Shrapit gaav - 3 in Marathi Horror Stories by DEVGAN Ak books and stories PDF | श्रापीत गाव.... - भाग 3

Featured Books
Categories
Share

श्रापीत गाव.... - भाग 3

       नवजात शिशू चे प्राण घेऊन त्याने शैतानी देवताची स्थापना केली व त्याला गावातील बाया माणसे व लहान मुलांचा तो बळी देऊ लागला.श्वेतकमल कडे श्रिमंती आली , धनदौलत आली , त्याला आपल्यात शैतानी शक्तींचे अस्तित्व जानवू लागले. श्वेतकमल त्या शक्तींचा उपयोग माणसांचा बळी देण्यासाठी करू लागला. कोणत्याही माणसाला तो त्याला हवे तसे संमोहीत करू लागला व त्याच्या जाळ्यात अडकलेल्या  माणसांचा तो बळी देऊ लागला.

एकामागून एक असे असे गावातील बाया माणसे व मुले बेपत्ता होऊ लागली. गावात एक प्रकारची दहशत निर्माण झाली. लोक रात्री अपरात्री घराबाहेर पडण्यास धजावू लागली. दिवसाही एकट्या दुकट्याने  फिरण्याससुध्दा घाबरू लागले ‌.गावातील शांती भंग झाली होती. भितीचे वातावरण संपूर्ण गावात निर्माण झाले होते. अस्यात कोणाला काही सुचत नव्हते.काही माणसांनी आश्रमातील साधुला बोलावण्याचा विचार केला . ते साधू आपले आश्रम चालवित असत. जिथे मोठमोठ्या राजाची मुले व सामान्य घरातील मुले शिक्षा ग्रहन करण्यासाठी येत असत.गावातील माणसांनी आश्रमातील साधुला बोलावले. त्या साधुने आपली सर्व शक्ती पणाला लावली पण तो कहीच करु शकला नाही. त्याने फक्त लोकांना एवढेच सांगितले ,"हा सर्व शैतानी शक्तिंचा खेळ आहे, आपण सर्व  संध्याकाळनंतर घरातून बाहेर निघने टाळा व दिवशाही गावाच्या वेशीबाहेर जाने टाळा."

गावातील माणसांचा आता विश्र्वास बळावला होता की गावातीलच कोणीतरी हे सर्व करत आहे.म्हणून लोकांनी गावातच सर्वत्र शोध सुरू केला. पण त्यांच्या हाती काही लागले नाही.

असल्या संकटात अचानक आलेली श्रिमंती व श्वेतकमलच्या घरातील सुख शांती बघून लोकांचा श्वेतकमलवरील शंसय बळावला . पण् श्वेतकमल ब्राह्मण असल्या कारणाने लोकांचा त्याच्यावर एक प्रकारचा विश्र्वास होता की श्वेतकमलचा ह्या घडणाऱ्या घटनेत काहीच हात नाही.दिवस सरू लागले , श्वेतकमलला आपली शिकार मिळविने फारच कठीण झाले. लोक रात्री घरात बंद व दिवसा वेशीबाहेरही फिरकत नव्हते. रात्री श्वेतकमल अधीक शक्तीशाली व्हायचा पण त्या शैतानी शक्त्या असुनही तो हतबलच होता.श्वेतकमल अगदी रागाने लालबुंद झाला होता. तो जाऊन त्या तांत्रिकापूढे उभा ठाकला . तांत्रिक आपली तंत्रक्रीया  करण्यात व्यस्त होता."काय झाले?, तुझ्या शैतानी देवाला, कित्येक बळी देऊनही तो कहीच फळ देत नाही..... आपण मला फसवले; जर का? ही गोष्ट गावाला माहिती पडली तर..तर ते मला जिवंत सोडणार नाहीत ", श्वेतकमल तांत्रिकाला म्हणाला.तांत्रिक आपल्या जागेवरुन उठला, तो श्वेतकमलला म्हणाला," मी उगाच तुला हा प्रकार करायला सांगीतला नाही मुर्खा! माझी मुलगी सुध्दा तुझ्यासोबत आहे, मी कसा काय तिला तुझ्याबरोबर संकटात ढकलु शकतो."श्वेतकमल आता शांत झाला होता. तो खाली मान घालून उभा होता. तो खालच्याच सुरात म्हणाला ," हे सगळं तर ठिक आहे पण..... तो तुमचा देव .....तो ... शैतान......"श्वेतकमलची व्याथा बहुतेक तांत्रिकाला समजली असावी म्हणून त्याचे बोलणे मध्येच तोडत तांत्रिक म्हणाला,"  बहुतेक तुझ्या साधनेत काहीतरी कमतरता असेल किंवा तो शैतानी दैवत तुझ्यावर प्रसन्न झाला नसेल , त्याला प्रसन्न कर!"" ते कसं!", श्वेतकमल उद्गारला.तांत्रिकचा चेहरा थोडा गंभीर झाला तो म्हणाला," एक नवविवाहीत जोडप्यांची बळी देऊन"."ते, अशक्य! आहे,कारण मला आता सावजच मिळणे कठीण झाले आहे, अस्यात मी नवविवाहीत जोडपे शोधू कुठे?", श्वेतकमल.तांत्रिक म्हणाला," मुर्ख ! आहेस तु , तुझ्याच घरात तुझा तरुण मुलगा आहे."श्वेतकमल ओरडलाच, " नाही हे फार अवघड आहे , ते अशक्य आहे , आधीच मी एक मुल जन्मताच गमावले आता तुम्ही मला दुसऱ्या तरुण मुलाचा बळी द्यायला सांगता."तांत्रिकाने श्वेतकमलच्या खांद्यावर हात ठेवला , तो त्याला म्हणाला ," विचार कर , तु व तुझी बायको सदा सर्व काळा साठी अमर होणार , देव ,दाणव, भुतं, प्रेत , कसाचीच तुम्हाला भिती नसनार सर्व मनुष्य तुमचे गुलाम होतील , कित्येक काळ्या शक्तींचे तुम्ही मालक असनार."श्वेतकमलच्या चेह-यावरील नाराजीचे भाव क्षणात नाहीसे झाले. तो एखाद्या राक्षसासारखा  मोठ मोठ्याने हसू लागला."पण एक गोष्ट लक्षात ठेव", तांत्रिक म्हणाला."कोणती ?", श्वेतकमल.तांत्रिक ," तुला अस्या जोडप्याची बळी द्यायची आहे जे दोघं मणाने व शरीरानेही निर्मळ असतिल ,सुध्द असतिल ..... तुझा मुलगा तर आहेच पण तुला तसी मुलगीही शोधावी लागेल."श्वेतकमल," ते अवघड नाही, मझी त्या साधूसी चांगली ओळख आहे व त्याची एक मुलगी सुध्दा आहे."

