले आहे.
शिक्षण...... कालमितीला शिक्षणाचा इतिहास पाहिल्यास जेव्हा कानाला हात पुरायचा. तेव्हा त्याचं नाव शाळेत दाखल केलं जात असे. ते तसं वय ठरविण्याचं कारण होतं, त्या मुलांचं आत्मनिर्भर होणं. ते मुल वयाच्या सातव्या वर्षीच आत्मनिर्भर व्हायचं. आपली कामे आपण स्वतःच करायचं ब्रीद, ते मुल शाळेत येण्यापुर्वीच शिकून येत होतं. ते ब्रीद त्याला शिकवावंच लागत नव्हतं. जसे प्रातःक्रिया करणे. आज प्रातःविधीपासून तर सर्व प्रकारच्या क्रिया शाळेत शिकविल्या जाणार. कारण नर्सरीपासून म्हणजे मुलाच्या वयाच्या तीन वर्षापासून मुलांना शिक्षण प्रवाहात आणायचे आहे. काही दिवसानं तोही स्तर बदलणार व मुलांच्या जन्मापासूनच त्याला शाळेत ठेवावं लागणार. ही शंका नाकारता येत नाही.
तो काळ व ते वय. जरी आज त्या शिकण्याला घोकंपट्टीचं वय समजत असले तरी खरं शिक्षण तेच वाटायचं. ज्या शिक्षणातून पुढे प्रत्येक विद्यार्थी अगदी अल्पवयातच आत्मनिर्भर बनायचा. विद्यार्थी आत्मनिर्भर असायचा. त्याचं कारण असायचं त्याचं वय. ते वय वाढलेलं असायचं व त्या वाढलेल्या वयात त्या विद्यार्थ्यांचा मेंदू हा अधिक विकसीत झालेला असायचा. त्यातील काही विद्यार्थी घोकंपट्टी करीत शिकायचे. काही विद्यार्थी शिकत नव्हते. कारण त्या विद्यार्थ्यांच्या शिकण्यात वातावरण वा परीसर कारणीभूत असायचा. वडीलांचं सतत आईला मारणं तसंच वडीलांचंही दारुचं व्यसन हे त्याला कारणीभूत असायचं. शिवाय त्या शिक्षणाला महत्वपुर्ण अडथळा होता, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या घरी असलेले त्याचे भाऊबहिण. ते जरा जास्तच असायचे. आज हा भाग कालबाह्य झाला व प्रत्येक बालक आज शिकू लागला आहे. कारण आज शिक्षण शिकण्याचं व शिकविण्याचं महत्व वाढलेलं आहे.
शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास कालची मुले महामारीत डॉक्टर औषधाला सापडत नाहीत व महामारीत लेकरं विना औषधानं मरण पावतात, म्हणून जन्मास घालावी लागायची. त्यानंतर त्याचे आईवडील मुलांना शाळेत तर टाकत असतच. परंतु मुलं शिकलीच पाहिजे ही काही त्यांची अपेक्षा नसायची व मुलांनाही मी शिकलोच पाहिजे असंही वाटायचं नाही. ज्यातून मुलं जरी स्वतः कोणाचीही मदत न घेता आत्मनिर्भर बनत असली तरी त्याला त्या काळात विशेष महत्व नव्हतं. आज तीच मुलं आहेत की जी मुलं आपल्या मुलांना शिकवितात. हे केवळ आज वाढल्या असलेल्या शिक्षणाच्या महत्वामुळे. आज काळ हळूहळू बदलला व मुल जन्मास कात्री लागली. त्याचं कारण म्हणजे औषधे व तंत्रज्ञानाचा शोध. तसेच महागाई. या तीन भात्यातील तलवारीनं जुन्या काळातील आत्मनिर्भर करणाऱ्या शिक्षणाची हत्या केली. अन् त्या जागी नवीन शिक्षण आणलं. त्यासाठी फार मोठी जाहीरात केली गेली. जाहीरात होती, जुनं शिक्षण बेकार होतं, आजचं नवीन शिक्षण चांगलं आहे.
विशेष म्हणजे नवीन शिक्षणाबद्दल सांगता येईल की आज मायबापांना दोनच मुलं असतात. त्यातच महागाईची झळ जास्त प्रमाणात सतावू नये म्हणून लोकांनी दोनच लेकरं ठेवली. तसंच अलिकडील काळातील जाहीरातीनुसार जे शिक्षण शिकत असतांना तो विद्यार्थी आत्मनिर्भर होत नसेल तर ते शिक्षण कोणत्या कामाचं? असं म्हणण्याची वेळ येवू नये म्हणून अलिकडील शिक्षण व्यवस्थेची जाहीरात मोठी व त्यामागे काहीतरी मोठी गंभीर बाब, ती म्हणजे जुन्या काळातील राबवलेल्या अभ्यासक्रम यंत्रणा लपविण्याचं षडयंत्र घडत असल्याचं चित्र दिसतं.
