नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आलो तुमचा भेटीला आणि तूम्हा सगळ्यांना खीळखीळन खीळखिळून हसवायला. तर मित्रांनो, मागील भेटीत मी माझ्या शालेय जिवनातील काही निवडक प्रसंग तुमचा सोबत शेअर केले होते, आज पून्हा अजुन काही निवडक असे प्रसंग मी तुमचासाठी घेऊन आलेलों आहे. आज मी पुन्हा तुम्हाला माझा तरुणपणाचा काळात घेऊन जातो, तर आजचा प्रसंगाचा क्रमवारीतील पहिला प्रसंग आहे तो काहीसा माझ्यासोबत घडलेला होता परन्तु याचा नायक हा चिंटु हा आहे. हो या प्रसंगातिल सगळ्यात महत्वाचे कार्य हे चिंटू याचा हस्ते पूर्ण झालेले होते. मित्रांनो, हा प्रसंग थोड़ा काय जास्तीच किळसवाना आणि हास्यास्पद आहे. यात जे कृत्य केल्या गेले ते परिस्थितीचा आणि काही उद्धट मनुष्यांचा निर्लज्ज आणि उद्धट अशा वागण्यामुळे केले गेले, तर मीत्रांनो, हा प्रसंग सांगण्याची सुरुवात करण्याचा आधी मीं माझ्या मीत्राचा बाबतीत थोड़ी अल्पशी माहिती देऊ इछितो, कारण की त्या ठिकाणी आम्हाला नेण्याचे श्रेय हे त्याला देण्यात यावे. तर माझ्या या मीत्राचे
नाव आहे नागेश. नागेश हा मूलतः आंध्रप्रदेश येथील रहिवासी आहे. त्याचे बाबा हे सुद्धा ऑर्डनन्स फैक्टरी येथे कामाला होति आणि माझ्या बाबांचे सुद्धा चांगले मीत्र होते. तर हा नागेशने बारावीचा शिक्षणानंतर परोपकार करने सुरु केले ते कसे याबद्दल सविस्तर सांगतो. तर हा
नागेश त्याचा आई वडिलांचा एकुलता एक असा मुलगा आहे. त्याला तीन बहिणी आहेत आणि त्या तीन बहिणित तो एक भाऊ आहे. तर नागेशला शाळेचा काळापासूनच आर्मीचा फार नाद होता आणि आजही आहे. त्यामुळे बारावी नंतर त्याने प्रहार सारखी ही संस्था ज्वाइन केली आणि आजवर तो त्या संस्थेमध्ये आपले सहयोग देत आहे.
आज नागेश त्या संस्थे मध्ये हॉर्स रायडिंग शिकवतो मुलांना. आमचा नागेशचा स्वभाव हा आधीपासुनच फारच परोपकारी असा राहीला आणि आत्ताही आहे. म्हणून आम्ही सगळेच मीत्र नागेशचा फार रिस्पेक्ट करतो, आम्ही नागेशचा प्रत्येक गोष्टीरीला सहज हसत करण्यास सरसावत होतो. त्याला कारण ही तसेच होते आणि असायचे , नागेश सुद्धा दिवस आणि रात्र नाही पहात होता. तो दिवसाचा २४ तासांत कधीही कुणाचा ही मदतीला धावून जाणारा आहे. त्याने प्रहार सारखं संस्था तर ज्वाइन केलीच त्याच बरोबर तो फायर फायटिंगचा सुद्धा कोर्स करून जेव्हा आवश्यकता पड़ते तेव्हा तेथे सुद्धा जातो. आत्ता हल्ली तो होमगार्ड मध्ये कार्य करतो आहे. तर हा प्रसंग असा निर्माण झाला की एकेदिवशी नागेश प्रहार येथून त्याचे कार्य करून आला होता. तो आम्हाला रस्यात भेटला आम्ही सगळे क्रिकेट खेळून बसलेलो होतो आणि नागेशचे आगमन झाले. तो सरळ येऊन मला म्हणाला, "अरे यार गजू कल मेरे साथ तुम लोग एक जगह चलोगे क्या. एक काम है जीसमें मुझे तुम्हारी मदत चाहिए. इसके लिए तुमको पैसे भी मीलेंगे फ्री में नहीं करना है." एवढ़े ऐकून मी त्याला विचारले, " नागेश कहा जाना है हम आएँगे." मग नागेश म्हणाला, गजू, हमारे एक सर है हमारी संस्था में उनके किसी रिश्तेदार के यहाँ शादी है. समस्या ये है की हमारे सर प्रहार के किसी काम से कश्मीर गये है और सर ने मुझे फोन पर रिक्वेस्ट की है की उनके जो रिश्तेदार है उनकी व्यवस्था एक कोई सरकारी निवास में किया हुआ है.
तो उन्होंने मुझे कहा है की ५ से ६ लड़के उनकी सेवा करने के लिए अरेंज करना है. तो आप ये टास्क पूरा करे मेरे अबसेन्ट में."
