कमलाकर," त्याचे प्रण आज पुर्ण होणार , तू शंभरावा आहेस . सखाराम तो शैतान पुन्हा नव्या ताकतनीसी ( ताकदीने) जिवंत होणार व ह्या पृथ्वीतलावर हाहाकार माजवणार . तुला आम्ही वेळीच सावध केले आहे , तू लवकरात लवकर इथून पळ , थोड्याच वेळात तो इथे येईल ."असे म्हणत तो कमलाकरचा आत्मा नाहीसा झाला , त्याच बरोबर सर्व आत्मे नाहीसे झाले . ते सर्व मिळून त्या श्वेतकमलच्या शैतानी शक्तींचा सामना करू शकत नव्हते , बहुतेक त्यांना पुढील संकटाची चाहूल लागली असावी . ते सर्व आत्मे क्षणात तिथून नाहीसे झाले . सखारामच्या हातापायाला कंप सुटला होता . श्वेतकमलची हकीकत ऐकून तर तो पुरता हादरला होता . सखाराम थरथरत्या अंगाने आपल्या जागेवरून उठला . त्याने संपूर्ण घरात नजर फिरवली . घराला खूप सारे दारे व खिडक्या होत्या , सगळ्याच खिडक्यांना लोखंडी गज होते . सखारामला कोपऱ्यात एक दार किलकीले उघडे असलेले दिसले , ज्यातून पिवळा प्रकाश बाहेर पडत होता.सखारामने त्या दिशेने आपली पावले अलगद उचलली . तो दाराजवळ येऊन पोहोचला , त्या थोड्यासा उघड्या असलेल्या दारातुन त्याने आतमध्ये डोकावून पाहिले कही पायऱ्या खाली जात होत्या . खाली एक मोठे तळघर होते , तिथे सर्वत्र एक उग्र वास पसरला होता . सखारामची नजर एका कोपऱ्यात गेली तिथे मानवी हाडांचा ढिग साचला होता , त्याच्याच बाजूला एक भट्टी सुध्दा होती . समोरच श्वेतकमल व त्याची बायको डोळे बंद करून मंत्र उच्चार करत होते . तिथे बळी देण्यासाठीचीही व्यवस्था केली होती . त्याच्याच बाजूला दोन लाकडी खोके होते , ज्यात हिरव्या रंगाचे द्रव्य तरळत होते . सखारामला कळायला वेळ लागला नाही की त्यात श्वेतकमल व कमळाचे मृतदेह सुरक्षितपणे ठेवलेले होते . श्वेतकमल बसला होता त्याच्याच बाजूला काही माणवी कवट्या होत्या जी लाल रंगाने रंगवलेली होती , जे वर्तुळाकार होते व त्यांवरती कापराचे गोळे पेटत होते , त्यांच्या मधोमध एक हळदीकुंकवाने माखलेली मानवी कवटी होती जिच्यावर एक मोठा कापूर पेटत होता.जिथे श्वेतकमल व कमळा बसलेले होते त्यांच्याच समोरच एक लहानसे शिशू होते, जे अधांतरी तरंगत होते , ज्याच्या शरीरावरून तेलासारखे चिकट द्रव्य ओंघळत होते . तो सर्व प्रकार पाहून सखाराम पुरता हादरला होता . त्याचे सर्व अंग शहारून आले होते . तेवढ्यात श्वेतकमल आपल्या जागेवरून उठला. सखारामला कळायला वेळ लागली नाही की तो आपल्या दिशेने येत आहे . सखारामने जोरात आपले पाऊले उचलली , तो वेगाने समोर असलेल्या दरवाजाकडे पळू लागला , दोन पाऊलांच्या अंतरावर तो दरवाजा होता .सखारामला अचानक घर हालल्यासारखा भाष झाला , तो दरवाजा ऐवजी भिंतीवर जाऊन आदळला . सखाराम जोरात खाली कोसळला , त्याच्या मानगूटीला कोणाची तरी घट्ट पकड बसली व ते त्याला ओढत नेऊ लागले. सखारामला त्याचा चेहरा अंधुकशा दिसला तो श्वेतकमल होता . जोरदार भिंतीवर आदळल्यामूळे काही वेळातच सखारामला ग्लानी आली .