अलिकडच्या काळातील शिक्षण सांगतं की विद्यार्थी हा केवळ शाळेतच शिकत नाही. तर तो परीसरात शिकतो. त्यासाठी त्याला शिकविण्याची गरज नाही. त्याला फक्त मार्ग दाखविण्याची गरज आहे. हे सगळं करीत असतांना त्याच्या कौशल्यावर व कृतीशिलतेवर आज भरपूर दिला आहे. वय कमी केलं आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी अलिकडील शिक्षणाला हे माहीत आहे की पुर्वीच्या शिक्षणानं विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर केलं. ती मुलं शाळेत शिकत जरी नसली तरी ती आपोआपच आत्मनिर्भर बनायची. उदा. थॉमस अल्वा एडीसनसारखे बरेचसे शास्त्रज्ञ की जे शाळेतच गेले नाहीत. तरीही त्यांनी मोठमोठे शोध लावलेत. काल शाळेत जाण्याचे वय जास्त होते व आज ते कमी झालेले आहे. अर्थात आकृतीबंधानुसार पुर्वप्राथमिक वर्ग शाळेला जोडलेला आहे व एक नवीन स्वरुपाचा आकृतीबंध तयार केल्या गेला आहे. शिवाय या नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलगा हा वातावरणातून अनौपचारिक शिक्षण शिकायला हवा. जे पुर्वी अभिप्रेत होतं व तीच क्रिया आज आपोआपच घडत असे. आज ती घडावी असा आकृतीबंध तयार केला आहे. तसंच आज ज्या शिक्षणावर भर दिलं जातं. तो स्तर आहे, ५+३+३+४. याचाच अर्थ असा की वय वर्ष सात वर्षापर्यंत पहिला पाचचा स्तर. ज्यात बालवाटिका स्तर अर्थात नर्सरी, त्यानंतर केजी वन व केजी टू. या इय्यतेचा समावेश केल्या गेला आहे. याचाच अर्थ असा की मुलगा शिको की न शिको. औपचारिक शिक्षणातून त्याला पुर्वीसारखं स्वतः आत्मनिर्भर बनू द्यायचे नाही तर त्याला आपण आत्मनिर्भर व्यक्ती बनवायचे आहे. त्यासाठी त्यांच्यावर त्यांना समजायच्या आतच क्रिया प्रतिक्रिया करायच्या आहेत. याचाच अर्थ असा की विद्यार्थ्याला मातीची उपमा दिली तर त्या मातीला आपल्याला जसा आकार द्यायचा असेल, तो देण्यात येईल. यात महत्वपुर्ण भाग असा की एकीकडे सरकार म्हणतं की विद्यार्थ्यात काही सुप्त गुण असतात. ते गुण आपण विचारात घेवून त्या गुणांनुसार शिकवायचे. त्या गुणांना वाढीस लावायचे. ज्या गुणांचा वापर करुन मुलांना आत्मनिर्भर बनवायचे व नवनिर्मीती करायला लावायची. तर दुसरीकडं सरकार अशा मुलांचे वय वर्ष लक्षात न घेता त्याच्या अगदी तीन वर्षाच्या काळापासून शिकवायचे. जेणेकरुन तो मुलगा म्हणजे ओली माती व तो नर्सरीचा वर्ग म्हणजे एखादे भांडे आकार देणारं. यात उदाहरण द्यायचं झाल्यास दारु तीच आहे, पिणारेही तेच आहेत. फरक इतकाच आहे की त्याचे भांडे वेगवेगळे आहे. सरकार हे सांगत नाही की आमच्याही देशात आम्हाला कॉन्व्हेटचं शिक्षण आणायचं आहे. परंतु सरकार हे सरळ सरळ सांगत नाही.
विशेष सांगायचं झाल्यास सरकारनं नक्कीच कॉन्व्हेंटचं शिक्षण आणावं. त्याला मनाई नाही. ज्याचा पॅटर्न याआधीच कॉन्व्हेंटच्या शाळेच्या स्वरुपात राबविण्यात आला. ज्या शाळेत आतापर्यंत केवळ श्रीमंतांची मुलं शिकत होती. आता शाळा या मराठी माध्यमाच्या राहणार आहेत स्तर आणि अभ्यासक्रम हा कॉन्व्हेंट स्वरुपाचा राहणार आहे. परंतु स्तर व अभ्यासक्रम हा जरी कॉन्व्हेंट स्वरुपाचा असला तरी कालच्या शिक्षणालाही वा अभ्यासक्रम आणि स्तरालाही नावबोटं ठेवता येणार नाही. कालचाही अभ्यासक्रम त्यातच स्तर आणि तेवढंच शिक्षणही तेवढंच महत्वाचं होतं. यात शंका नाही. समजा कालचं शिक्षण जर आत्मनिर्भरतेला बळ देणारं नसतं तर कदाचीत आज जो अभ्यासक्रम तयार केल्या गेला. तोही कदाचीत करता आला नसता हे तेवढंच खरं.
