Niyati - 58 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 58

Featured Books
Categories
Share

नियती - भाग 58














भाग 58



आपल्यासाठी ती स्वतःच्या इच्छा आकांक्षा... संयमात ठेवते..
सहवासाची आस तिलाही असते त्याला माहीत होते.... दोघांच्याही भविष्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे हे दोघांनाही समजत होते...





एवढ्यात त्याची नजर तिच्या चेहऱ्याकडे गेली...
.... आणि...

मोहित मनात तिच्याकडे पाहत.....
"किती सुंदर दिसते आहे...??? नेहमीच जेव्हा बघावं तेव्हा सुंदर कशी काय दिसते बरं....??"

ती स्वतःच्या डोक्यात खाली हात घेऊन निवांत झोपलेली असते. मोहित तिच्या कपाळावरची केस कानामागे करत तिला हळू आवाजात....
"ए मायू.... उठ ना गं..... किती दिवस झाले आपण बोललो नाही.... आरामशीर... तुझ्यासाठी मी वेळ काढलाय उद्या आणि तू अशी झोपलीयेस...."

त्यावर ती झोपेतच पुटपुटते....

"अम्म. ....मोहित....जा बाबा... तू फक्त स्वप्नातंच मला वेळ देतोस...
जा मग ....मी ....तुला पण स्वप्नातच किशी देते...अम्म...."


असं म्हणत ती ओठांचा चंबू करून मान उंचावून हवेतंच किस 
करते...

झोपेतच बोलू लागते...

"उद्या सुट्टी आहे तर किती प्लॅन केला होता मी... तुला त्याचं काहीच नाही... मी ऑनलाईन विकत घेतलेलं काहीतरी माझ्या आवडीचे... मला घालून दाखवायचं होतं ना... मला सेलिब्रेट पण करायचं होतं तुझ्यासोबत... सिक्स मंथ एनिवर्सरी...
मी आता बोलणारंच नाही तुझ्याशी..... तू स्वप्नातच फक्त चांगला राहतो...जा तू..."

डोळे किलकिले करून झोपाळू आवाजात त्याच्याकडे पाहत
पुटपुटली... आणि त्याला "जा तू "..म्हणताना आणखीन 
जवळ ओढून घेत होती स्वतःजवळ......

त्यामुळे तिच्या सर्वांगाचा स्पर्श त्याच्या शरीराला होत होता त्यामुळे त्याला आता उत्तेजित झाल्यासारखे वाटत होते.

मोहितला तिच्या असे बोलण्याने थोडे... हृदयाला भिडल्यासारखे होते... आणि तो तिच्या कानाजवळ जाऊन हळूच कुजबुजात म्हणाला....
"ए राणी ...उठ ना यार...."
म्हणत कानाची पाळी दातात घेऊन हळूच चावत.....
तिच्याकडे पाहतो... ती डोळे अर्धवट खोलून...
पुन्हा बंद करत....
"नाही... सगळं स्वप्नात होत आहे..."

मोहित हळूच खाली घसरत तिच्या खोल गळ्यावर ओठ 
टेकवत मान वर करून तिला हळूच म्हणाला आता...
"खरंच .....हे स्वप्न नाही...गं.. राणी...."

असं म्हणत तिथे आपली ट्रिम केलेली दाढी हळुवार घासतो.
त्यावर ती झोपाळूच अवस्थेत....."अम्म.... सर्व खोटं आहे.."


त्यावरून आता त्याला समजते की...
आपली मायराने रोज किती किती वाट पाहिली आहे...??


आता  त्याला स्वतःवर राग येऊ लागला होता.... तिच्या मनाच्या अवस्थेचा विचार करून त्याला हृदयाला टोचल्यागंत झालं....
तो जास्त वेळ वाट पाहू शकत नव्हता.. तो डेस्पिरेटली मग हळूच मानेवर धूसमुसळेपणा करून... तिच्या ओठांवर येतो...
ओठांची पाकळी ओढून घेतो स्वतःच्या ओठांत... आसुसून किस करू लागतो... आता मायराही प्रतिसाद देऊ लागते.
बेधुंद होतात दोघेही... तिला तर आत्ताही वाटत होते की ती स्वप्नातच आहे.... 



पण जसं मोहितला जाणवून आले की ....
अजूनही ती स्वप्नातंच आहे तर त्याने हळूच आता चावा घेतला तिच्या ओठांचा... ती कळवळली आणि आता पूर्णपणे जागी झाली.