सखारामचे डोळे उघडले गेले . त्याने सर्वत्र नजर फिरवली . मघाशी पाहिलेले तळघर , त्यातच तो होता . त्याने उठण्याचा प्रयत्न केला , पण तो परत खाली कोसळला . त्याला आपले अंग बधिर झाल्यासारखे जाणवले . समोरच मंत्र उच्चार करत असलेला श्वेतकमल उठला. त्याने समोरच असलेले खंडग उचलले , ज्यावर सुकलेले रक्त माखले होते . त्याने आपल्या बायकोला आरती करण्याचा इशारा केला. ती उठली त्या वर्तुळाकार लाल मानवी कवट्यांच्या मधोमध एक हळदीकुंकवाने माखलेली मानवी कवटी होती . ती कवटी कमळाने उचलली व त्याने ती शैतानाला ओवाळू लागली .श्वेतकमलने खंडग वरती उचलले. आता वाचण्याची कोणतीच आशा सखारामडे नव्हती . त्याने समोरच वर्तुळाकार रचलेल्या लाल मानवी कवट्यांवर एक जोरदार लाथ हानली , कवट्या हवेत उडाल्या . सखारामने मृत्यूच्या भयाने आपले डोळे गच्च बंद केले .श्वेतकमलने खंडग हवेत फिरवले .त्या उडालेल्या कवट्यांपैकी एक कवटी कमळाच्या हातात असलेल्या त्या मानवी कवटीला जाऊन आदळली . त्यासरशी तिच्या हातातून ती कवटी खाली पडली व त्यावरती असलेला कापूर त्या शैतानाची स्थापना केलेल्या लहान नवजात बाळाच्या ( शिशू) शरीरावर पडला ; त्यासरशी त्याने पेट घेतला . (हि सर्व घटना क्षणार्धात घडली . )त्याचबरोबर श्वेतकमल व कमळाचा आत्मा सुध्दा आगीच्या लोंढ्याने पेटू लागला . श्वेतकमलच्या हातात असलेला खंडग खाली पडला . खोलीत आग पसरली.श्वेतकमल आणि कमळाच्या ओरडण्याने संपूर्ण खोली दनानली होती . सखारामच्या तर काणठळ्या बिसल्या होत्या . सखारामने वेळ न दवडता तळघरातून पळ काढला , संपूर्ण घरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. सखारामने घरातून बाहेर उडी घेतली . तो मागे न बघता जोरात पळत होता . शेवटी तो वाटेवर आला . त्याने मागे वळून पाहिले ते संपूर्ण घर आगीच्या वेढ्यात सापडले होते. आगीचे लोट मोठाले आकार हवेत नाचत होते , काळ्या धुराचे लोंढेचे लोंढ हवेत उडत होते .सखाराम परत पळाला , त्याचे पाय जमिनीवर नव्हते संपूर्ण शरीरातून घाम ओंघळत होता . त्याला जोराची धाप लागली , तो दमून कुठे थांबला . हवेत त्याला एकप्रकारचा गारवा जाणवू लागला .इतक्यात त्याच्या कानावर कोणाची तरी हाक पडली . मागून एक घोडागाडी येत होती . त्या घोडागाडी हाकणाऱ्यानेच सखारामला हाक मारली होती . पक्ष्यांचा किल-बिलाट ऐकू येत होता , हवेत आणखीनच गारवा वाढला होता . ती घोडागाडी सखाराम जवळ येऊन पोहचली . त्यात घोडागाडी हाकणाऱ्या शिवाय कोणी नव्हते . तो घोडागाडी हाकणारा सखारामला म्हणाला ," कुठे चाललात पाव्हणं , फार दमलेले वाटतात, मी सुद्धा ह्याच वाटेने चाललेलो आहे या बसा ! "सखाराम घोडागाडीत चढला . त्या माणसाने घोडा पळवला.त्याने सखारामची विचारपूस केली . सखाराम त्याला म्हणाला," आपण कोण आपली ओळख नाही पटली ?"तो म्हणाला ," अच्छा ! मी जवळच्याच गावचा सावकार आहे , आज रामपुरला जत्रा आहे म्हणूनच निघालो , रात्री निघण्यापेक्षा सकाळी निघणे बरे ! रात्री त्या श्रापित गावाचा त्रास असतो . पाहिले नाही पण पुष्कळ काही ऐकलेले आहे त्याविषयी . असे म्हणतात की ते गाव फक्त रात्रीच दिसते ; आमच्या गावातील कित्येक तरूण ह्या वाटेने बेपत्ता झाले आहेत , ज्यांचा शोध आजही लागलेला नाही ." सावकारने एक आवंढा गिळला व तो म्हणाला ," आपण सुध्दा त्याच वाटेने आलात ना ? , काही पाहिले नाही वाटते आपण !"सखाराम त्यांच्या ह्या प्रश्नाने गप्पच होता . त्याला घडलेला सगळा प्रकार आठवला ." काय झाले पाव्हणं , असे गप्प का ?," तो सावकार म्हणाला .सखाराम दचकला ," कही नाही ........ काही नाही ......थोडा विचारात शिरलेलो होतो ."
सुर्याचे कोवळे किरण पडले होते . पुन्हा पृथ्वी नव्या तेजाने न्हाऊन निघाली होती .सखाराम आणि त्या सावकाराच्या गप्पा परत रंगल्या होत्या.................
# समाप्त #
कथा वाचल्या बद्दल मी आपले फार फार 💐 आभार व 🌹 धन्यवाद 💐 मानतो . आपल्या प्रतिक्रिया ,रेटींग़ज द्यायला विसरू नका .
मी येथला मुळचा लेखक नाही मी , प्रतिलिपिवर लेखान करत आहे .जर आपण माझ्या आणखी काही कथा वाचण्यासाठी उत्सूक असाल तर , माझ्या प्रोफाइलला भेट द्या ,
https://pratilipi.page.link/H42A5abJ9R2tWABc8