******************************************
जातीआधारावर निर्माण झालेला तो खटला. आज दिक्षानं न्यायालयात दाखल केलेला तो खटला. ती उच्च न्यायालयात जरी अपयशी ठरली असली तरी तिनं हिंमत हारली नव्हती. तिनं तो खटला पुन्हा एका नव्या जिद्दीनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केला. ज्यात त्या खटल्यातील तथ्यांश एका खंडपीठात तपासण्यात आलेत. त्या खटल्यातील बारकावेही लक्षात घेण्यात आलेत. त्याचे फायदे तोटे अभ्यासण्यात आलेत. ज्यातून फायद्याचा विचार केल्यास फायद्यापेक्षा तोटेच जास्त होते. जातीनं कित्येक उपवर मुलामुलींचे जीव गेले होते. जातीनंच अंधश्रद्धा पसरवल्या होत्या व जातीनंच कित्येकांवर अत्याचारही केले होते. हाच भाग लक्षात घेवून सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. ते म्हणालं,
"जात ही तसं पाहिल्यास नष्टच व्हायलाच हवी. कारण जातीचे फायद्यापेक्षा नुकसानच जास्त आहे. परंतु ती सरासर नष्ट केली जावू शकत नाही. कारण ती नष्ट व्हायला बराच वेळ लागू शकेल. त्यासाठी जनमत तयार होणं गरजेचं आहे. ते जेव्हापर्यंत निर्माण होत नाही. तेव्हापर्यंत जात ही नष्टही केली जावू शकत नाही. मात्र न्यायालय अशिलाला एक संधी नव्हे तर निर्णय देत आहे की जर तिला तिची जात तिच्या मुलांसमोर शाळेत दाखल करतांना टाकायची नसेल तर तिची ती कृती समर्थनीय राहिल. त्यासाठी तिला बंधन नको आणि भविष्यातही जर एखाद्याला तिच्यासारखी कृती करायची असेल वा आपल्या मुलांना शिकवितांना त्यांच्या नावासमोर जात लावायची नसेल तर त्यालाही तशा स्वरुपाचं बंधन नको. याची मुभा या निकालाच्या पाश्र्वभूमीवर देत आहे. हाच न्यायालयाचा अंतिम निर्णय आहे व यानंतर कोणाला आपल्या नावासमोर जात लिहायची नसल्यास हाच पुरावा ग्राह्य धरण्यात यावा. हाच न्यायालयाचा या प्रकरणात अंतिम निर्णय आहे."
न्यायालयानं दिक्षाला तिच्या प्रकरणात दिलेला निर्णय तिला योग्य वाटला होता. तिला अतिशय आनंद झाला होता. त्यानंतर तिनं त्याच निकालाचा आधार घेवून आपली मुलं, त्यांच्या नावासमोर जात न लावता शिकवली. आज ती विदेशात स्थावर झाली होती. ज्या देशात जातीव्यवस्था नव्हती तर वर्गव्यवस्था होती.
आता कुणालाही कोणीही आपल्या नावासमोर जात लावण्याबद्दल मनाई करु शकत नव्हते. शाळेतही आपल्या मुलांचे नाव दाखल करतांना जात लावण्याबद्दल शिक्षकही जबरदस्ती करु शकत नव्हते. एकंदरीत सांगायचं झाल्यास जात विरहीत समाज तयार होवू लागला होता.
आता लोकं आपल्याच जातीची कामं न करता कोणत्याही जातीची कामं स्वखुशीनं करु लागले होते. ज्यातून त्यांना आनंद प्राप्त होत होता. कामं करतांनाही जात महत्वाची नव्हती तर काम हेच ब्रीद होतं व काम महत्वाचं होतं.
न्यायालयातील प्रकरण निवळताच न्यायालयीन लढाई जिंकलेल्या दिक्षाला भेटायला तिचा पती आला असता त्यानं तिचं अभिनंदन केलं व आपण आपला संसार नव्यानं सुरु करण्याबाबत तिला विनंती केली. परंतु तिनं ती विनंती धुडकावून लावली व तिनं गोपालशीच विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ती गोपालशी विवाहबद्ध झाली होती.
दिक्षाला गोपालची व्हॅलेंटाइन दिवसाला गुलाबाचं फुल देण्याची कृती पटली नाही. परंतु त्यानं केलेली सोबत तिला पटली होती. त्यातच निकाल लागल्यानंतर तिनं त्याचेशीच विवाह केला होता व ती त्याचेसमवेत सुखी राहू लागली होती.
आज तिची मुलं विदेशात स्थायिक झाली होती. ज्या देशात आपल्या नावासमोर जात लावण्याची पद्धत नव्हती. तिही अतिशय सुखी होती व आपल्या आईनं केलेल्या कष्टाबद्दल कृतज्ञताही व्यक्त करीत होती.
आज दिक्षा व गोपाल म्हातारे झाले होते. त्यांच्या डोळ्यानं बरोबर दिसत नव्हतं, ना कानानं बरोबर ऐकायला येत होतं. परंतु ते आजही लोकांचे चाहते बनले होते नव्हे तर मार्गदर्शक बनले होते. त्यांनी जणू आपल्या कृतीनं लोकांचे डोळे उघडले होते.
***********************************समाप्त ************