मोहित हळूच कुजबुजत म्हणाला....
"मायू.... मला माहित आहे ...तू दिवसभर काम करून थकून जातेस.... माझाही अभ्यास असतो.... ना..... या गोष्टीमुळे मी तुला वेळ देऊ शकत नाही ......मलाही वाटतं गं तुझ्यासोबत वेळ घालवावा..... तुझ्यासोबत गोष्टी कराव्यात..... पण जमतंच नाही आहे ... 

मायरा....त्याच्या गालावर हात फिरवीत म्हणाली....
"आपल्याला आपले ध्येयंही पूर्ण करायचे आहे ना ..मोहित.
तेव्हा जास्त विचार करणं सोडून दे... तू आपल्या अभ्यासावर फोकस्ड रहा फक्त...."


मोहित....
"कधी कधी मला वाटतं गं....पण मग... असं वाटतं...
तूही एवढी थकून असतेस तर.....मला असं वाटते की अजून आपण जर जवळ आलो... त्यात .... पुन्हा थकून जाशील म्हणून मग मी दुर्लक्ष करतो ....संयम ठेवतो ....  
पण उद्या आता तुला सुट्टी आहे .....मी पण माझा आजचा आणि ......"


तो बोलतंच होता पुढे पण त्याचे बोलणे काही तिने पूर्ण होऊ दिले नाही...

"शूsss.... बाकी बोलणं नंतर... हा आपला क्वालिटी
टाईम आहे .... उपयोग करून घेऊया...😜
मला टाईम वेस्ट करायचा नाहीये....."

असे म्हणत ती त्याच्या कुशीत जात.... त्याच्या शर्टाच्या दोन बटना खुल्या होत्या.... तर त्याच्या उघड्या छातीवर ओठांनी धूसमुसळेपणा करत बोलली.. होती....

क्षणात त्याच्या ऋदयाची धडधड वाढली.... 
तिच्या त्या कृतीने शरीर रोमांचित होऊन थरथरून गेलं एकाएकी... त्यांचं शरीर आतून तप्त होऊन अग्नी 
भडकल्यागंत वाटू लागले त्याला...

न राहवून त्याने शर्ट अंगातला काढून टाकला.....
तिला जवळ ओढून घट्ट मिठीत पकडून माने जवळून गंध श्वासात भरून घेतला,....
त्याला अचानक आठवलं....
तिच्या कपाळावर आलेली केस बोटांनी हळूच बाजूला
करून म्हणाला हळुवारपणे....

"ए मायू.... काय घेतलं आहेस तू.....???
जा ऊठ... ते घालून ये... मला बघायचंय तुला त्याच्यात....."

तशी तिलाही त्या वस्तूची आठवण आली... आणि तिचे आता गाल अजून लाल भडक झाले...

मायरा....
"...ते मला लाज वाटत आहे...."


तिच्या त्या नाजूक गुलाबी हास्याने त्याच्या अंगातल्या 
प्रीत फुलांनी सप्तरंगांची उधळण केली...

तिच्या गोऱ्यापान नितळ अंगाशी किंचितशी लगट करून केसांच्या लहरी खोडकर बटांना पुन्हा बळेच कानामागे रेटले
आणि नजरेनेच तिला इंसिस्ट केले घालून घेण्यासाठी....

तशी ती त्याच्याकडे लाज भरल्या चोरट्या नजरेने पाहत उठली आणि..... तिच्या काहीतरी लक्षात आले.....

खाली बघत उजव्या पायाच्या अंगठ्याने फरशीला खोरत
नजरेचा एक कटाक्ष त्याच्याकडे टाकत म्हणाली....
"घालून येते मी ...पण तू इकडे पाठ कर... तेव्हा मी घालेल."


मन तर त्याचे अजिबात नव्हते पण....
तिने जे काही आणलं आहे ....ते लवकर घालावं ... 
या उद्देशाने त्याने कड पलटला......



मनातला प्रेमपूर तर दुथडी भरून वाहत होता जोरजोराने 
आतून येणाऱ्या लाटांनी पण तरीही ......
त्याने नेहमीप्रमाणे संयम ठेवला होता....

अगदी एका मिनिटांतच त्याला जाणवले काहीतरी आणि त्याने वळून पहिले....