मीत्रांनो, त्यावेळेस मी बारावी नंतर रिकामा होतोच शिवाय आम्ही सगळे मीत्र सुद्धा काही खास करत नव्हतो म्हणून आम्ही संगळे तेथे जाण्यास तयार झालो. तर ते स्थान आमदार नीवासचा जवळ एक मोठे रोहाउस होते. आम्ही सगळे तेथे गेलो तेव्हा माझ्या मित्राचा सरांचा पत्नीने आम्हाला बघीतले आणि आम्हा सगळ्यांना बोलावले. मग त्यांनी माझा मित्राला समजावले काय करायचे आहे आणि काय नाही. त्यानंतर त्या तेथून निघून गेल्या. माझ्या मित्राने मला आणि चिंटूला एका रोहाउस मध्ये पाठवले आणि उरलेल्या चार जणांना जोड़ीने एक एक रोहाउस दिला. माझ्या मित्राने आम्हाला सांगीतले की हे त्याचा सरांचे नातेवाईक आहेत आणि आज दिवसभर आपल्याला एका वेटर कम हाउस कीपरचे काम करायचे आहे. तर मी आणि चिंटू ज्या रोहाउस मध्ये होतो तेथे जवळ जवळ २० स्त्रिया आणि मुली होत्या. तसे त्या सगळया तीनही रोहाउस मध्ये नातेवाईक या स्त्रियाच थांबलेल्या होत्या. माझ्या मित्राचे सर हे आर्मितील एका मोठ्या पोस्ट वर होते आणि त्यांचे घराणे हे श्रीमंत होते. त्या अनुशंगाने त्यांचे नातेवाईक सुद्धा श्रीमंत असतील किंवा तेथे येऊन आमचा समोर अधिक श्रीमंत असण्याचा दिखावा करत असतील ते आम्हाला माहीत नाही. मग आमचा रोहाउस मधील स्त्रियांत दोघीजणी त्या माय लेकी होत्या की नाही मला माहीत नाही. तर त्या दोघीजणी विनाकारण आम्हाला त्यांचा श्रीमंतीचा रौब दाखवू लागल्या होत्या, दिसायला त्या दोघीजणी सुंदर होत्या परन्तु मुलगी ही फारच सुंदर होती. त्या दोघा मायलेकी मध्ये आईचा एवजी ती मुलगी फारच नाकचढ़ी होती. त्याच बरोबर तीला दुसऱ्याचा सोबत बोलण्याची शिस्त नव्हती. ती सतत आम्हा दोघांना घालून पाडून बोलत होती आणि आमचा वर हुकुम सोडत होती.
त्या दिवसभर काय घडले ते मी तुम्हाला सविस्तर सांगतो, आम्ही दोघेही तेथे गेल्यावर आम्हा दोघांना सगळ्या स्त्रियांना पाणी सर्व करण्यासाठी सांगीतले, तेव्हा सगळया स्त्रियांनी पाणी घेतले परन्तु त्या नाकचढ़ी मुलीने ते घेतले नाही. तीने फरमान सोडला मला आइसक्रीम
पाहिजे म्हणून, मग मी गेलो आणि तीला आइसक्रीम आणून दिली, तर ती काय म्हणते, " नॉन सेन्स थर्ड क्लास पीपल तुला काय अक्कल आहे की नाही. एकदा काही मागीतले तर काय पाहिजे आणि काय नाही पाहिजे ते विचारायचे हे नाही शिकले काय तुम्ही. गाढवासारखा मान हलवत गेला आणि हे काय घेऊन आला." असे म्हणून तीने ती आइसक्रीम खाली फरशीवर फेकून दिली. मग मला म्हणाली, " आधी हे साफ़ कर आणि मला वेनीला फ्लेवरची आइसक्रीम आणून दे." आम्ही मध्यम वर्गीय परिवारातले होतो तरीही कोणीही आमचा सोबत असे कधी वागले नव्हते याचा अगोदर. याचा आधी आम्ही अनेको लग्नाचे कार्यक्रम मदत म्हणून पार पाडले. त्या वेळेस तेवढ्या स्त्रियांत आम्हाला सरळ सरळ अपमानीत केल्या गेले होते. मी मग दूसरी आइसक्रीम आनण्यासाठी गेलेलो असतांना चिंटूने त्यांना नाश्ता आणून दिला तर त्या मुलीने ती नाश्त्याची प्लेट धुडकावून लावली आणि म्हणाली, " श्रीमंत लोकांना बघून वाट्टेल तेवढे पैसे घेता आणि बेचव असे खाद्य देता नॉन सेन्स लोक" आता चिंटू बिचारा त्या धुडकवलेल्या प्लेट मधील नाश्ता उचलु लागला तर त्याला एक एक कण साफ़ करण्यास लावला त्या भवानीने. त्यानंतर तीने त्यांचे सामान तेथून उचलून दुसऱ्या रूममध्ये न्यायला सांगीतले आणि ती रूम साफ़ करायला लावली.
शेष पुढील भागात........