क्रमशः

श्वेतकमलने त्या साधूची भेट घेतली. एखाद्या कुत्र्याने हरणाचे कातडे पांघरावे त्याचप्रमाणे श्वेतकमलनेही सज्जनाप्रमाने वागुन साधूचे मन जिंकले.त्यातल्या त्यात श्वेतकमलचा मुलगा कमलाकर साधूचा शिष्य असल्या कारणाने, साधू कमलाकरला चांगलाच ओळखत होता त्याच्यासारखा गुणी व संस्कारी मुलगा मिळने कठीण होते. एका गुणी मुलाच्या हातात मुलीचा हात द्यायला व एका ब्राह्मणाकडे आपली लेक सोपवायला साधूला कहीच अडचण नव्हती.......दोघांचे लग्न अगदी थाटामाटात पार पडले. लग्नाच्या वेळी गावकऱ्यांना श्वेतकमलची श्रिमंती चांगलीच दिसून आली. गावकरी उत्क्रूष्ट जेवणाने अगदी तृप्त झाले व आज  इतका मोठा लग्न सोहळा बघून  संतुष्ट झाले.कधी नव्हे तो आज गावात पहिल्यासारखा आनंद पसरला होता , सर्वत्र खुषहाली पसरली होती. पण गावकऱ्यांना समजने कठीण होते की हा आनंद फक्त एका दिवसाचा आहे, कारण खऱ्या विनासाल आता कुठे सुरवात होणार होती.आज श्वेतकमलचे घर  खास सजवले होते अंधारात बाहेर- रचा आवार काही स्पष्ट दिसत नव्हता, पण आतुन भव्य असलेले घर सुदर टपोऱ्या झेंडुंच्या फुलांनी सजविले होते. दिव्याच्या पिवळ्या प्रकाशात ती पिवळी फुले आनखीनच उठून दिसत होती.आज जेवणाची खास सोय केली गेली होती. कमलाकर आपल्या बायकोसोबत जेवण्यासाठी बसला.जेवणाचा सुगंध सुध्दा वातावरणात पसरला होता,त्याने दोघांची भुक आनखीनच वाढली."आई-बाबा आपण पण आमच्या बरोबर जेवायला बसा ना ?", कमलाकरणे आपल्या आई-वडिलांना विचारले. श्वेतकमल थोडे हसत," आधी तुम्ही दोघे आपले जेवण उरकून घ्या, आम्ही नंतर जेवूं ."कमलाकर काही विचार न करता अधासासारखा खाऊ लागला. त्याच्या बायकोची सुध्दा तिच अवस्था होती. त्या बिचाऱ्या दोघांना माहीतही नसेल की आपल्याला काय होत आहे ते!.दोघांनी जेवण उरकले."बाब फार थकलोय, आम्ही झोपायला जातोय , आपण पण जेवण उरकून घ्या!", असे म्हणुन कमलाकर आपल्या खोलीकडे निघाला . त्यांना दार बंद करण्याची सुध्दा सुध्द राहीली नसावी . कारण , श्वेतकमलने त्यांच्या जेवनात गुंगीचे औषध टाकले होते. 

जे काही क्षणात विषाप्रमाने संपूर्ण शरीरात भिनते (पसरते) व  मानवाची लगेचच सुध्द हरपते. ...........ते दोघे खोलीत जाऊन तसेच खाली कोसळले.


कथा वाचल्या बद्दल व मी सर्व वाचकांचे मनःपूर्वक 💐 आभार 💐 धन्यवाद 💐 मानतो......