तर तो एकदम स्तब्धच झाला... निशब्द झाला...
जे आता त्याला दिसत होतं... ते स्वप्न आहे की काय... असं वाटण्याची वेळ त्याची आली होती... त्यामुळे त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता....


तो एकटक तिला वरून खालीपर्यंत पाहत राहिला फक्त...
स्वप्नात असल्यासारखा उठून उभा झाला आणि तिच्याकडे येऊ लागला हळूहळू....

दोघांचे पुढचे सारे संवाद जणू मूके झाले होते..

शांत सागरासारखा तो.... त्याच्या मनातल्या भावनांमध्ये उठलेली खळबळ तिला समजली...
ती एक पाऊल मागे जाणार तर त्याने तिचा कंबरेत हात घालत तील जवळ ओढले...
तिच्यावर प्रेमळ आक्रमण करत घोगऱ्या आवाजात म्हणाला....
"...सेक्सी दिसत आहेस...."

तिने एक स्लीवलेस लॉन्ग टी-शर्ट... निलेंथ असा घातलेला होता....

त्याने तिला हळूच उचलून घेतले आणि तसे तिचा तो ढगाळ निलेंथ टी-शर्ट मांड्यांपर्यंत वरती आला... तर....


तिला फारच लाजल्यागंत झाले....

तिला तो खाली सरकवायचा होता म्हणून त्याच्या गळ्यात गुंफलेला हात खाली घेतला मायराने.... तसे त्याने हळूच
तिला खाली सोडल्यासारखे केले....
लगेच दचकून तिने हात पुन्हा त्याच्या गळ्यात गूंफला...
तसा तो मिश्किल हसत तिच्याकडे एक डोळा मारून पाहू लागला....
प्रत्युत्तर म्हणून तिनेही गोड चावताळून त्यांच्या मानेवर हळूच लाडे लाडे चावा घेतला.....

मोहित....
" बदला घेण्यात येणार आहे आता याचा.... हां..."

त्याच्या या हळूच बोलण्याने आणि त्याच्या होणाऱ्या नरम श्वासाने ती मोहरून गेली होती...
तो तिच्या या रूपाकडे स्वतः भान हरपून पाहत होता...
दोघेही एकमेकांचे होण्यासाठी आतुर होते..
मोहितनेही तिला अलगद बेडवर ठेवले....


.....♥️🌿
या आपल्या पलंगावर छोट्याशा
नाही कोणत्या फुलांचा गंध
तुझाच गंध रानी इथे दरवळतोय आजही 
मी तर तुझ्यातंच झालो गं पूर्ण धूंद
.....♥️🌿
ये अशी जवळ माझ्या
अंग अंगाशी हृदय हृदयाशी स्पर्शू दे
येऊ दे रोमरोमी माझ्या शहारा शहारा 
धमान्यांतले रुधिरं सारे पून्हा भडकु दे
....♥️🌿
मान तुझी भासे सुराहीदार
ओठ भासे गुलाब पाकळ्या
थरथरते हे तुझे यौवन आजही 
भडकवतेय या देहाच्या जाणीवा सगळ्या
......♥️🌿
स्पंदने धडधडली हृदयांची
धुंद प्रीतीचे संगीत बेधुंद मिसळले
श्वास श्वासात गुंफले हळूच
सादाला प्रतिसादात चिंबचिंब प्रीतीत डूंबले
.....♥️🌿
खुले मुक्त स्वच्छंद पुन्हा
पुरी रात बेधुंद बेधडक पुन्हा होऊ लागली आज
स्पर्श स्पर्शांत फक्त माझाच सगळा हक्क तनी मनी
वाटे दोघांनाही रजनी गतिमंद व्हावी आज
.....♥️🌿
पिऊन रस डाळिंबी तरी आतूर दोघेही 
स्पर्शिता लावण्य-रांगडे स्वरूप भान सुटले
गळून पडले वस्त्र आपोआप सारे 
एकमेकांना पुन्हा सर्वार्थाने समर्पित झाले
.....♥️🌿
©️✍️D.Vaishali

.....
उशीर झाला तरी दोघेही आज तसेच झोपलेले होते...
मोहितही लवकर उठून रनिंगला जायचा तोही गेला नव्हता...
थकलेले शरीर दोघांचे....
ते....
तसेच... पुन्हा...



🌹🌹🌹🌹🌹